वेलांवरेील फळगळती रोखण्याविषयीचा माझा अनुभव

Submitted by सुभाषिणी on 11 May, 2014 - 13:21

माझ्या घराच्या गच्चीवर मोठ्या हौसेने मी भाज्या लावल्या.जवळ जवळ वीस बावीस प्रकारच्या. भाज्या आल्या पण छान. पण काही विषेशता वेलवर्गीय भाज्यांबाबत मात्र काय चुकत होते काही केल्या कलेना. फलधारणातर होत असे पण ती फळे एक तर जळुन जात नाहीतर गळुन पडत.पुस्तके वाचली, नर्सरीत विचारले,रोज प्रदर्श्नात एक् जण म्हणाले एकापेक्शा जास्त वेल लावा.खतेबदलुन पाहीली.काही फरकच पडत नव्हता.
सतत डोक्यात विचार घोळत असेच. असेच एकदा टिव्हीवर कोणतासा प्रोग्राम चालु होता.लिंबाचे उत्पादन कसे वाढ्वावे याबाबतचा. आणि त्यात जे दाखवत होते ते पाहुन मला वाटले हा उपाय करुन तर पाहुया. आणि काय सांगु भरभरुन यश मीळाले.
हैड पोलीनेशनने हे यश मीळाले.दुधी भोपळा, कारले, दोडकी ,काकडी या भाज्यांच्या बाबतीत खुप उपयोग झाला.या वेलांना नर व मादी अशी दोन प्रकारची फुले येतात. नर फुल आकाराने थोडे मोठे असते आणि मादी फुलछोट्या फळाच्या पुढे आलेले असते. अशा मादीफुल फुलले की नर फुलाचे परागकण मादी फुलच्या मध्यभागी पोचवावे लागतात. पेंटीग ब्रशने, नरफुल मादीफुलावर हळुवार घासुन इ.आणि हे काम शक्यतो सकाळी लवकर करणे गरजेचे असते.
फळभाज्यांचे वेल पुन्हाम्हणुन लावणार नाही इतकी निराश झालेली मी अता या वेलांवर फार खुश आहे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. जर दुसर्‍या वेलावरचे परागकण मिळाले तर जास्त चांगले. कापसाच्या शेतातही असे करतात. आणि या कामासाठी स्त्रियांचेच हात आवश्यक असतात कारण त्या फार काळजीपूर्वक व कौशल्याने हे काम करतात.

चांगली गोष्ट केलीत .मुळात परागीभवन करणारे किटकच कमी झालेत रासायनिक फवारे मारल्याने .दिनेश ,जास्त उत्पन्नाच्या हव्यासापायी वांझोटे कापसाचे बिटि बियाणे लावतात जे पुन्हा रुजत नाही आणि प्रत्येकवेळी नवीन बियाणे विकत आणावे लागते .सुभाषिणी ,भाजीवाल्यांकडून मुद्दामहून पिकलेले पिवळसर कारले मी आणतो त्यातले टणक बी लावून छान कारली येतात .

Flight of the pollinators मला वाटते डिस्कव्हरीवर होता. जगात ५०% फळे बनविण्याचे काम हे जीव करतात. डायनासॉर्स च्या काळात जगात फुले आणि फळेच नव्हती कारण हे पॉलिनेटर्स्च नव्हते. आपण या कीटकांचे शतशः ऋणी आहोत.

किटकांना नष्ट करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न मनुष्यप्राणी करत आहे आणि त्यात लवकरच (२०५० पर्यंत) यश मिळेल याची आशा बाळगून आहे .

धन्यवाद दिनेशदा. तुम्ही म्हणता ते अगदि खरे आहे. हे काम अगदी हळुवारपणे करावे लागते. जराजरी जास्त जोर लागला, जास्त दाब प डला तर फुलाचा मधला भागच गळुन पदतो. माझ्या हातुन एकदी असे झाले होते. अतीशय वाइट वा ट्ले हो ते त्यावेळी.कोण्त्याही फुलाला इजा पोचवन्याचा अपल्याला काय अधिकार आहे. पण या अनुभवामुळे मी हे काम जास्त काळजीपुर्वक करायला लागले.अनुभव हाच आपला उत्तम गुरु असतो नाहीका?