Autism.. स्वमग्नता..

Submitted by Mother Warrior on 12 February, 2014 - 16:29

तुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात व अचानक तुम्हाला एका बर्‍यापैकी मोठ्या दिसणार्‍या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते? "काही शिस्त लावत नाहीत पालक" .. "आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ! काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची!" .. वगैरे वगैरे..

पण आपण असा कधीच विचार करत नाही की कदाचित त्या मुलाला काही sensory processing disorder असेल, त्याला ऑटीझम असू शकतो. आपल्या साठी जे अतिशय नॉर्मल आहे, ते त्याच्यासाठी फार डीस्टरबिंग असू शकते. उदाहरणार्थ: भल्या मोठ्या सुपरमार्केट मधील लांबच लांब पसरलेले फ्लोरोसंट लाईट्स. कधी विचार केला होता तुम्ही, की त्या लाईट्समुळे एखाद्याला प्रचंड unsettling वाटू शकते? ओके, तुम्ही म्हणाल सगळे नखरे आहेत, इतकं काय?

याविषयावर मराठीमध्ये स्वानुभवावर लिहिलेली लेखमालिका

ह्या धाग्याचे नाव व लेखमालिकेच्या पहिल्या धाग्याचे नाव एकच केले आहेत. तर दोहोंपैकी एका धाग्याचे नाव बदलु शकाल का म्हणजे मुख्य धागा एक व त्यातले अनेक विषयवार धागे असे बरोबर चित्र तयार होईल.

हो आणि कुठे तरी देवनागरीत "ऑटिझम" असंही लिहा.
म्हणजे कोणी मराठीमधुन गूगल करायला गेलं तर हा शब्द टाकल्या टाकल्या इथला एक तरी धागा येईल.
या धाग्याच्या हेडिंग मध्येही चालेल खर तर Happy

शिस्त नाही लावत हे बऱ्याचदा ऐकायला मिळते, माझ्या मुलाला toilet- trainig मी लहानपणापासून दिले, तो शीचे दोन वर्षाचा असल्यापासून सांगतो, शु हल्ली दोन वर्षे. मला नेहेमी विचारला जाणारा प्रश्न, हे काय तुम्ही शुचे शिकवले नाहीत त्याला? खरं म्हणजे माझ्या मुलाला पाणी खूप आवडते त्यामुळे शु म्हणजे पाणी असेच त्याच्या डोक्यात, कितीही नेले तरी करायचा नाही, खूप त्रास झाला मला ह्याचा त्यात लोकांचे विचारणे, तुम्ही याला शिस्त नाही का लावली? मग मी सांगायची नाही लावली, शीचे त्याचा तोच शिकला आणि सांगतो, काय सांगणार दुसरे?

हे खूप छान झालं. आता ही लेखमालिका फेबुवर किंवा ईमेलवर इतरांशी शेअर करायला सोपं जाईल

वरती मी अर्धवट लिहिले, बाहेर मी त्याला नेहेमीच डायपर घालून नेते अजूनही, पण तो घरात नाही घालत त्यामुळे हा त्रास घरीच व्हायचा आणि त्याला येणाऱ्या फिट्स आणि शुचे न सांगणे हेच बऱ्याच स्पेशल स्कूलने त्याला न घेण्याचे कारण, काही शाळांनी डायपर चालणार नाही त्याने शुचे सांगितले तरच आम्ही घेऊ असे सांगितले पण एका शाळेने दिली admission, तिथे डायपर लावूनच पाठवायचे.

स्वमग्नता इतके सुंदर आणि डिटेलमध्ये सर्व लिहितेना की मी तिची खरंच आभारी आहे.

हे बरे झाले.

या पानाचे नाव 'लेखमालिका: Autism - स्वमग्नता' असे केले तर जास्त स्पष्ट होईल, असे वाटते.