वास्तुशांती चे return गिफ्ट

Submitted by मी-आद्या on 25 January, 2014 - 02:49

वास्तुशांती साठी आलेल्या नातेवाईकांना return गिफ्ट काय देता येईल ?
मला crockery / key होल्डर असे typical options सोडुन काहीतरी सुचवा न please
सधारण ४० लोक (१५ families) असतील आणि माझ budget १००-५०० each family अस असेल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म्म्म. असले काही असते हा विचार केला नव्हता... आलेल्यांना चमचमीत जेवण हेच रिटर्न गिफ्ट मानले होते.

एनी वेज, जोक्स अपार्ट. भेटवस्तुच घ्यायची तर बाजारात खुप ऑप्शन्स आहेत. होमस्टॉपमध्ये भरपुर वस्तु आहेत ज्या घेऊ शकता.

अगदीच काही सुचले नाही तर प्लॅस्टिकच्या अर्धा फुटी कुंडीत शोभेचे फुलझाड असे गिफ्ट बघा. नर्सरीवाला करुन देईल. ह्या सिजनमध्ये पिटुनीया खुपच फुलतात. आता दिले तर मे-जुनपर्यंत रोप टिकेल.

चांदीच्या पॉलिश मारलेल्या वस्तू या बजेटमधे बसत असतील तर द्या. आम्ही बर्याचदा त्याच देतो.

झाडं वगैरे लोकांनी नीट सांभाळली नाहीतर आपल्यालाच फार त्रास होतो, त्यापेक्षा वस्तू देणं परवडतं.

गुड idea साधना ; पण आजकाल काही सोसायटी मध्ये घरात/ बाल्कनी त फुलझाडे लावण्यास बंदी असते.
आमच्या सोसायटी मध्ये allowed नाहीये!! त्यामुळे जरा वेगळ्या वस्तु चाच option सुचवा न

१५ कुटुंबे म्हणजे १५ श्रीकृष्ण चांदीचे किंवा करंडे किंवा १५ मोठ्ठाले चिनीमातीचे कॉफी कप किंवा फोटो फ्रेम्स

१. सीडीज देऊ शकता.

२. आलेल्यांचेच फोटो फोटोग्राफरकडून काढून आलेल्यांना द्यावेत.

३. क्रॉसवर्डमध्ये सव्वाशे, दिडशेपर्यंत अनेक छोट्या छोट्या उपयुक्त वस्तू मिळतात व त्या आकर्षकही असतात.

.

Feng shui plants देता येतील . छान वाटतात . आम्ही गाडी घेतली तेव्हा ते गिफ्ट मिळाले होते . maintain करायला पण सोपे . फक्त थोडे अधून मधून पाणी टाकावे लागते .
फेंग शुई शी माझा काही संबंध नाही परंतु ते plant आवडते .

हम्म. वास्तुशान्तिला रिटर्न गिफ्ट, ते पण १०० ते तब्बल पाच्शे दरम्यान, ओके.
थोरलीच्या लग्नात मी सर्व वर्‍हाड्यान्ना अत्तराच्या बाटल्या वाटल्या होत्या, जवळपास ३२०, पब्लिक होत ५००, १८० कमी पडल्या, पण बिघडले नाही. (माझ्याकडच्या ३० जणान्नाही दिल्या बर्का).
तर, वास्तुशान्तीनिमित्त म्हणजे तुमची आठवण निघत रहावी असे वाटत असेल तर, छानशी टेबल/वॉल क्लॉक, ३००/३५० पर्यन्त मिळणारा चार्जेबल एफेम रेडिओ, नाईटल्याम्प्सचे विविध प्रकार, टॉर्चचे विविध प्रकार, ग्यास लायटर, भारीच्या उदबत्या, मेणबत्यान्चे पुडे, पुजेचे विविध साहित्याचा सेट, आरतीसंग्रह, कहाणी संग्रह, ओगलेंचे पाकशास्त्रावरील पुस्तक, पेन होल्डर्स बरेच जण देता६त, नेमके पेनच देत नाहीत, तर डझन डझन चे पेनचे प्याकेट, हल्ली मिळतात त्या पिशव्या, ब्याग, शबनम वगैरे, पत्राळे, अगदी काही नाही तर एकेक झेरॉक्सरीम वगैरे द्यावे.

#आणुन न जास्त काळजी न घेता घरात ठेवु शकता येणार्या गोष्टी-
-बेडशीट
-सोफ्यावर टाकण्यासठी बॅकरेस्ट
-सतरंजी (सिंगल बेड्शीट आकाराची, योगा मॅट सदृश)
-स्टील डब्बे-एकात एक असा सेट

#पॅकिंग अन आहेर करताना काळजी घ्यावी लागेल अश्या काही वस्तू--
-कप बश्या सेट
-फुलदाणी
-घड्याळ
-प्लॅस्टर ओफ पॅरिस ची शोपिसेस..
-ओवन स ठी सुटेबल काचेची कंटेनर्स.
-थर्मास

खाद्यपदार्थः
काजू/अक्रोड्/पिस्ता पॅकेट्स.
मिठाई
फ्रुट बास्केट.

दिव्यश्री, मी सायली कुलकर्णीच्या वस्तूच सुचवणार होते Happy

एका माबोकराचीच अर्धांगिनी आहे ती.

आम्ही वास्तुशांत घरातल्या घरात केली होती. फक्त पुजा सांगायला आलेले काका आणि त्यांच्या सौ. होते.

पण नंतर एकावेळी ३-५ फॅमिलीज बोलावुन ५-७ वेळा गेट टुगेदर केले होते. तेव्हा नवीन घरात आलेल्यांना पहिल्यांदाच पितळ्याचा/ब्रासचा नंदादीप + वातींची लड असे दिले होते. दोन्ही वस्तु डीमार्टमधुन खरेदी केल्या होत्या. अगदीच १००-१५० रुपयांत झाले. पण नंदादीप देण्याची आयडीया युनिक असल्याने बर्‍याच लोकांना खुप आवडले. तसेच भारतीय नसलेल्या लोकांसाठी ठाण्याच्या सत्यम कलेक्शनमधुन ब्रासचे कँडल स्डँडस आणले होते. तेही हिट झाले.

सायली कुलकर्णी यांच्याकडच्या वस्तू मस्त दिसताहेत. चांदीच्या आहेत की चांदीचे पॉलिश केलेल्या? चांदीचे पॉलिश केलेल्या वस्तुंची काय काळजी घ्यावी? या ट्रीपमध्ये मला चांदीचे पॉलिश असलेले एक ताट, २ वाट्या आणि ३ भांडी मिळाली आहेत.

दिव्यश्री, मी सायली कुलकर्णीच्या वस्तूच सुचवणार होते स्मित

एका माबोकराचीच अर्धांगिनी आहे ती.<<< मला मघाशी लिहिताना तिचे नावच आठवत नव्हते. धन्यवाद.

वत्सला, फोटोमधे चांदीचे पॉलिश केलेल्या वस्तू आहे.

गालिच्याच्या मटेरियलची बस्करे / छोटे गालिचे (कृत्रिम) हेही भेट म्हणून द्यायला छान वाटतात.

व्हाईट मेटलच्या / चांदीचे पॉलिश केलेल्या वस्तू (शोभेच्या किंवा वापरातल्या) देण्याचा पर्याय वर अनेकांनी सुचवला आहेच!

छोट्या आकारापासून मोठ्या आकारापर्यंत ऑर्नामेन्टल / डेकोरेटिव ट्रे (तबके) छान मिळतात.
तांबे धातूचे तांब्याभांडेही छान वाटते. पुण्यात तुळशीबागेत रामाच्या देवळापासच्या दुकानांत अष्टविनायक कोरलेला तांब्या व भांडे मिळते, निरनिराळ्या प्रकारचे कोरीव काम केलेल्या मंजुळ किंवा गंभीर नादाच्या घंटा मिळतात, पितळी - तांब्याचे दिवे, धातूची लहान ते मोठ्या आकाराची डेकोरेटिव भांडी मिळतात, अगदी छोटेसे तांब्याचे पिंप मिळते... रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला खूप व्हरायटी मिळू शकते अशा ठिकाणी.

सुवासिक अत्तरे सुंदर बटव्यात घालून देऊ शकता.

सुवासिक अत्तरेबाटल्या सकट पुण्यात गोडबोल्ये ह्यांच्या दुकानात मिळतील. मुलां ची भावेस्कूल पेरू गेट जवळ दुकान आहे. १०० रु. चा मोबाईल रि चार्ज कींवा टा टा स्काय रिचार्ज दिल्यास पैसे वाया जाणार् नाहीत.

ग्रीन टी व ऑरगॅनिक वस्तूंची छो टी बास्केट बनवून देता येइल.

तसेच साबण बॉडी वॉश फेस वॉश हयांची बास्केट.

अरोमा थेरपी किट ह्यात मेणबत्ती, तेल टी लाइट वगिअरे सर्व सरंजाम येतो. १५० परेन्त आहे.

रीड पर फ्यूम डिफ्यूजर ह्यात रीड च्या कांड्या अत्तर व ते ठेवण्यासाठी काचेचा बुधला असे येते.

पोपुरी पॅकेट्स.
हार्दिक शुभेच्छा.

http://fragrance.tradeindia.com/aroma-lamp-gift-set-748296.html इथे दाखवलाय तसा अरोमा लँपसेट देता येईल. सुरेखशा सुवासिक कँडल्सचा सेट ही देता येईल.

अरेच्चा, वरती अमामीनं लिहिलंय अरोमा सेटबद्दल. मी नंतर वाचलं.

व्हाईट मेटलच्या / चांदीचे पॉलिश केलेल्या वस्तू (शोभेच्या किंवा वापरातल्या) देण्याचा पर्याय वर अनेकांनी सुचवला आहेच! >>> हे नंतर काळं पडत नाही का?

,
मामी, आम्ही जिथून आणतो तिथून आणलेली चांदीच्या पॉलिशची वस्तू आजवर काळी पडलेली नाही, मात्र त्याला घासताना प्लास्टिकचा स्क्रबर आणि लिक्विड सोप वापरावा लागतो आणि घसाघसा न पुसता मऊ कापडाने पुसून घ्ययाला लागते. आयुष्यमान आर्थात चांदीच्या वस्तूपेक्क्षा कमीच असतं.

सुनिधीच्या जेवणाची प्लेट, वाटी चमचा, ग्लास या सर्व अशा चांदीच्या पॉलिशच्या वस्तू रोजच्या वापरामधे आहेत आजवर काही प्रॉब्लेम नाही.

लोकहो,

इथे इंग्लंडमध्ये हाय स्ट्रीट व्हाऊचर नावाचा एक प्रकार मिळतो. तसा काही प्रकार भारतात सुरू झालाय का? हा सर्वात कमी वेळखाऊ पर्याय असावा. Happy

आ.न.,
-गा.पै.

दिव्यश्री, मी सायली कुलकर्णीच्या वस्तूच सुचवणार होते स्मित

एका माबोकराचीच अर्धांगिनी आहे ती.>>> अच्छा मला हे काहीच माहिती नव्हते. कुठे तरी जाहिरात वाचली होती हि तेंव्हा फोटो save केला होता.मला खूप आवडल्या त्या फोटो मधल्या वस्तू खरतर मी आमच्या वास्तुशांती साठी ते Picture अगदी जपून ठेवले आहे बघूया कधी योग येतोय. Happy

हॅलो आद्या,
दोन आयडिया आहेत.
मंत्रांचे (चॅटिंग बॉक्स) माहिती असतीलच. ते देता येऊ शकतात. आम्ही ते घरीच बनवतो. त्यामुळे ते सहज देणं शक्य होतं. आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना दिले त्यांचा खुप चांगला प्रतिसाद आला. त्यांच्या घरात चोवीत तास मंत्राचा जागर होत असल्याने त्यांनाही छान वाटते. तुमच्या बजेटमध्ये ते बॉक्स अगदी सहज बसू शकतात.
दुसरी वेगळी आयडिया. ज्यांच्याकडे आहे त्यांनाच परत देण्यापेक्षा त्या पैशांचा सामाजिक विनियोग देखील करता येऊ शकतो.
पुस्तकांची आयडिया छानच आहे. तुमची इच्छा असेल तर अनेक चांगली पुस्तकं सुचवता येऊ शकतात.

मंत्रांचे यन्त्र ही कल्पना छान आहे.
अत्तरे माझा आवडीचा विषय, >>> अत्तर व ते ठेवण्यासाठी काचेचा बुधला असे येते.<<<< मस्त प्याकिन्गमधिल अत्तरे. .. वाह Happy आम्हालाही बोलवा वास्तूशान्तिला Wink
[मामे, तुझ्याकडे आहेत का ग असे बुधले? इकडे पुण्यात सहजासहजी मिळत नाहियेत, मिळालेच तर रास्त किम्मत नाही , अन मला मुबैत जाउन धुन्डाळाणे शक्य होत नाही. ]

लिंबू, बेस्ट बुधले असे क्रॉफर्ड मार्केटात मिळतात. मागवून तुला भेजते. तुला पण आहेर करायचाच आहे. Happy मयुरा. मंत्राचे बॉक्स बद्दल माहिती द्याल का. मला एक मागवायचा आहे.

मामी,
मंत्र्यांचे बॉक्स दोन प्रकारचे असतात. एका प्रकारात बॉक्समध्ये चीप (कॉब) असते. ज्यात किमान दहा - पंधरा तरी मंत्र असतात. पण वीजेमध्ये जरा जरी चढउतार झाले तर ती चीप खराब होऊ शकते. परिणामी बॉक्स दुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळेच त्याची किंमत थोडीशी कमी असते.
दुसरा प्रकार : ज्यात आयसीमध्ये मंत्र रेकॉर्ड असतात. यात तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे मंत्र रेकॉर्ड करता येतात. या बॉक्सची किंमत आयसी २० सेकंदाचा, ४० सेकंदाचा, ९० सेकंदाचा की आणखी मोठा यावर ठरते. आयसी खराब होत नाही. त्यामुळे हा बॉक्स दुरुस्त होऊ शकतो. वीजेमुळे आतला एखादा पार्ट खराब झाला तर तो बदलणे शक्य असते. मंत्र तसाच रहातो.

मंत्र्यांचे बॉक्स दोन प्रकारचे असतात.>>>> मंत्र्यांचे बॉक्स कितीतरी प्रकारचे असतात. 'खोका' सगळ्यात भारी असावा.

चूक दाखवून दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
इथे मला मंत्रांचे (मंत्र्यांचे नव्हे) बॉक्स म्हणायचे होते. याला चँटिंग बॉक्सही म्हटले जाते.

आर्ये, वयस्कर लोकांना एखादे देवाचे पुस्तक दे... बाकिच्यांना ते चांदिचे पॉलिश भांडे चांगले आहे ....

मामे, मला नुस्ते बुधले पाठीव डझनाच्या/शेकड्याच्या सन्ख्येने, अत्तरे मी भरीन त्यात, केळकरांकडून आणिन.
अजुन वर्षाभराचे सण साजरे करायचेत, उपयोगी पडतील. Happy

पुण्यात चांगली अत्तरं कुठे मिळतील ?
अश्विनीमामी, तुम्ही एक पेरूगेट जवळ दुकान सांगितले. पण मला सापडलं नाही.
अजून दुसरीकडे कुठे असतील तरी सांगा.
कोणत्या सुवासात मिळतात ?
सुवास जास्त वेळ टिकणारा हवा असेल तर बाटलीवर काय बघून घ्यायचं ?

ये कौन सायली कुलकर्णी है?? मेरी बायको नही है.. वो डान्स क्लास लेती है.. कन्फ्युज मत होना.. और किसी माबोकरकी बायको रहेगी तो अच्छा ही है..

अवनी, ते दुकान अश्विनीमामीनी सान्गितले होते मला, अनाथविद्यार्थीगृहाकडून खुन्यामुरलीधराकडे जाताना डाव्या हाताला आहे. खुन्यामुरलीधर मन्दिराच्या अलिकडील चौक, त्या अलिकडे दोन तिन बिल्डिन्गा डाव्या हाताला ते दुकान आहे.

सुनिधीच्या जेवणाची प्लेट, वाटी चमचा, ग्लास या सर्व अशा चांदीच्या पॉलिशच्या वस्तू रोजच्या वापरामधे आहेत आजवर काही प्रॉब्लेम नाही.>>>

नंदिनी, चांदीच्या पॉलिशच्या का वस्तू? थेट चांदीचाच ग्लास, वाटी, चमचा का नाही वापरत सुनिधीसाठी?