डॉ. हाउस येतोय स्टार वर्ल्ड वर - लवकरच - नक्की पहा.

Submitted by mansmi18 on 18 April, 2014 - 00:33

स्टार वर्ल्ड वर लवकरच "हाउस" ही मालिका सुरु होत आहे. जॉन्स हॉपकिन्स मधे शिक्षित डॉ. ग्रेगरी हाउस या अत्यंत बुद्धीमान पण विक्षिप्त डॉक्टर आणि त्याची टीम यांच्या या कथा आहेत. त्याला "मेडिकल शेरलॉक होम्स" असेही म्हणतात. काहीशी विनोदी, काहीशी गंभीर आणी बर्‍याच वेळा अंतर्मुखही करायला लावणारी ही मालिका..
तारीख सांगत नाही आहेत पण मोस्टली मे मधे कधीतरी सुरु होइल.
नक्की पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! सुरुवातीला काही एपिसोडस तरी नक्की बघेन. ( टी.व्ही.वर नवीन काहीतरी हवंच होतं मला बघायला..)

हाऊस...मी मरते बघायला.
आता टॉरेंट वरुन सर्व सीझन्स परत पाहते वेळ मिळेल तसे.टिव्ही वर फक्त कार्टून्स १ तास लागतात किंवा तो बंद घरात बंद असतो त्यामुळे नो चान्स.
एका पायाने लंगडत असून इतकं अपिलिंग आणि मॅग्नेटिक कॅरेक्टर हे पहिलंच आहे.तो खूप निगेटिव्ह आहे पण शेवटी तो आवडतोच. आय अ‍ॅम इन लव्ह Happy

हाउस इज हाउस!!!

काल त्या हरामखोर एडवर्ड वोगलर ला घालवला कड़ी ने!! लोकांना तो तुसड़ा वाटतो पण त्याला दांभिकता टॉलरेट होत नाही, पाय जायबंदी होण्याची कथा तर लैच स्पर्शी आहे! हाउस इज हाउस