ग्रंथालयाचे सभासद कसे वाढवावेत? त्यासाठी प्रचार व जाहीरात कशी करावी?

Submitted by साताराम on 21 October, 2013 - 23:51

ग्रंथालयाचे सभासद कसे वाढवावेत? त्यासाठी प्रचार व जाहीरात कशी करावी? जास्तीत जास्त सवलतीत पुस्तके व दिवाळी अंक कोठे मिळतील?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीच्या छोट्या जाहिराती विभागात आपल्या ग्रंथालयाची माहिती (ग्रंथालयाचे नाव, पत्ता, फोन क्रमांक, मिळू शकणारी पुस्तके कोणत्या प्रकारची - भाषेतली, काही विशेष योजना असल्यास त्या - असे सर्व तपशील) देऊन जाहिरात नक्कीच करता येईल.

ग्रंथालय नक्की आहे कुठे? त्यानुसार जास्तीत जास्त सवलतीत पुस्तके व दिवाळी अंक कोठे मिळतील हे कदाचित सांगू शकेन मी…

वेध! मुक्त ग्रंथालय! मोतीचौकाजवळ, गंगासागर, स्टेट बँकेसमोर, आयडीबीआय बँकेशेजारी, कैलास प्लायवुडमागे, सातारा: 415002. मोबाईल: 9422609032.
विशेष योजना: वाचनमैत्री: विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांना संग्राह्य, बाल, चिल्ड्रेन विभाग आणि दिवाळी अंकांसाठी शून्य वर्गणी.

सभासद मिळवण्यासाठी आपल्या ग्रंथालयाच्या परिसरातील शाळा, कॉलेजेस व ज्येष्ठ नागरिक संघ / सांस्कृतिक केंद्रे, उद्याने इ. ठिकाणी ग्रंथालयाची माहिती देणारी पत्रके लावा.

कोल्हापूरला अजब प्रकाशन नावाची एक संस्था आहे. ते अत्यंत गाजलेली, नामांकित पुस्तके केवळ ५० रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहेत. सध्या पुण्यात आणि कोल्हापूरात देखील त्यांचे एक प्रदर्शन भरलेले आहे. येथे हर प्रकारची, हर विषयावरची पुस्तके उपलब्ध आहेत आणि कोणतेही पुस्तक सरसकट फक्त ५० रुपयांत मिळत आहे.

Ajab Publishers
Phone: (0231) 254671९/ ९६८९९०९८९८
Address: 321-B, Bhausinghji Road, Kolhapur- 416003
Landmark: Near Bhavani Mandap Temple
----------------------

पुण्यामध्ये महात्मा फुले मंडई जवळ (विश्रामबाग पोलिस चौकी शेजारी) एक रद्दीवाला आहे प्रकाश नावाचा. त्याच्या कडे पुस्तकं आणि मासिकं यांचा अफाट साठा आहे. प्रकाश अगदी किरकोळ किमती मध्ये विकतो.
------------------------

शिवाय कराड मध्ये Rajyog Departmental Stores म्हणून एक दुकान आहे, त्यांच्याकडे ही चौकशी करा.
Sikachee Book Corner, Ravivar Peth, Main Road, Karad, Satara - 415110
(02164) 222787, 230205

१. हल्ली ब-याच जेष्ठ नागरिकांना वाचायचे असते पण गर्दीत लायब्ररीत जाऊन पुस्तक बदलून आणणे दिव्य वाटते.
त्यांच्यासाठी घरपोच पुस्तक ही योजना (आठवडयातून १/२ दा वगैरे ) राबवता येईल.
२. मुलांच्या शाळेच्या बाहेर जाहिरात करणे. हाऊसिंग सोसायटीत जाऊन प्रचार करणे/पत्रक वाटणे.

"मला आवडलेले पुस्तक " या विषयावर वेगवेगळ्या वयोगटा करिता
वक्त्रुत्व स्पर्धा घ्या. स्पर्धेचि वर्तमान पत्रातुन माहिति द्या. एखाद्या
लेखकाच्या ह्स्ते पारितोषिक वितरण़ करा.