अर्ज/ पत्र रजिस्टर्ड पोस्ट ने कसे पाठवावे?

Submitted by LonelyBoy on 16 April, 2014 - 03:29

मला माहिती अधिकाराचे अर्ज तसेच काही तक्रार अर्ज दुसर्या तालुक्यात असलेल्या तहसिलला पाठवायचे आहेत, परंतु याआधी कधीही पोस्ट खात्याशी काम पडले नाही, त्यामुळे नेमके काय काय करावे लागते ते माहित नाही, कृपया मला स्टेप बाय स्टेप माहिती सांगा, तहसिल अंदाजे 50 किमी अंतर आहे. खर्च किती येईल? अजून काही माहिती हवी असल्यास विचारा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेक्नॉलॉजी बदल रही है! ईमेल अ‍ॅटॅचमेंट सह पटकन पाठवू शकाल तुम्ही, पण पोष्ट!
असो.

१. पत्र पाठवायचा खर्च अंतरावर नसून पत्राच्या पाकिटासहित वजनावर अवलंबून असतो.
२. पोस्ट ऑफिसात जावून तिकिटविक्रीच्या खिडकीत रजिस्टर एडी चा लिफाफा मागा. बेसिक वजनाच्या कामासाठी हा पुरेसा असतो, सहसा वरतून तिकीट लावावे लागत नाही.
३. 'एडी' म्हणजे अ‍ॅकनॉलेजमेंट ड्यू. यासाठी एक 'एडी रिसिट' नामक पोस्ट कार्डासारखे कार्ड मिळते. ते खिडकीवरून मागून घ्या. या कार्डावर तुमचे, व ज्याला पत्र पाठवायचे, अशा दोहोंचे नांव लिहायची सोय असते.
४. रजिस्टरचा लिफाफा (पाकीट) असल्यास त्यात, व ते पाकीट न मिळाल्यास, आपल्या आवडीच्या पाकिटात हवी ती कागदपत्रे घालून पाकीट चिकटवून सीलबंद करा.
५. पाकिटावर समोर, मध्यभागी, 'प्रति,' असे लिहून खाली. ज्याला पत्र पाठवायचे त्यांचा पत्ता लिहा.
६. खाली डाव्या कोपर्‍यात तुमचा पत्ता लिहा. त्याच्यावर 'प्रेषक,' असे लिहा.
७. पाकिटास पाठीमागील बाजूस 'एडि रिसिट' स्टेपलर पिनेने टाचा.
८. हे तयार पाकीट घेऊन रजिस्टर साठीच्या खिडकीवर जा.
९. तेथील व्यक्तीस रजिस्टर करावयाचे आहे, हे सांगून पाकीट द्या. ती व्यक्ती पाकिटाचे वजन करून तुम्हाला किती किमतीची तिकिटे लावायची हे सांगेल. तितकी तिकिटे त्या पाकिटास चिकटवा.
अनेकदा छोट्या हापिसात हे सगळे काम एकाच खिडकीवर होईल.
मोठ्या हापिसात तो माणूस तुम्हाला तिकिटासाठी वेगळ्या खिडकीवर पाठवेल.
त्याच माणसाला रजिस्टरचे पाकिट कुणाला देऊ असे विचारून घ्या. हे पाकिट बहुदा रजिस्टरच्या खिडकीत स्वीकारले जाते, पोस्टाच्या पेटीत टाकावयाचे नसते.
रजिस्टर केल्याची पावती मिळेल, ती जपून ठेवा.
१०. काही दिवसांनी पोस्टमन तुमच्या घरी एडी रिसिट आणून देईल. ती जपून ठेवा.

या दोन्ही रिसिटचा अर्थ तुम्ही अर्ज पाठविला होता, व तो सरकारी कार्यालयात / ज्याला पोहोचवायचा होता त्याला मिळाला, असा पुरावा होतो. या पुराव्यासाठीच तुम्हाला रजिस्टर करण्यास सांगितलेले आहे.

इब्लिसभाऊ, मेडिकलला १६ मार्काचे फुल क्वेस्चन असतात.

Happy तुम्हाला १६ पैकी १६.

@इब्लिस तुमचे खूप खूप आभार..!, पण मला मग खालील गोष्टींबद्दल कसा पुरावा मिळेल

(1) सोबत जोडून पाठविलेले संदर्भ कागदपत्रे, xerox documents etc ( नाहीतर पाठवलेला अर्ज ते बाद करतील, म्हणतील अमुक एक कागद नाही पाठवला, जरी आपण योग्य ती सर्व कागदपत्रे पाठवली तरी..)

(2) तहसिल मध्ये अर्ज नेऊन देल्यास आपल्याला त्या अर्जाच्या xerox वर सही शिक्का मारुन मिळतो, मग पोस्टाद्वारे पाठवलेला अर्जा विषयी कसं?

लोबॉ,
सरकारी लोक काड्या करायच्या, तर वाट्टेल त्या करू शकतात. तुम्हाला शिक्का मारून दिला तरी अक्खी फाईल 'हरवू' शकते. त्याला इलाज नाही.
स्वतः जाऊन दिलात तर घेतीलच याची खात्री नसते. अमुक भाऊसाहेब खुर्चीत नाहीत, रजेवर आहेत, हेड ऑफिसला गेलेत, मिटींग मधे आहेत, करत तुम्हाला इकडुन तिकडे फिरवतील दिवसचे दिवस.
रजिस्टर केले, हा पुरावा कोर्टातही ग्राह्य धरतात, इतपत मला ठाऊक आहे. इतर बाबींसाठी तुमच्या वकिलांस एक शब्द विचारून घ्या.

मला नाही वाटत ई-मेल द्वारे ते रिस्पॉन्स देतील, नाहीतर हे खुप चांगले झाले असते,. खर तर सरकारी कामामध्ये online help desk असायला हवे

इब्लिसा, एक राहिल, हल्ली त्या पोस्ट रिसीटवरच्या क्रमांकावरुन तुम्ही इन्टरनेटवरुन त्या पाकिटाचा प्रवास बघु शकता व पोचवल्याची तारीख कळू श्काते व तो स्क्रिनशॉट ग्राह्य धरला जातो.

सोबत जोडून पाठविलेले संदर्भ कागदपत्रे, xerox documents etc ( नाहीतर पाठवलेला अर्ज ते बाद करतील, म्हणतील अमुक एक कागद नाही पाठवला, जरी आपण योग्य ती सर्व कागदपत्रे पाठवली तरी..)

ह्या वरून आठवले. एका वकिलाने सल्ला दिला होता कि "One closed envelope received, Content not known " असा शिक्का करून ठेवा.

पत्र पाठवताना.. त्यात एक कव्हरिंग नोट लावा.. आणि त्यात कोणती कागदपत्रे जोडली आहेत ते सविस्तर लिहा...

माझ्या आईचे आधार कार्ड पण अजून मिळाले नाही, नॉर्मल पोस्टाने तिकडून ते पोस्ट झाले होते 10 महिन्यांपुर्वीच, पोस्टमन ने आधार कार्ड हरवून टाकल्याची शक्यता वाटतेय, त्याला विचारल्यास अजून त्यांचाकडे आलेच नसेल असे तो अंदाजे म्हणतोय, नॉर्मल पोस्टची इथे पोचल्यास register मध्ये नोंदणी होत नाही का? म्हणजे ते इथे पोचले असेल की नाही हे register मधिल नोंदी पाहून खात्री करता येईल

वेबसाईटवरून प्रिंटाऊट काढून घ्या. चालतो.
पोस्टात हरवण्याचा हज्जार जागा आहेत. त्या बिचार्‍या पोस्टमनला झापू नका.

बरोबर आहे पण आमच्या शेजारी राहणार्या कडून त्याने 100 रू घेतले आधार कार्ड आणुन देण्याचे, त्यामुळे अशी शंका येत आहे आणि दुसरे म्हणजे आधार कार्ड सारखी गोष्ट नॉर्मल पोस्टने पाठवतातच कशाला?

>>>> ते स्पीडपोस्टासाठी आहे ना? <<<<< रजिस्टर्ड व स्पीडपोस्ट दोन्ही साठी आहे. Happy
आम्हाला आमच्या लिगल नोटीसा/इतर अतिमहत्वाचा पत्रव्यवहार वगैरे करत हे ट्रॅकिन्ग नेहेमी लागते, वापरतो.

सोबत जोडून पाठविलेले संदर्भ कागदपत्रे, xerox documents etc ( नाहीतर पाठवलेला अर्ज ते बाद करतील, म्हणतील अमुक एक कागद नाही पाठवला, जरी आपण योग्य ती सर्व कागदपत्रे पाठवली तरी..)>> तर त्यासाठी अतिरिक्त एक लिफाफा योग्या तिकीट लाऊन व संबंधित अधिकार्‍या त्या झेरॉस्क कॉपी सही शिक्क्यानिशी पाठविण्याचे विनंती पत्र लिहा काम होईल. तसेही नाही झाले तर स्टॅम द्वारे अतिरिक्त शुल्क भरुन झेरॉक्स मागवु शकता.