भांडी

Submitted by मी गौरी on 5 January, 2014 - 09:00

मला स्टेन्लेस स्टील चा कुक वेअर सेट घ्यायचा आहे .. मुंबई मधेय दादर परिसरात कुठे चांगल्या ब्रॅड चा मिळेल .. कुठला इकोनोमि़कल ब्रॅन्ड आहे .. स्टील कढै मधेय भाजी खाली लागत नाहि का ?
amc brand बद्दल अधिक माहिती हवी आहे .. खरच वर्थ आहे का ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरुडा brand ची भांडी थोडी महाग वाटली तरी उत्तम आहेत. भाज्या करणे, लोणी कढवणे यासाठी मी याची पातेली वापरते.

जाड बुडाची स्टील कढई कुठे मिळेल. मी बोरीवलीत शोधले. कुठेही मिळाली नाही. मला अ‍ॅल्युमिनियम आणि हिंडालियम वापरायचं बंद करायचं आहे.

मुंबई मधेय दादर परिसरात कुठे चांगल्या ब्रॅड चा मिळेल ..>>> दादरला कबूतरखान्याला किर्तीकर मार्केट आहे, तिथे भरपूर व्हरायटी आहे. त्या परीसरात भांड्यांची असंख्य दुकानं आहेत. सहज सापडेल.

मला अ‍ॅल्युमिनियम आणि हिंडालियम वापरायचं बंद करायचं आहे.>> वेल, का?

वेल विनोद नावाची बघा. उत्तम स्टील असते. फूड फूड चॅनेल वर दाखवतात ती उत्तम प्रतीची
नॉन्स्टिक नसलेली भांडी कुठे मिळतात. तवा पन व्हाइट दिसतो.

मला नाही आवडत. डोक्यात उगाच भीती असते. कार्सिनोजेनिक आणि काय काय.

दादरला गेले की पाहीन. बोरिवलीत नाही मिळाली.

अमा - शोधते.

amc brand ची स्टील भांडी माझ्या सासरी आहेत. भांडी छान आहेत. वजनाला खूप जड आहेत म्हणजे आपल्याला रोज घासायला म्हणजे अवघड आहे पण तुम्ही किती मोठी भांडी घेतले आहे त्या वर आहे.

amc brand ची एक मोठी kadhaee आहे , ती तळायला चांगली आहे. ते लोक घरी डेमो देतात पण अगदी भारावून न जाता, योग्य तो निर्णय आपल्या budget मध्ये घ्यावा कारण भांडी खूप महाग पण आहेत.

कुटुंब मोठे असेल आणि पाहुणे सारखे येत असतील तर AMC चे मोठे भांडे घेण्यात अर्थ आहे आणि छोट्या भांड्यात उगाच पैसे घालवू नये ( असे माझे मत) त्यात तुम्ही सारखे घर बदलणार / परदेशवारी असे काही असेल तर नकोच हे जड प्रकरण, हाताळणे कठीण( नवऱ्याला कधी कळत नाही आपला जीव का त्या भांड्यात अडकलेला असतो) . AMC चे पातेली/PAN ला एक झाकण असते ( kadhee ला काचेचे झाकण असते तसेच ) तर त्या झाकणाला एक गोल digital dail असते. अन्न शिजले कि indicator एक लेवेल वर जातो मग gas बंद करायचा, प्रत्यक्षात याचा उपयोग काही नाही जेवण करताना, लक्ष ठेवावे लागते त्या indicator वर.

AMC ची भांडी घासताना ते digital dail काढायचे, dail ला पाण्यात घालू नये अजिबात. बाई ने हे रोज भांडी घासताना केले तर ठीक नाहीतर नुकसान आपले. नेहमी त्या dail ची चिंता डोक्यात नको (किवा आपले स्वंयपाक काम एकदम चोख हवे). बरे भांडी घासताना स्टील घासणी नको, हे सारे बाई करणार का हा पण विचार करावा.
AMC च्या भांड्यांना स्टील च्या उलथने चरे जातात मग fiber/plastic चे झारे हवेत.

विनोद ची nonstick भांडी मी वापरली आहे चांगली आहेत prestige पेक्षा, स्टील चा काही अनुभव नाही पण चांगली भांडी, वाजवी दरात घायला काही हरकत नाही.

मायबोली वर cast -iron , लोखंडी भांडी या वर खूप चर्चा झाली आहे ते पण पाहावे. आधीच एक भांड्याचा धागा हिट असताना, वेगळे पोस्ट टाकून उत्तरे कमी मिळणार.