पिंपरि -चिंचवड / पुणे महानगर पालिकेमधे घराचा प्लॅन पास करायचि प्रोसेस काय आहे?

Submitted by प्रिया७ on 30 October, 2013 - 10:41

माझ्या मावशिचे पिंपरि -चिंचवड एरियामधे घर आहे. २० वर्षांपुर्वि बांधले होते. आता ते पडायच्या स्थितित आहे. तर नविन घर बांधायचे आहे. त्यासाठि नविन प्लॅन काढुन पास करुन घ्यायचि काय प्रोसेस आहे आणि साधारण किति वेळ/खर्च लागतो या साठि?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिया,

माझ्या अनुभवाप्रमाणे मी काही माहिती देत आहे. ही माहिती पूर्ण असेलच असे नाही.
इतर अनुभवी लोकांनी ह्यात आपापल्यापरीने भर घालावी.

सर्वात पहिलं काम म्हणजे एखादा आर्किटेक्ट गाठणं.
आर्किटेक्ट असा हवा कि ज्याला पिंपरी चिंचवड पालिकेत प्लान पास करून घेण्याचा चांगला अनुभव आहे.
"चांगला अनुभव" म्हणजे काय ते ते तुम्हाला कळले असेलच असे मी गृहीत धरतो.
आर्किटेक्ट तुमच्या सध्याच्या राहत्या घरा जवळ असावा म्हणजे तुम्हाला त्याचे कडे वारंवार जायला सोपे जाते.
त्या आर्किटेक्ट बरोबर बोलून साधारण सर्व प्रकारच्या खर्चाचा अंदाज घ्या.
खर्च दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे ज्याची तुम्हाला पावती मिळते आणि दुसरा म्हणजे ज्याची तुम्हाला पावती मिळत नाही.
अशा सर्व प्रकारच्या खर्चाचा अंदाज तुम्हाला मिळतो.

आर्किटेक्ट ची फी तुम्ही चेकने दिली तर tax पड्तो. कॅश अणि चेक पेमेंट चे प्रमाण तुम्ही बोलून ठरवू शकता.
ह्या शिवाय इतर अनुशंगिक किरकोळ खर्च असतात - उदा. stamp paper , फोटो कॉपी (xerox ) इत्यादि.

काही आर्किटेक्टस तुमच्या बांधकाम खर्चाचा ठराविक दराने अंदाज काढतात अणि त्याच्या प्रमाणात फी आकारतात. असे करणे चांगले.
म्हणजे प्रत्यक्षात झालेला बांधकाम खर्च आणि आर्किटेक्टच्या फीचा संबंध राहत नाही.
फी टप्याटप्याने दिली तरी चालते. म्हणजे प्लान सबमिट झाल्यावर काही, प्लान पास झाल्यावर काही, आणि उरलेली completion certificate मिळाल्यावर.
बांधकाम सुरु झाल्यावर आर्किटेक्टच्या विशिष्ठ टप्यावर site visits आपेक्षित असतात. त्याची वेगळी फी काही काही आर्किटेक्ट्स घेत नाहित. त्यासंदर्भात आगोदरच बोलून घेतलेले बरे.

हे झालं खर्चा बद्दल.

वेळेबाबत बोलायचं झालं तर तो बराच लागतो असे धरून चला.
खालील गोष्टींवर वेळ आवलंबून असतो:

१. तुम्ही किती वेळा प्लान मध्ये बदल करता.
२. तुमचा आर्किटेक्ट तुमच्या कामाला किती वेळ आणि प्राधान्य देतो.
३. प्लान सबमिट केल्यापासून पास होण्यासाठी लागणारा वेळ.

वरीलपैकी फक्त पहिली गोष्ट तुमच्या हातात आहे.
तुम्हाला घर कसे हवे आहे हे घरातील संबधित सर्व लोकांशी बोलून नक्की करावे आणि मगच आर्किटेक्टला प्लान काढायला सांगावे.
ह्या चर्चेत वास्तुशास्त्र, दिशा, अमुक दिशेला देवघर, तमक्या दिशेला स्वयंपाकघर. दरवाजे आणि त्यांच्या दिशा, वाऱ्याची दिशा, नैसर्गिक उजेड इत्यादी बाबींचा उहापोह होतो.
जेवढे बदल जास्त आणि अनेक वेळा तेवढा वेळ वाढतो.
जेवढे जास्त लोक आपापलं डोकं त्यात घालतात तेवढा वेळ वाढतो.
सर्व विचार करून प्लान पास झाल्यावर, बांधकाम सुरु असताना बदल करणारे लोक असतात.

पालिकेत काही काही वेळा (आचारसंहिता) सर्व प्रकारची पासिंग ची कामे बंद असतत. त्यामुळेपण वेळ लागू शकतो.

वरील माहितीवरून बऱ्यापैकी अंदाज तुला असेल अशी अपेक्षा करतो.

खुप धन्यवाद अलगुज. चांगलि माहिति दिलि. मला यातिल बर्‍याच गोष्टि माहिति नव्हत्या. मावशी एकटि रहाते. तिला फारसे या एरिआ मधे माहितगार लोक माहिति नाहित. त्यामुळे फसवणुक होऊ नये या हेतुने आधि सगळि माहिति तिच्यासाठि काढायचा विचार आहे.
completion certificate हा काय प्रकार असतो? आणि ते कधि आणि कोणाकडुन मिळते? तिने एका आर्किटेक्ट ला विचारले तर तो जेव्हढा बांधकामचा एरिया असेल त्याच्या स्क्वेअर फुटेज नुसार चार्ज करेल असे म्हटला.
पण तो म्हटला कि प्लॅन पास करायचे काम त्याचे नाहि. तुम्हाला स्वतः करायला लागेल ते. आणि मावशी ला यातील काहिहि माहिति नाहिये.

ऑफिसबाहेर एजंट नाहीतर वकील असतात. त्यांच्याशि बातचीत करायची. तो आकडा सांगतील त्यात घासाघीस करून ठरवायचं . पुढचं सगळं तेच करतात. फास्ट काम होतं. डायरेक्ट गेलं तर पाच सहा वर्षं काहीच होत नाही.

प्रिया,

Completion certificate हे महापालिका देते. त्यासाठी आपल्याला आर्किटेक्टची मदत घ्यावी लागते.
महापालिकेने पास केलेल्या प्लान प्रमाणे बांधकाम झाले आहे का नाही हे पालिकेचे engineers साईट व्हिजीट करून तपासून बघतात.
पास केलेल्या प्लान प्रमाणे बांधकाम नसेल तर काही दंड भरून भागते.
प्रत्येक वेळेला असे होईलच असे नाही. काही वेळेला नियम बाह्य केलेले बांधकाम पडावे पण लागते.

Completion certifcate साठी आपल्याला काही गोष्टींची पूर्तता करावी लागते.
उदा. प्लॉट मध्ये काही झाडे लावणे व ती ठराविक उंची पर्यंत वाढलेली असणे.
Rain water हार्वेस्टिंग, आज काल नियमाने करावे लागते.

Completion certifcate मिळाल्यानंतरच नियमाने आपण घरात राहायला जाऊ शकतो.
पिण्याच्या पाण्याचे connection मिळण्यासाठीपण Completion certifcate लागते.
Completion certifcate मिळाल्यावर वार्षिक मालमत्ता कर (Property Tax ) किती भरायचा हे पण ठरते.

नियम खूप असतात. प्रत्यक्षात सर्व नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसते.

एकंदरीत तुम्हाला बरीच माहिती गोळा करावी लागणार असे दिसते.