पुण्यात लहान मुलांच्या कॅन्सर उपचारासाठी चांगला डॉक्टर माहित आहे का ?

Submitted by mimarathi on 19 October, 2013 - 01:37

आमच्या नात्यातल्या ४ वर्षाच्या मुलाला बल्ड कॅन्सर झाला असून शेवटची stage असल्याच सांगितल आहे. त्याला आत्ता १०४ ताप आला होता, परंतु पुण्यात काही डॉक्टरांनी औषध देण्यास नकार दिला, तसेच आता त्याची वाचण्याची शक्यता काही टक्केच आहे असेही सांगितले, कदाचित यास काही वैद्यकीय करणेही असतिल. परंतु आई वडील आणि सगळ्या जवळच्या माणसाना आशा असतेच ना , ज्योतिष , दैवी, आयुर्वेदिक असे काही इतर उपाय माहिती असतील तर तेही सुचवा हि कळकळीची विनंती,

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.rubyhallcancercentre.com/htmlsite/Medical_Oncology.asp?id=28 यांना भेटुन तुम्ही तुमच्या शंकेच निरसन करु शकता. यांनी लहान मुलांच्या कॅन्सरवर उपचार केले आहेत की नाही माहीत नाही.
डॉ. पद्मज कुलकर्णी नोबल हॉस्पीटल हडपसर,पुणे - 411028 इथे असतात, त्यांचा फोन नं 9923391255.

मी मराठी,
ब्लड कॅन्सरकरिता हिमॅटोलॉजिस्टला भेटा.
हिमॅटोलॉजिस्ट इन पूणे असा सर्च द्या.
डॉक्टर आणि हॉस्पिटलची लिस्ट येइल.
पैकी किमान दोन चांगल्या डॉक्टरांचे मत घ्या.

मुलाच्या आणि पालकांच्या मनःशांतीसाठी दैवी उपचार वैगेरे करताना एक लक्षात ठेवा की या रूग्णांना संसर्ग व्हायचा खूप जास्तं धोका असतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणि देवळात/ मठात मुलाला घेऊन जाउ नका.
काढे, रस किंवा काय प्यायला दिलेत तर शक्यतो घेऊ नका. पूर्णं निर्जंतुक असतील याची खात्री नसते.

मी तु मच्या भावना समजू शकते. मुंबईती ल टाटा व हैद्राबादमधील एन टी आर कॅन्सर स्पेशालिटी पण चांगले आहे. प्लीज ते ही कन्सिडर करा.

सर्वांना धन्यवाद ! हि बातमी आईकाल्यापासून सुन्न झाले आहे, काही केल्या डोक्यातून हि गोष्ट जात नाही, निदान त्या बाळाला औषध उपचार योग्य मिळावेत आणि त्याचा इतर त्रास कमी व्हावा ह्यासाठी चांगला डॉक्टर मिळावा. तुमच्या सर्वांची माहिती त्याच्या आईला कळवते.

साती,
हिमॅटोलॉजिस्ट सगळ्यांसाठी एकाच असतो का? म्हणजे pediatric वेगळे असतात का ?

मीम
वाचून वाईट वाटले.
डॉक्टर मेलीन केरी आहेत दिनानाथ हॉस्पीटलला तसेच अजून अनेक हॉस्पीटलला पण ते प्रॅक्टीस करतात. ते खूप वर्षांपासून आमचे hematologist आहेत (We don't go to him for cancer treatment though). फोनवर पण खूप चांगले बोलतात. एकदा भेटून पहा त्यांना. माझ्या छोट्या भाच्याचे पण तेच आहेत.
गुड लक.

रूनी पॉटर,

समीर मेलीन्केरी (Dr. Sameer Melinkeri ) का? ते सह्याद्री ला पण आहेत बहुधा, सतीने सांगितल्याप्रमाणे सर्च केले असता त्यांचे नाव येते नेट वर .

अरेरे वाईट वाटले, तो छोटा आणि त्याचे आई-बाबा हे कुठल्या परीस्थितीतून जात असतील, लवकर त्यांना योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळूदेत आणि त्या छोट्याला लवकर बरे वाटूदे.

हो. हेच ते. त्यांचा भाऊपण डॉक्टर आहे. तो भाऊ बहुदा सूर्या हॉस्पीटलला असतो जो बोन मॅरो रीलेटेड काम करतो. नॉट शुअर.