घडीचं शिसवी देवघर

Submitted by कपीला on 11 October, 2013 - 13:36

चांगल्या प्रतीच्या लाकडाचे, शिसवी किंवा तत्सम, घडी होउ शकणारे (प्रवसात नेण्यासाठी) देवघर पुण्यात किंवा मुंबैत कुठे मिळेल? २०००-३००० रु बजेट आहे, रास्त आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Devhara.jpg (32.27 KB)पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर एक दुकान आहे. नक्की मिळेल तिथे. आकार..लाकुड.. कोरीवकाम..पॉलिश ह्यावर किमती बदलतील. परंतू, माल खात्रीशीर असेल. वेळ काढून पाहुन या..बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

मागे .. मी एक २फुटी देव्हारा खरेदी केलाय स्वतःसाठी ( ५ वर्षांपूर्वी रु. ३७००). कासवाच्या आकाराचा सुरेख बेस आहे.

स्वाती +१

आम्ही (आईबाबांनी) घेतलं होतं भुलेश्वरला फोल्डिंगचं सुबक असं शिसवी देवघर १८ वर्षांपुर्वी. अजूनही जसंच्या तसं आहे. शिसवी असल्यामुळे बेताच्या आकाराचं असलं तरी चांगलंच जड आहे. तिथून पॅक करुन १० मिनिटांच्या पायी अंतरावर नेतानाही हात भरुन आले होते. माधवबागेत जैनमंदिराच्या आवारात ही दुकानं आहेत. हमखास मिळेल. इतर कुठेही फिरु नका.

एक शंका घरातल्या देवघराला कळस असू नये अस म्हणतात याला काही कारण आहे का? कृपया माहिती असल्यास इथे द्यावी . धन्यवाद .