टर्किश एअरलाईन आणी ईस्तबूल एअरपोर्ट

Submitted by फेरफटका on 7 April, 2014 - 13:28

यंदाची भारतवारी टर्किश एअरलाईन ने करायची आहे (ह्युस्टन - ईस्तंबूल - मुंबई).

कुणाला टर्किश एअरलाईन चा काही भला-बूरा अनुभव आहे का?

ईस्तंबूल एअरपोर्ट वर जाताना ३.५ तासाचा आणी परतीच्या प्रवासात ३ तासाचा हॉल्ट आहे. त्या एअरपोर्ट विषयी कोणी काही सांगू शकेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी केलाय प्रवास २ वर्षापूर्वी. तेव्हा तरी अनुभव चांगला होता. काही अडचण नाही आली. फक्त चार मिल पैकी एकदा व्हेज मिल तिकीटावर कम्फर्म केलेले असून मिळाले नाही, पण हे इतर एअर्लाइन्स् मधे ही होते. विमान प्रवासात तसेही मी नेहमीच माझे जेवण सोबत ठेवते त्यामुळे मला फरक पडला नाही.
एअरपोर्ट चांगला आहे. काही अडचण नाही आली.

टर्किश चांगली विमानसेवा आहे. स्टार अलायन्समधील एक आहे त्यामुळे तुमचे जर स्टार अलायन्सपैकी एखाद्या कंपनीचे कार्ड असेल तर माइल्सपण मिळतील. जेवण उत्तम मिळते, किमान मला तरी नेहेमी एशियन वेज मिळाले आहे चांगले.
इस्तंबूल विमानतळावर तीन तास ट्रान्झिटला खूप झाले. फार छोटा नसला तरी फार मोठाही नाहिये विमानतळ. ड्युटीफ्री खरेदीचा एक मध्यभागी विभाग आहे, तिथेच पाच-दहा दुकाने आहेत.

महिनाभरापूर्विच टर्किश नी प्रवास केला. इस्तांबूल ला सुमारे सहा तास हाॅल्ट ही होता. त्यात जाणवलेले काही मुद्दे:
१- वेब चेक् इन् करूनही हव्या त्या सीट्स नाहीत
२- मुंबई रूट ला जनरली जेट एअरवेज चं वेट् लीज केलेलं जुनं विमान असतं, सीट (मरून) अन डिस्प्ले यथातथा
३- फ्लाइट फूड साधारणच
४- जेट चं विमान नसेल (रंगीत हेडरेस्ट वाल्या सीट्स असतील) तर आॅनबोर्ड वायफाय, सुमारे ४०० सिनेमांचा चाॅईस (जेट मधे सुमारे १००)
५- इस्तांबूल-मुंबई विमान कनेक्टिंग फ्लाईट्स उशिरा आल्यानी सुमारे तासभर डीले
६- आतातुर्क एअरपोर्ट ड्यूटी फ्री सो सो, रेस्टाॅरंट्स ठीक, फ्री इंटरनेट (वायफाय / डेस्कटॅप पाॅईंट्स) नाहीत
७- एअरपोर्टवर 'साल्हेप' पिऊन पहा, टर्किश डिलाइट्स खाऊन पाहिल्या शिवाय आजिबात घेऊ नका

लहान मुलं (वय वर्षं ६ आणी २) बरोबर आहेत. त्यादृष्टीनं काही खास सुचना असतील तर नक्की सांगा.

'साल्हेप' काय आहे?

सिक्युरिटी चेक होतो का? (खरं तर कारण नाही, पण मागे एकदा बेल्जियम मधे विमानातून बाहेर काढून कैद्यांसारखं सिक्युरिटी चेक मधून काढून परत त्याच विमानात बसवल्याची जखम अजून पुरती भरायचीये).

Turkish airlines ने एकदाच गेले आहे. चांगला अनुभव होता पण एका वेळी शाकाहारी जेवण मिळाले नाही. एअरपोर्ट ठीक आहे..फार लहान नाही आणि मोठाही नाही. security check ला काहीही त्रास झाला नाही. तिथे खाल्लेले पिस्ता आईसक्रीम फार छान होते! फक्त भारतातून त्यांची परतीची फ्लाईट सकाळी ६/६:३० ची असते. मुंबई बाहेर रहात असाल तर ते थोडे गैरसोयीचे वाटले. म्हणजे डेल्टाच्या फ्लाईटस् पहाटे २ च्या सुमारास असायच्या तेव्हा दुपारी/संध्याकाळी घरातून निघून रात्री मला विमानतळावर सोडून आई बाबा परत घरी जायचे. पण ह्या वेळी एका हॉटेलमध्ये रात्री राहून पहाटे विमानतळावर जावे लागले. तिकीट मात्र जरा स्वस्त असते!

टर्किश एअर लाईन झकास आहे.... काही दिवसा पुर्वि टर्की ट्रिप झाली ...एअर पोर्ट पण मस्त मस्त ....काहिच त्रास नाही ...उलट मस्त आहे .....मजा करो ...शुभेच्छा ....

ट्रांझिट मधे चेंज आॅफ प्लेन असेल तर ट्रांझिट सिक्युरिटी चेक होतंच

साल्हेप : क्रीम, दूध, मध, दालचिनी पूड अन् आॅर्किडच्या रूट्स पासून बनवलेलं पेयं
थंडीच्या दिवसात बाॅडी वाॅर्मिंग साठी मस्त

जनरली मुंबई अन् इस्तांबूल दोन्हीकडे विमान सर्वात टोकाच्या गेटला पार्क्ड असल्यानी बर्यापैकी तंगडतोड होते

रच्याकने, मुंबई टी-२ मस्त आहे, पण ओडोमाॅस सोबत ठेवा
प्रचंड डास आहेत

खरं तर कारण नाही, पण मागे एकदा बेल्जियम मधे विमानातून बाहेर काढून कैद्यांसारखं सिक्युरिटी चेक मधून काढून परत त्याच विमानात बसवल्याची जखम अजून पुरती भरायचीये
>>>

ह्यात जखम कसली? तुम्ही जेट एअरवेज नेवार्क फ्लाइटबद्दल बोलत आहात का? जगातील सर्वच विमानतळावर विमानातून खाली उतरले की परत त्याच किंवा दुसर्‍या विमानात चढायच्या आधी सुरक्षा तपासणी करतात. आणि हे आजचे नाही तर गेली ७-८ वर्षे तरी आहे. ही नेहेमीची कार्यप्रणाली आहे तीत वाईट का वाटून घेता.

टण्या, नाही हो. त्यात वाईट नाही वाटले. ९/११ पसून सुरू झालेली extra security अंगवळणी पडलीये आणी बर्याच अंशी पटते सुद्धा.

मी खरं तर अशी अर्धवट पोस्ट ईथे टाकायला नको होती. बेल्जियम च्या सिक्युरिटी मधून जाताना काही अनुभव खटकले होते. जाऊ द्या! सोडून द्या.

अमेरीकेत परत येतांना इस्तंबूलला परत एकदा सेक्युरीटी चेक असतो. जिथून विमान सुटते त्या गेटजवळच सेक्युरीटी चेक होते आमच्यावेळी. एकदा ते चेक करून गेट जवळ गेल्यावर परत बाहेर पाठवत नाहीत आणि तिथे रेस्टरूम वा खाण्याची दुकाने काहीच नव्हती. आमच्यासोबत लहान मुले असल्याने हे थोडे गैरसोयीचे झाले होते. आम्ही डायपर बदलायला परत बाहेर गेलो व परत एकदा सगळे सेक्युरीटीचे सोपस्कार करून आत आलो.

तुम्हाला जर १-२ दिवस वाढवता आले तर बघा. टर्कि ला भारतीय पासपोर्ट असेल तर on arrival visa मिळतो. १-२ दिवस इस्तांबूल बघता येइल तुम्हाला. छान सिटी आहे.

सायो सेक्युरीटी चेक सगळ्याच एअरपोर्ट वर होते, ते चेक अप झाल्यावर रेस्टरुम नव्हत्या हे अडचणीचे होते विशेषतः लहान मुले सोबत असतील तर.
आत्ता भारतातून आले तेव्हा Ethiad ने आले. त्यांनी अबुधाबीला अमेरीकेसाठी वेगळे टर्मिनल केलेय, तिथे सिक्युरिटी आणि कस्ट्म्स व इमिग्रेशन पण झाले जे खूपच सोईचे झाले. त्यामुळे अमेरीकेत उतरल्यावर डायरेक्ट बॅगेज एरीआत जाता आले डोमेस्टीक फ्लाइट सारखे.

वाह. असं (अबुधाबी सारखी ईमिग्रशन ची सोय) प्रत्येक ठिकाणी असलं, तर काय बरं होईल! अमेरिकेत उतरल्यावर डोमेस्टिक विमानतळासारखं थेट बॅगेज क्लेम कडे जाता येईल.

मला इतर ठिकाणीही असा काउंटर बघितल्याचे आठवते. मात्र नंतर अमेरिकेतील इमिग्रेश्न स्किप होते का नाही लक्षात नाही.

>>सायो सेक्युरीटी चेक सगळ्याच एअरपोर्ट वर होते, ते चेक अप झाल्यावर रेस्टरुम नव्हत्या हे अडचणीचे होते विशेषतः लहान मुले सोबत असतील तर.>> त्याच संदर्भात मी लिहिलं होतं. >> त्या गेटजवळच सेक्युरीटी चेक होते आमच्यावेळी. एकदा ते चेक करून गेट जवळ गेल्यावर परत बाहेर पाठवत नाहीत>> हे असंच झालं होतं एअर इंडिया फ्लाईटला. बाथरुमला सोडायला तयार नव्हते.

अरे पण हे असं करण्यात काही अडचणी नसतात का कायदेशीर ? अबुधाबीतच अमेरिकेत प्रवेश केल्याचा शिक्का मारला आणि नंतर ते विमान कुठे दुसरी कडे उतरलं (कुठल्याही कारणाने) तर तुम्ही नक्की कोणत्या देशातून आलात असं धरतात ? तसच पोर्ट ऑफ एंट्री काय धरतात ?
अमेरिकेत येऊ तरी द्या म्हणं शिक्के मारण्याआधी..
कायदेशीर गोष्टींचा विचार झालाच असेल पण ऐकायला कैच्याकै प्रकार वाटला हा. Happy

फेरफटक्या, आजच पहाटेच्या टर्किश एअरलाईनने लिम्बीचा भाऊ तिकडे युएसला गेलाय, वाटेत इस्तम्बुलला दोन अडीच तासाचा मुक्काम आहे. अजुन अर्ध्यापाऊण तासात साडेदहा पर्यन्त पोहोचेल इस्तम्बुलला.
उद्यापरवा त्याचा नि माझा कॉन्टॅक्ट जेव्हा होइल, तेव्हा माहिती विचारुन घेता येईल. Happy

पराग,

>> कायदेशीर गोष्टींचा विचार झालाच असेल पण ऐकायला कैच्याकै प्रकार वाटला हा.:स्मित:

कसला डोंबलाचा कायदेशीर विचार म्हणतो मी! Happy अमेरिकेने संगीत वाजवलं की आखाती देश त्याच तालावर नाचू लागतात! Wink पूर्वी अमेरिकन मिलिटरी बेस नावाचा प्रकार असे. तो कायदेशीर रीत्या अमेरिकेची भूमी मानला जाई. आता हीच योजना नागरी विभागातही सुरू झाली तर!

पारशी आखाती राष्ट्रे नावापुरतीच सार्वभौम आहेत हे वेगळे सांगणे नलगे.

आ.न.,
-गा.पै.

limbutimbu - वा! झकास! एकदम ताजा अनुभव ईथे कळेल. हे काम ब्येश्ट झालं म्हणायचं!

फेरफटक्या, पण एक प्रॉब्लेम आहे, लिम्बिच्या भावाने बरोबर नुस्ता मोबाईल नेलाय, पण त्यात कोणतेच सिम कार्ड नाहीये Proud
येऊन जाऊन ल्यापटॉप नेलाय, अन वायफाय फ्री असेल तिथुन नेटवर कनेक्ट होईल म्हणतोय.... बघु काय कसे ते.
तशात तो कॉम्प्युटरबरोबर तितकासा परिचित नाही, जरी घरबसल्या स्काईपवरुन गाण्याचे/तबलापेटीचे क्लासेस घेत असला तरी! असो.
काही थोडीफार माहिती तरि आज उद्या दोन दिवसात मिळेलच. Happy

limbutimbu: काही घाई नाही. जेव्हा जमेल तेव्हा कळवा. आम्ही पुढच्या महिन्यात प्रवास करणार आहोत.

ग्रीस टर्की प्रवासा दरम्यान मी इस्तंबूल एअरपोर्टला भेट दिली होती आणि तो अनुभव खूपच सुंदर होता. एअरलाइन तर छान आहेच पण इस्तंबूल एअरपोर्ट ही सुद्धा खूप छान जागा आहे. भटकंतीकरिता सोप्पा आणि देखणा. आवर्जून सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे टर्कीचे फेमस स्वीट "बकलावा" हा पदार्थ आयुष्यात एकदा तरी चाखावा असाच! "बकालावा"चे शेकडो प्रकार तिथे मिळतात, कुठलाही चाखा पण चाखा जरूर!

पराग,

कायदेशीर गोष्टींचा विचार झालाय. मॅक्स म्हणतो तसं कॅनडा मध्ये असच होत, टोरोंटोला तुम्ही एकदा अमेरिकेचे इमेग्रेशन केलेत की तुम्ही तांत्रिक दृष्ट्या अमेरिकेत जाता. १-२ वर्षापूर्वी टोरोंटो ला एक विमान तांत्रिक कारणानी रद्द झाले, तर त्या सगळ्या प्रवाशांचे कॅनडात परत इमिग्रेशन झालेले. टोरोंटो मधून बाहेर न पडता (असं आपल म्हणायला Happy
) पासपोर्टवर अमेरिका आणि परत कॅनडाचा शिक्का पडला.

टर्किश एअरलाईन्स ने आत्ताच जाऊन आलो. मस्त अनुभव होता. विमानं, सेवा, ईस्तंबूल चा विमानतळ आणी सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईचा नविन विमानतळ छान आहेत.