भारतीय आहार : १८००/१५००/१२०० क्यालरीज तक्ता हवा आहे

Submitted by बन्या on 6 September, 2013 - 00:44

सध्या वजनाने ७५ किलो ची पातळी ओलांडली असून वजन वाढतच चालले आहे .
परवा सहज अंतर्जालावर मी किती क्यालरीज साधारण रोज खातो हे तपासून बघत असताना धक्काच बसला
रोज जवळपास ४००० क्यालरीज मी द्बवतोय Sad
शिवाय बसून काम ... वजन वाढेल नायतर काय

मला साधारण आहार निम्म्यावर आणायचा आहे, घाई नाही फटफट वजन कमी नाही झाले तरी हरकत नाही

कोणी १८०० /१५००//१२०० क्यालरीज चा भारतीय आहाराचा तक्ता देऊ शकेल काय ?
नेट वर सर्च केले , बरेच प्लान्स आहेत , पण सगळे परदेशी पदार्थ .

मला आपला देसी प्लान हवाय
मी पूर्ण शाकाहारी आहे

वजन कमी कसे करायचे हा थ्रेड वाचतोच आहे
पण त्यात ह्या संबंधी माहिती दिसली नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या डाएटीशियनने २ वर्षांपूर्वी १८०० कॅलरीजचा प्लान दिला होता. शोधून टाकते संध्याकाळपर्यंत.

परवा सहज अंतर्जालावर मी किती क्यालरीज साधारण रोज खातो हे तपासून बघत असताना धक्काच बसला
रोज जवळपास ४००० क्यालरीज मी द्बवतो>>> हे कोणत्या कॅलरी काउंटर /ट्रॅकरने चेक केलं. अगदी आटोकाट कॅलरीज मोजल्या की अंदाजपंचे?
मी दोन महिन्यांपूर्वी लिव्हस्ट्राँगच्या ट्रॅकरवर आठवडाभर माझा आहार मॉनीटर करते होते. खूप अ‍ॅक्युरेट नाही मोजलं मी, पण तरी १८०० चं टारगेट कसंबसं पूर्ण व्हायचं माझं. Happy

सेम , मी पण तीच साईट वापरली होती Happy

अंदाजपंचे मोजल्या . पोळ्यांचे प्रमाण कमी करावे लागेल बहुतेक
बाहेरचे खाणेही खूप होते , तेही डेरी प्रोडक्ट्स. चीज पनीर च्या भाज्या

Sad

हळू हळू प्रमाण कमी करत आणायचे आहे
तुम्हाला १८०० चा अनुभव कसा होता?

१८०० चं टारगेट कसंबसं पूर्ण व्हायचं म्हणजे माझ्या १५०० ते १८५० च्या आसपास कॅलरीज व्हायच्या. त्याच्यावर कधीच गेल्या नाहीत. हे करत असताना माझ्या आहारात खूप काही बदलही नव्हते केलेले मी.
साधारणतः आहाराची आउटलाइन सांगते -
सकाळी उठल्याबरोबर ६ वाजता ३-४ मनूका, १ अंजीर आणि ४-५ बदाम भिजवलेले.
त्यानंतर ७.३०-८ वाजता - अर्धा ग्लास ज्युस किंवा दुध
९-९.३० ला १-२ फुलका, भाजी, अर्धी वाटी दही / एक ऑम्लेट आणि फुलका/ दुध - म्युसेली आणि नंतर लगेच अर्धा कप कमी साखरेची कॉफी.
१२ च्या आसपास - एखादं फळ /किंवा काकडी-गाजर
२-२.१५ ला जेवण - दोन फुलके, वाटीभर भाजी, कोशिंबीर /सलाड /रायतं, दही/डाळ्/ताक.
६ वाजता - अर्धा कप कॉफी आणि त्याबरोबर कधी बिस्किट /मठ्ठी, कधी खाकरा तर कधी फ्रेश नाश्ता / स्वीट कॉर्न्स, मोड आलेलं कडधान्य - फळं चाट मसाला घालून (जे घरात अ‍ॅव्हलेबल असेल ते)
रात्री ८ वाजता २-२.५ फुलके, वाटीभर डाळ, भाजी, सलाड, थोडा भात.
रात्री झोपताना अर्धा-पाऊण कप दुध.

भाज्या कमी तेलातल्या, फुलक्यांना तुप नाही. वरून पण क्वचीत कधीतरी तुप (साधं वरण किंवा वरणफळं असतिल तर), साध्या ब्रेड ऐवजी ब्राउन ब्रेड, बाहेरचं खाणं ८-१० दिवसातून एकदा.मधून अधून गोड /मिठाई /चॉकलेटचा तुकडा /आंबा/ आईसक्रीम हे पण खाल्लं जायचं.

चीझ /पनीर पण खायचे पण आठवड्यातून एखाद्या वेळीच,