"तिळगूळ वाटा आणि आनंद वाढवा !" अर्थात तिळगूळा मागील शास्त्रीय सत्य !

Submitted by SureshShinde on 14 January, 2014 - 02:15

मित्रहो,

मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा !

तिळगूळ वाटण्यामध्ये आणि खाण्यामध्ये काही शास्त्रीय कारण आहे काय ?
खरोखर आपले पूर्वज अतिशय बुद्धिमान होते. त्यांच्याकडे कुशाग्र निरीक्षण शक्ती होती. जे आज आपल्याला हजारो रुपयांचे संशोधन करून समजते ते त्यांना केवळ निरीक्षण व अभ्यास-चिंतन-प्रुथ्थक्करण करून समजले होते. याची अनेक उदाहरणे मी आपणाला सांगू शकेन. सर्पगंधा या वनस्पतीचा उपयोग उच्च रक्तदाबासाठी करावा हे त्यांना ब्लड प्रेशर म्हणजे काय हे माहित नसूनही समजले होते. तिळ आणि गूळ याचेही असेच आहे. आपल्या सणांचा आणि रूढी-प्रथांचा अर्थ आपण विसरून त्या मात्र नित्यनेमाने पाळत असतो. (निदान ही पिढी तरी !)
सुमारे सात ग्रामच्या तीळ लाडू पासून मिळतात…
३० क्यालरीज, २ ग्राम फ्यट, ३ ग्राम पिष्ठमय आणि एक ग्राम प्रथिने आणि बरेच क्यल्शियम, लोह , मग्नेशियम, फोस्फरस इ. इ.
हिवाळ्यामध्ये हे एकत्र करून खाल्याने शरीरामध्ये थंडी सहन करण्याची शक्ती निश्चितच वाढते.

आपल्या शरीराच्या आतील रासायनिक क्रिया अनेक संयुगाद्वारे होतात. मेंदूचे आणि मनाचे कार्य ज्या संयुगान्द्वारे बदलते त्यांना neurotransmitters असे म्हणतात. अशा तीन संयुन्गापैकी एक आहे 'सेरोटोनीन' ज्या मुळे माणसाचा मूड आनंदी होतो. डिप्रेशन या आजारामध्ये जी औषधे आम्ही वापरतो ती औषधे मेंदूमध्ये सेरोटोनीनचे प्रमाण वाढवतात , उदा. 'प्रोझ्यक' ( जे 'हप्पिनेस्स पिल' म्हणून प्रसिध्द आहे !) हे सेरोटोनीन तयार होण्यासाठी त्रिप्तोफेन 'tryptophan' या अमिनो आम्लाची गरज असते. तिळामध्ये असलेल्या प्रथिनांचे वैशिठ्य असे की याचा 'tryptophan : protein ' रेशो खूप मोठा आहे. थोडक्यात तीळ खाल्यामुळे दुख्खद भावनांना तिलांजली मिळते. गूळ मिसळल्यामुळे तिळाची चव मास्क होते. पण हे सर्व आपल्या पूर्वजांना कसे कळले हे एक आश्चर्यच !
म्हणूनच 'तिळगूळ वाटा आणि आनंद वाढवा !'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती!
सेरोटोनीनचे प्रमाण वाढवणारे रोज आहारात येणार्‍या काही अन्नपदार्थांची माहिती द्याल का? काही महिन्यांपूर्वी आमच्या डॉ.स्नेह्यांनी सांगितले होते की हॉर्लिक्समधे असे घटक आहेत.

देवकीजी,
नमस्कार !
सेरोटोनीनचे प्रमाण वाढवणारे रोज आहारात येणार्‍या काही अन्नपदार्थांची माहिती द्याल का? >>>How To Boost Serotonin Naturally हि लिंक वाचा व त्यावरून इतर अनेक दुवे सापडतील.
The Wrong Way to Boost Serotonin,
A Better Way to Boost Serotonin, and
The Best Way to Boost Serotonin, etc.
डॉ ग्रेगर हे एक अफलातून डॉक्टर आहेत.
त्यांच्या मुख्य पृष्ठाची लिंक : http://nutritionfacts.org/2012/11/15/boost-serotonin-naturally/
अडचण आल्यास मला अवश्य मेल करा - acmepune@yahoo.com

आपल्या आरोग्य खबरदारीचे कौतुक (appreciation )!
कारण "Our Health Matters Most !"

धन्यवाद !

डॉक्टर साहेब,

हा लेख ही उत्तम आहे. आपल्यासारखे लेखक अशी छान माहिती वाटत आहात आणि मायबोलीचा ज्ञानकोश समृद्ध करत आहात म्हणून आभार!!

वाह डॉ. साहेब, किती उपयुक्त माहिती देताहात तुम्ही - अशीच अजूनही माहिती येत रहावी तुमच्याकडून ही प्रांजळ अपेक्षा ....
मनापासून धन्यवाद ...

>>पण हे सर्व आपल्या पूर्वजांना कसे कळले हे एक आश्चर्यच !<<
आपण दिलेली माहिती पुर्वजांना माहित असेल असे वाटत नाही. पण निरिक्षणांच्या अनेक टप्प्यातून त्यांना याची उपयुक्तता जाणवली असणार असे म्हणायला नक्किच वाव आहे. बाकी उपयुक्त माहिती दिलीत डॉ साहेब.