आजचे आजी आजोबा

Submitted by mee_na on 13 December, 2008 - 12:02

कालच एक लेख वाचला. अमेरिकेत राहणारया एका मुलाला, खुप वाईट वाट्त होते, आपण आई बाबांवर अन्याय करतो आहे म्हणुन. खरे तर भारताबाहेर गेलेले सगळ्या लोकांसाठी काळ तिथेच थांबतो कि काय अशी शंका मला यायला लागली. भारतात खुप परिस्थीती बदललेली आहे.
आज भरतात अनेक आजी आजोबा असे आहेत कि जे आपल्या सुनांना सरल सांगतात, बाई गे हे तुझे घर आहे, तुम्ही सुखाने नान्दा. मला माझे freedom हवे आहे. मी माझी वेगळीच राहाते. मी आता कुठे retired होते आहे.सगळे आयुश्य कष्टातच गेले. आता कुठे पैसा आला आहे. आता आम्हाला राजा राणी सारखे फिरु द्या. पण तेंव्हाच नेमकी सुनेला गरज असते, तिचा बाळंतपणाचा वेळ असतो. career take off karanar असते. तिला वाटते,काय हरकत आहे सासुने थोडि मद्त केली तर. पण आजकालच्या सासुला पडली असते ते बाहेर फिरण्याची, काय तर म्हणे त्यांच्या काळी आजकाल सारखा हनीमुन नव्हता. त्यामुळे त्यांना मजाकरता नाही आलि. आता वेळ आहे आणी मुलगे आणी सुना ईत़के कमवतात आहे तर का नको मजा करायला? नाही तरि मुलांचे कर्तव्य नाही का आई बाबांना पैसे पाठ्वायचे ? पण आमच्या सारखे भांडणे नको, म्हणुन आपण वेगळे राहु. एका शहरात राहणारे आई बाबा आणी मुलगे पण एका घरात राहत नाही. ८० वयाची आजीला पण हवे असते फ्रीड्म.
आज भारतातल्या आजी आजोबांना पण या गोश्तीचा विसर पडत चालला आहे कि नाते मनाचे निर्माण करावे लागते. ते money ne nahi hot,tar ek dusaryasaathi keleya tyagane hote. ek dusarya che kaam kelyane hote. aaj tumachya haata paayat bala aahe tenvha jar tumhi sunesaathi kahi nahi kele tar naate kase nirman hoil ? mag jevha tumhala garaj asel tanvha aahecha mulana dosh dyayala. aamache kahi karat nahi.aani aaj chya mulana suddha aapa americet rahato ase wait watun ghyayachi garaj nahi.karan aae wadiliancha tumhi nakose hotat.
tyancha tumahcya javal rahane mhanaje tyanchya freedom war gada aali aahe ase watate. so jari tumhi bharatata asal tari nahi rahanar te tumachya javal. tyana shejarachyacha traas aavadato pan tumacha nahi.karan to kamavalela asato and tumacha expected. shejarachyacha navara mela mhanun diwali na sajari karanari saasu, aapalya sunecha mulaga mela tari mhanate ki aapan diwalisaajari karu ya. mag kay kay karayache ya welela. tichya diwali sajare karanyacha freedom war aalela ghala tila chalat nahi. aahe ki nahi twisted ?

गुलमोहर: 

मी_ना,
कृपया हे ललित पूर्ण देवनागरीत टाका. ते आधी मराठीतुन आणि अचानक रोमन मराठीतुन लिहील्यामुळे पुढे वाचावेसे वाटत नाही. तसेच आपण वाचलेल्या लेखाचा संपूर्ण संदर्भ द्याल का म्हणजे मायबोलीकरांना पण तो वाचता येईल.
धन्यवाद.

aapalya sunecha mulaga mela tari mhanate ki aapan diwalisaajari karu ya. mag kay kay karayache ya welela. tichya diwali sajare karanyacha freedom war aalela ghala tila chalat nahi. aahe ki nahi twisted ?
हे जरा अतीच वाटते बरे का!
बाकी असे आहे की जे आजी आजोबा मुला मुलीच्या घरी न रहाता वेगळे स्वतंत्र राहू इच्छितात, ज्यांना सुनेच्या बाळंतपणात, तिच्या करीअर साठी स्वतःचा वेळ देऊ इच्छित नाहीत, ते बहुधा, आमचे मुलांनी केले नाही असे म्हणणार नाही.

आम्ही नि आमची मुले यांचे संबंध अत्यंत उत्तम आहेत, पण हे आधीच स्पष्ट करण्यात आलेले आहे, की आम्ही त्यांच्या जवळ रहाणार नाही, गरज लागली तर पैशाखेरीज इतर काही मदतीची अपेक्षा नाही. हा अलिखित करार आहे, आणि त्याबद्दल आता चर्चा नाही! त्यामुळे आमचे संबंध अत्यंत प्रेमाचे, जवळचे आहेत. नि माझ्या आजारपणात ते आपणहून आले होते, कारण त्यांना काळजी वाटली म्हणून.

हे जरा अतीच वाटते बरे का! >>>> अगदी अगदी !!
एकूण सगळीच मतं काहिच्या काही आहेत !!

mee_na, हे सगळं तुम्ही वाचलेल्या लेखातलं आहे की तो वाचल्यावर तुम्हाला सुचलेलं आहे? रूनी म्हणाली तसं लेख पूर्ण लेख किंवा संदर्भ देऊ शकाल का? अविश्वास किंवा उलट तपासणी म्हणून विचारत नाहिये पण just curiosity म्हणून तो लेख वाचावासा वाटतोय..

ह्म्म्म्म, मला तरी हे विचार पटलेले नाहीत... या वृद्ध लोकांनी कसे वागावे असे वाटते तुम्हांला? त्यांनी लेकाच्या संसारात जास्त लक्ष घातलेलेही आवडत नाही आणि अलुफ राहिलेले ही आवडत नाही. फक्त सुनेच्या गरजेच्या वेळीच त्यांनी असायला हवे.. इतर वेळी नको? आणि मी म्हणते जर मागितले त्यांनी थोडे स्वातंत्र्य तर काय चुकले?इतकी वर्षं मुलांमध्ये अडकल्यामुळे त्यांनाही काही गोष्टी मनात असले तरी करता आल्या नसतील. आता जरा जबाबदार्‍या संपल्यावर वाटले त्यांना जरा हिंडावे-फिरावे तर त्यात वावगे ते काय?
एकत्र राहून रोज वादविवाद करण्यापेक्षा वेगळे राहुन गोडीत राहिले तर त्यात काय चुकले? 'आम्ही आमच्या मनाप्रमाणे जगतो, तुम्हीही तुमच्या मनाप्रमाणे जगा. गरज पडली तर आहोतच आपण एकमेकांसाठी.' हा विचार चूक आहे?

aapalya sunecha mulaga mela tari mhanate ki aapan diwalisaajari karu ya>>>>>
हे तर अतीच आहे. मला नाही वाटतं जगात कोणीही आजी अशी असेल जिला आपल्या नातवंडाच्या मृत्युचे दु:ख झाले नसेल्..(सुनेचा मुलगा म्हण्जे नातूच ना तिचा?)

karan aae wadiliancha tumhi nakose hotat.>>>>
काहीही....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)

मलाहि इथले विचार पटले नाहित. आई वडिलांनि त्यांच्या मुलांकडुन 'आमच्या इछ्छेने लग्न करा' हि अपेक्षा करणे जितके चुक वाटते तितकेच मुलगा आणि सुनेने आइ वडिलांकडुन स्वतःच स्वातंत्र्य बाजुला ठेवुन अपत्य संगोपनात मदत करावि हि अपेक्षाहि चुकच वाटते. सासु ने काय म्हणुन कायम त्याग करायचा? आधि स्वतःच्या मुलांसाठि आणि मग मुलांच्या मुलांसाठि! मग तिने तिच आयुष्य कधि जगायच? आज शरिर साथ देतेय वय आहे तेन्व्हा सुनेचे करियर मह्त्वाचे मानुन त्याग करायचा का तर पुढे गात्रे थकल्यावर मुलगा आणि सुनेने सांभाळले पाहिजे म्हणुन? मग तिने ह्याच मुलासाठि तो लहान असताना ज्या खस्ता खाल्ल्या त्या उपकाराचि परतफेड करण हि मुलगा आणि सुनेचि जबाबदारि नाहि? ज्या कोणाला एक लहान मुल ह्या जगात आणायचे आहे त्यांनिच त्या मुलाच्या सर्व जबाबदार्‍या घ्याव्यात हे न्याय्य नाहि का?

<<<एकत्र राहून रोज वादविवाद करण्यापेक्षा वेगळे राहुन गोडीत राहिले तर त्यात काय चुकले? >>> १००% सहमत

मलाहि 'आम्ही आमच्या मनाप्रमाणे जगतो, तुम्हीही तुमच्या मनाप्रमाणे जगा' हा विचार अजिबात चुक वाटत नाहि.

बाप रे......खूपच टोकाची विचारसरणी आहे ही......! असं काही असू शकतं?
खरंच जरा संदर्भ द्यावा म्हणजे काही तरी उलगडा होईल.

टीपः मी लेखिकेच्या मतान्शी सहमत नाही >> मी सुध्दा ....

मला तर दोन्हीत काही संबंध दिसत नाहीए. Uhoh

>>काय हरकत आहे सासुने थोडि मद्त केली तर>> हे बरंय. सासूकडून मदतीची अपेक्षाच कशाला फक्त? चुकून असं म्हटलं तरी चालेल की या उतार वयात एकटे राहू नका, आमच्या जवळ रहा, आम्हाला निदान तुमची काळजी तरी घेता येईल.

म्हातार्‍या माणसांना फ्रिडम हवे, यात मला तर काही गैर वाटत नाही. स्वातंत्र्यासाठी वयाचे बंधन असू नये. सर्वांना सर्व वयात मनाजोगते निर्णय घेण्याचा आणि तो निभावण्याचा अधिकार हवा. विशेषकरून आई-वडीलांना. त्यांनी आयुष्यभर मुलांचे केलेलेच असते. वर नातवंडात पण खर्ची पडायचं?

नातवंडाच्या मृत्यूबद्दलच्या लिखाणाला तर माझा कडाडून विरोध आहे. सासू भले ही सुनेचा दुस्वास करेल पण नातवंडाच्या मृत्यूचं दु:ख तिला होणार नाही, हे अज्जिब्बात पटत नाही...

ऊंहू...! नॉट ऍग्री.. Sad

धेडगूजरी लेखांचे पीकच आले आहे म्हणायचे.
(भाषा आणि आशय- दोन्ही दृष्टीने.)

कवितांचं एक समजू शकतो. जे न देखे रवि वगैरे...
असो.

--
.. नाही चिरा, नाही पणती.

हा लेख मी फक्त "देवनागरी" भाषेत जेव्हढा होता, तेव्हढाच वाचला अहे-- रोमन लिपीतला नाही वाचला..

<<<<पण आजकालच्या सासुला पडली असते ते बाहेर फिरण्याची, काय तर म्हणे त्यांच्या काळी आजकाल सारखा हनीमुन नव्हता.>>>>>>>>

मला नाही पटलं...
प्रत्येकानेच आपापल्या आउष्याचा काहीतरी विचार केलेला असतो. आणि त्याना त्याप्रमाणे करण्यचा पुर्ण अधिकार असतो. सुनांना गरज असते हे मान्य.. पण जर आपल्याला गरज आहे, तर आपण विनम्रपणे मदत मागायची असते-- ऑर्डर सोडुन नव्हे..(कोणावरही आरोप वगैरे नाहीये).आणि समोरच्याने मदत नाकारली तरी त्याला सरसकट वाईट ठरवायची गरज नसते.
फ्रिडम प्रत्येकालच हवे असते-- ८ वर्षाची मुलगी असो वा ८० वर्षाची आज्जी !!! जर एखाद्या आज्जीने दुर्दैवने ८० वयपर्यन्त स्वतंत्र्य अनुभवले नसेल, तर त्या नंतरही ते अनुभवण्याचा अधिकार नाहीये का तिला?त्या नन्तरही तिने फक्त दुसर्‍यान्साठीच जगायचं का? तिच्या इच्छा केव्हा पुर्ण होणार मग?

--------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

काय फालतूपणा आहे? कुठे शोधलेत हे विकृत आईवडील?
तुमचा संसार तुम्ही सुखानं करा इतपर्यंत सांगणारे ठीकेत पण म्हणजे त्यांना काही पडलेली नसते ह्या निष्कर्षावर कसं पोचलात?
काहीही?
आणि काय चुकलं एका वळणावर येऊन आता जबाबदार्‍या नकोत असं वाटलं तर? आयुष्यभर कष्टतच रहायचं त्यांनी? का? त्यांचं आयुष्य तुमच्या नावे केलंय त्यांनी?

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मीना, कृपया हे लिखाण विनोदी लेखन या सदरात हलवाल का?
योग्य जागी लिखाण असलेले बरे असते Happy

कुणि काहिहि म्हणा, पण हि सत्य घटना आहे. पचवायला थोडे जड आहे. पण हे मी स्वतः माझ्या कानांनी ऍकले आहे, डोळ्यांनी पाहिलेले आहे. त्या नंतर मी ही अशीच सुन्न झाले होते, चिड्ले होते. खुप विचार केला. मुलांना विकणारे आई बाबा असतात तर असे का नसतिल ? .. शेवटी, मानवी मन कुणाला कळले म्हणुन विचार करणे सोडुन दिले. ... मग असेही वाट्ले.. की maybe just maybe त्या आईला असेही वाट्ले असेल की आपण दिवाळी साजरी केली तर जरा atmosphere change होईल... माहीत नाही नक्की काय thought process. पण त्या दिवशी तो लेख वाचला आणि आठवले म्हणुन लिहीले. ... कुणाला आवडो वा न आवडो.. असे कुठेतरि घड्ले आहे.. ते पण तुमच्या आमच्या सारख्या लोकांकडुन. ....
मी असे मुळीच म्हणत नाही की आजकालचे आजी आजोबा वाईट असताता. my point was ... in today's world.. we are drifting too much apart mentally and emotionally.

मी_ना,
तुम्हाला मराठी अगदी नीट लिहीता येतेय मग लेखच असा धेडगूजरी अर्धा मराठी अर्धा रोमन मध्ये का? चुकुन तसा पोस्ट केला असेल तर कृपया तो संपूर्ण मराठीत नीट पोस्ट करा.

लेख अर्धाच वाचला, मराठीत जेवढा होता तेवढाच, त्यातल्या तुमच्या विचारांशी मी सहमत नाही.

एक विकृत उदाहरण माहित असले म्हणजे सगळ्यांना एकाच मापात तोलायचे नसते.
तुमच्या मानसिकतेत आणि आजकालच्या मुलांना आईवडील नकोत असं म्हणणार्‍या मानसिकतेत काहीही फरक नाही.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आयुष्यभर मुलांसाठी खस्ता खाल्ल्यावर शेवटी जर त्यांना काही काळ एकमेकासाठी, स्वतःसाठी द्यावा वाटला तर कुठे चुकले? तुम्ही म्हटले आहे की..
<<तेंव्हाच नेमकी सुनेला गरज असते, तिचा बाळंतपणाचा वेळ असतो. career take off karanar असते. तिला वाटते,काय हरकत आहे सासुने थोडि मद्त केली तर.>>
म्हणजे सुनेला गरज आहे म्हणुन तिला सासु जवळ हवी आहे, सासुबद्दल प्रेम, आपुलकी आहे म्हणुन नव्हे...हे योग्य वाटतं तुम्हाला ?

अर्थात, सगळ्याच सुना अशा नसतात आणि सगळ्याच सासवा देखिल. पण तरीही तुम्ही म्हणताय ते अजिबात पटत नाही. आणि कुठलेही आई-वडील किंवा आज्जी आजोबा आपल्या जबाबदार्‍या कधीच नाकारत नाहीत, फक्त त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी स्वतःला, परस्परांना थोडासा वेळ द्यावासा वाटतो, त्यामध्ये काहीच गैर नाही.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

ते मराठीतचलेच वाचले फक्त. बाकी मराठी इंग्लीश वाचवत नाही.
माझ्ये मते प्रत्येकाला आपल्या इच्छेने जगण्याचा हक्क आहे.
आपल्या आई वडीलांवर पुन्हा कुठल्या हक्काने आपल्या मुलांची जबाबदारी टाकायची?
कमवतोय ना आपण पैसा मग ठेवा ना मुलाना बाई सांभाळायला किंवा day-care बघा ना.. ह्याच मताची आहे. वयानुसार कोणाला फ्रीडम असावे वा नाही हे कोणीही ठरवायचे का?
बाकी काहीच्या काहीच विचार वाटले जरी असे मानले की there is a exception to every rule..
आजकाल मायबोलीवर कायच्या काय नाती गोती, नको तेवढ्या dramatic गोष्टीच ज्यास्त दिसतात... नवरा,बायको,आई,बाप, मुलगी.. मुलगा.. हिंदी सिनेमाचे वातावरण झालेय. छ्या!
(इथे कोणावरही व्यतीगत कमेंट नाही केलीय. का मी मास्तुरेचा जॉब काढून नाही घेत आहे हे लक्षात असु द्या. डोके किटले ते उगीच नाते संबधावर गोष्टी पाहून जिकडे तिकडे.... ) Happy

मला वैयक्तिक पातळीवर उतरून लिहीण्याची इच्छा नाही. पण वरचा लेख 'एखाद्या 'सासुची' गरज पडली असता ती मदतीला न आल्यामुळे भडकलेल्या सुनेचा' वाटतो. Happy (ह्यात सासर्‍याचा उल्लेख नाही.) Proud

कश्याला अपेक्षा करता कुणी यावं म्हणून? आपल्या नवर्‍या किंवा बायकोला लहानाचं मोठं करायला त्यांनी खाल्लेल्या खस्तांना जागून त्यांना लागेल ती मदत करायला काय जातं? माझी चार कामं नाही केली म्हणून आता त्यांच्या पडत्या काळात त्यांना मी मदत करणार नाही हा कुठला हलकटपणा? काही गरज नाही सासु आणि सार्‍यांवर प्रेम करण्याची. प्रेम असणं आवश्यकही नाही. पण म्हणून माणुसकी सोडून वागायचं?

जो काही मराठी भाग वाचला त्यावरुन तुमचा आक्षेप आपल्या जबाबदार्‍यांतून मोकळं झाल्यावर थोडी मजा करु इच्छिणार्‍या आजी आजोबांवर दिसतोय. काय बिघडलं त्यांनी फ्रिडम मागितला तर? जपानमधल्या आज्यांना पण मी अशीच मजा करताना पाहिलंय.दुपारी सगळा गृप जमायचा कॅफे,रेर्स्टॉरंटमध्ये आणि मग पुढचे २,३ तास त्या वय्,जबाबदारी सगळं विसरुन हसत खेळत्,गप्पा मारत मजेत घालवायच्या. मग आपल्या इथल्या आई वडिलांनी अशी मजा न करता नातवंड संभाळावीत असं कुठच्या पुस्तकात लिहिलंय बरं?
क्वचित गरजेला सासू-सुनेने एकमेकांना मदत करणं ठिक आहे. करायलाही हवंच. पण एकमेकांना जिथे गृहित धरणं येतं तिथे संबंधही कडूच होणार. आणखीन एक माझं मत. जर समजा आजीने नातवांना संभाळणार नाही म्हणून म्हटलं तर मग सून त्यांना डे केअरमध्ये ठेवते ह्यावर मत/नाराजीही व्यक्त करु नये.

आपल्या जबाबदार्‍यांतून मोकळं झाल्यावर थोडी मजा करु इच्छिणार्‍या >>> इथे मजे पेक्षा निवांतपणाचा भाग जास्त असतो असे मला वाटते. रांगतं मुल सांभाळायचं म्हंटलं तरी त्याच्या खाण्या-पिण्याच्या वेळा/नाटकांपासून ते त्याचे दिवस भराचे उद्योग/रहाडे निस्तरणे हे बरेच मेहनतीचे काम असते. उतारवयात नकोसे वाटले इतके काम करणे तर आश्चर्य वाटायला नको. शिवाय नोकरी करणार्‍या/भरपूर शिकलेल्या सुनेचे बाळ सांभाळायचे म्हणजे नातवंडांबरोबर वेळ घालवण्यात आनंदाचा भाग कमी आणि दडपण जास्त असेही होते बर्‍याच आज्ज्यांना.

माझ्या एका कमावत्या मैत्रिणीने पाळणाघरात बाळ ठेवायचे नाही (ही आजी-आजोबांचीच इच्छा) म्हणुन एक हट्टी-कट्टी बाई लावली कामाला. बाईने बाळाचे कपडे धुवायचे, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या, अजून काही बाळाचा पसारा/कामे आवरायची, आजी-आजोबांच्या झोपेच्या वेळेत बाळाकडे बघायचे अशी सर्व कामे करायला. ह्याव्यतीरिक्त रोजची कामाची बाई होतीच. आजी-आजोबा, सुनबाई, बाळ सगळेच खूश.

हा पर्याय सर्वोत्तम वाट्तो!

खरंच उतारवयात रांगतं मूल सांभाळणं अतिशय जोखमिचं आणि दमणूकिचं काम आहे. तरिही कित्तीतरी आज्या मनापासून ते करतात... हॅट्स ऑफ टू देम!

मी बेबी सीट करायची माझ्या भाचीला.. नुकतीच ती रांगायला नी पकडून पकडून चालायला लागली होती. अरे बापरे सगळ्यात खतरनाक स्टेज.. (६- ९ महीन्याचा काळ),रांगायचा स्पीड पण कायच्या काय असतो. :).
त्यात जीना हा प्रकाराबद्दल खूप आकर्षण असते.
दमत सुद्धा नाही त्यांची एकदा पुरेशी झोप झाली नी पोट ट्म्म फुगले की सुरु... जोडीला तोंडात मिळेल ते चाखत बसा,शी नी शू वगैरे.... Happy

मनू
अगदी बरोबर .........रांगणार्‍या मुलाचा स्पीड आणि प्रत्येक दृश्य वस्तूची चव घेण्याची जिज्ञासा........ग्रेट!!!!!
आणि मीनाताईंना एवढा या वयस्कर लोकांचार एवढा का राग आलाय? आणि जरी सासू ८० वर्षाची असली तरी तिला स्वातंत्र्य देणारे आपण(सून) कोण? वयस्कर लोकांना काय आयुष्य त्यांच्या पद्धतीने उपभोगण्याचा अधिकार नसावा?
हे: अजिबात बरोबर वाटत नाही हे लिखाण!

हुम्म्म.. हा लेख खुपच मनाला लागला वाट्ते सगळ्यांना. एक फक्त calrify करते. माझा वयस्कर लोकांच्या freedom ला मुळीच आषेप नाही. सासु सुनेने वेगळे राहण्याला तर नाहीच नाही. सासुने पाहीजे तशी मजा करण्यालाही नाही. सुनेने आपली मुले स्वतः सांभाळावी हे ही मान्य. खरे तर मला जे म्हणायचे तेच सगळ्यांनी म्हट्ले आहे. मलाही हेच म्हणायचे होते की मी जगात हे आजकाल खुप बघते आहे की आजचे सासु सुना एकत्र राहत नाही त्या मुळे bond निर्माण होत नाही. आपणाला काहीच देणे घेणे नसल्यासारखे वागल्या जाते कळत नकळत.
माझे म्हणाल तर माझ्या सासुशी खुप पट्ते. ईतके की माझा नवरा म्हणतो की मीच माझ्या घरात जावाई झालो. Happy
पण मी असे अनेक उदाहरणे पाहीले आणी मला वाट्ले.. हे सगळे होते कारण आपण सोबत नाही राहत. मला चीड आली. आणी fact आपल्या समोर मांड्ली. this is my last post on this subject though. Not sure how else to explain. I know language has become very strong. that is why maybe. But believe me... I am on same page. I will try to write same story in different words. Maybe in story format. lets see if i can tackle the challenge.