जुळुन येती रेशीमगाठी-ललित-प्राजक्ताची फ्रेश जोडी

Submitted by संगीता वैद्य on 24 December, 2013 - 06:24

प्रेम... प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. पण प्रेमाचा अर्थ मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो. कुणी प्रेमात सर्वस्व गमावतं तर कुणाला प्रेमातच सर्वस्व सापडतं. कधी प्रेम अवचित समोर येतं आणि डोळे दिपवतं तर कधी ते नकळत येतं आणि सगळं आयुष्यच व्यापून टाकतं. मग मेघना आणि आदित्यच्या आयुष्यातलं प्रेम कसं असणार आहे ? या रेशीमगाठी गुंतणार आहेत की त्यांची आयुष्यं गुंफणार आहेत ? कारण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा माणूस मिळायलाही खूप भाग्य लागतं. अशाच प्रेमाची कहाणी सांगणारी नवी मालिका म्हणजे 'जुळून येती रेशीमगाठी'..........कशी वाटली ही मालिका? चला इथे चर्चा करूयात!

imagesCA7LJHYB.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृदुला,

खूप छान लिहिले आहेत. बहुतेक ह्या मालिकेबाबत एका धाग्यावर चर्चा चाललेली आहे. पुढील चर्चा येथेही करण्याची विनंती करा प्रतिसाददात्यांना! Happy

http://www.maayboli.com/node/46778

नायिका प्राजक्ता माळी 'इ' टीव्हीवर आधी एका मालिकेत होती, तिथे तिने काम चांगले केले होते पण इथे मला ती नायक आहे, त्याच्यापेक्षा थोडी थोराड वाटते.

नमस्कार, मी माबोवर पहिल्यांदाच आले आहे. सदस्यत्व नसल्याने मला हा बाफ वाचायला परवानगी नाही. कोणी मला मार्गदर्शन करेल का?

वरती लिंक दिलेला बाफ सार्वजनिक नाहीये का? त्यासाठी उपग्रह वाहिनी मराठीचे सदस्यत्व घ्यायला लागेल, मी नाही घेतले त्यामुळे मलापण तो बाफ बघता येत नाहीये, बाकी मालिकांवर चर्चा होतात ते बाफ बघता येतात. जाऊदे मी हि सिरीयल बघत नाही त्यामुळे चर्चा काय करणार, नायिकेविषयी जे वाटले ते वर लिहिले.

सारिका त्या त्या ग्रुपचे सभासदत्व घ्या म्हणजे तुम्हाला त्या त्या ग्रुप मधले बाफ बघता येतील Happy