मुंबईमध्ये झुंबर, गालिचे, पेन्टिग्स कुठे मिळतील?

Submitted by राहुल१२३ on 2 September, 2013 - 06:34

घर सुशोभित करण्यासाठी हॉलमध्ये लावयचे झुंबर, गालिचा, फुलदाण्या, कृत्रिम फुले, चित्रे(पेन्टिग्स) अश्या गोष्टी स्वस्त आणि मस्त असे मुंबईमध्ये कुठे मिळतील?

खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? काही टिप्स?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रॉफर्ड मार्केट, चोर बाझार अशा ठिकाणी. पण सोबत जाताना कुणीतरी ओळखीचा माहिती असलेला माणूस घेऊन जा. जबरदस्त बार्गेनिंग करावे लागेल.

पेन्टिंग्ज जर खरी (म्हणज्वे स्वतः काढलेली वगैरे) हवी असतील तर जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थ्यांशी संपर्क साधा, ते स्वस्त आणि मस्त चित्रे विकत असतात.

पेन्टिंग्ज जर खरी (म्हणज्वे स्वतः काढलेली वगैरे) हवी असतील तर जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थ्यांशी संपर्क साधा, ते स्वस्त आणि मस्त चित्रे विकत असतात. >>> +१
प्रिंट्स घेण्यापेक्षा जेजेच्या विद्यार्थ्यांची ओरिजिनल चित्रं विकत घेणं चांगलं.

जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थ्यांशी संपर्क साधा <<< त्यांची काही वेबगॅलरी/ब्लॉग वगैरे असतात का?

तत्पर प्रतिसादांबद्दल खुप धन्स!!

गजानन, मलाही तेच विचारायचे होते.

बोरीवलीला झुंबराचे भाव काहीही अफाट सांगत होते (१००००+), म्हणून हा प्रपंच.

वरील खरेदीसाठी क्रॉफर्ड मार्केट बेस्ट. निम्मा भाव बोला सरळ. क्रॉमाला जायच्या आधी बाहेरही किंमती विचारुन घ्या म्हणजे अंदाज येईल कितीपर्यंत खाली आणायच्या किंमती त्याचा.

येथे 'कविन' आयडी आहे. तिला संपर्क करुन बघा चित्रांसाठी. तिचा भाऊ आर्टिस्ट आहे. तसेच 'पाटिल' आयडीशीही बोलुन घ्या. तो स्वतः आर्टिस्ट आहे. 'नीलू' आयडीलाही विचारा.

निम्मा भाव बोला सरळ>> गेले ते जुने दिवस.. आता ते अगोदरच डब्बल भाव सांगतात.. माहितीतला माणूस घेऊन जा आणी जे बघितलं तेच दिले की नाही ते बघा.. त्यांनी १००० रु सांगित्ले तर ते १०० रु ला सुध्दा विकतील...