मानवाची सर्वात आदिम जाणीव कोणती असावी ??

Submitted by रणथंबोर on 7 April, 2014 - 08:24

(सर्वात आधी हा विषय कुठे लिहावा हे अजून नक्की माहित नाही... जरा मदत करा... )

तर ..असाच विचार करता करता एक विचार आला कि .... आदिमानवाला जेव्हा बुद्धीची जाणीव झाली तेव्हा कोणती भावना प्रथम मनात आली असेल ... म्हणजे पुढीलपैकी कोणती आणि का ?

१) प्रेम
२) राग
३) काम
४) भय
५) मत्सर
६) निराशा / दु:ख
७) आनंद
८) _____________

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदिमानवाला जेव्हा बुद्धीची जाणीव झाली तेव्हा कोणती भावना प्रथम मनात आली असेल <<<

येथे तुम्ही 'भावना' हा शब्द वापरला आहेत. शीर्षकात मात्र जाणीव म्हंटले आहेत.

भावना म्हणालात तर भय आणि जाणीव म्हणालात तर तहान असावी बहुधा!

माझ्या मते भय असावे. कारण भयाची भावना तर मानवापेक्षा अप्रगत अशा इतर प्राण्यांमध्ये सुद्धा आढळते. ते म्हणतात ना - "भय इथले संपत नाही." Happy

अ‍ॅडम आणि ईव्ह ची कथा जुनी आहे. भारतीय पुराणात तरी तश्या आशयाची कथा आठवत नाही.

या विषयाला अनुसरुन माझा एक प्रश्न आहे. तहान किंवा भुक सोडुन ज्या शारिरीक नसलेल्या भावना उदा अर्थ भिती किंवा प्रेम प्राथमिक मेंदुचे कार्य आणि की प्रगत मेंदुचे ?

गजानन यांचे सर्वात बरोबर आहे. + १ दिलेला आहे.

भूक लागल्याची, अन सटायटी, उर्फ पोट भरल्याची भावना सर्वात आधी येते. ही सर्वात आदीम भावना होय. आय नीड टू फीड ही सर्वात आदीम "भावना"

आहार, निद्रा, भय, मैथुन असा तो क्रम लागतो. सर्वात आधी आहार. मग निद्रा.

आहार सेल्फ सस्टेनन्स (स्वतःला जगविण्यासाठी केलेले प्रयत्न/कार्य) साठी.

निद्रा, पुन्हा 'सेल्फ सस्टेनन्स'साठी. ग्रोथ्+रिपेअर्स (शरिराची वाढ, व झीज भरून काढणे) हे झोपेतच सर्वात जास्त प्रमाणात होतात.

त्यानंतर भीतीची भावना येते. एक लक्षात घ्या, लहान मुलांना भीती वाटत नाही. धोक्याची जाणीव त्यांना आपण करून देतो. त्याच सोबत दया, करुणा, क्षमा या भावना देखिल मुलांना/आपल्याला 'शिकवलेल्या' आहेत. या जन्मत: आलेल्या इन्स्टिंक्ट्सपैकी नसतात. फुलपाखराचे पंख उपटणारी मुलं पाहिलीत का तुम्ही? या उद्योगातून आपण कुणाला वेदना देत आहोत ही कन्सेप्टच त्यांच्या डोक्यात नसते.

त्यानंतर एक विशिष्ट वय गाठल्यानंतर, मैथुन, अर्थात 'सेल्फ प्रोपागेशन' अथवा प्रोपागेशन ऑफ स्पीसीज ही ऊर्मी येते. अन मग नंतर दिलेले भावनांचे मुलामे हे वर्खापेक्षा जास्त जाडीचे नसतात... नखाने खरवडले की गळून पडतात - ओरखडे उमटतात.

नितीनचंद्रजी,
मेंदूची उत्क्रांती शोधून वाचून पहा. शक्य होतील तश्या लिंका देईन. हृदय व श्वास चालणे हे सर्वात आदीम कार्य आहे. व्हायटल सेंटर्स ज्याला आम्ही म्हणतो ती मेंदूतील केंद्रे ही कामे करीत असतात.. अत्यंत रोचक प्रकरण आहे ते.

माझ्या मते "मी आहे" ही अस्तित्वाची जाणीव सर्वात आधी येते मग आपण आणि सृष्टीतील इतर गोष्टी ह्यात एक द्वैत संबंध निर्माण होतो त्यातून इतर जाणिवा उत्पन्न होत असाव्यात !!

वैवकु,
इंटरेस्टिंगली,
'मी' फार उशीरा समजतो माणसाला.
मुलं अथर्व आला, किंवा माऊला भूक लागली, इ. प्रकाराने स्वतःबद्दल तृतियपुरुषी बोलतात ते तुम्ही ऐकले आहेत काय?
हे असे का होते?
इतरापेक्षा मी कुणी वेगळा आहे, "मी" आहे, हे समजणे हे कदाचित मानव असण्याचे व्यवच्छेदक लक्षण असावे. काही उत्क्रांत 'एप्स' मधे ही जाणीव असते. पण आरशात दिसतो, तो 'मी'च आहे, ही समजूत बरीच उशीरा येते. याच साठी लहान मुलांना आरसा दाखवत नाहीत. (असे काही वयस्कर लोक म्हणतात. बाळाला आरशासमोर नेऊ नको, इ.)

http://en.wikipedia.org/wiki/Id,_ego_and_super-ego

इब्लिस:
भयाची भावना लहान मुलांमधे नसते.. पण आवाजची भिती आणि तोल जाण्याची भिति या दोन माणसामधे जन्मा पासून असतात असं वाचलं होतं. हे खरं आहे का?

मध्यंतरी आदिम गरजा यावर एक लेख वाचनात आला होता...त्यात Plutchik's psychoevolutionary theory of emotion वाचली होती. गूगल बाबाला विचरलत तर लगेच माहिती मिळेल.

त्यांनी खालील प्रमाणे वर्गीकरण केलं आहे.

Plutchikfig6.gif

'मी' फार उशीरा समजतो माणसाला.<<<<

मी अवतरणचिन्हांशिवायच्या मी बद्दल बोललो . हा मी अहं विरहीत मी आहे .तो आहे ही जाणीव उत्पन्न झाल्यावर मी काय आहे हा प्रश्न जाणवत असावा त्यात हा देह सर्वात आधी उत्तर देत असावा मग देहाच्या गरजा भागवण्याची कार्ये ..असा क्रम मी लावतो .
आपण जो मी समजण्याविषयी बोलत आहात ती प्रक्रिया आपण सांगत आहात तशी असेलही जी कदाचित जन्मभरही चालत असेल . 'मी' समजणे आणि मी आहे अशी जाणीव होणे ह्या वेगळ्या बाबी आहेत
प्रश्न जाणीव होणे ह्याबाबतचा आहे आणि "मी आहे " ही जाणीव आहे त्याबद्दल मी बोलत आहे .

वरील प्रतिसादातले चित्र माहीतीवर्धक आहे ह्या चित्राच्या केंद्रात ही "मी आहे" ची जाणीव असावी असे माझे मत.बाकीच्या जाणीवा ह्या केंद्रातून फुलतात असे मला ह्या चित्रात दिसते आहे
असो
माझा एक शेर आठवला

जाणिवा सोडती माग काढायचे
ह्या मनाला तिथे न्यायला पाहिजे

धन्यवाद

asaa ekhaadaa xaN hotaa kaa ki jyaa xaNaapaasun... ek praaNee maanav samajlaa jaoo laagalaa ? jar aadeem jaaNeevach shodhaayachee tar tee prUthveevarachyaa pahilyaa jeevaachee shodhaayalaa havee... yaa varchyaa jaaNeevanchaa ekaadhikar maanavaakaDe aahe kaa ? maanavaane tyaa nirmaaN kelyaa ? tyaachyaapurvee navhatyaa ? ( malaa maraaThi type karaaa yet naahee aajkaal Sad )

>>>>>>भिती किंवा प्रेम प्राथमिक मेंदुचे कार्य आणि की प्रगत मेंदुचे ?>>>>>>

खात्री नाही पण असे वाटते कि प्राथमिक मेंदूचे असावे. कारण या भावना इतर अप्रगत सस्तन प्राण्यांत सुद्धा आढळतात. उदा. सिन्हीनीचे आपल्या पिलान्प्रती असलेले प्रेम.

श्रीयू
त्या प्रतिक्षिप्त क्रिया : रिफ्लेसेस झाले. त्या आधीचा पहिला असा रिफ्लेक्स ओठांनी चोखून दूध पिण्याचा येतो, पण त्याआधी (ओ)रडून मला भूक लागली आहे, हे सांगण्याची क्रीया येते, ती भूक लागल्याची भावना/जाणीव मेंदूला झाल्यापासून.
आपण 'भावना' उर्फ जाणीव यांचेबद्दल बोलत आहोत, बेफिंनी जरी दोहोंत अर्थछटांचा फरक सांगितलेला असला, तरी मी दोन्ही शब्द एकाच अर्थाने घेतले आहेत

>>>>>>>>>>>>>>> आदिमानवाला जेव्हा बुद्धीची जाणीव झाली तेव्हा कोणती भावना प्रथम मनात आली असेल ... म्हणजे पुढीलपैकी कोणती आणि का ?
१) प्रेम
२) राग
३) काम
४) भय
५) मत्सर
६) निराशा / दु:ख
७) आनंद
८) _____________ <<<<<<<<<<<<<<<<<<<

माझ्यामते यातिल एकही भावना मनात निर्माण होण्यासाठी अन व्यक्त होण्यासाठीही बुद्धिची (निखळ बुप्रावादी बर्का...) गरज नाही. या भावभावनांशी बुद्धिचे काहीही देणेघेणे नाही.
ज्याक्षणी आदीमानवाने कोणत्याही गोष्ट/वस्तु/घटनेचे उपयोजित्व समजुन घेतले असेल, ती त्याच्या बुद्धिची पहिली चमक असेल, जसे की पाऊस पडायला लागल्यावर झाडाखाली आडोशाला जाणे म्हणजेच "झाडाचा उपयोग" करुन घेणे..... इत्यादि इत्यादी! ही कार्यकारणभाव समजुन घेण्याची उपयोजित्वाची बुद्धिची चमक अक्षरष: शेकडो बाबतीत चमकली असेल, अन त्यात प्रथम द्वितीय क्रम लावणे अवघड आहे.

>>>> त्यानंतर भीतीची भावना येते. एक लक्षात घ्या, लहान मुलांना भीती वाटत नाही. धोक्याची जाणीव त्यांना आपण करून देतो. त्याच सोबत दया, करुणा, क्षमा या भावना देखिल मुलांना/आपल्याला 'शिकवलेल्या' आहेत. या जन्मत: आलेल्या इन्स्टिंक्ट्सपैकी नसतात. <<<<<
इब्लिसा, याबाबतीत मतभेद होतोय.
लहानमुलाला धोक्याची जाणीव करुन देणे म्हणजेच "भिती" घालणे असा काही एक अर्थ तू लावत असशील तर बोलिभाषेप्रमाणे/रिवाजाप्रमाणे तो बरोबरही असला तरी शब्दचिकित्साकरताना तो तसा उरत नाही.
माझे मते भिती ही भावना जन्मतःच असतेच असते, फक्त प्रत्येकात केव्हा/कशी/कितीप्रमाणात दृगोच्चर होईल हे व्यक्तिनुसार बदलते. मात्र "साप दिसल्यावर तो चावू शकतो/तो धोकादायक आहे" ही जाणीव व तदनुषन्गाने बचावाची कृती ही बुद्धिची द्योतक असेल, तर धोक्याच्या जाणिवेमुले निर्माण झालेली भावना कधी भिती असेल, तर कधी धाडसही असेल वा कधी सन्यस्त अनुल्लेखाचि असेल. मूलतः भिती या भावनेचा बुद्धिशी काही संबंध मला सापडत नाहीये! Happy मुलांना आपण शिकवतो ते धोक्यापासुन बचावाचे मार्ग, भिती नाही! Happy
अन जर कोणी भिती "शिकवित" असेल तर माझेमते तुम्ही बुप्रावादी /अन्निसवाले वगैरेन्नी बाकी समाजातल्या अंधश्रद्धा वगैरे बाजुला ठेवून पहिल्यांचा लहान मुलांन्ना जे कोणी भिती शिकवित असतील, तर ते थाम्बविण्याचे मागे लागावे. :डोमा;

असो.

दिनेशदा आपला प्रतिसाद आवडला
विचारल्या गेलेल्या प्रश्नात 'आदीम' हा शब्दही फार फार महत्त्वाचा आहे हे उत्तरदात्यांनी आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे !
इब्लीस यांची माहीती अतीशय ज्ञानवर्धक आहेच पण हे सगळे वरवरचे झाले आहार निद्रा भय मैथुन ह्या गोष्टी शरीर भावनेशी निगडीत आहेत .इब्लिस सांगत आहेत ती बहुतकरून पुस्तकी माहीती आहे.

जाणिवा आणि भावना ह्यांअचा अर्थ जवळ जवळ सारखाच होतो असे मलाही वाटते .

ह्या मुद्द्याचे प्रॅक्टिकल नॉलेज(नोंदी) कसे मिळवायचे /मिळ्वतात ह्याचे कुतुहलही लागून राहिले आहे Happy

मस्त माहित येत आहे .... येऊ द्या...

भयाबद्दल मी एके ठिकाणी वाचल होत कि .... आपण जर काचेच्या बशीवर चमचा घासला कि जो आवाज येतो त्यामुळे आपल्याला खूप irritate होते... आपोआप आपण दात खातो... मुठी आवळल्या जातात... याचे मुळ कुठे आहे हे जेव्हा शोधण्यात आले तेव्हा असे आढळलं कि ... आदिम काळात जेव्हा माणूस गुहेत राहत होता ... तेव्हा गुहेबाहेर एखाद हिंस्त्र श्वापद त्याच्या शिकारीसाठी थांबलेलं असताना ..त्याच्या नखांचा घर्षणाचा आवाज आल्यवर माणूस एक तर पळण्यासाठी किंवा प्रतिकारासाठी तयार होत असे... तेव्हा तो मुठी आवळत असे आणि दात खात असे.....

अगदी हीच जाणीव मानवी मेंदूत आजपर्यंत चिटकून आहे ...

धन्यवाद डॉ. मस्त माहीती. Happy
डॉ. इब्लिस: पण मग मेंदूत निर्माण होणारया या भावना आपल्या ह्रुदयाशी कशा जोडल्या गेल्या आहेत?
म्हणजे भिती वाटली की ह्रुदयात धडधडतं, किंवा खूप आनंद झाला की छाती भरुन येते, प्रेमाचं नातं तर मेंदूपेक्षा ह्रुदयाशीच जास्त जोडल्या गेलय. हे co-ordination कसं होतं..
मग या जाणीवा उत्क्रांती पासून ह्रुदयाशी जोडल्या गेल्यायेत का मेंदुशी??
सॉरी हे जर अवांतर होतय बहुतेक..

माझ्या मते पहिली जाणिव आपली 'ही आपली आई. ही आपल्याला प्रेम देणारी, उब देणारी, आपल्या गरजा पुर्ण करणारी हीच आपली माता' ही असावी.

मला इब्लिस ह्यांचे अनेक प्रतिसाद फार आवडले. त्या प्रतिसादांमध्ये रंजक माहितीही आहे व तिला तर्कसुसंगत अशी कारणमीमांसाही असल्याचे जाणवत आहे. मात्र इब्लिस ह्यांच्या समजुतीत (अर्थातच माझ्या समजुतीनुसार व कुवतीनुसार) एक बेसिकच घोळ आहे व तो असा:

>>>भूक लागल्याची, अन सटायटी, उर्फ पोट भरल्याची भावना सर्वात आधी येते. ही सर्वात आदीम भावना होय. आय नीड टू फीड ही सर्वात आदीम "भावना"

भीती, राग, लोभ, मत्सर, प्रेम ह्या सर्व भावना आहेत.

तहान, भूक, निद्रा, मैथुन ह्या जाणिवा आहेत.

उदाहरणार्थ, एखादा लांडगा भूक (जाणीव) लागली म्हणून एखादा ससा मारतो पण सश्याचा राग (भावना) आला म्हणून ससा मारत नाही.

भावना आणि जाणिवा ह्यांच्यातील तफावत जर विचारात घेतली नाही तर डॉक्टर इब्लिस म्हणतात ते सर्व मुद्दे रंजक व उत्तम असूनही दिशाहीन (पर्यायी शब्द लगेच न सुचल्याबद्दल क्षमस्व) वाटत आहेत.

पुन्हा एकदा:

>>>>>> ह्या मुद्द्याचे प्रॅक्टिकल नॉलेज(नोंदी) कसे मिळवायचे /मिळ्वतात ह्याचे कुतुहलही लागून राहिले आहे स्मित>>>>>>

मानस-शास्त्रज्ञ विविध प्रयोगांतून (मानव व इतर प्राण्यांवर केलेल्या) अशा प्रकारची माहिती मिळवतात असे एका मानास्शास्त्रावाराच्या पुस्तकात वाचले आहे.

कुणि बालमानस शास्त्रज्ञ व्यक्तीने यावर संशोधन केले असेलच. कुणाला माहित आहे?
अर्थात त्यावर विश्वास असेल तरच. नाहीतर मी म्हणतो तेच खरे म्हणून आपल्या मनाला येईल ते उत्तर द्यावे.

आदिम माहित नाही, पण अंतिम जाणीव मात्र वेदना नि भय या असाव्यात असे वाटते. जेंव्हा आपण म्हणतो कुणि शांतपणे झोपेतच गेले तेंव्हा अंतिम क्षणी त्या व्यक्तीला वेदना झाल्याच असतील पण त्या व्यक्त कश्या होतील? नि बाकीच्यांना कश्या समजतील?

भीति ही भावना की जाणीव? असे म्हणतात की पडण्याची भीति उपजत असते, इतर बाबतीतली भीति आपण शिकवतो मुलांना.
asaa ekhaadaa xaN hotaa kaa ki jyaa xaNaapaasun... ek praaNee maanav samajlaa jaoo laagalaa ?
समजला जाऊ लागला? कुणाला समजला? इतर प्राण्यांना कळते का की दुसरा प्राणी माणूस आहे की मा़कड?
असे म्हणतात अश्या अनेक जमाती आहेत ज्यांचा चालू जगाशी काहीहि संबंध नाही, त्यांना माणसे म्हणायचे का? कशावरून? त्यांच्या जाणीवा आदिम?