गफलत !

Submitted by कवठीचाफा on 2 December, 2008 - 12:19

पुराणाचा अभ्यास हा माझा एकेकाळचा छंद पण आता तोच माझ्या पोटापाण्याचा उद्योग झालाय. सध्या मला एक नाणावलेला पुराणवस्तु संशोधनकर्ता म्हणुन मान्यता मिळायची वेळ आलिये. पण मी नुसताच पुराणवस्तुंमधे गुंतुन पडलेला नाहीये. माझे आवडते मत म्हणजे ‘पुराणातली वांगी पुराणात ठेउ नका’ कारण त्यात बरचसं तथ्य असतं हे आता शास्त्रसुध्दा मान्य करत. निव्वळ दंतकथा म्हणुन आपण कानाडोळा करतो पण मुळात या दंतकथा तयार कशा होतात? आपल्याकडे म्हणतात ना ! ‘आग असल्या शिवाय धुर निघत नाही’ तसा विचार एकदा करुन पहा,............ थोडंफ़ार पटतय ना !

मी अश्या हजारो दंतकथा ऐकल्यात, वाचल्यात आणि त्यांच्यामधले तथ्य शोधण्यासाठी भरमसाठ पायपीट केलीये. कधी त्यातुन काही निष्पंन्न झाले तर कधी नाही, पण तरीही जे काही अनुभव मिळाले त्याच्या तुलनेत फ़ुकट गेलेल्या वा-यांचे दुखः आजीबात नाही. आजही मी कोणत्याही नव्या दंतकथेच्या शोधात पळतच असतो वेळात वेळ काढुन.

सध्या मी निलगीरीच्या एका खेड्यात आहे झांबीडी नावाच्या ! आता मी इथे काय करतोय? असा प्रश्न नक्कीच पडला असणार ना ! पण त्याचं उत्तर देण्याआधी मला ज्या दंतकथेने इकडे यायला भाग पाडले ती दंतकथा सांगावीच लागेल, त्या शिवाय माझ्या पुढच्या सांगण्याला अर्थ रहाणार नाही.

‘ ही सत्ययुगा नंतर आणि द्वापारयुगाच्या आधी म्हणजे रामाच्या नंतर आणि कृष्णाच्या आधी घडलेली गोष्ट आहे.
’ शषाल आणि शेषाल असे दोन जुळे भाउ एका महर्षींच्या आश्रयाला होते. लहानपणापासुन त्यांचे पालनपोषण आणि शिक्षण दोन्ही त्यांच्याकडेच झाले. जुळे भाउ म्हणुन जरी दोघे एकसमान दिसत असले तरी त्यांच्यात एक महत्वाचा फ़रक होता. शषाल हा अतीशय मेहनती आणि जिद्द बाळगुन असलेला होता, पण त्याच्या तुलनेत शेषाल हा जरा आळशी आणि चटकन निराश होणारा, प्रयत्न सोडून देणारा. दोघांनाही एकाच प्रकारचे प्रशि़क्षण मिळाले पण शषाल प्रत्येक पातळीवर अफ़ाट मेहनत घेत यशस्वी होत गेला. तर शेषाल मधेच प्रयत्न सोडून देत राहीला. शेवटी जेंव्हा त्यांचे प्रशि़क्षण पुर्ण झाले तेंव्हा प्रत्येक कलेत शषाल पारंगत होता तर शेषाल चुका करत होता. एकदा त्या महर्षींच्या आश्रमावर दुसर्‍या संकृतीच्या टोळीने हल्ला केला. दोघेही आपापल्या तंत्रशक्तीच्या सहाय्याने प्राणपणाने लढले पण अखेर दोघेही एकाच ठीकाणी धारातिर्थी पडले. लढाईत विजय मिळाल्यावर त्या ठिकाणी दोघांच्याही मुर्ती उभारल्या गेल्या. `खरं तर हे थोडंस वेगळ वाटतं कारण त्या काळात कुणाच्या मुर्ती वगैरे उभारल्या जात नसत'. पण ठिक आहे थोडेफ़ार प्रसंग वाढतातच असे मुळ घटनेमधे. तर या दोघांच्या मुर्ती उभारल्या आणि त्यांना समस्त ऋषीमुनींनी चिरंजीव शक्तीत्वाचा आशीर्वाद दिला. आता जर कुणी त्यांच्या मुर्तीसमोर काही गार्‍हाणे मांडले तर आपल्या तंत्रसामर्थ्याच्या जोरावर त्यांच्या मुर्तीही ते गार्‍हाणे दुर करु शकत होत्या.

मला शक्य तितक्या कमी शब्दात ती दंतकथा लिहीलीय. बाकी ती कहाणी म्हणजे जवळपास पन्नास एक पानांचे बाड आहे चक्क. तर या दोघांच्या मुर्ती या निलगीरी मधल्या या झांबीडी गावाजवळ आहेत. मी इथे त्यांच्या दंतकथेबद्दल अधिक माहीती मिळवण्यासाठी आलोय. आता आजुबाजुला चौकशी केल्यावर थोडीफ़ार माहीती हाताला लागेलच माझ्या पुर्वानुभवावरुन मी हा अनुमान काढलाय.

त्या मुर्तींबद्दल जास्त माहीती मिळवताना आणखी एक नवीन गोष्ट कळलीय. जरा चमत्कारीक आहे पण एकंदरीत त्यात तथ्य असण्याची शक्यता जास्त वाटते. इथल्या लोकांना या मुर्तींच्या शक्तींबद्दल माहीती आहे, पण त्याचा फ़ायदा घेउन इथे कुणी काही मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. या मागचे कारणही तितकेच चमत्कारीक आहे.

दोन्ही मुर्ती शेजारी शेजारी आहेत. आपले गार्‍हाणे मांडताना त्या दोन्ही मुर्तींसमोर मांडावे लागते. यथावकाश त्यांच्या तंत्रशक्तींचा प्रत्ययही येतोच पण...........
यातला शषाल किंवा शेषाल दोन्हीपैकी कुणीही एकच गार्‍हाणे घालणार्‍याची अडचण दुर करण्यासाठी आपली शक्ती वापरतो. यातल्या शषालने आपली कृपादृष्टी टाकली तर ठीक पण जर शेषालने कृपादृष्टी टाकली तर आगदी शंभर टक्के काही ना काही चुकीचे घडते.
हे सगळे ऐकल्यावर मला तरी आश्चर्य वाटले नाही शेषाल मुळात आपले शिक्षण आपल्याच आळशी पणामुळे पुर्णत्वास नेउ शकला नव्हताच. त्याची तंत्रशक्ती अर्धवट होतीच त्यामुळे त्याने टाकलेल्या कृपादृष्टीत याला आपण आशिर्वाद म्हणु काही ना काही त्रुटी रहाणारच होत्या. एकुणच वाचलेली दंतकथा ही खरोखर अस्तित्वात असलेल्या शक्तींबद्दल होती यात शंका नाही आता त्या मुर्तींचे दर्शन घेणे इतकेच काम बाकी आहे, अर्थात तिकडे नेण्यासाठी गावातले कुणी तयार होणार नाही हे माहीत आहे म्हणा. कारण म्हणे तिथे जाउन काहीही न मागताच परत आले तरी काही ना काही भलंबुरं घडतंच. याबद्दल मी गावक-यांना दोष देणार नाही कारण एखाद्या अंधश्रध्देचा पगडा मनावर बसला की तो सहजासहजी दुर होत नाही.

मुर्तींच्या समोर उभं राहील्यावर खरच त्या घडवणाया कलाकाराला मनापासुन दाद द्यावीशी वाटली. आगदी चेहर्‍यावरच्या हावभावांसहीत संपुर्ण मुर्ती म्हणजे आगदी समोर खरोखरच कुणी जिवंत व्यक्ती उभ्या असाव्यात असे वाटण्या इतपत त्यावरचे काम अप्रतीम आहे. आणि महत्वाचं म्हणजे इतक्या प्रचंड कालखंडाचा त्यांच्यावर फ़ारसा परीणाम झालेला दिसत नाही. बाकी गावकरी म्हणतात त्याप्रमाणे एकाच वेळी दोघांसमोर आशिर्वाद मागावा लागतो हे खरे आहे कारण या मुर्ती आगदी खेटून आहेत दोघांच्यामधुन वाराही जाणार नाही, वर त्या एकाच लहानश्या घुमटाकार देवळात आहेत. त्यांच्या समोर उभे राहील्यावर मनात एक चुकार विचार डोकाउन गेलाच आपणही काही मागावे, नाहीतरी माझ्या थिसिस बद्दल माझ्या सिनियर्सना कधी आपुलकी वाटलेली नाहीच जर त्यांना माझ्या लिखाणाबद्दल आपुलकी वाटायला लागली त्यांनी जर मेहेरनजर ठेवली तर मला जगप्रसिध्द व्हायला वेळ लागणार नाही. पण कसाबसा मी हा विचार मनातुन झटकला. आणि समोरच्या मुर्तींचे फ़ोटो घेण्याकडे ल़क्ष वळवले. हो ! लेखनाबरोबर फ़ोटो असतील तर ते जरा जास्त परीणामकारक बनते असे माझ्या वरीष्ठांना वाटते.

माझे इथले काम संपले आता मी या प्रवासाबद्दलचे अनुभव आणि त्यातले रिझल्ट लिहून माझ्या वरीष्ठांकडे सोपवायचे काम तेवढे राहीलेय. लेखन मला जातानाच्या प्रवासात पुर्ण करता येईल म्हणजे गेल्या गेल्या मी आमच्या मंडळात हे सारे मांडू शकतो. त्यांना पटले म्हणजे झाले.

" काय महाशय या असल्या चित्रविचित्र गोष्टी तुम्ही कधीपासुन करायला लागलात? तेही एक संशोधक असुन? की तुम्ही सुध्दा या दंतकथांच्या शोधात फ़िरता फ़िरता त्यात वहावलात?"
माझे वरिष्ठ माझे लिहीलेले कागद माझ्यासमोर फ़डकवत मला म्हणत होते. मला काही कळेना हे असे का म्हणताहेत? मी तरी जे दिसले, अनुभवले तेच तर लिहीले होते. यात कुठली चित्रविचित्र गोष्ट मी केली? निदान मला तरी आठवत नव्हते.
" सर तुमची काहीतरी चुक होतेय मी नेहमी प्रमाणे पेपर्स दिलेयत तुमच्याकडे यात कोणतीच विचित्र गोष्ट नाहीये." गोंधळून मी म्हणालो.
" हो का ? मग हे काय आहे ? हे काळ्या मांजराचा फ़ोटो?" लेखाच्या शेवटच्या ओळीखालच्या मोकळ्या जागी बोट आपटत माझे वरिष्ठ कडाडले.
"फ़ोटो नेहमी लेखाच्या सोबत जोडायचे असतात लेखाच्या खाली नव्हे हे विसरलात की काय?"
" नाही सर, तिथे काहीच नाहीये" माझ्या स्वरातुन माझा अविश्वास नक्कीच जाणवला असला पाहीजे.
" मग आमचे डोळे काही चुकीचे दाखवतायत का? की तुमच्या थियरी प्रमाणे यातही काही अतिमानवी शक्ती उतरली आहे?" त्यांच्या स्वरातला उपहास स्पष्ट जाणवत होता.
गुपचुप त्यांच्या हातातले कागद घेउन मी परत घराकडे निघालो, जाता जाता कमीतकमी दहा-बारा वेळा तरी मी ते कागद पाहीले पण मला एकदाही त्यात केवळ शब्द सोडून कोणतेही चित्र दिसले नाही.

हताश मनाने घरात येउन आरामखुर्चीत अंग टाकले. ‘हे लोक खरचं बोलतायत की आपले मला वाटेला लावण्यासाठी असले काही बहाणे करतायत?’
‘असेलही कदाचीत, नाहीतरी या लोकांना असले काही संशोधन नकोच असते, कोणती तरी मातीची मडकी उकरुन त्यांच्या कार्बन डेटींगने त्या काळात एखादी संस्कृती असावी वगैरे..., असले काहीतरी स्कुप हवे असते यांना. पण त्या काळात कोणती संकृती असावी त्या गावाचे नाव काय असावे या साठी त्या ठीकाणी प्रचलीत दंतकथांचा आधार घेण्याची कल्पना त्यांना हास्यास्पद वाटते’. या असल्या लोकांचा विश्वास काय बसणार माझ्या लेखावर? माझे या विषयावर डॉक्टरेट करायचे स्वप्न स्वप्नच रहाणार बहुतेक. मनातल्या काहुरात कधी झोप लागुन गेली ते कळलच नाही.

दुसर्‍या दिवशीची सकाळ माझ्यासाठी फ़ार मोठी बातमी घेउन आली. माझे ते तथाकथीत वरीष्ठ एका अपघातात आपले पाय गमावुन बसले. म्हणजे नेहमी प्रमाणे ते घरी निघाले होते आणि ते त्यांच्या गाडीत बसत असताना त्यांच्या गाडीला बाजुने जाणा-या गाडीने धडक दिली. अर्धवट आत आणि अर्धवट बाहेर असलेल्या त्यांच्या शरीरामुळे गाडीच्या दरवाजा बरोबर त्यांचे पायही.............
खुप कठोर वागत असले तरी अखेरीस ते ही तुमच्या आमच्यासारखे माणुसच होते. वाईट तर वाटणारच, पण त्यातही एक चोरटे दुखः होतेच आता माझ्या लेखाचे भवीतव्य पुरते अंधारले होते.

त्या घटनेला बरेच दिवस होऊन गेलेत. आता त्या झींबाडीच्या लेखाचे काहीतरी करायला हवे हा विचार अस्वस्थ करतोय. आजच एका संपादकाला भेटतोय निदान वर्तमानपत्रात तरी हा लेख आला तर मला त्याचे समाधान वाटेल. प्रसीध्दी मिळाली तर कुणाला नको असते? त्यातुन या लेखात माझे भावानुबंध जुळले होते, तसे ते आजवरच्या प्रत्येक लेखाशी जुळलेले आहेतच.

" फ़ारच रोमांचक अनुभव आहे हो तुमचा" संपादक हातातल्या कागदांकडे उत्सुकतेने पहात म्हणाले.
नाही म्हंटल तरी मनाला जरा शांतता लाभलीच.
" आणि सोबत फ़ोटो असल्यामुळे जरा जास्तच प्रभावी झालय लेखन" संपादकांची पुष्टी मिळाल्यावर आणखी बरे वाटले. मनातल्या मनात म्हंटलं जर त्या डॉक्टरेटच्या नादाला लागण्या ऐवजी जर असेच आपले लेख वर्तमानपत्रात दिले असते तर एव्हाना तळागाळापर्यंत ते प्रसिध्द झाले असते. कशाला त्या नावाआधी डॉक्टर जोडायचा हव्यास करायला हवा होता?
" पण एक रोमांचक प्रवासवर्णन म्हणुन हे लोकांच्या फ़ारसे पचनी पडणार नाही"
" अं, काय म्हणालात?" तंद्री लागल्यामुळे मी त्यांचे बोलणे निट ऐकलेच नाही आणि जेंव्हा ऐकले तेंव्हा माझ्या डोक्यात जणु स्फ़ोट झाले.
" आहो पण फ़ोटो दिले आहेत ना त्या ठिकाणचे तुमच्याकडे?"
" नाही म्हणजे तसे त्या ठीकाणचे फ़ोटो आहेतच आपल्याकडे पण तुम्हाला माहीताय त्यातुन फ़ारसे काही सिध्द होत नाही. हे फ़क्त त्या ठिकाणाचे आहेत"
"मग? आणखी काय हवे ? "
" त्यातुन तुम्हाला आलेल्या अनुभवांना सिध्द करता येणार नाही ना! जर तुम्ही तिथल्या कुणाची मुलाखत आणली असती तर......... "
" म्हणजे याचा अर्थ तुम्ही हा लेख छापणार नाही तर"
" अहो! तुम्ही गैरसमज करुन घेतलात की, मी असे नाही म्हणालो तुम्हाला"
" मग ?"
" आपण तो काल्पनीक, किंवा कथा म्हणुन छापु शकतो ना ! "
" अहो, पण माझा अनुभव खरा आहे"
" हो पण हयात अनुभव असा काय आहे? फ़क्त तुम्ही तिथे जाउन पडताळणी केलीत इतकाच बाकी त्या दंतकथेला काही पुरावे नाहीत ना ! "
" अच्छा! म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे तर मग मला सांगा हो, रामायण महाभारताचे पुरावे आहेत तुमच्याकडे ? श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगीतल्याचा पुरावा आहे तुमच्याकडे? तरी त्या दंतकथा म्हणता का हो तुम्ही?" माझ्या दुखर्‍या नसेवर हात ठेवल्यामुळे मी संतापलो.
" चिडता काय हो, मी आपली सामान्य शंका काढली हो"
" मी ही तुम्हाला सामान्य उदाहरणेच दिली"
" तसे आपण छापु शकतो हे प्रवास वर्णन म्हणुन अर्थात आमच्या अटीं नुसार"
" म्हणजे जे लिहीले आहे त्याच्याशी संपादकांचा संबंध नाही असेच काहीसे ना?"
यावर काही बोलण्याऐवजी संपादक कसेनुसे हसले. आणि मी काय ते समजुन गेलो, आणि जाण्यासाठी उठलो.
" आहो, एक विचारायचे राहुना गेले, या लेखाच्या शेवटी असलेला हा काळ्या मांजराचा फ़ोटो तसाच छापायचा का ?" संपादक लेखाच्या शेवटी असलेल्या कोर्‍य़ा जागेवर बोट ठेवत म्हणाले.
माझ्या डोक्यात पुन्हा एकदा स्फ़ोट झाल्यासारखे वाटले, नेमके असेच माझे वरीष्ठ म्हणाले होते.
निमुटपणे मी संपादकांच्या समोरुन लेखाचे कागद उचलले आणि बाहेरचा रस्ता धरला. मागे हाक मारुन ते काय म्हणत होते तिकडे माझे ल़क्षच नव्हते.

दोन दिवस मला शब्दशः काही सुचत नव्हते, माझ्या लेखाचे कागद मी पुन्हा पुन्हा तपासले पण मला त्यात काळ्या मांजराचे चित्रच काय एखादा काळा ठिपकाही दिसला नाही. मग त्या दोघांना त्यात असे का दिसावे? पुन्हा पुन्हा ह्याच विचाराने अस्वस्थ होत मी टी.व्ही. समोर चॅनल बदलत बसलो होतो आणि त्या बातमीने माझे ल़क्ष वेधले. बातम्यांमधे त्या संपादकांचे नाव ऐकले आणि मी ती बातमी पुर्ण पाहीली.
ते संपादक रोजच्या प्रमाणे सकाळी बाहेर फ़िरायला गेलेले असताना एका झाडाची भलीमोठी फ़ांदी अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे आणि दोन्ही खांदे फ्रॅक्चर झाले आहेत असा साधारण त्या बातमीचा सारांश होता. म्हणजे ही शक्यताही संपली म्हणायची.
नाही म्हणता माझ्या मनात एक संशयाची पाल चुकचुकलीच माझे वरीष्ठ आणि हे संपादक, दोघांमधेही एक साम्य होते, दोघांनाही माझ्या लेखाच्या अखेरीस काळ्या मांजराचे चित्र दिसले होते.
ताबडतोब मी माझ्या लेखांच्या कागदांकडे धाव घेतली, आणि सगळे लेखन दुसर्‍या कागदावर उतरवले न जाणो त्या कागदातच काही दोष राहीला असावा.

संपुर्ण रात्र अशी लिखाणात घालवल्यावर मला पहाटे पहाटे अचानक झोप लागुन गेली. जाग आली तेंव्हा समोरच्या खुर्चीत माझा जुना मित्र तेच कागद चाळत बसला होता. तरी नशीब मी त्या लेखाच्या मुळ कागदांना रात्रीच जाळून टाकले होते. मला जाग आल्याचे पहाताच तो माझ्याकडे पहात तोंडभर हसला.
" काय रे? कधी आलास ? आणि मला उठवले का नाहीस?" मी विचारले.
" तासाभरापुर्वीच आलोय पण तुला झोपलेला पाहीला तो ही असा बाहेर सोफ़्यावर म्हंटलं स्वारी रात्रभर जागी असणार म्हणुन नाही उठवले रे"
"तरीपण........." पुढे काय बोलावे ते सुचलेच नाही.
" असु दे रे ! मी तुला उठवणारच होतो, पण समोर हे कागद दिसले, सहज चाळले फ़ार सुरेख वर्णन केलेयस यार ! "
" हो तसे आहे खरे"
" हा तुझा नवा शोधनिबंध वाटत?"
" नाही असेच सहज लिहीलेय रे"
" असो, जे काही लिहीलेयस ते खरंच अप्रतीम आहे रे, मला सांग असे घडले असेल का रे या दंतकथेनुसार?"
"माहीत नाही पण तिथे त्या दोघांच्या मुर्ती आहेत खर्‍या"
एव्हाना तो फ़ोटो निरखायचे काम करत होता. म्हणुन मी त्याच्या निरी़क्षणात व्यत्यय आणला नाही, कारण हा सुध्दा एक पुरातत्व विषयात गती असलेला माणुस आहे.
" काय रे? त्या मुर्ती किती उंचीच्या आहेत रे ? साधारण?"
"साडेसहा सात फ़ुटाच्या असतील, का रे?"
" तु कधी पुरातन मुर्तीत इतके बारकावे पाहीलेस काय रे ? म्हणजे तु म्हणतोस तश्या समाध्यांमधे तरी?"
"म्हणजे?"
" हे बघ!" हातातल्या मुर्तींच्या फ़ोटोवर बोट ठेवत तो म्हणाला" यांचे डोळे पाहीलेस? त्यावरच्या पापण्या?"
"त्यात काय वेगळे आहे?"
"निट पाहीले असतेस तर जाणवले असते, पापण्यांवरचे केसही स्पष्ट दिसतायत. तश्याच हातांवरच्या रेषा सुध्दा"
" त्याने काय साधतेय?"
"खुप काही, बघ ना ! त्यांच्या उजव्या हातांच्या मुठीच्या शीरा फ़ुगलेल्या दिसतायत"
"बरोबर आहे, पण तुला नक्की काय म्हणायचेय?" आता मलाही उत्कंठा लागली होती.
" उंची आणि शरीराचे प्रमाण योग्य, चेहयावर थिजलेले भाव जसेच्या तसे, जणु आत्ता डोळे उघडतील असे वाटणारे"
" हो त्या मुर्तीकाराची कला जबरदस्त असावी मलाही मुर्ती पहाताच असे वाटलेले"
" इतका काळ गेला पण कुठे टवका सुध्दा उडालेला नाहीये"
" तुला नक्की काय म्हणायचेय"?
" या मुर्ती नाहीतच असे म्हणायचेय मला"
" मग काय आहे?" उत्कंठेने कळस गाठला.
" या ममीज असाव्यात म्हणजे हे ते दोघेच असावेत प्रत्य़क्षात"
" ते कसे शक्य आहे? ते दोघे तर युध्दात मारले गेले असे म्हणतात"
" तुला पौराणीक युध्दे कशी व्हायची हे माहीत आहे ना?"
"अर्थात, शस्त्र आणि अस्त्र यांनीच"
" तु कधी स्पर्शास्त्राचे नाव किंवा वर्णन ऐकलेस का?"
" हो, त्याने माणुस एका जागी स्तब्ध होत असे, म्हणजे तुला म्हणायचेय की ..............."
"होय या दोघांवर त्याच अस्त्राचा प्रयोग झाला असावा"
"ते कसे शक्य आहे? तसे असते तर कुणीतरी त्यांना त्यातुन मुक्त केले असतेच ना !"
" शक्यता कमी आहे कारण हे अस्त्र फ़क्त एकाच गटाकडे होते याची तोड दुसर्‍याकडे असणे शक्य नाही, पुढे त्यांचा प्रसार झाला तेंव्हा ते इतरांना माहीत झाले"
" बाप रे ! म्हणजे ते इतकी वर्षे त्याच स्थीतीत गोठलेले आहेत?"
"शक्य आहे तु लिहीलायस तो कालखंड पहाता त्याकाळी असे होणे शक्य आहे"
"मग त्यांच्या मारल्या गेल्याची माहीती चुकीची आहे की काय? दंतकथेत नंतर पडलेली भर?"
"तो तुझा प्रांत आहे, मला फ़क्त पौराणिक अस्त्रांमधे माहीती आहे"
" मग त्यांच्या शक्ती आजुन काम करत असतील का?"
" का नाही ? शेवटी शरीर गोठले तरी मन कार्यरत रहाणारच ना?"
"बाप रे ! म्हणजे त्यांच्या आशिर्वादाबद्दलही खरेच असणार"
"असु शकतील, बरं ते राहू दे आता जरा चहा कॉफ़ी काही देणार आहेस की........."
" सॉरी यार, विसरलोच होतो"
मी नोकराला हाक मारुन चहा आणायला सांगीतला.
" पण त्यांच्यात असे काय आहे की तिथले गावकरी तिकडे जायलाही घाबरतात? मला तरी तसे काही दिसले नाही"
" पण काही कारण असल्या खेरीज गावातली ही रांगडी माणसे अशी घाबरणार नाहीत हे खरे" त्याचा मानवी स्वभावाचा अभ्यास जबरदस्त होता.
"मग फक्त आशीर्वाद देणे या खेरीज तिथे काहीच घडायची शक्यता नाही, आणि तो नाही मागितला तर मग तो चुकायची भितीच नाही ना ! "
" असे आपण म्हणतो पण देवळात गेलास की देवासमोर तु काहीही न मागता कींवा अपेक्षा न ठेवता तु उभा राहु शकतोस का रे ?"
" बाप रे ! म्हणजे आपल्या मनातलं सुध्दा तिथे ओळखले जात असावे?........."
"शक्य आहे, या गावातल्या माणसांना एखाद्या गोष्टीबद्दल काही वाईट शंका आली तर ते सरळ ती गोष्ट किंवा ती जागा टाळतात त्या मागची कारणमिमांसा शोधत बसत नाहीत तो त्यांच्या स्वभावाचाच एक भाग आहे"
"म्हणजे ते म्हणतात त्यात तथ्य असावं ! "
"शक्य आहे....."
इतक्यात चहा आला आणि बोलण्यात खंड पडला, त्या नंतर गप्पा सुरु झाल्या पण विषय वेगळे होते.
बर्‍याच गप्पा झाल्या इकडच्या तिकडच्या आणि माझा तो मित्र तासाभराने जायला निघाला. मी ही त्याला दारापर्यंत सोडला, आपल्या टू व्हीलरवर बसता बसता त्याने विचारले
" आणि काय रे ? तु त्या लेखाच्या शेवटी काळ्या मांजराचा फ़ोटो लावलायस तो काढून टाक, शोभत नाही तिथे."
माझी जणु दातखीळ बसली मी काही बोलु शकायच्या आत तो गाडी चालु करुन निघुनही गेला.

कालच मी त्या मित्राला हॉस्पिटल मधे जाउन भेटून आलोय म्हणजे मी कालपासुन खरंतर तिथेच होतो. मला भेटून निघाल्या नंतर पुढच्याच वळणावर एका वाळूच्या ट्रक मधुन सांडलेल्या वाळूवरुन त्याची गाडी घसरली आणि त्यात त्याच्या शरीराच्या डाव्या बाजुला जबरदस्त मार बसला. डाव्या गुढघ्याची वाटी सरकल्याने त्यावर शस्त्रक्रीया करावी लागली. त्या खेरीज डाव्या हाताची कातडी पार सोलल्या गेलीये त्यामुळे कमीत कमी पंधरा दिवस तरी तो जायबंदी झालाय.

मला आजुनही त्या लेखावरच्या मला न दिसणाया फ़ोटोचे रहस्य उलगडले नाहीये, मला तो का दिसत नाही बाकीच्यांना का दिसत असावा? बरं ज्यांना दिसतो त्यांच्या बाबतीत अश्या घटना का घडाव्यात? हा त्या मुर्तींसमोर मनात आलेल्या विचारांना गफ़लतीने मिळालेला आशिर्वाद तर नसेल? मग तो कुणी दिला असावा? शषाल की शेषाल ? बरेच प्रश्न मला शांत बसु देत नाहीयेत म्हणुन आता शेवटचा मार्ग म्हणुन मी सगळा लेख जसाच्या तसा इथे इंटरनेटवर प्रसिध्द करतोय. कदाचीत इथे तरी काही लोक वाचतील कदाचीत त्यामुळे माझ्या या विचित्र अनुभवाला वाचा फ़ुटेल. आणि इंटरनेट वर असल्यामुळे कागदाचा प्रश्न नाही म्हणजे त्या मला न दिसणाया फ़ोटोचा प्रश्नच नाही, आणि तो दिसल्यामुळे जे अपघात होतायत त्यापासुनही बाकिच्यांना सुटका मिळेल. एकुणच हे माध्यम फ़ारच चांगले पडेल निदान या लेखासाठी तरी...... नाही का ?

images.jpg

गुलमोहर: 

तुझ्या नानाची टांग. लेका, आता आठवडाभर मी पांघरुणातही जपुन बसणार! आधीच मी कन्या राशीची, नको ते विचार करणारी. वरुन काही पडत नाही ना, खालचे सरकत नाही ना ह्यातच दिवस्-रात्र जातील माझ्या. कारण मलाही लाल डोळ्याचे काळे मांजर दिसले आहे तुझ्या लेखाच्या शेवटी! संशोधन लेख छान आहे हं. कुठेतरी छापायची हौस इथे भागवलीस आणि म्या पामरांना मांजर दिसु लागलं. Wink

कुठे आहे मांजर? मला नाही दिसत. मी तर उलट म्हणते इथे फोटो नाही का लावायचा मांजराचा.. लोक घाबरले असते जरा!

साल्ला. पहिलि कथा वाचलि, ति पन मांजराचि.
काले मांजर आडवे गेल्यावर गेल्यावर कोन पुढ्ल्या कथा वाचेल??
तुमाला अतिरेकि आडवे गेले होते काहो?

एकदम मस्त. अगदी आवडली ही कथा.

मस्त लिहिलीये ही कथा.. Happy

१ नम्र विनंती

सदर कथा कोणत्या ना कोणत्या मार्गानी देशातल्या सर्व 'नेत्यांना वचायला द्या...
ते लोकसभेत जाताना जाहिरात वाटल्यासारखी वाटा...
देश सुखी होईल...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!

God forbid, पण हे वाचल्यानंतर कोणाचं काही बरंवाईट झालंच तर ह्या चाफ्फ्याला sue करावं का? :p

मस्तच, खुप आवडलि कथा. पण शेवट नेहमिच्या पध्दतिने करण्याऐवजि (काळ्या मांजराचा फोटो) त्या स्पर्शास्त्राबद्दल आणि त्या दोघा भावांच्या परत जीवंत होण्याबद्दल काहितरि गुढ क्रिएट करायला हव होत अस वाटल.

काळं मांजर दिसलं रे !!!!
आता जे घडेलं त्याला जवाबदार कोण?

अनघा
-------------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

मी विचार करतोय, आज ऑफीस संपल्यावर घरी कसं जावु.
माझ्या बाइकने, कंपनीच्या गाडीने, रिक्षा पकडु कि टॅक्सी....
साल्या एक सुद्धा पर्याय शिल्लक ठेवला नाहीयेस.........

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

चाफ्या,
मला पण निट पत्ता सांग त्या जागेचा.
बहुतेक अपघात झाल्यावर आणि नंतर बरा झाल्यावर मी नक्की जाईल
आशीर्वाद मागायला..
Biggrin
************************
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात...
************************

सर्वांना धन्यवाद !
>>>>>>>>पण हे वाचल्यानंतर कोणाचं काही बरंवाईट झालंच तर ह्या चाफ्फ्याला sue करावं का?
मला नाही शषाल कींवा शेषालला करा ! Happy
मराठमोळी : त्या दोघांना जिवंत करायला गेलो असतो तर मग या कथेची `असंभव' होण्याची शक्यता होती ना ! Wink
.................................................................................................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !

मलाही मांजर नाही दिसले Wink चला मी सुटले...

चाफा पण कथा मात्र अफलातुन ... शेवटी टुणकन उडायची बाकी होते.

विल्लप
**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !

Happy चांगली जमलीये कथा चाफ्फ्या.
------------------------------------------
'घोड'चूक जरी केली, तरी होतो 'गाढव'पणाच! Proud

वा, आजवरच्या तुमच्या सगळ्या कथांमधली खतरनाक.. Happy काय हे, वाचकांनाही नाही सोडलतं?

तुझी प्रेमकथा वाचून मी तुझ्या अंगावर काळा कुत्रा सोडायची तयारी केली होती, आता ते कँसल!!
लई भारी जमवलीस रे!!!
(कोणत्या रूममध्ये बसून हे अचाट लिहितोस, ती बघायला देशील का एकदा? चार-दोन जण सोबत आणतो, एकटे यायची हिंमत नाही.)

--
.. नाही चिरा, नाही पणती.

चाफ्या लय भारी.... मला पण दिसले काळे मांजर्.....आता घरी कशी जावू??????
हिच का रे ती कथा तु काल म्हणालास ती.

ankyno1 ने सांगितलेले मनावर घे.....

चाफ्या,

हे तुझ काळं मांजर पाहुन मला काहि झाल तर पहा. वकिल आहे मी, दावाच ठोकेल तुझ्यावर.

सागर,

माझंही वकिलपत्र तुला.... in advance !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

>>>>>>>>तुझी प्रेमकथा वाचून मी तुझ्या अंगावर काळा कुत्रा सोडायची तयारी केली होती
साजिर्‍या, जमेगा नय ! माझ्याकडे पण एक भलाथोरला कुत्रा आहे Happy
>>>>>>>सदर कथा कोणत्या ना कोणत्या मार्गानी देशातल्या सर्व 'नेत्यांना वचायला द्या...
ते लोकसभेत जाताना जाहिरात वाटल्यासारखी वाटा...
देश सुखी ह>>>>>>>तसं करण शक्य असत तर २६/११ झालाच नसता ना ! Sad
असो दोस्त कंपनी एकुणच मी माझ्याच लेखनप्रांतात ठिक आहे, एखादी भयकथा मालिका सुरु करावी का ? ( विचार करणारी बाहुली ) Wink

.................................................................................................................................
घाबरा आणि घाबरु द्या, ........... !

दिलिपकुमार
आयला, अगदि भन्नात गोस्त सादर केलिय मजा आलि. अभिनन्दन

हे तुझ काळं मांजर पाहुन मला काहि झाल तर पहा. वकिल आहे मी, दावाच ठोकेल तुझ्यावर. >>>>
मेल्यावर का? (भिषण हसणारी बाहुली)

वैसे तो, मरे तुम्हारे दुश्मन.. Happy

चाफ्फ्या आयडिया मस्त काढतोस हं तू! अन मलाही असंच वाटतं , तू भयकथा हाच प्रकार जास्त इम्प्रोवाइज कर Happy
. एकाच गोष्टीत २-३ छान कल्पना आहेत त्यातल्या मांजराच्या आयडियेवर जास्त स्ट्रेस दिला गेलाय. ते दोन भाऊ अन ती दन्तकथा अजून वापरायला हवी होती Happy

छान आहे कथा, उत्सुकता वाटत होती शेवटपर्यंत. पण घाबरावला जरा ते दुसरं काही तरी वापरा, मांजर काय घाबरायची गोष्ट आहे, ती तर आवडायची गोष्ट आहे, काळं असलं तरी Happy

तुझी प्रेमकथा वाचून मी तुझ्या अंगावर काळा कुत्रा सोडायची तयारी केली होती, आता ते कँसल!!
लई भारी जमवलीस रे!!!
(कोणत्या रूममध्ये बसून हे अचाट लिहितोस, ती बघायला देशील का एकदा? चार-दोन जण सोबत आणतो, एकटे यायची हिंमत नाही>>>>>>>>>

Rofl

साजिरा माझ्या मनातलच लिहिलस रे अगदि. Happy

<<माझ्याकडे पण एक भलाथोरला कुत्रा आहे>>

तुला कुत्र्याची गरज काय चाफ्या, तुझ्याकडे काळं मांजर आहे ना...तेच पुरेसं आहे ! Lol

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

जमलंय रे Happy

पण अजुन काहीतरी करता आले असते का??
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

मी सकाळपासुन विचार करत होतो कि आज मला काळी मांजरे का आडवी जात आहेत?
पण मी घाबरत नाही, माझा अपघात विमा आहे, हो....
बाकी, लेख छान, नेहमी सारखाच...

चाफ्फ्या.... Happy चांगली जमलीये.. पण त्या दंतकथेचा अजुन सुयोग्य वापर करायला हवा होतास..

Pages