कृपया जाणकारांनी मदत करा

Submitted by प्राप्ती on 13 September, 2013 - 05:42

आम्ही काही दिवसांआधी नव्या घरी राहायला आलो. नव्या नवलाईचे दिवस सुरु असतांना फारश्या ध्यानात न आलेल्या गोष्टी आताशा लक्षात येऊ लागल्या आहेत. मी या अडचणी इथे मांडते आहे. इथून जाणकारांकडून मिळालेल्या माहितीतून मला या सर्व अडचणींवर मार्ग काढायला मदत होईल अशी अपेक्षा आहे,

तर अडचणी अश्या आहेत :-

१. आमच्या या एरियात कचरा उचलायला गाडी चार-पाच दिवसातून एकदा येते त्यातही सुट्ट्या असतील तर पाच दिवसाचे सहा दिवस देखील होतात, गाडी पहाटे येत असल्याने कधी येते अन कधी निघून जाते कळत देखील नाही. आपण एकदा कचरा टाकायला चुकलो कि पाच दिवसांपासून वाट बघत असलेला कचरा हिरमुसून परत पुढल्या पाच दिवसांची वाट बघत बसतो बिचारा.

संपूर्ण एरियात कचरा कुंडी नाही त्यामुळे मग मधेच कुठेतरी रिकाम्या प्लॉट वर कचरा फेकला जातो कारण तिथे टोकायला कुणी राहत नाही.

कचरेवाल्याने निदान एक दिवसा आड यावे, विशिष्ट जागेवर कचरा कुंड्या ठेवाव्यात यासाठी कुठे अर्ज करावा आणि त्याचे नियम काय आहेत हे जाणून घ्यायचे आहे.

२. आमच्या या भागात स्ट्रीट लाईट नाहीयेत त्यामुळे रात्री उशीरा येणार्यांना त्रास होतो आणि अंधार असल्याने चोरी, चेनस्नेचींग या सर्व गोष्टींची भीती वाटत राहते.

स्ट्रीट लाईट एरियात लावून घेण्यासाठी कुणाकडे अर्ज करावा लागेल आणि त्याचे नियम काय ?

इथे एक कमाल वाटते लोक खूप श्रीमंत आणि शिकलेले आहेत पण कुणातही अवेअरनेस नाहीये अजून. त्यांना त्यांचे हक्क माहिती नाही त्यासाठी करावयाचे प्रयत्न करण्याची उत्सुकता नाही किंवा गरजाही वाटत नाही. चाललय तस चालू दे किंवा मीच का करायचं अशी प्रवृत्ती. या सर्वांचा पाठींबा कितीसा मिळेल माहिती नाही पण प्रयत्न करणे गरजेचे आहे.

या निमित्त्याने प्रत्येकाला माहिती असावेच असे अधिकार त्यांचे कर्तव्य आणि त्यासाठी कोणते आणि कसे प्रयत्न करावे याबद्दलची माहिती जाणकारांनी द्यावी हि विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण राहता कुठे? तेच नेमकं लिहीलं नाहीये.

ही सर्व कामं वॉर्ड ऑफिसमधे होतात. नगरसेवकाला गाठा.

नगरपालिका/महानगरपालिका/ग्रामपंचायत (बांधकाम विभाग्)यापैकी ज्या कुण्याच्या एरियात आपले घर येते तिथे जाउन चौकशी करावी. जर टाउनशीप आसेल तर बिल्डरकडे चौकशी करावी (रस्ते, लाइट इ.)

तन्मय कानिटकर यांच्या http://tanmaykanitkar.blogspot.com/ या ब्लॉगवरील
लोकसहभाग आणि मोहल्ला कमिट्या हा लेख यासंदर्भात थोडीफार माहिती देणारा आहे.
हा ब्लॉग मला आवडतो. ब्लॉगवरचे लेख वाचण्यासारखे आहेत.
मी ब्लॉग लिहिणार्‍या व्यक्तिला व्यक्तिशः ओळखत नाही. पण तुम्ही त्यांना संपर्क केल्यास तुम्हाला तुमच्या दोन समस्यांबाबत हवी असणारी माहिती ते देऊ शकतील असं वाटतं.

हा त्यांचा संपर्क,
http://tanmaykanitkar.blogspot.com/p/contact.html

अहो मामी, उसगावी जा काय? आमच्याकडेही आठवड्यातून दोनदाच कचरा उचलतात. त्यात येण्याची वेळ पक्की नाही. आपण कचरा ठेवायला आळस केला तर उसगावातला कचराही हिरमुसून बसतो बिनमध्ये. नॅशनल हॉलिडे आला की कचरा त्या ठरलेल्या दिवशी उचलला जात नाही. तसंच इथे सगळ्या रस्त्यावर लाईट आहेत असं नाही.

अ‍ॅक्च्युअली, उसगावात कचरा(सुद्धा) हिरमुसत नाही. म्हणजे, थंड आणि कोरडी हवा ना, त्यामुळे कधीही बघा - टवटवीत! Proud

उसगावात नको. अशा माणसांची भारतालाच जास्त गरज आहे. :p

अशा = हक्क, कर्तव्य जाणीव, सार्वजनिक न समजता पुढाकार घेणे वगैरे.

(उगा जिथे तिथे वाकड्यात कशाला!)