मला माहित नाही इतका खासगी विषय इथे बोलणे योग्य आहे का ते ? पण "ऐकावे जनाचे ...." यासाठी प्रयत्न करतो....
मी एका खासगी कंपनीत Accountant म्हणून काम करत आहे ... मला एक ५ वर्षाची मुलगी आहे.. आणि आम्ही गेला एक वर्ष दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करतोय... अजून काही वेगळी treatment वैगरे चालू नाहीय ....गेले काही दिवस माज्या मनात एक विचार येतोय कि आपण एक बाळ दत्तक घ्याव.. पण हा असा निर्णय आहे कि एकट्याने घेऊ शकत नाही .... सर्व कुटुंबाची साथ पाहिजे ... (माजे आई वडील माज्य्सोबातच राहतात) माज्या बायकोशी मी बोललोय पण ती पूर्णपणे तयार नाहीय ....
मला आपला प्रतिसाद खालील बाबत पाहिजे....
१) दत्तक घ्याव कि स्वतासाठी प्रयत्न करावेत....?
२) जर दत्तक घेतले तर नवजात बालक घेणेच योग्य राहील असे मला वाटते ..तुम्हाला ?
३) दत्तक मुलाला "तू दत्तक आहेस" हे सांगावे का नाही / किंवा कधी सांगावे..?
४)यामध्ये काही कायदेशीर अडचणी येऊ शकतात का ?
..आणि हो .... जर दत्तक घ्याच ठरलं तर माझी पसंती "मुलीलाच" आहे !!!
http://www.misalpav.com/node/
http://www.misalpav.com/node/11410
इथे तुम्हाला क्रमशः अनुभव कथन दहा भागात मिळेल. जरुर वाचा
तुम्ही आई बाबा तर झालात
तुम्ही आई बाबा तर झालात त्यामुळे या दत्तकाचा उद्देश नाही कळला .
srt तुम्ही आई बाबा तर झालात
srt
तुम्ही आई बाबा तर झालात त्यामुळे या दत्तकाचा उद्देश नाही कळला .>>>>
खर तर मला स्वताच मुल असण्यापेक्षा दत्तक मुल घेण्यात लाग्नाधीपासून रस होता .... आपण आयुष्यात येउन कुणाच्या उपयोगी पडत नाही अस मला वाटत ... म्हणजे आपण वाईट आहे अस नाही पण परिस्थितीमुळे इच्छा असूनहि कधी कधी मदत करू शकत नाही... दत्तक घेऊन किमान एका जीवच आयुष्य तरी सावरायला आपली मदत होईल अस मला वाटत ....
चांगला विचार आहे रणथंबोर.
चांगला विचार आहे रणथंबोर. माझ्या मुलीच्या मैत्रिणीचा भाऊही दत्तक आहे. मैत्रिणीच्या आईने आणि मावशीने आधीच ठरवलेले की पहिले अपत्य झाले की दुसरे दत्तक घ्यायचे. एकीला पहिला मुलगा झाला, दुसरीला मुलगी. दोघांनीही अनुक्रमे मुलगी आणि मुलगा एकत्रच दत्तक घेतले. आता मुलगा अकरावीत आहे. मस्त आहे ते कुटूंब. मुलालाही माहित आहे.
अर्थात मला इतर काहीच प्रोसेस माहित नाही. माबोवर या विषयावर भरपुर चर्चा झालीय. तुम्ही शोध मध्ये दत्तक हा शब्द घालुन शोधलेत तर खुप माहिती मिळेल.
तुम्हाला हवे ते अपत्य मिळण्यासाठी शुभेच्छा.
या विषयावर मायबोलीवर आधीही
या विषयावर मायबोलीवर आधीही खूप चर्चा झाली आहे. शोधून पहा.
रणथंबोर, तुमचे विचार खूप
रणथंबोर, तुमचे विचार खूप चांगले आहेत प्रश्नच नाही, पण मूल दत्तक घेण्यासाठी तुम्हा दोघांचीही मानसिक तयारी असणे जरूरी आहे. स्वतःचच मूल हवं ही मानसिकता असेल तर दुसर्या मुलावर नकळत अन्याय होऊ शकतो. आणि स्वतःचे दुसरे मूल होऊ शकत नाही म्हणून आपल्याला आणलं गेलंय हा विचार नकळत त्याच्या मनात रूजू शकतो (त्याला बर्याचदा जवळचे नातेवाईक, शेजारी पाजारी हातभार लावतात) त्यामुळे दत्तक घेण्याचा विचार पक्का केल्यास पत्नीची मानसिक तयारी असणे आणि त्यानंतर त्या मुलाशी स्वतःच्या मुलाप्रमाणे बाँडींग तयार करणे हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. बाकी कायदेशीर चर्चा मायबोलीवर आहेच. http://www.maayboli.com/node/36102
वर सगळ्यांनी आधी झालेल्या
वर सगळ्यांनी आधी झालेल्या चर्चांच्या लिंक दिलेल्या आहेतच.
पण हा बाफ 'विरंगुळा' ह्या ग्रुपमध्ये का काढला आहे ???
पराग, +१
पराग, +१
पराग +१
पराग +१
दत्तक आवश्य घ्या. मात्र
दत्तक आवश्य घ्या. मात्र त्यासाठी फर्टिलिटी ट्रीटमेंटपेक्षा जास्त पापड बेलावे लागतात त्याची तयारी ठेवा.
दत्तक प्रक्रियेत लहानात लहान मूल काही महिन्यांचं मिळू शकतं. तुमचं, तुमच्या पत्नीचं वय लक्षात घेऊन किती मोठं मूल तुम्हाला द्यायचं हे ठरतं. मुलाचं वय जितकं कमी, तितकं त्याला नव्या वातावरणाशी जुळवून घेणं सोपं.
दत्तक मुलाला "तू दत्तक आहेस" हे अचानक बाहेरून कळण्यापेक्षा लवकरात लवकर, आणि आईवडिलांकडून समजलेलं चांगलं, नाही का?
मला नक्की आठवत नाही, पण पहिलं मूल मुलगी असेल तर दत्तक बहुतेक मुलगा घ्यावा लागतो.
एक फुकट सल्ला ... प्लीज त्या दत्तक बाळाचं भलं करण्यासाठी मी हे करतो आहे असा विचार नका ठेवू हो ... यातून तुम्हाला किती समाधान मिळणार आहे ते जास्त मोलाचं.
जोडीदार तयार नसेल तर तो विचार
जोडीदार तयार नसेल तर तो विचार सोडणे बरे!
जोडीदार तयार नसेल तर तो विचार
जोडीदार तयार नसेल तर तो विचार सोडणे बरे!>>>> खरे आहे.
दत्तक घेऊन किमान एका जीवच
दत्तक घेऊन किमान एका जीवच आयुष्य तरी सावरायला आपली मदत होईल अस मला वाटत .... >>
समजा दत्तक घेता आले नाही तरी तुम्ही इतर अनेक प्रकारे अनाथ मुलांना मदत करू शकता. जसे की काही अनाथ मुलांच्या शिक्षणाचा , रहाअण्याचा पुर्ण खर्च उचलणे. ईतरही अनेक मार्ग तुम्हाला इथे माबो कर सुचवू शकतील. त्यायोगे दत्तक न घेता देखिल तुमची इतरांना मदत करण्याची ईच्छा पुर्ण होऊ शकते. आणि परत फक्त १ च मुला एवेजी तुम्ही जास्त मुलांना मदत करू शकता.
पण हा बाफ 'विरंगुळा' ह्या
पण हा बाफ 'विरंगुळा' ह्या ग्रुपमध्ये का काढला आहे

विरंगुळा म्हणूनहि दत्तक घ्यायची कुणाची इच्छा असेल तर?
हा बाफ 'विरंगुळा' ह्या
हा बाफ 'विरंगुळा' ह्या ग्रुपमध्ये का काढला आहे >>>>
मित्रानो ...मी मा.बो. वर नवीन आहे ... म्हणून जास्त माहिती नसल्यामुळे असे झालेय.( बाफ चा
fullform पण माहित नाही राव ). तरी कुणीतरी मदत करेल का हा प्रश्न कुठे असावा...??
आगावू धन्यवाद !!
काय राव साडेपाच वर्ष झाली की
काय राव साडेपाच वर्ष झाली की तुम्हाला माबोवर!
बाफ म्हणजे बातमी फलक किंवा विंग्रजीत discussion thread.
संपादन वर क्लिक करून विरंगुळा ऐवजी सल्ला हवा आहे असे बदला.
नया है वह... दत्तकाचे थोडेसे
नया है वह...
दत्तकाचे थोडेसे सर्दीसारखे असते... औषध घेतले तर आठवड्यात बरे होता किंवा नाही घेतले तर सात दिवस लागतात....
दत्तक घेतले तर घेण्याच्या प्रोसेस मधेच रांगते मूल "सज्ञानही" होऊ शकते, नाही घेतले तर आपले मूल व्हायची वाट बघणे ही तेवढेच लांबचे असू शकते..
पण गंभीरपणे सांगायचे तर अनाथ आश्रम आता फार व्यापारी वृत्तीचे झाले आहेत, तुम्ही अशा ठिकाणहून जर दत्तक घेत असाल तर अक्षरश: तुम्ही किती देणगी देता यावर तुम्हाला कुठले मूल दाखवायचे हे ठरते...
कारण फिरंगे म्हणे खूप सारे दत्तक नेतात...
एखादी वाढीच्या वयाची, जरा कमी सुंदर दिसणारी मुलगी, किंवा वाढत्या वयाचा मुलगा (म्हणजे पाळण्यात नसलेले) यांची दखल कुणीही घेत नाहीत.
ही माझी वैयक्तिक मते स्वानुभवानुसार दिलेली आहेत... सत्य वेगळे असल्यास प्रचंड आनंदी होईन मी...
काय राव साडेपाच वर्ष झाली की
काय राव साडेपाच वर्ष झाली की तुम्हाला माबोवर! >>>>>>
साडे पाच वर्ष फक्त नावाला झालीत.... पण त्या दरम्यान Active अजिबात नव्हतो ... (आपल्या नेत्यांची आठवण आली ना ?)
आता बघू थोडा वेळ मिळतोय तर सत्कारणी लावावा म्हणतोय ... तुमच्या सोबत....
खर तर मला स्वताच मुल
खर तर मला स्वताच मुल असण्यापेक्षा दत्तक मुल घेण्यात लाग्नाधीपासून रस होता .... आपण आयुष्यात येउन कुणाच्या उपयोगी पडत नाही अस मला वाटत ... म्हणजे आपण वाईट आहे अस नाही पण परिस्थितीमुळे इच्छा असूनहि कधी कधी मदत करू शकत नाही... दत्तक घेऊन किमान एका जीवच आयुष्य तरी सावरायला आपली मदत होईल अस मला वाटत ....
>>>>>>>>>>>>>>>>
हे जर तुम्हा दोघा नवराबायकोचे प्रामाणिक विचार असतील तर मूल दत्तक घ्यायचे आहे हे बिनधास्तपणे नक्की करा आणि मग त्यानंतर मी मूल दत्तक घेत आहे तर त्यासाठी काय काळजी वा सावधानी घेणे अपेक्षित आहे असे सल्ले मागा
कृपया जर तुम्हाला समाजसेवा
कृपया जर तुम्हाला समाजसेवा करण्याच्या किंवा कुणाचे तरी भले करायचे/कुणाच्या तरी उपयोगी पडायचे असे काही मनात असेल तर त्याचे इतर मार्ग आहेत..सरळ एखाद्या चांगल्या समाजसेवी संस्थेला अमुक रक्कम प्लेज करा आणि त्यांना द्या..तुमचा हेतु साध्य होइल.
मुल असणे.. स्वतःचे किंवा दत्तकही.. तर ती एक गुंतवणुक आहे..भावनांची/प्रेमाची.. दयेची नाही. त्या मुलाचे/मुलीचे संगोपन करण्यात, त्याचे कोडकौतुक करण्यात, त्याच्या आनंदात/दु:खात सहभागी होण्यात, त्याला मोठे होउन एक चांगला माणुस बनवण्यात जो आनंद तुम्हाला मिळेल हेच या गुंतवणुकीचे रिटर्न्स..
तुम्ही दिलेल्या माहितीवरुन तुमची पत्नी, तुमचे घरचे तुमच्या या निर्णयात स्वखुशीने सहभागी होत आहेत्/होतील असे दिसत नाही. तुमचा विचार जेन्युइन असेलही (आहे असे दिसतेय) पण प्रॅक्टीकल वाटत नाही.
Having said this, तुमच्यासारखे दुसर्यांसाठी काहीतरी चांगले करावे असे वाटणारे लोक समाजात आहेत हे पाहुन आनंद झाला.
रणथंबोर तू नुकते सुरू केलेले
रणथंबोर तू नुकते सुरू केलेले काही interesting धागे आणि वर दिलेला राजकीय नेत्यांचा खुमासदार संदर्भ आवडले. तू भले नवीन आहेस पण मुरलेला वाटतोस
दत्तक घेण्याबद्द्ल माझ वैयक्तिक मत अस की यालारखा नोबल काॅझ नाही. माझ्या जवळच्या मित्राने मुलगी दत्तक घेतली आहे. तो मनापासून तिच्यात रमलाय. दुसर उदाहरण माझ्या ओळखीत एकाला मुल दत्तक घ्यायच होत पण आई वडीलांकडुन कडाडुन विरोध झाला. त्याने खुप प्रयत्न केले पण अखेरीस दत्तक मुलाच्या भविष्याचा विचार करून त्याने प्लान कॅंसल केला.
बाकी तुझ्या प्रश्णंाची उत्तरं:
आणि माबोकरांन लवकर पेढे वाट.
साधारण १ वर्षापर्यंत मुल दत्तक घेतात.
माझ्या माहितीप्रमाणे मुलाला त्याचे खरे पालक कोण आणि ते कुठे आहेत ते एका विशिष्ट वयात सांगाव लागत.
माझ मत:-
तुझ्या बायकोला नसेल आवडणार तर I suggest की उगीच ह्या फंदात पडू नकोस.
कारण तुलाही हे समजल असेलच की बापाने कितीही प्रयत्न केले तरी 'आई' ही आईच असते. देवही तिच स्थान घेउ शकत नाही.
बाकी दत्तक घ्यायची process लगेच होत नाही.वेळ लागतोच. तेव्हा हा वेळ तु सत्कारणी लाव
॒@ पुण्याची विनिता, दत्तक
॒@ पुण्याची विनिता, दत्तक मुलांसाठी हा पालकनीती मधील उज्ज्वला परांजपे यांचा लेख या वर काही भाष्य करतो. वाचा
@प्र.घा. सत्य किती विदारक
@प्र.घा.
सत्य किती विदारक आहे. परांजपेनी अगदी उघड केले आहे.
आमच्याकडे दापोडीतील एका संस्थेच्या २-३ बायका देणगी मागायला अगदी नियमाने यायच्या, आम्ही त्याना विचारायचो मुले किती आहेत आश्रमात, कुठल्या वयाची आहेत, शिकतात का इ. फार तार्किक उत्तरे द्यायच्या, सगळ्यांची उत्तरे अगदी संतुलित असायची. तरीही मनाला खटकायचे की एकाच आश्रमाच्या इतक्या बायका का देणगी मागायला येतात,
एके दिवशी मी सांगितले की या वेळेस पैसे नाहीत तर तुम्ही जुने कपडे खेळणी न्या, तर म्हणू लागल्या की नवे कपडे द्या, जुने मुले घालत नाहीत. मुलाना तर चॉईस कुठे असतो? मग मी विचारले की इतर लोक देतात का कपडे खेळणी इ. तर हो म्हणाल्या हातात तर पिशवी नाहीच, इतक्या ठिकाणी फिरून एकाही कुटुंबाने कपडे दिले नाहीत? तर म्हणाल्या खालच्या दुकानात पिशवी ठेवलीय, नंतर बघितले तर रिकाम्या हातानेच परत गेल्या. मग कुठून समजले की या बायका कमिशनवर काम करतात, टक्केवारीवर. नेमून दिलेल्या!!
पैसे मुलांपर्यंत पोचत असतील याची कुठलीही खात्री उरली नाही आणि यात सर्वजण सामील असतील याची मात्र खात्री पटली.
दत्तक ......घ्यावे कि घेवू
दत्तक ......घ्यावे कि घेवू नये ....??? >>> हा प्रश्न मनात असेल तर मुळीच घेऊ नये!!
अमित M. धन्स !!
अमित M.
धन्स !!