Submitted by pltambe@yahoo.co.in on 21 April, 2014 - 04:40
ज्येष्ठ नागरिकांचे हितगुज
मी एकज्येष्ठ नागरिक आहे. मला समवयस्क मित्रांबरोबर गप्पा माराव्यात असे वाटते. माझे प्रश्न मला त्यांचेशी शेअर करायचे असतील जेष्ठांचे प्रश्न,आरोग्य,आहार विषयक हितगुज करण्यासाठी एखादा ग्रुप आहे का ? या साथी मायबोलीवर काय सोय आहे? कुणी सांगेल का.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काका तसे गृप मला तर काही
काका तसे गृप मला तर काही दिसले नाहीत. आणी असतील तर माहीत नाहीत. मला वाटत की तुम्ही आणी झक्कीच या माबोचे मोस्ट सिनीयर मेम्बर आहात. बाकी अजून तुमच्या वयाचे बाकी कुणी माबोवर दिसले नाहीत.
माबोवर वय वर्षे १८ ते वय वर्षे ४५ च्याच दरम्यानचा वयोगट सध्या कार्यरत दिसतोय. आणी त्यातुन ७५ टक्के हे नोकरी तसेच देश परदेश वास्तव्यामुळे माबोशी परिचीत दिसतायत. तुम्हीच असा एखादा गृप काढा, म्हणजे तुमचे समवयस्क ( झक्की वगैरे) त्यात मनमोकळेपणाने सामिल होऊ शकतील.:स्मित:
तुम्हीच असा एखादा गृप काढा,
तुम्हीच असा एखादा गृप काढा, म्हणजे तुमचे समवयस्क ( झक्की वगैरे) त्यात मनमोकळेपणाने सामिल होऊ शकतील<<<
झक्कींना मनमोकळेपणे सामील व्हायला काही खास अॅरेंजमेन्ट्स करण्याची आवश्यकता नाही. झक्की रोज मोजून पाच ठरलेले प्रतिसाद पोस्ट करतात. त्यातला कोणताही प्रतिसाद कोणत्याही धाग्यावर सुसंबद्धच वाटू शकेल असा असतो. त्यानंतर रोमातल्यांसकट सगळे तेथे मनमोकळेपणाने सामील होतात. अनेकांची आपापसात भांडणे होतात, दोन चार आय डी शहीद होतात, काही नवीन ड्यु आय डी निर्माण होतात, मूळ धागा कशावर होता हे तिसर्या पानापासून कोणाच्या लक्षातही राहात नाही.
आणि झक्की आणि प्रमोद तांबे समवयस्क असणे हे एकाच वर्षात एकाच ग्रहावर किती परस्परविरोधी व्यक्तिमत्वे निर्माण होऊ शकतात ह्याचे निदर्शक आहे.
(No subject)
देव काका, भिडे काका आहेत ना
देव काका, भिडे काका आहेत ना
देव काका, भिडे काका आहेत
देव काका, भिडे काका आहेत ना<<<
मुक्तेश्वर, 'काका' आणि 'आजोबा' ह्यातील मूलभूत फरक तुम्हाला समजतो का?
देव काका आणी भिडे काका
देव काका आणी भिडे काका साठीच्या आसपास असावेत.( चुभुदेघे.:फिदी:) अगदीच आजोबा काय करताय त्याना. छे!
अहो ताम्बेसाहेब, वय बघुन
अहो ताम्बेसाहेब, वय बघुन कस्ले ग्रुप कर्ताय? वय वाढले म्हणजे अक्कल आहेच असे नाही असे सान्गणारे इथेच माबोवर भेटतील, बाहेर तर चिक्कार! केवळ वय वाढलेय म्हणून मी पाया का पडू असे प्रश्न जिथे पडतात, ज्यान्ना पडतात त्यान्ना स्वतःहुन वय सान्गुच नये!
मी पण नै सान्गत, अन म्हणूनच गेली दहाबारा वर्षे सकाळ/लोकसत्तामधे चिंटू जसा झळकत आहे, तसाच गेली नऊ वर्षे इथे लिम्बुटीम्बु म्हणून वावरतोय!
खरे तर माणसान्च्या कुठल्याच झुन्डीला वय नसते!
म्हणून मी इथे जरी अनुभव/अनुभूति शिवाय एकही अक्षर लिहीत नसलो, तरी हा हा माझा असा अनुभव आहे, म्हणुन तुम्ही तसे करा वगैरे सान्गायला जात नाही! हल्लीच्या "तरुणाईला"(?) ते आवडत नाही. )
अन कुठल्याच वयाचा अन अक्कलेचा संबंध नसतो.
वयाचा संबंध असलाच तर समरसुन जगलेल्या जीवनातल्या प्रत्येक बर्यावाईट अनुभवांशी असतो (ज्याबद्दल इतरान्ना बहुधा काहीही देणेघेणे नसते
असो.
रश्मी, झक्कीन्च नाव घेतलस्/उच्चारलस! त्यान्ना आवडेल का? परवानगी घेतली का?
एक काम करा, काढाच असा ग्रुप
एक काम करा, काढाच असा ग्रुप बघुया कोण कोण नाव नोंदणी करते ते.... बघुया कोण कोण या वयाचे खरेच आहे.... आणि वयाने ज्येष्ठ असे कुठे म्हणतायत ताम्बेकाका?
@बेफि
@बेफि
आत्ता! अहो लिम्बुभाऊ, ताम्बे
आत्ता! अहो लिम्बुभाऊ, ताम्बे काका झक्कीन्चे मित्र आहेत की. झक्कीनीच तसे लिहीलेय. मग झक्कीन्ची परवानगी कशाला?:फिदी:
आणी काय हे विनीता, काका वर स्वतःच तर लिहीतायत की ज्येष्ठ नागरीक हवेत म्हणून.:स्मित:
आता काकाना देव आनन्द आणी अमिताभ टाईप मनाने तरुण पण वयाने ज्येष्ठ नागरीक व्हायला आवडेल की वयाने आणी मनाने पण ज्येष्ठ नागरीक व्हायला आवडेल ते त्यानी ठरवावे.:स्मित:
सध्या तुम्ही झाऱ्याने इतक्या
सध्या तुम्ही झाऱ्याने इतक्या तऱ्हेंच्या बुंदी झरझर पाडत आहात की तुम्हाला कोण ज्येष्ठ नागरिक म्हणेल ?बागकाम म्हणू नका ,आरोग्य ,तत्त्वज्ञान ,पाककृती असो .उद्या सकाळी उठल्यावर काय काय करायचे याची यादी आठवत रात्री सुखाने झोपणाऱ्याला ज्येष्ठ नागरीक का म्हणायचे ?
बाकी ज्येष्ठ नागरिक एकमेकांना भेटल्यावर काव्य शास्त्र विनोदांच्या सरस्वती वाहातील हा भ्रम ठरेल .एरंडाचे गुऱ्हाळ सुरू होण्याची शक्यता अधिक वाटते .
रश्मी ,बेफिकीर ,पुण्याचीविनीता ,मुक्तेश्वर कुलकर्णी ,आणि छोटा limbutimbuशी सहमत .
मी ,शंभरवजाचाळीस तुम्हास्नी चालेल का ?
बाकी ज्येष्ठ नागरिक एकमेकांना
बाकी ज्येष्ठ नागरिक एकमेकांना भेटल्यावर काव्य शास्त्र विनोदांच्या सरस्वती वाहातील हा भ्रम ठरेल .एरंडाचे गुऱ्हाळ सुरू होण्याची शक्यता अधिक वाटते>>>>उत्सुकता काय काय विषय असतील हो?
सुना कशा भांडतात,
मुलगा कसा बोलत नाही
असे?
कि
खुप दिवस झाले गुडघा दुखतोय?
पण झक्की नि ताम्बेकाकांची एकमेकांच्या विपु फार मस्त आहेत
पुण्याचीविनिता ,आत्मप्रौढीने
पुण्याचीविनिता ,आत्मप्रौढीने गारद करतात .कमी जास्त पेन्शनपायी मत्सर या दोन गोष्टी निकोप संपर्कात अडथळा आणतात .
मायबोलीकर रवी
मायबोलीकर रवी करंदीकर,विजयकुमार देशपांडे , अरुणा एरंडे ,प्रमोद देव (मुंबई) हेही माझे समवायस्कच आहेत. जेष्ठांच्या काही समस्या,काही प्रश्न ,काही व्याधी , काही आवडी ह्या कॉमन असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल चर्चा करायला असे एखादे व्यासपीठ का असू नये ? आणि इतरांनी त्यात भाग घेण्यास मला तर कलाही वावगे वाटत नाही. आत्ताच काही वेळापूर्वी अशाच एका वृद्धाला पडलेला प्रश्न मी मायबोलीच्या " कोणाशी तरी बोलायचंय “ या धाग्यावर विचारला आहे. जर असे व्यासपीठ मायबोलीने उघडले तर ते आम्हाला फारच आवडेल.
झककी म्हणजेच आनंद म्हसकर .तो माझा वर्ग मित्र आहे. आम्ही दोघे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून १९५९ मध्ये एस.एस.सी झालो. शाळेत ४ वर्षे आम्ही एकत्र घालवली आहेत. नुकतेच तो भारतात आला होता तेंव्हा मी पुढाकार घेऊन शाळेतील वर्गमित्रांचे एक पुनर्भेट स्नेह निलन सुद्धा आयोजित केले होते.
मायबोलीकर रवी
मायबोलीकर रवी करंदीकर,विजयकुमार देशपांडे , अरुणा एरंडे ,प्रमोद देव (मुंबई) हेही माझे समवायस्कच आहेत. जेष्ठांच्या काही समस्या,काही प्रश्न ,काही व्याधी , काही आवडी ह्या कॉमन असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल चर्चा करायला असे एखादे व्यासपीठ का असू नये ? <<<
सर प्रॉब्लेम इतकाच आहे की आपण घेतलेल्यांपैकी काही नांवे इथे येऊन येऊनच वृद्ध झालेली आहेत आणि त्यांना 'तुम्हाला वाटतात तसे' प्रश्न पडत नाहीत तर अतिशय भोचक प्रश्न पडतात.
लहान तोंडी मोठा घास घेऊन एक सल्ला दिला तर रागवायचा नाहीत ना?
तुम्ही 'वयाप्रमाणे हितगुज' असा एक (न वाहणारा) धागा काढा व त्यावर स्लॅब्ज ठेवा. पंधरा ते पंचवीस, सव्वीस ते पस्तीस, छत्तीस ते पंचेचाळीस वगैरे अश्या! प्रत्येक स्लॅबला एक प्रमुख नेमा व त्याने परवानगी दिल्यास इतर स्लॅबमधील सदस्य त्या स्लॅबमध्ये अधेमधे येऊन जाऊ शकतील अशी प्रोव्हिजन ठेवा.
(एवढे करूनही मी तुम्हाला सांगतो की त्या धाग्याच्या बाहेर पडल्यानंतर ते वयाप्रमाणे वागत इतर धाग्यांवर वावरतील ही अपेक्षा साफ चुकीची ठरेल).
अरे त्यांना तसा ग्रुप असणं
अरे त्यांना तसा ग्रुप असणं गरजेचं वाटत असेल तर करु द्यात ना
खरोखर त्यांचे आणि समवयस्कांचे काही प्रश्न असू शकतात आणि ते इथे डिस्कस करु इच्छित असू शकतात. आपण इतर बाफ सारखा हा सुद्धा वाचू. आपल्याकडून ज्येष्ठांसाठी काही करण्याजोगं असेल तर करु. त्यांच्या नजरेतून चुक असलेल्या गोष्टी जर दुसर्या अँगलने (म्हणजेच आपल्यासारख्या त्या एजग्रूपपासून अजून खूप लांब असलेल्या लोकांच्या दृष्टीतून) बरोबर असतील तर तसं इथे चांगल्या शब्दांत सांगू. कदाचित त्यांचा दृष्टीकोन बदलू शकतो, तर कधी आपल्या दृष्टीकोनात अजून एक अँगल जमा होऊ शकतो.
अहो मग तेच म्हणतेय की मी.
अहो मग तेच म्हणतेय की मी. तुम्हीच नवीन गृप तयार करा.
रश्मी, तूम्ही म्हणालात हो
रश्मी, तूम्ही म्हणालात हो
सर, तो शब्द ज्येष्ठ असा आहे.
सर, तो शब्द ज्येष्ठ असा आहे.
ज्येष्ठ नागरिकांची कुजबुज असेही शीर्षक सूट होऊ शकेल.
अहो काका, तुम्हीच काढू शकाल
अहो काका, तुम्हीच काढू शकाल असा धागा. अॅडमिननी काढायला हवा असं काही नाही.
ह्या बाकीच्या लोकांकडे लक्ष देऊ नका अजिबात. त्यांना त्यांच्या वयानुसार धागे काढायला मिळत नाहीत नाहीत म्हणून जळतात तुमच्यावर.
(No subject)
वयाप्रमाणे हितगुज कप्पे वाचून
वयाप्रमाणे हितगुज कप्पे वाचून मला एकदम गुड ओल्ड याहू चाट रुमची आठवण आली.

asl pls...
अरे वा ! वेमा
अरे वा ! वेमा अभिनंदन!
कार्यतत्त्पर महाबलशाली कर्तव्यपरायण वेमांनी 'उत्तररंग' काढलेले आहे हो!
काढले बर का तुमच्या साठी
काढले बर का तुमच्या साठी वेगळे पान अड्मीन ने "जेष्ठ नागरिकांच्या गप्पा "
काही वर्षांपूर्वी असा ग्रूप
काही वर्षांपूर्वी असा ग्रूप सुरु करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला तेंव्हा प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित तेंव्हा पुरेसे सभासद ऑनलाईन नसावेत.
उत्तररंग असा नवा ग्रूप सुरु केला आहे. हे सध्याचे नाव आहे, पण सर्व मिळून सभासदांनी दुसरे नाव सुचवले तर बदलता येईल.
http://www.maayboli.com/node/48636
यातून जगभरच्या ज्येष्ठ मायबोलीकर नागरिकांचे नेटवर्क तयार झाले तर मायबोलीला आनंदच आहे.
प्रमोद तांबे कल्पना छान
प्रमोद तांबे कल्पना छान आहे..मीही जेष्टनागरिक आहे..वेब मास्टर धन्यवाद.उत्तर रंग नाव छान आहे.मायबोलिकरांच्या सहवासात वय विसरायला झाल होत.
प्रमोद, अरे मला मायबोलीवर
प्रमोद,
अरे मला मायबोलीवर गंभीरपणे काही लिहायची इच्छाच होत नाही. इथल्या लोकांची बुद्धीची अनुभवाची, गंभीरपणाची पातळी पहाता इथे फक्त पोरकटपणा करायला संधी मिळते म्हणून मी इथे येतो.
आधी अनेक वर्षांनी मराठी वाचायला, लिहायला मिळावे म्हणून मोठ्या उत्साहाने नि आनंदाने इथे आलो. दुर्दैवाने व्यसन लागले. त्यातल्या त्यात खर्च नाही, प्रकृतीवर काही वाईट परिणाम होत नाही, त्यामुळे हे व्यसन बरे,
तसे मी अध्यात्म, राजकारण, समाजशास्त्र इ. बद्दल बरेच काही काही वाचले. जे समजायचे ते समजले पण त्यात आणखी काथ्याकूट काय करायचा? मला तरी त्यात उगाच काही तरी लिहायची इच्छा नाही, तेव्हढी मा़झ्या बुद्धीची कुवत नाही, मला जे करायचे होते ते इतके वर्षात केले, आता मी स्वयंकेंद्रित होऊन सतत आनंदात कसे रहायचे हे बघतो. अध्यात्माने त्याबद्दल बरेच काही काही शिकवले, पण परत तो विषय एव्हढा मोठा आहे, की ज्याने त्याने स्वतःला पटेल ते करावे, इतरांना सांगून काही उपयोग नाही. आपल्या वयाच्या लोकांना ते माहितच असते नि लहान मुलांना सांगून काही उपयोग नाही. ते सर्व स्वतः चिंतन, मनन करून समजून घ्यायचे असते.
बाकी आता या वयात तुला कसले प्रश्न पडले आहेत? मुलेबाळे सुखात, औषध, जेवणखाण, झोप व्यवस्थित आहे म्हंटल्यावर उरलेच काय? आता तुला ब्रिज खेळायचे असेल, नोकरीतील अनुभवातील गमती जमती एकमेकांना सांगायचे असतील, काही विनोद, मजेदार गोष्टी बोलायच्या असतील तर मी नेहेमीच तयार आहे.
नाही म्हंटले तर आपण इथे बोललो तर इथल्या लोकांना विनोदासाठी, टिंगल टवाळी करण्यासाठी अनेक नवीन विषय मिळतील हेच आपले contribution. कुणि म्हणायला नको की तुमचा उपयोग काय जगाला?
आणि त्याबद्दलसुद्धा मनाला चांगले वाईट काही वाटत नाही.
<< त्यातल्या त्यात खर्च नाही,
<< त्यातल्या त्यात खर्च नाही, प्रकृतीवर काही वाईट परिणाम होत नाही, त्यामुळे हे व्यसन बरे, >> झक्कीजी, व्यसनातही तोच तोचपणा येण्यापेक्षा थोडा बदल झाला तर बरंच ना !!!
झक्कीसर, सिक्सर हाणलीत की!
झक्कीसर,
सिक्सर हाणलीत की!
उत्तररंग बद्दल अभिनंदन नाही
उत्तररंग बद्दल अभिनंदन
नाही म्हंटले तर आपण इथे बोललो तर इथल्या लोकांना विनोदासाठी, टिंगल टवाळी करण्यासाठी अनेक नवीन विषय मिळतील हेच आपले contribution. कुणि म्हणायला नको की तुमचा उपयोग काय जगाला?>>>> असं काय ते!
कुणी टिंगल टवाळी केली तर वर्मी लागेल हे खरं आहे पण एवढ्या आयुष्यात अश्या गोष्टींवर मात करायला जमलं असेलच आतापर्यंत. कधीतरी हेच टिंट करणारे लोक्स तुमच्या उपयोगालाही येतील. त्यांचं वागणं "पोरकटपणा" म्हणून सोडून द्या शक्य झालं तर. घरच्यांचं देखील सोडून देत असालच 
झक्की ,कुठल्यालाही सहलीत एक
झक्की ,कुठल्यालाही सहलीत एक "साम्पल" असल्याशिवाय मजा येत नाही .कधीकधी आपणच व्हायचे साम्पल .
आणि कसे आहे, कि सगळेच विनोद
आणि कसे आहे, कि सगळेच विनोद टिंट मधे नाही मोडत, नाही का?
८१ वर्षांची माझी आई, तिच्या
८१ वर्षांची माझी आई, तिच्या पेईंग गेस्टबद्द्ल म्हणते की आहेत पोरकट पण त्यांच्या संगतीत छान वाटते,तरूण वाटते.त्याही तिला मैत्रिण म्हणून वागवतात.
अश्विनी पोस्ट आवडली
अश्विनी पोस्ट आवडली
<< ८१ वर्षांची माझी आई,
<< ८१ वर्षांची माझी आई, तिच्या पेईंग गेस्टबद्द्ल म्हणते की आहेत पोरकट पण त्यांच्या संगतीत छान वाटते,तरूण वाटते.त्याही तिला मैत्रिण म्हणून वागवतात. >> दॅटस द स्पीरीट !!!
वावावा! तांबेकाका
वावावा!
तांबेकाका अभिनंदन.
तुमच्या एका शब्दावर (सातींच्या शब्दांत) कार्यतत्त्पर महाबलशाली कर्तव्यपरायण वेबमास्तर यांनी काही तासांच्या आत 'उत्तररंग' काढला देखिल!
वर्जिनल आयडिया पेश केल्याबद्दल पुनश्च येकवार हबिनंडन.
(डिस्क्लेमरः ताम्बे काकांना मी काका म्हणत असल्याने मी अजून हापिशली 'ज्येनाना' आहे, म्हणजेच ज्येना नाही. प्लीजच नोट.)
@ वेमा,
उत्तररंग जरा जास्तच रंगीत वाट्टंय बघा.
'वानप्रस्थ' कसं राहील?
पण परत तो विषय एव्हढा मोठा
पण परत तो विषय एव्हढा मोठा आहे, की ज्याने त्याने स्वतःला पटेल ते करावे, इतरांना सांगून काही उपयोग नाही. आपल्या वयाच्या लोकांना ते माहितच असते नि लहान मुलांना सांगून काही उपयोग नाही. ते सर्व स्वतः चिंतन, मनन करून समजून घ्यायचे असते.>>>>> +१ झक्की!
अहो इब्लिस वानप्रस्थ
अहो इब्लिस वानप्रस्थ म्हणल्यावर ते एकदमच जगापासुन हटके होईल की. त्यापेक्षा आहे तो जीवनाचा तणावमुक्त उत्तरार्ध जास्तीत जास्त रन्गतदार आणी फुलत जाणारा कसा होईल हेच बघणे सोयीस्कर, त्यामुळे वेबमास्तरानी दिलेले उत्तररन्ग हे नाव जास्त समर्पक वाटतेय.:स्मित:
वेबमास्तर धन्यवाद.:स्मित: ताम्बेकाका अभिनन्दन. झक्कीना काका नाही म्हणणार. ते आपले प्राध्यापक मधुकर तोरडमल यान्च्यासारखे तरुण तुर्क् वाटतात.:फिदी:
झक्की दिवा घ्या.:दिवा:( नाहीतर काठी हाणुन कपाळमोक्ष कराल आमचा)
उत्तर रंग आवडलं
उत्तर रंग आवडलं मला.
'साठेबाजी' कसं वाटतंय?
साती लय भारी.
साती लय भारी.:हाहा:
पुण्याचीविनिता ,आत्मप्रौढीने
पुण्याचीविनिता ,आत्मप्रौढीने गारद करतात>>>> मला हे नीट नाही कळले.:अओ::फिदी:
अहो गाडगीळ तुम्ही परत काव्यात्मक लिहायला सुरुवात केलीत. जरा गद्यात लिहा.:फिदी:
रश्मी मी वाचले २-३ वेळा
रश्मी मी वाचले २-३ वेळा तेव्हा मला समजले,
मग वाटले की मी याँव मी त्यांव असे एकमेकाना सांगत असावेत ज्येना
ज्येना-दा-ढाबा असे पाकृ गृप ला नाव द्या हो वेमा
कुणी टिंगल टवाळी केली तर
कुणी टिंगल टवाळी केली तर वर्मी लागेल हे खरं आहे पण एवढ्या आयुष्यात अश्या गोष्टींवर मात करायला जमलं असेलच आतापर्यंत.
अर्थातच मस्त जमले आहे. तुम्हाला काय वाटते कुणि टिंगल टवाळी केली तर मी मनाला लावून घेतो? छे:!
कधीतरी हेच टिंट करणारे लोक्स तुमच्या उपयोगालाही येतील. त्यांचं वागणं "पोरकटपणा" म्हणून सोडून द्या शक्य झालं तर. घरच्यांचं देखील सोडून देत असालच
अहो मायबोलीवाल्यांनी मला अनेकदा मदत केली आहे, नि मला काही विचारायचे असले की इथेच आधी येतो. (मग ते म्हणतात गूगल करा!). तसे पोरकट वागण्याकडे दुर्लक्षच करायचे असते. माणूस पोरकट, वाईट नसतो. कधी कधी त्याचे वागणे पोरकटपणाचे, वाईट होते. सोडून द्यायचे ते!
माझा मान अपमान माझ्या मनावर अवलंबून. म्हंटले तर अपमान म्हंटले तर नाही. त्यात काय?
व्यसनातही तोच तोचपणा येण्यापेक्षा थोडा बदल झाला
तेव्हढे एकच व्यसन नाही हो! अनेक व्यसने आहेत. ब्रिज, क्रिकेट बघणे, पुस्तके वाचणे फिरायला जाणे, वेळ मोठा मजेत जातो.
अहो इब्लिस वानप्रस्थ म्हणल्यावर ते एकदमच जगापासुन हटके होईल की.
या बाबतीत मा़हे मत असे आहे की जगापासून एकदम हटके व्हायला नको. पण जरा विचार करून ठरवा की खरोखरच अश्या किती गोष्टी आहेत की ज्याच्या बद्दल आपण विचार करावा?
उदा. माझी सौ. व माझी वहिनी दररोज तास दोन तास चर्चा करतात की अमुक सिरियल मधे अमुक बाई असे कसे म्हणाली, अमुक माणसाने तसे का केले? भावजयीच्या सासूच्या भाचीने तिला लग्नात असा कसा अहेर कमी दिला!
गरज आहे का या गोष्टींत लक्ष घालण्याची?
मी क्रिमिया, रशिया, अमेरिका यांच्याबद्दल वाचतो पण कुणाशी वाद घालायला जात नाही की अमेरिकेने काय करावे!
भारतात मोदी पंप्र झाले की कोण तो गांधी हे मी बातम्यात वाचीन. पण बाकी चर्चा आपली फक्त मायबोलीवर, जरा बघून, काय लिहीले की लोक कसे प्रतिक्रिया देतील त्याची गंमत बघायला. मला काय करायचे आहे भारतात काही झाले तरी.