सांताक्रुझ विमानतळाजवळची फिरण्यासारखी ठिकाणे

Submitted by पियू on 7 April, 2014 - 12:23

माझा मित्र व त्याची बायको १ दिवसाकरीता सांताक्रुझ विमानतळाजवळच्या हॉटेलमध्ये राहाणार आहेत.
आदल्या दिवशी रात्री ते हॉटेलवर (विमानतळाजवळच्या) येऊन राहातील.
दुसर्‍या दिवशी त्यांचे पाहुणे रात्री ८.३० च्या फ्लाईटने येतील तोपर्यंतचा वेळ त्यांच्याकडे मोकळाच आहे.
तर त्यांना जवळपास कुठे कुठे फिरता येईल? काय पाहाता येईल?
शक्यतो लोकलने नको कारण त्यांना लोकलने प्रवास करायची सवय नाहीये.
कमी गर्दीची लोकल असेल तरच त्यांना ट्रेनमध्ये चढता येईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पार्ल्यातली खादाडी नावाचा बाफ वाचून काढा . गजाली मधे जेवण, दीनानाथ मधे नाटक, विजय स्टोअर्स, प्रभूक्रुपामधे खरेदी जवाहर बूक डेपो, मॅजेस्टिक चे दुकान इथे खरेदी
पार्ला वेस्टला फाटकापाशी एक छोटेसे अ‍ॅक्वएरियम आहे तिथे जाता येईल.

अजून थोडे दूर जायला जमत असेल तर विहार - पवई लेक- तिथले चिन्मय मिशनचे देऊळ

अजून पलिकडे गोरेगाव पूर्वेला ऑब्सर्व्हेशन पार्क / पिकनिक स्पॉट, आरे कॉलनी ,

वेस्ट साईडला पृथ्वी मधे काही शो असेल तर तो, जुहू बीच, लोखंडवाला मधे खरेदी

दीनानाथ सध्या बंद आहे रिनोव्हेशनकरता. पण भाईदासला एखादं नाटक बघता येईल आवड असेल तर. किंवा पृथ्वी थिएटर आणि कॅफे, जुहू बीच, इस्कॉन टेम्पल, तिथलं गोविंदा व्हेज रेस्टॉ. ह्यात एक दिवस आरामात जाईल.

हो ना, अजून जैसे थे बंद आहे. नाटकं पाहिलिच जात नाहीएत त्यामुळे.

सांताक्रूझ मार्केटमधे टिपिकल सिरियल छाप कपडे, दागिने असलं शॉपिंग भरपूर करायला स्कोप आहे. बान्द्र्याला जाऊन माउंट मेरी, बॅन्डस्टॅन्ड, मन्नत Wink (किंवा टॅक्सीवाला बॉलिवुड स्टार्स बंगलो अशी टूरही देतो जुहू, पालिहिल एरियात Proud , एल्को मार्केट, हिलरोड, जॉगर्सपार्क, पटवर्धन गार्डन असं बरंच आहे.

एखादी कूलकॅब बुक करुन हवं तिथे दिवसभर फिरलं मुंबईत तर बेस्ट. रात्री सुद्धा मरिन ड्राइव्ह, गेटवे, बाणगंगाला जाता येईल. फूड वॉक, हेरिटेज वॉक, निलाम्बरी बसराईड असं आधी गुगल करुन बुक केलं तर फारच छान.