बातमी खरी आहे का?

Submitted by रश्मी.. on 7 April, 2014 - 07:51

आजच्या लोकसत्ता ( ऑनलाईन) मध्ये नुकतीच खालची बातमी वाचली, ती खरी आहे का? कारण सकाळ मध्ये नाही आलेली पण मटा व लोकसत्तात आलीय.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/parents-anger-in...

http://www.loksatta.com/pune-news/rape-on-4-year-baby-by-school-bus-atte...

आणी असल्यास आता हे लोण कुठपर्यन्त येऊन पोहोचले आहे पहा. कुठल्या भरवश्यावर पालकानी अपल्या मुला-मुलीना बस/ व्हॅन/रिक्षामधुन पाठवावे? वेळेच्या अर्धा तास आधी तर शाळा सुटल्यावर पण अर्धा तास उशिरा ही निरागस मुले मुली घरी पोहोचतात.

त्यान्च्या वाटेकडे डोळे लावुन बसणार्या आई-वडिल, आजी-आजोबा यान्ची काय हालत होत असेल?

काय लिहावे आणी काय वाचावे. माझा देश एवढा रसातळाला जाईल असे कधी वाटले नव्हते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई गं!
काय चाललयं हे सगळं. संताप संताप होतो नुसता.
माझी लेक जुनपासुन शाळेत बसने जाणार आहे हे असे वाचुन खुप भिती वाटते. बस/ व्हॅन/रिक्षामधुन तिला पाठवावे की नाही हेच कळत नाही.

दोन्ही फोटोत शाळेबाहेर संतप्त पालकांचा जमाव दिसत आहे. म्हणजे बातमी सत्य असणार. म.टा. ने तर शाळेचे नाव, संबंधित नराधमांची नावेही प्रसिद्ध केली आहेत.

४ वर्षाची बाहुलीसारखी पोर ! काय म्हणावे या अमानुष प्रवृत्तीला. भयाण अवस्था झाली असेल त्या मुलीच्या घरच्यांची. किती कायदे करायचे याच्या विरोधात ? आणि सध्या इतक्या कडकपणे त्यांची अंमलबजावणी होत असल्याच्या बातम्या येत असूनही सांप्रत महाराष्ट्र देशी असले राक्षस आसपास वावरतात ही अवस्था भयाण आहे.

लोकान्समोर आणुन त्याना या लोकाना तुडवायला सान्गा. नाहीतर दुबई सारखे कडक कायदे करा.:राग:

बसमध्ये एकही महिला सहायक नाही? काय म्हणावे याला?

कृपया आपल्या मुलांच्या शाळेच्या प्रिन्सिपल पर्यंत ही बातमी पोहोचवा आणि प्रत्येक बसमधे महिला अटेंडंट ठेवण्याची मागणी करा. (Demand.. Do not Request).

खरंच पशु आहेत अश्या प्रवृत्ती. माझी छोटी भाची पण जूनपासून बसने शाळेत जाणार, मला काळजी वाटते.

भयंकर आहे हे!
शाळेत पालक संघ आहे का? नसेल तर तयार करावा. दररोज एखादा पालक प्रतिनिधी बस-अटेंडट म्हणून काम करु शकेल अशी व्यवस्था करता येईल का?

दररोज एखादा पालक प्रतिनिधी बस-अटेंडट म्हणून काम करु शकेल अशी व्यवस्था करता येईल का? >> खरंतर आयडिया चांगली आहे. प्रत्येक पाल्याच्या आई वडिलांनी एकेक दिवस ऑफिसातून मागून घ्यावा आणि तसा कायदाच करायला हवा खरंतर.

मुलांसाठी शाळा निवडताना आम्ही आमच्यापुरते ठरवलेले महत्वाचे निकष-
- शाळा घरापासून १-२ किमी पेक्षा दुर नसावी.
- शाळा ते घर प्रवास १५-२० मिनिटांपेक्षा जास्त नसावा. गर्दीच्या वेळेत जास्तित जास्त २५ मिनीट.
- प्रायव्हेट व्हॅन नाही तर शाळेच्या बसेस असाव्यात.
- शाळेच्या बसेस सरकारचे(इथे आरटीओचे स्पेशल नियम आहेत स्कुलबससाठी) स्कुलबससाठीचे नियम कितपत पाळतात यावर नेहेमी चेक.
- शाळेमध्ये खेळण्यासाठी ग्राउंड असावे.

इथले आमची शाळा पाळत असलेले नियम-
बसचा रंग पिवळा आणि त्यावर मोठ्या अक्षरात स्कुलबस असे लिहिलेले आहे.
शाळेचे नाव लिहिलेले आहे.
बसचा नंबर आणि रुट बसमध्ये चिटकवलेला आहे.
ड्रायव्हर आणि अटेंडट युनिफॉर्ममध्ये असतो.
लहान मुलांच्या बसमध्ये ( ३ ते ७ वयोगट) एक महिला अंटेंडंटही असते. मोठ्यांच्या बसमध्ये बर्‍याचदाफक्त पुरुष अटेंडंट असतात.
याशिवाय बसमध्ये (सगळ्या- लहान आणि मोठ्या दोन्ही मुलांच्या) किमान एक शिक्षक पुर्णवेळ असतो /असते.
बसची सर्व्हिसींग रेग्युलरली केली जाते. ती कागदपत्र मागितल्यास पालकांना दाखवली जातात.
बसचे ड्रायव्हर किमान ८-१० वर्षांचा अनुभव असलेलेच आहेत.
शाळेत लेखी कळवल्याशिवाय बसस्टॉप तसेच मुलाला बसमधून घेणारी व्यक्ती बदलता येत नाही.

हे नियम तुमच्या शाळांमध्ये पाळले जातात का बघा. हे शाळेत करण्यासाठी आग्रह धरा.खाजगी व्हॅन /वाहन टाळा कारण यावर शाळेचे नियंत्रण नसते. (अर्थात वरच्या केसमध्ये बहूतेक शाळेचीच बस दिसत आहे)

ती लेडि अतेण्ड्न्ट तरि कशि असेल,हि सुद्धा एक काळजिचि बाब आहेच असे मला वाटते Sad

खूपच अवघड झाले आहे.देशात परत जाण्याचि हि भिति वाटते ह्या सारख दुसर दु:ख नाहि

ती लेडि अतेण्ड्न्ट तरि कशि असेल,हि सुद्धा एक काळजिचि बाब आहेच असे मला वाटते >>> म्हणूनच एकापेक्षा जास्त व्यक्ती बसमध्ये असाव्यात.
आमच्या बसमध्ये सध्या तरी एक ड्रायव्हर, एक भैय्या, एक आंटी आणि एक किंवा दोन शिक्षिका असतात.
आणि अर्थातच ड्रायव्हर, अटेंडंट्स (भैय्या, आंटी) हे लोक शाळेमध्ये परमनंट स्टाफ म्हणून पेरोलवर आहेत. सध्या आमच्या बसमध्ये असलेल्या व्यक्ती शाळेत गेल्या ७-८ वर्षांच्या आधीपासून आहेत. शाळेत अटेंडंट /ड्रायव्हर किंवा इतर कोणत्याही नोकरीवर ठेवण्याचे शाळेचे निकषही खूप कडक आहेत.

नुसतंच शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर बघण्यापेक्षा शाळा प्रवेशाच्या वेळी या बाबी तपासाव्यात असं सध्याच्या परिस्थितीत मला वाटतं.

(नेहमीसारखाच) संताप होतोय हे वाचुन. पालकसंघ कल्प्ना चांगली आहे. अल्पनाचा प्रतिसाद चांगला.

गोपिका, खूपच अवघड झाले आहे.देशात परत जाण्याचि हि भिति वाटते ह्या सारख दुसर दु:ख नाहि >
अनुमोदन (हे लिहायला पण दु:ख होत आहे).

Sad

-शाळेत पालक संघ असणे जरुरी आहे / तसा नियमच आहे.
-दररोज एखादा पालक प्रतिनिधी बस-अटेंडट >> बस मधे ड्रायवर, एक पुरुष अटेंडंट आणि एक स्त्री अटेंडंट असणे सक्तीच आहे. नसल्यास तक्रार करा.
-छोटी व्हॅन असेल तर ड्रायवर आणि एक स्त्री अटेंडंट असायलाच हवी ( कुठल्याही वयोगटाच्या शाळेच्या मुलांसाठी) असा नियम आहे. शाळा अटेंडंट देत नसेल तर पालकांनी त्यासाठी आग्रह करायला हवा. काही ठिकाणी अटेंडंटचा पगार कोण देणार / पगार परवडत नाही म्हणुन शाळा अटेंडंट देत नाही.
काहीवेळा बस सर्विस शाळेची नसेल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तत्वावर शाळेसाठी असेल तर ती कंपनी अटेंडंटसाठी पालकांना बस ची फी वाढवुन मागते, आणि बहुतांश पालक त्याला नकार देतात. अशा बर्‍याच ठिकाणी विनाअटेंडंट बस चालवल्या जातात आणि पालक सतत दुर्लक्ष करत राहातात हे मी पाहीले आहे. अशावेळी पालकांनी एकतर पैसे वाढवुन देऊन योग्य सर्विस मिळतेय का याकडे लक्ष द्यावे किंवा स्वतःच एकेक पालकाने बस अटेंडंटचे काम करावे. पण ते खरच केले जात नाही. Sad काही ठिकाणी स्वस्त पडते म्हणुन खाजगी वहानात दहा बारा मुले कोंबुनही पाठवली जातात.

बाकी
बसचा रंग पिवळा आणि त्यावर मोठ्या अक्षरात स्कुलबस असे लिहिलेले असावे.
शाळेचे नाव लिहिलेले असावे , कॉन्टॅक्ट नंबरही लिहीलेला असावा.
बसचा नंबर आणि रुट बसमध्ये चिटकवलेला असावा.
ड्रायव्हर आणि अटेंडट युनिफॉर्ममध्ये असावा.
बसच्या खिडक्यांना जाळ्या / तीन आडवे रॉड लावलेले असावेत.
वाहाने फार जुनी नसावीत ( किती वर्ष वापरलेली त्याचा काहीतरी नियम आहे)

इत्यादी नियमही आहेतच.

सावली व अल्पनाने लिहीलेले तर आवश्यक व योग्यही आहेच, पण त्याचबरोबर आणखीही एक खबरदारी घ्यायला हवी, मी आधीही कदाचित लिहीले असेल याबद्दल.
बंगलोरमधे झालेली घटना - स्कूलबसमधे लेडी अटेंडंट होती तरी कधीकधी ती मधल्याच एखाद्या स्टॉपवर तिच्या नातेवाईकाला/मित्राला स्कूलबसमध्ये चढू देत असे, व हा मुलगा/माणूस शेवटच्या स्टॉपवर उरलेल्या २-३ मुलामुलींना त्रास देत असे व त्याआधीपण बाकी मुलांचे जोरात गालगुच्चे घे वगैरे असे प्रकार करत असे. त्यामुळे स्कूलबसमध्ये अधेमधे कुणी चढत नाहीना यासाठी पालकांनी सतर्क रहायला हवे. मुलांशी याबद्दल बोलत, विचारत राहणे जरुरीचे आहेच, तसेच आपल्या मुलामुलीला चढवताना / उतरवताना बसमध्ये सर्व आलबेल आहे का याची प्रत्येक वेळी आत डोकावून खात्री करुन घेणे अतिशय गरजेचे आहे.
बंगलोरमधे काही इंटरनॅशनल स्कूल्स च्या बसेस ना पडदे वगैरे असायचे त्यामुळे आतले काहीच दिसायचे नाही, ते अजून रिस्की आहे.

खुप काळजी वाटली !
खरं तर मोठ्या मुलांसोबत एखादा गट करून सार्वजनिक वाहनाने नाही का जाता येणार.
सहज आठवलं म्हणून लिहितो. ऑकलंड मधे मुलांनी चालतच शाळेत यावे असा नियम आहे. त्यांना पालकांनी गाडीने सोडलेले चालत नाही. अर्थातच प्रत्येक विभागात सरकारी शाळा आहेत. रस्त्यावर मुलांसाठी खास लेन असते. त्यावर वॉकिंग बस असे लिहिलेले असते. एकाच विभगात राहणारी सर्व मुले गटाने एकत्र जातात.
शाळेच्या वेळात शाळेच्या गणवेशात मुले इतरत्र कुठेही दिसली तर कुणीही त्यांना हटकू शकते.

ती मुले एरवीही रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळत असतात.

बंगलोरमधे काही इंटरनॅशनल स्कूल्स च्या बसेस ना पडदे वगैरे असायचे त्यामुळे आतले काहीच दिसायचे नाही, ते अजून रिस्की आहे. >>>
इथे स्कुलबसना पडदे लावण्यास /टिंटेड ग्लास ठेवण्यास मनाई आहे. पण पालकच याच्या विरोधात ओरडत असतात. आमच्या मुलांना एसी बसमध्ये उन्हाच्या झळा लागतात म्हणून पडदे असू द्या असलं ऑर्ग्युमेंट करतात पालक. :अओ::

कित्येक पालक शाळेची स्कुलबस असूनही स्कुलबसचे पैसे जास्त आहेत किंवा स्टॉपपर्यंत /जो बहूतांशी वेळा घराच्या गल्लीच्या तोंडाशी असतो २-५ पावलं चालत जावं लागतं आणि व्हॅन मात्र दरवाज्यात येते /बस स्टॉपवर मुलाची वाट बघत थांबत नाही पण व्हॅनवाले २-३ मिनीट थांबतात अशा कारणांमूळे खाजगी व्हॅनमध्ये (ज्यात मुलांना अक्षरशः कोंबलेले असते) मुलांना पाठवतात. सकाळी सुसाट जाणार्‍या खाजगी व्हॅन्स बघून मला नेहेमीच भिती वाटते. Sad

खरंतर शासनाने स्कुलबस संदर्भात बरेच कडक नियम केलेले आहेत. ते आपल्या शाळेत पाळले जातात की नाही हे बघणं फक्त शासनाचंच नाही तर आपलंही कर्तव्य आहे. पण खूप कमी पालक यासंदर्भात जागरुक असतात. अशी एखादी घटना घडली किंवा एखादा अपघात झाला की शाळेची चुक म्हणून आपण गोंधळ घालतो. पण शाळेला अशी चुक करु द्यायची संधी आपण देवू नये असं मला वाटतं.

अल्पना चान्गला आढावा घेतलास. जवळपास चान्गल्या शाळा आहेत. पण आम्हाला जी सोयीची पडेल तीच शाळा आम्ही निवडली, कारण ५ मिनिटाच्या अन्तरावर आहे. मी चालत जाते मुलीला आणायला इतकी जवळ आहे. भलेही उच्च दर्जाची नाहीये, पण स्टाफ खूप चान्गला आहे. इतर मुलान्करता बसमध्ये महिला सहायक आहेत.

मुलीला परिक्षेच्या दरम्यान त्रास होता( उलटी वगैरे) तेव्हा त्यानी ताबडतोक फोन करुन बोलावले. मिटिन्ग्ज होत असतातच.

मला शाळा बदलण्याचा अनेकानी सल्ला दिला,कारण शाळा खूप हायफाय नाहीये. पण मलाच ते नकोय, कारण ही आताची परिस्थिती. जीव टान्गणीला ठेवण्यापेक्षा मुल सुरक्षीत आहे हे महत्वाचे.

कसले कायदे आणि कसले काय? घटना दोन दिवस आधी घडली, पालकांनी शाळेला कळवले, शाळेने कारवआई करु म्हणुन आश्वासन दिले तरी सोमवारी तोच नराधम परत बसमध्ये हजर..

असल्या गोष्टी आता रोजच्या झाल्यात, त्यामुळॅ त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे असेच समाजमत तयार होताना दिसतेय आता.

घटना दोन दिवस आधी घडली, >>>

http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=445853&boxid=14549812&pgno=6&u...

मुलीला त्रास होत होता म्हणुन डॉ. कडॅ गेल्यावर या गोष्टींचा उलगडा झालाय.

असल्या गोष्टी आता रोजच्या झाल्यात, त्यामुळॅ त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे असेच समाजमत तयार होताना दिसतेय आता.>> कैच्या काय Sad

वाईट एकाच गोष्टीच वाटतय कि १.५ महिने हा प्रकार सुरु असुन त्या मुलीला हे घरी साम्गावेसे वाटले नाही म्हणजे पालक देखिल कुठे तरी कमी पडतात असे वाटतय ये नक्की. समाजातील घटकांना बदलले जाने हे कठीण असले तरी आपण आपल्या मुलीम्ना तेरी शिकवु शकतो . फक्त ते शिकवण्याचे वय एवढे कमी झालय याबद्दलच चीड / संताप / उद्वेग / लाज / शरम / हतबलता येतेय.

असल्या गोष्टी आता रोजच्या झाल्यात, त्यामुळॅ त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे असेच समाजमत तयार होताना दिसतेय आता.>> कैच्या काय

कैच्याकैच काय? वर दिलेल्या बातमीत पालकांनी तक्रार केल्यावर संचालकाने कारवाई करतो हे सांगितले आणि तरीही सोमवारी अपराधी बसमध्ये हजर होता. यावरुन कसली कारवाई केली हे कळते? सोमवारी पालकांनी शाळेत जाऊन आवाज उठवला नसता तर या प्रकरणाचे पुढे काय झाले असते? अपराधी अडाणी होता म्हणु शकतो आपण एकवेळ पण संचालकाला नको कळायला गांभिर्य?

>>असल्या गोष्टी आता रोजच्या झाल्यात, त्यामुळॅ त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे असेच समाजमत तयार होताना दिसतेय आता.<<

ह्म्म...
ज्याच्या मुलाला/मुलीला नाहक बळी जावे लागते त्यांचा विचार करून वाईटवाटते पण दुर्लक्ष करूनच समाज जगतोय ना म्हणून असल्यांचे फावते.

काहींचे प्रतिसाद तर, हे तर काय रोजचेच आहे, त्यात काय? पण विचार करा, हे कोणाही लहान मुला/मुलीबरोबर होते आहे. देव ना करो, उद्या तुमच्या जवळचे मुल असु शकते.
पालकांनी एक्जुटी करून विरोधच करावा. शाळेसाठी पैसे भरतोच ना, मग इतकी खबरदारी व जबाबदारी शाळेने घ्यायलाच पाहिजे जर ती बस शाळेकडून असेल तर. नसली तर बाहेरच्या कंपनीच्या बस मालकांकडून ती खातरजमा केलीच पाहिजे.

असल्या गोष्टी आता रोजच्या झाल्यात, त्यामुळॅ त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे असेच समाजमत तयार होताना दिसतेय आता.>>
ह्यामुळेच हे नराधम असले गुन्हे करायला मोकळे होतात.त्यांची खात्री असते की आपलं कुणीही काहीही वाकडं करु शकत नाही. गुन्हेगारांना पोलिस आणि कायद्याची भीती राहीली नाही हे सत्य आहे. (ती भीती सामान्य लोकांना आहे, काहीही गुन्हा न करता).
संचालकाला नको कळायला गांभिर्य?>>
संचालकाने (मुख्याध्यापकाकडुन) माहिती मिळाली नसल्याचे सांगितले आहे.खरं खोटं माहित नाही.
त्यांना मुला-मुलिंच्या सुरक्षेपेक्षा, पैसा आणि शाळेची बदनामी ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. पालकांनी आवाज उठवला नसता तर कदाचित हे प्रकरण दाबले गेले असते.
मुलीच्या पालकांनी एव्हढा गंभीर गुन्हा पोलिसात का नोंदवला नाही ते कळले नाही, शाळेत माहिती देण्याआधी पोलिसात तक्रार करायला हवी होती.

अल्पना, मवा, सावली, चांगली माहिती.

>>खूपच अवघड झाले आहे.देशात परत जाण्याचि हि भिति वाटते ह्या सारख दुसर दु:ख नाहि>>
अशा घटना परदेशातही घडू शकतात्/घडतात. शक्य ती सर्व खबरदारी घेणे हे मात्र पालक करु शकतात.

अशा बातम्या वाचल्या कि आधी अशा विकृत माणसाबद्दल (खरेतर त्यांना माणूस म्हणणे पण चुकीचे आहे ) प्रचंड चीड येते , राग येतो . एकंदर परिस्थिती बघता खूप निराश वाटते आणि भीती पण वाटते. अशा लोकांना अतिशय कडक शिक्षा तर झाल्याच पाहिजेत त्याही लवकर .
बाकी वर बरेच जणांनी सागितले आहे तशी काळजी घेणे आवश्यकच वाटत आहे.

संस्थाचालकांची जबाबदारी आहे, त्यांनी ती झटकून चालणार नाही,अ‍ॅडमिशन घेतेवेळी पालकांना लूटायला लाज वाटत नाही मग मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला नको. ??

नवलेसाहेब कायदे धाब्यावर बसवण्याकरता प्रसिद्ध आहेत. सिंहगड संस्थेची जमिन कुणाकडून तरी हडप केल्याचे प्रकरण बराच वेळ कोर्टात चालू होते. तेव्हा ह्याही प्रकरणी जर खिशाला चाट बसत असेल तर नियम वगैरे पाळण्याचे ते फार मनावर घेणार नाहीत. अशा लोकांना कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय ते ताळ्यावर येणार नाहीत. दुर्दैवाने लोकांनी कायदा हातात घेतल्याशिवाय पोलिस वगैरे यंत्रणा हलतच नाहीत. सुदैवाने हा मुद्दा सगळ्यांच्या इतका जिव्हाळ्याचा आहे की कितीही स्वार्थी, आप्पलपोटा माणूस असला तरी ह्या कारवाईला उघड विरोध करु शकणार नाही.

whatsapp var firtay, this news was a rumour. I don't know which one is rumour.
in any case it's all ridiculous.