कार्यक्रमासाठी मदत हवी आहे.

Submitted by आर्च on 10 March, 2014 - 19:09

मेमध्ये आम्ही आजींच्या वाढदिवसासाठी पुण्याला येणार आहोत. १०० लोकांसाठी गेट्-टु-गेदर दुपारच्या जेवणासाठी अरेंज केलं आहे. आजी स्वतः छान कवीता लिहायच्या. त्यांना गाण्याची आवड आहे. नातेवाईक, त्यांच्या आजूबाजूचे, त्या ज्या शाळेत शिकवत होत्या तेथील त्यांचे सहकारी असे लोक असणार आहेत. आजी ९० वर्षांच्या होणार आहेत. काय कार्यक्रम ठेवावा, जो सगळ्यांना आवडेल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता वाचन, कथाकथन (फेमस लेखकाचा पुस्तकातील वगैरे), गायन आणि अर्थातच काही मजेदार आठवणी सांगायचा प्रोग्रम करायचा जर जुने विध्यार्थी येणार असतील तर.... आजींना तेवढेच बरे वाटल जुन्या स्मृतींना उजाळा.
आणि खाद्य अर्थातच.

आम्ही आजोबांचा केला तेव्हा आजोबांना मजा आलेली की प्रत्येक विद्यार्थाने त्यांची आवडती /नावडती सुद्धा आठवण मजेशीर रूपात सांगितली तेव्हा. (माझे आजोबा सुद्धा प्रोफेसर होते)

हिंदी किंवा मराठी गाण्यांवर आधारीत काही खेळ, हौजी वगैरे सादर करणारे एक कुटुंब माझ्या ओळखीचे आहे. माझ्या वडिलांच्या ७५रीला आम्ही त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. लोकांना खूप आवडला होता. जर इंटरेस्ट असेल तर संपर्कातून इमेल करा. नंबर देईन.

माझ्या आज्जीच्या नव्वदीला आम्ही आजीची मुलाखत घेतली होती. घरातल्याच लोकांनी. प्रोफेशनल वगेरे नाही. आजीच्या लहानपणापासूनचे प्रश्न त्यात होते. साधारणपणे गेल्या २५-३० वर्षातल्या घटना सगळ्यांना नाहीत असतात. पूर्वीचे फारसे माहीत नसते. तिचे बालपण जाणून घेताना मजा आली Happy

अजून एक खेळ खेळता येईल. प्रश्नमंजुशा. आजीच्या संदर्भातले प्रश्न. उदा. तिचे माहेरचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, आवडते गाणे असे काहीही. एक जोडी म्हणजे एक गट. असे कितीही गट करता येतील. सर्वांनी प्रश्नाची उत्तरे लिहायची आणि मग उत्तरे जाहीर चेक करायची. धमाल येते.

आम्ही आज्जीची धान्याने तुलाही केली होती. नंतर ते धान्य अनाथ आश्रमाला दिले होते. नातवंड आणि पंतवंडांना एक एक पूडी तराजूत घालताना मजा आली होती Happy

आम्ही आज्जीची धान्याने तुलाही केली होती. नंतर ते धान्य अनाथ आश्रमाला दिले होते. नातवंड आणि पंतवंडांना एक एक पूडी तराजूत घालताना मजा आली होती >>>>> +१००

मी नताशाशी सहमत. स्वातंत्र्यपुर्वीचा काळही तेव्हाच्या आठवणी, चांगल्या वाईट घटनांना सामोर्‍या गेल्या. आपण इतर लोकांच्या मुलाखती ऐकत, वाचत असतो पण आपल्याच लोकांविषयी माहिती नसते आणि वयस्क लोकांना नॉस्टॅअलजिक व्हायला आवडत आणि मध्ये मध्ये प्रसंगानुसुप गाणी घालून बहारदार कार्यक्रम होऊ शकतो.

आजीबद्दलची माहिती घ्रेऊन शब्दकोडे - क्रॉसवर्ड - करायचे अन ते सगळ्यांना भरायला लावायचे
पाळण्यातलं नाव, शाळेतली मैत्रीण, आवडता खाऊ, सगळ्यात लाडकी सून / जावई, पहिल्या घराचं नाव, शाळेतले आवडते विद्यार्थी / विधार्थिनी, सिग्नेचर डिश असे क्लूज द्यायचे.

कवितासंग्रहांनी तुलाभार करा अन ते जव़ळ्पासच्या शाळेला/ लायब्ररीला द्या.

जुने फोटो, लग्न पत्रिका किवा इतर आमंत्रण पत्रिका, त्यांच्या कवितांची कात्रणं हे सगळं एकत्र करुन एक व्हिडीओ करता येईल. ज्यांना कार्यक्रमाला येणंशक्य होणार नाही त्यांच्या कडनं पण व्हिडिओमेसेज मागवता येईल.

आजींची नव्वदी म्हणजे किती भारी - नशीबवान आहात सर्व. आजींना हॅपी बर्थडे !

जर इंटरेस्ट असेल तर संपर्कातून इमेल करा. नंबर देईन.
>>>

तुम्हाला आर्च ह्यांचा इमेल आयडी मिळाला तर भाईंना सांगायला विसरू नका Happy

आर्च, समारंभाबरोबरच, त्यांचे जुने फोटो, त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचे फोटो मिळवून शटरफ्लायसारख्या सर्व्हिसेसकडून सुंदर पुस्तक तयार करवून घे. Happy

तुम्हाला आर्च ह्यांचा इमेल आयडी मिळाला तर भाईंना सांगायला विसरू नका >> ह्ये काय ते सांगण्याचे करावे. असे मोघम बोलून थांबू नये.

आजींच्या कवितांचे सुरेल स्वरात वाचन. Happy त्यांची आवडती गाणी , घरातील ज्यांचा आवाज चांगला असेल त्यांच्याकडून गावून घेता येतील.
शुभेच्छा.
मामी Happy

फोटोबुक आणि आजीची मुलाखत >> +१

जेवणात आजीचा खूप आवडीचा/ पाककृतीचा एक पदार्थ ठेवा (सरप्राईज म्हणून) ...

सगळ्याच सजेशन्स मस्त आहेत. काय केलं ते नक्की कळवीन्. इतक्या प्रेमाने एवढ्या छान कल्पना दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.