AC कुठला घ्यावा ?

Submitted by तनुदि on 29 March, 2014 - 15:37

२८००० ता ३२००० या कीमतीत कोणता चान्गला A C मिळे ला
वर टेरेस आहे रुम मधे उन असत दुपारी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या बजेट मध्ये असेल तो.
आपल्या रूम ची size बघून.
वीज बिल कमी येईल तो
कोणताही ही घ्या ब्रँड वरून दर्जा बिलकुल ठरवू नका.
नाव झाले की.
ब्रँड आणि दर्जा ह्याचा काही संबंध नसतो.
हे नेहमीच सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे

एसी घेताना..

  • आपण ज्या भिंतीला बसवणार आहोत तिच्यावर सूर्यप्रकाश थेट पडतो का ? दिवसाच्या किती काळ ती सूर्यप्रकाशात असते ?
  • बाहेर जर कॉम्प्रेसर युनिट बसवणार असू तर त्याच्यावर प्रकाश पडणार आहे की सावली ? सावली असेल तर एसी छान काम करतो. तप्त उन्हात असेल तर उष्णता बाहेर फेकायला अडचण होते आणि एसी काम करत नाही. त्याच्यावर शेड बनवून घ्यावी. ही कामे एसी विकत घेण्याच्या आधी करावीत. जिथे कॉम्प्रेसर बसणार आहे ती जागा सपाट असावी. त्या खाली रबराचे शॉक अ‍ॅब्सॉर्बर्ज बसवावेत.
  • इन्व्हर्टर एसी घ्यायचा असेल तर खास इन्व्हर्टर स्टॅबिलायझर घ्यावा. जिथे वारंवार व्होल्टेज बदल होतात तिथे आवश्यक आहे. जर पीसीबी उडाला तर त्याची किंमत ८ ते १२ हजारपर्यंत आहे.
  • इन्व्हर्टर एसी घ्यायचा असेल तर खास इन्व्हर्टर स्टॅबिलायझर घ्यावा. जिथे वारंवार व्होल्टेज बदल होतात तिथे आवश्यक आहे. जर पीसीबी उडाला तर त्याची किंमत ८ ते १२ हजारपर्यंत आहे. ( इलेक्ट्रॉनिक्स मधले मला समजत नाही यासाठी त्यातल्या हुषार लोकांना विचारले होते)
  • खूप उष्ण भागात राहत नसाल, वर्षात किमान ८ महीने एसी चा वापर होणार नसेल तर ५ स्टार ऐवजी ३ स्टार एसी परवडतो. वीजेची बचत आणि किंमतीतला सुरूवातीचा फरक हे गणित करून पहावे.
  • १२० स्क्वे फूट पर्यंतच्या खोलीला एक टनाचा एसी पुरेसा आहे. अनेक कंपन्या ११२, १०८ स्क्वे फूट पर्यंतच १ टन एसी चालतो असे दाखवतात. जर उन्हं येत असतील तर मग जास्त क्षमतेचा घ्यावा.
  • एसीचं इनडोअर युनिट जिथे बसणार आहे तिथे एसीच्या खाली काहीही नको. खिडकीच्या वर बसणार असेल तर भिंतीवर रॉड लावलेले पडदे नकोत. काचांना फिल्म लावावी किंवा खिडकीच्या गाळ्याच्या आतच चॅनल बसवून सरकता पडदा लावावा.
  • बाहेरचे युनिट अशा जागी बसवावे जिथे चढून नंतर मेन्टेनन्स किंवा रिपेअरिंग करता येईल. हे आधीच ठरवावे लागते.
  • कंप्रेसर युनिट कडून आत येणारी ट्यूब भिंतीच्या ठिकाणी यू आकार करून मगच आत ढकलावी. नाहीतर पावसाचे पाणी किंवा काही काळाने कप्रेसर युनिटमधले पाणी आत जाऊन भिंत आणि आतल्या युनिटला त्रास होतो.
  • ब्ल्यू फिन किंवा अन्य फॅन्सी नावाने जे तंत्रज्ञान वापरतात ते ट्यूबवर लावायचे एक केमिकल आहे. जर आपण दमट भागात. धुळीच्या भागात, जास्त पावसाच्या भागात राहत नसू तर याची गरज नाही.
  • टू स्टेज किंवा थ्री स्टेज एसी २०२० साली होते. ते मॉडेल पुरेसे असेल तर उगीचच ५ स्टेज किंवा ६ स्टेज वाले घेऊ नये. विनाकारण खर्च होतो. १ टन एसी असेल तर तो ०.८ टनावर चालतो. यापेक्षा खाली जात नाही. १.५ टन असेल तर १ टन आणि ०.८ टन अशा क्षमतेने खोली थंड झाल्यावर एसी चालतो. १.५ वरून ०.८ वर थेट आल्याने फरक पडत नाही. खूप जास्त बचत होणार नाही. २४ तास आणि १२ महीने वापरणार असाल तर मग सगळे फीचर्स घ्यावेत.
  • पॅनासॉनिक, सॅमसंग, लॉईड, व्होल्टास, ब्ल्यूस्टार यांची सर्व्हिस चांगली आहे.
  • ज्या कम्प्रेसर वर १० वर्षांची वॉरंटी आहे त्याला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर पीसीबी वर पण किमान ५ वर्षांची वॉरंटी आहे का हे पहावे. नसेल तर एक्स्टेंडेड वॉरंटी घ्यावी.
  • आउटडोअर युनिट शक्यतो इनडोअर युनिटच्या वर बसले तर ग्रॅव्हिटीच्या विरोधात पंपिंगमधे जाणारी ऊर्जा वाचते.
  • दोन्ही युनिट मधे कमीत कमी अंतर असावे. जॉईण्ट द्यायचा झाल्यास तो सीलबंद असावा. त्यात प्रॉपर टेफलॉन किंवा इतर टेप लावलीय का हे पहावे. ट्यूब्सचा जो भाग उन्हात असतो त्यावर इन्स्युलेशन करावे.

सर्व पॉइंट अतिशय उत्तम फक्त शेवटचा पॉइंट अव्याहरिक आहे.
Outdoor unit he indoor युनिट पेक्षा जास्त उंचीवर असावे.
बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना ते अशक्य च आहे.
वर वरच्या मजल्यांची गॅलरी असते.
बंगलो मध्ये टेरेस वर ठेवावे लागेल पण अंतर लांब पडेल.

बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना ते अशक्य च आहे. >>> ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी आहे ते.

आमच्या बेडरुमसाठी ए सी घ्यायचा आहे. सध्या कोणते ब्रँड चांगले आहेत? एका बेडरुमला daikin चा एसी आहे तो गेली ७ वर्षे उत्तम सुरु आहे. आता दुसऱ्या बेडरुमसाठी हवा आहे.

कोणताही घ्या.
फक्त आपली रूम किती मोठी आहे त्याचा विचार करून योग्य टन ताकतीचा घ्या

कोणताही घ्या.
फक्त आपली रूम किती मोठी आहे त्याचा विचार करून योग्य टन ताकतीचा घ्या

भ्रमर, हेमंत ३३३, धन्यवाद!
हेमंत ३३३, हो रूम साईज नुसार दीड टनाचा घेऊ. नवीन काही फिचर वगैरे माहिती हवी आहे.

माझ्या कडे गोदरेज चा आहे .दोन वर्ष झाली अजून तरी कोणतीच तक्रार नाही.
फक्त वेळेवर सर्व्हिस करतो.

काही ही प्रॉब्लेम नाही.

तुमच्या daikin च्या निवडीबाबत सहमत. मी तेच लिहायला आलो होतो. मला एसी घ्यायचा होता तेंव्हा मी एक दिवसभर बराच रिसर्च केला होता.
शेकडो विविध रिव्ह्यूज आणि स्पेक्स वाचून. Daikin, BlueStar आणि Sharp या तीन कंपन्यांचे एसी चांगले (क्वालिटीच्या दृष्टीने) असतात असा तेंव्हा माझा निष्कर्ष होता. Sharp ने तेंव्हा कोणती एक नवीन टेक्नोलॉजी आणली होती (inverter technology का असेच काहीतरी) त्याची चर्चा तेंव्हा होती, मी BlueStar घेतला अजूनही उत्तम चालतो काहीच समस्या नाही.

टीप: एसी कुठलाही असो फिटिंग करताना बाहेरचे आणि आतले युनिट जोडणारी केबल अखंड असण्याचा आग्रह धरा.
(याबाबत माझा याच धाग्यावरचा पहिल्या पानावरचा प्रतिसाद वाचा हि विनंती)

एसी घेताना फाईव्ह स्टार रेटींगच्या एसीची किंमत आणि तुमची होणारी महिना बचत बघा. तुम्ही कुठे राहता त्याप्रमाणे एसी ठरतो. जर थ्री स्टार एसी पुरेसा असेल तर विनाकारण फाईव्ह स्टारचा आग्रह धरू नका. नवनवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण हे लागू आहे. ते कोणत्या परिस्थितीत जास्त इफेक्टिव्ह आहे हे बघा. कॉस्ट इफेक्टिव्हनेस हा महत्वाचा फॅक्टर आहे.
सॅमसंगचे एसी पण चेक करा. इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीमधे ते चांगले आहेत.

AC घेतांना (खरेतर बसवताना, installation करतांना) एक महत्वाच्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या.
खाली दिलेला मुद्दा हा केवळ स्प्लिट AC, cassette ac इ. साठी लागू आहे ज्यात indoor unit आणि outdoor unit वेगवेगळे असते आणि installation करतांना पाईपच्या सहाय्याने एकमेकांना जोडले जाते. Windows AC हे पूर्णपणे एकच युनिट असते, ज्याला फक्त त्या आकाराच्या खाचेत बसवायचे असते, बाकी installation असे वेगळे काहीही नसते. त्यामुळे हा मुद्दा Windows AC च्या installation साठी लागू नाही. (जर जुना Windows AC दुरुस्त करून घेत असाल, त्यात gas भरून घेत असाल तर मात्र त्यालासुद्धा हा मुद्दा लागू होईल.)

Vacumming : AC installation मधील सर्वात महत्वाची step परंतु आपल्याला माहिती नसल्याने installation करणारे वेळ आणि मेहनत वाचवायला ही स्टेप करत नाहीत, ज्याचा नंतर त्रास होऊ शकतो.
स्प्लिट ac मध्ये दोन युनिट असतात. Indoor & Outdoor.
१. Outdoor unit च्या coil मध्ये कंपनी R32 वा तत्सम refrigerent gas भरून त्याचे valves घट्ट बंद करून पाठवते. हा कंपनीने भरून दिलेला gas अत्यंत उच्च दर्जाचा, एकदम pure असा असतो.
२. Indoor unit मध्ये उच्च दाबाखाली नायट्रोजन भरलेला असतो व त्याच्या coil ची तोंडे प्लास्टिक / रबरच्या बुचांनी घट्ट बंद केलेली असतात. installation च्या वेळी technician ही बुचे काढतात तेव्हा उच्च दाबाखाली असलेला nitrogen बाहेर पडतो आणि तेव्हा 'फुस्स' असा आवाज येतो. आणि हा आवाज आलाच पाहिजे. आवाज आला याचा अर्थ कंपनीने ac बनवताना भरलेला nitrogen अजूनही (आपल्या घरी ac येईपर्यंत- काही दिवस / महिने झाल्यावरही) टिकून आहे, म्हणजेच indoor unit ची coil कुठेही लिक नाही. जर आवाज आला नाही याचा अर्थ कंपनीने भरलेला nitrogen आधीच निघून गेला आहे, याचा अर्थ indoor ची coil कुठेतरी लिक असू शकते.
३. Indoor & Outdoor unit एकमेकांना जोडण्यासाठी तांब्याचे पाईप वापरले जातात. एक जाड (large diameter) तर एक थोडा बारीक (small diameter) असतो. या पाईपमध्ये कोणताही gas भरलेला नसतो किंवा त्याची तोंडे बंद केलेली नसतात. म्हणजेच त्यात हवा असते. किंवा जरी तोंडे बंद केलेली असली तरी installation site च्या गरजेप्रमाणे पाईप कापल्यावर त्यात हवा शिरते. आणि खरी मेख इथेच आहे!

आपण पाहिलेच असेल की दोन्ही युनिट पाईपने जोडल्यावर (पाईपला brazing वगैरे केल्यावर) कुठेही लिकेज नाही ना हे तपासण्यासाठी साबणाच्या पाण्याचा वापर केला जातो. पण साबणाच्या पाण्याचा वापर करून लिकेज केव्हा तपासता येईल? तर पाईप मधून gas / हवा बाहेर येत असेल तरच. परंतु brazing करेपर्यंत पाईपचे तोंड उघडे होते, म्हणजेच बाहेरच्या हवेचा दाब आणि पाईपच्या आतील हवेचा दाब एकसारखा आहे. जर दाब सारखाच असेल तर हवा बाहेर येणारच नाही. थोडक्यात पाईप मध्ये दाब जास्त पाहिजे. आता दाब वाढवण्यासाठी हे मूर्ख technician (मूर्ख का म्हणतो आहे ते पुढे कळेल) outdoor unit मधील अत्यंत pure असा refrigerent gas release करतात. म्हणजे आता जर लिकेज असेलच तर पाईपमधील हवेसोबतच बाहेर काय येणार? तर refrigerent gas! ज्याच्यामुळेच कुलिंग होते. अशाने refrigerent ची quantity कमी होते. बरे नुसती quantity कमी होत नाही तर त्याची quality ही घसरते! का? कारण मगाशीच म्हटल्याप्रमाणे brazing करेपर्यंत पाईपचे तोंड उघडे होते, म्हणजे त्यात आसपासची हवा होती, जी आता या outdoor मधून release केलेल्या refrigerent मध्ये मिसळली आणि जो pure gas होता तो आता impure झाला. शिवाय या हवेमध्ये काही प्रमाणात बाष्पही असू शकते, जे नंतर ac सुरु केल्यावर coil थंड झाल्यावर condense होऊन त्याचे पाणी बनते आणि gas च्या circulation सोबत compressor मध्ये जाऊन त्याला खराब करते. कारण compressor मध्ये return येणारा gas हा gaseous state मध्येच असावा लागतो, तो liquid state मध्ये असून चालत नाही. या water vapour मुळे कॉम्प्रेसर लगेच खराब झाला नाही तरी त्याचे आयुष्य कमी होऊन over period of time तो खराब होऊ शकतो.

आता हे सगळे कसे टाळायचे? तर दोन्ही युनिट एकमेकांना जोडल्यावर त्या पाईपमध्ये असलेली हवा पूर्णपणे काढून टाकणे आणि मगच outdoor मधील gas release करणे. ही हवा काढण्याच्या प्रक्रियेलाच vacumming म्हणतात. त्यासाठी vacuume pump नावाचे उपकरण येते. काही technician vacuum करण्यासाठी फ्रीजचा जुना कॉम्प्रेसर वापरतात परंतु ते vacuum तितकेसे effective नसते. त्यामुळे vacuum pump वापरणेच उत्तम! तर दोन्ही युनिट जोडल्यावर gas release करण्यापूर्वी किंवा ac सुरु करण्यापूर्वी outdoor unit ला असलेल्या coupler ला vacuum pump जोडून किमान अर्धा तास vacuum करावे, जेणेकरून indoor unit, connecting pipes मधील सर्वच्यासर्व हवा बाहेर येईल. अर्धा तास vacuum झाल्यानंतर manifold चे valves बंद करून मग pump बंद करावा आणि अर्धा तास निरीक्षण करावे! manifold वर असलेल्या pressure gauge चा काटा अजिबात पुढे गेला नाही पाहिजे. जर तो काटा पुढे गेला याचा अर्थ कुठेतरी लिकेज आहे, जिथून vacuum केलेल्या system मध्ये हवा खेचली जात आहे, भविष्यात तिथून gas बाहेर येईल. जर अर्धा-पाउण तास थांबूनही काटा हलला नाही याचा अर्थ कुठेही gas लिक नाही. मगच manifold काढून outdoor मधील gas release केला पाहिजे. आता पाईप मध्ये हवा, बाष्प आदी काहीही नसल्याने gas release केला तरी त्यात काहीही मिसळले जाऊन तो impure होणार नाही!

यासंदर्भातील माहिती देणाऱ्या दोन व्हिडीओ च्या लिंक्स देतो आहे, नक्की पहा! आणि ज्यांना ज्यांना नवीन ac घ्यायचा आहे, किंवा घर बदलल्यामुळे एका ठिकाणाचा ac दुसरीकडे शिफ्ट करायचा आहे त्यांनी installation च्या वेळी vacuuming चा आग्रह धरा, तेही proper vacuum pump च्या साहाय्याने, old fridge compressor ने नको!

१. https://youtu.be/8E5nnW_cWB4?feature=shared
२. https://youtu.be/i31nMF9aUho?feature=shared (हा व्हिडीओ गाडीच्या ac संदर्भातील आहे, परंतु त्यातही vacuuming चे महत्व सांगितले आहे.)

इतक्या उच्च दर्जा चे technician कुठे शोधायचे.
सर्व कंपन्या पण सुमार दर्जा चे काम चालवून घेणारी लोक कमी पगारात नियुक्त करतात.

सिमेन्स सारख्या कंपन्या कडे पहिले service देण्यासाठी स्वतःची लोक असत.

आता सर्व च कंपन्या सर्व्हिस स्वतः देत नाहीत नाहीत कॉन्ट्रॅक्ट देतात.
त्या मुळे उच्च स्किल असलेले technician ह्यांचं तुटवडा आहे.

एसी घेताना रूम ची साईज, त्याच्या भिंतींवर येणारे आणि किती काळ राहाते ते ऊन, वर मजला असेल तर ते अश्या गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. यानंतर बाहेरचे युनीट साफसफाई रादर वॉटर वॉश करता येइल अश्या ठिकाणी असणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त आतलं युनिट वॉश करून जो परीणाम दिसतो त्याच्या दुप्पट कुलिंग चा परिणाम दोन्ही युनिट्स धुतल्या नंतर पडतो. अर्थात हे प्रकार एएम्सी किंवा ऑथोराईज्ड पेर्सोन्नेल थ्रू केलेले चांगले.

सध्या च्या काळात इन्व्हरटर एसीच घ्यावा हे माझं मत. तरीही पैश्यांच्या विचार करता हे एसीज जरा महाग असतात.
आणि ईन्व्हर्टर एसी वीजबचतीच्या दृष्टीनं रोज ५ ते ६ तास किंवा जास्त वापरल्या जाणार असेल तर जास्त परिणामकारक ठरतात (अर्थात कॉस्ट्वाईज)

ब्रँड्स बद्दल -
अत्त्युतम क्वालिटी अर्थात महाग - ओ जनरल >> मित्सुबिशी हेवी इलेक्ट्रिकल्स >> मित्सुबिशी इलेक्ट्रिकल्स >> डायकिन आणि मग बाकी सगळे.
यात मूळ एसी टेक्नॉलजी हाच एक फॅक्टर विचारात घेतलेला आहे. बाकी कॉस्मेटिक फिचर्स इ. मुळेही कॉस्ट वाढतेच अर्थात.

मला एसी घ्यायचा आहे.
ब्लू स्टार मुळे इलेक्ट्रिसिटी बील जास्त येतंय का?
डंकिनचा ४ वे स्विंग नाहीये त्यामुळे तो नक्कोच हे ठरलं आहे. पॅनासोनिक चा अनुभव आहे का कोणाला?
वोल्टास आणि ब्लू स्टार मधे कुठला जास्त चांगला ?

मला ज्येनांच्या घरात घ्यायचे आहेत त्यामुळे रिमोट नीट चालणारेच हवेत.
एका ज्येना चं म्हणणं ब्लू स्टारच हवा, एकाचं म्हणणं वोल्टास हवा. एकाचं म्हणणं दिड टन हवा, एकाचं म्हणणं एक टन हवा.
यासाठी अल्मोस्ट रोज वेगळ्या वेगळ्या दुकानात फिरते आहे.
सध्या मी १० बाय १२च्या खोलीसाठी ब्लू स्टार दिड टन आणि १० बाय १० साठी वोल्टास एक टन वर दोघांना अग्री केलं होतं पण आजच त्यांना क्रोमा वाल्यांनी सांगितलं की ब्लू स्टार फक्त कमर्शिअल वापरासाठी चांगले आहेत कारण ते खुप एलेक्ट्रिसिटी खातात. आता परत ब्लू स्टार नको वाले ज्येना नकोच वर आडुन बसले त्यामुळे आज परत चाय पे महाचर्चा!
कोणाकडे आहे ब्लु स्टार त्यांनी प्लिज मत सांगा

एका ज्येना चं म्हणणं ब्लू स्टारच हवा, एकाचं म्हणणं वोल्टास हवा...
मुळात त्यांना अमुक एकच brand का हवा? ते जाणून घ्या. केवळ अमक्या एका brand चे नाव चांगले म्हणून ते घेण्यापेक्षा इतर कोणते brand चांगली warrenty देतात, त्यापैकी comprehensive warranty किती आणि फक्त compressor वर तसेच PCB वर warranty किती हे जाणून घ्या. त्याचप्रमाणे एखादे मॉडेल नक्की केल्यावर YouTube वर त्या मॉडेलचे review videos नक्की पहा.
आणि हो, स्प्लिट ac घेतलात तर installation करतांना vaccuming करण्यावर आग्रही रहा, प्रसंगी vaccume केलं नाही तर job card वर मी customer sign देणार नाही, इतपत ठाम रहा. (अधिक माहितीसाठी याच पानावरची माझी २५ डिसेंबर २०२३ रोजीची प्रतिक्रिया वाचा.)

मायबोलीकरांनो... आम्ही गेले २० वर्ष AC च्या व्यवसायात आहोत . ( Sales ,service and maintenance of all branded and non branded AC). कृपया ८७८८९०२८९८/ 8788902898 या नबरवर संपर्क साधावा. किंवा 7350084563 या नंबर वर तुमची शंका किंवा enquiry पाठवली तरी चालेल.

ओ जनरल बद्दल काय मत आहे
>>>>>>
आमच्याकडे आहे सध्या.
तीन चार वर्षे झाली.
उत्तम अनुभव.

विकत घेतल्यानंतर वर्षभराने जिथे एसी होता तिथेच extra slab टाकून रूम वाढवायचे मोठे काम केले. त्याची धूळ माती एसीत जाऊन वाट लागलेली. निष्काळजी पणामुळे मोठा फटका बसतो की काय असे झालेले. पण त्यातून सुद्धा तावून सुलाखून आता या क्षणाला सुद्धा बसल्या बसल्या मला छान हवा देत आहे.

Pages