कॅमरा मधे बिघाड - सॉल्ट वॉटर

Submitted by मी प्रशांत on 2 October, 2013 - 10:53

नमस्कार,

मी सध्या Pentax कंपनीचा SLR कॅमरा वापरत आहे. मॉडेल K-X.
मागच्या आठवड्यात एका ट्रिप ला गेलो होतो तेव्हा समुद्रातून एका छोट्या होडी मधून जाताना कॅमरा वर सॉल्ट वॉटर पडले.
मी लगेच कॅमरा पुसून साफ केला but damage was done.
आता कॅमरा चा डिसप्ले चालू होत नाहीये आणि खर्रखर्र आवाज येतोय जेव्हा मी कॅमरा on करतो.
त्यातल्या त्यात एक गोष्टा चांगली की लेन्स शाबूत आहे अजून.
मी २ दिवसा पासून कॅमरा ला तांदळात ठेवला आहे, पण माहित नाही की किती effective असेल हा उपाय.
कोणी काही मदत करू शकता का ह्या प्रॉब्लेम वर?
पुण्यात कोणी कॅमरा repair करणारा चांगला कॉंटॅक्ट देऊ शकता का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर..
स्वानुभवारून सांगतोय.. damage is done and such damages are beyond repair.तुमचा लेन्स चांगलाय म्हणताय तर कदचित repairing चा उपयोग होउ शकेल पण picture quality will never be the same.माझा सोनि चा कॅमेरा असाच समुद्रात पडून खराब झाला होत्ता. repair चा उपयोग झाला नाही.
तुम्ही Pentax च्याच सर्विस center ला विचारा. मुंबैत असाल तर Lamington road वर try करुन बघा.
शुभेच्छा !!

माझा ही कॅनन चा समुद्रात पडुन खराब झाला तो झालाच.. सर्विस center ने दुरुस्तीचा खर्च कॅ.च्या किमतीपेक्षा जास्त सांगितला , आता भाचा खेळायला वापरतो तो....

खार्‍या पाण्याने इलेक्ट्रॉनिक वस्तु खराब झाल्या तर त्या नीट होण्याची शक्यता अगदीच कमी असते. ऑथराईज्ड सर्विस सेंटर मधेच न्या आणि बघा.

खारे पाणी पडल्यावर / कॅमेरा समुदातच पडल्यावर तो तसाच वाळू न देता, आधी बॅटरी काढावी. बॅटरी कंपार्टमेंट पुन्हा बंद करुन साध्या पाण्याने खार्‍या पाण्यात बुडालेला भाग धुवावा. कॅमेर्‍याला लागलेले खारे पाणी गेले पाहिजे. मग तो कॅमेरा पूर्ण वाळवावा आणि सर्विस सेंटर मधे न्यावा. एका दिवसात बहुधा वाळणार नाही. बॅटरी घालायची घाई अजिबातच करु नये.

धन्यवाद मंडळी..
आत्ता जे करतोय तेच थोडे दिवस अजून try करतो.
मी लंडन ला राहतो आणि इकडे Pentax ची सर्विसिंग खूपच महाग आहे, म्हणून दिवाळी मधे पुण्यात आल्यावर टाकणार होतो सर्विसिंग ला.
पुण्यात आहे का कोणी चांगला कॅमरा repair करणारा?