पेन ड्राइव्हमधल्या फाइल्स दिसत नाहीत

Submitted by भरत. on 2 March, 2014 - 23:30

काही काळा(महिन्यां)पूर्वी पेन ड्राइव्हमध्ये कॉपी केलेल्या फाइल्स लपून बसल्या आहेत.
तेव्हा पेन ड्राइव्हमध्ये शिरल्यावर आणखी एक डिरेक्टरी दिसायची. F:/F>:
त्यात त्या फाइल्स दिसायच्या.
आता ही डिरेक्टरी दिसत नाही. त्यातल्या फाइल्सही अर्थातच सरळपणे दिसत नाहीत. पण नाव टाकून सर्च केल्यावर दिसतात, वाचता येतात. संगणकावरून पेन ड्राइव्हवर फाइल्स पुन्हा कॉपी करण्याचा प्रयत्न केल्या तर या फाइल्स आधीच तिथे आहेत असा संदेश येतो.

पण अलीकडे नव्याने कॉपी केलेल्या फाइल्स मात्र शहाण्यासारख्या दिसतात.

गुगलबाबाला साकडे घालून अ‍ॅट्रिब्युट बदलण्याचा मंत्रोपचार केला. परिणाम शून्य.

काहींच्या मते हे विषाणूच्या प्रदुर्भावाने होते आहे. यावर डॉ. मॅकॅफींकडून उपचार करून विषाणू नष्ट केले पण फाइल्स लाजून लपूनच बसतात.

पेन ड्राइव्ह फॉर्मट करणे हाच एक उपाय आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित हिडन मधे गेल्या असतील तिथे File setting menu मधे जाऊन अ‍ॅक्चिव करा व हिडन वर क्लिक केलेले दिसत असल्यस ते काडुन टाका

तुमच्या लिहिण्यावरून ड्राईव्ह लेटर डूप्लीकेट झालेले दिसते. दुसरी एक पेन ड्राईव्ह आधी लावून मग ती जोडलेली असतानाच ही जुनीवाली लावून पहा. किंवा ms dos command prompt मध्ये जावून directory रिनेम करा. आणखीही अनेक उपाय आहेत पण files कॉपि करून फोरम्याट करणे सोपे आहे. पण software compressed drive असेल तर capacity कमी होईल.

>>>> पेन ड्राइव्ह फॉर्मट करणे हाच एक उपाय आहे का? <<<<<
माझ्या मते होय. माझ्याही घरच्या कॉम्प्युटरला अन अर्थातच पेनड्राईव्ह/क्यामेरा/मोबाईल जे जे त्याला जोडले त्यातिल डाटाकार्डवर हा व्हायरस घुसला आहे.
डाटा कार्ड फॉरम्याट करणे व ते देखिल व्हायरस इन्फेक्टेड नसलेल्या पीसीवर हाच उपाय उरलाय.
दुर्दैवाने माझ्या घरच्या पीसीला सध्या नेट कनेक्शन नाही, व अ‍ॅन्टीव्हायरस प्याकेजही नाही. Sad व ऑफिसमधे उपलब्ध पीसींवर पेनड्राईव्ह वगैरे फॉरम्याट करता येत नाहीत (ब्यान). सबब मी तसेच चालवतो आहे.

वरील मुक्तेश्वर यांनी सांगितलेला हिडन फाईल्स व डॉक्टरांनी सान्गितलेला ड्युप्लिकेट ड्राईव नेम हे दोन्ही उपायही करुन बघणे आवश्यक राहील.

LNK_DUNIHI.Sम३
LNK_DUNIHI.SMAB
हे ते दोन व्हायरस माझ्या पेनड्राईववर आहेत.
http://about-threats.trendmicro.com/us/malware/VBS_DUNIHI.SM3
NOTES:
This worm drops shortcut files pointing to the copy of itself in removable drives. These dropped .LNK files use the names of the folders and files located on the said drives for their file names. It then sets the attributes of the original folders to System and Hidden to trick the user into clicking the .LNK files.

लिंबुटिंबु, तुम्ही कुठल्या नेट्कॅफेवर न्या त्याला एखादे प्रिंट काढायचे निमित्त करुन ते व्हायरक क्लिन करुन देतील आपोआप

काही काळा(महिन्यां)पूर्वी फाइल्स मध्ये कॉपी केलेल्या फाइल्स लपून बसल्या आहेत.>>..असाच माझ्या पेन ड्राइव्हचाही प्रॉब्लेम झाला होता. व्हायरस क्लिन करुन आणला त्यावेळी लपलेल्या फाइल्स दिसायला लागल्या.