जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

Submitted by अभय आर्वीकर on 27 August, 2013 - 07:56

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

              या आधीच्या लेखांकामध्ये मी साप-विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचारपद्धती कशी असते, या विषयी लिहिले. ह्या उपचारपद्धती जश्या आहे तशाच स्वरूपात पिढोनपिढ्या चालत आल्या असाव्यात. उपचार करणार्‍या व्यक्ती स्वतः प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या नसल्याने व रोगी त्याचे म्हणणे ऐकत नसल्याने त्याने "हे मी करत नाही, माझ्या हातून देव करून घेतो" अशी भूमिका घेऊन उपचाराच्या सोबतीला पुजा-अर्चा करण्याचा देखावा निर्माण केला असावा. रोग्याची श्रद्धा देवावर असल्याने रोग्याला मानसिक बळ यातून आपोआपच मिळून उपचार अधिक प्रभावी होण्यास नक्कीच मदत झाली असावी.

              हे पारंपरिक उपचार आहेत. त्यात बदलत्या काळानुरूप संशोधन झालेले नाही. प्रयोगशीलता नसल्याने हे शास्त्र अविकसित राहिले. जे शास्त्र काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, ते फार काळ स्वतःचे उपयोगमुल्य शाबूत राखू शकत नाही. आज अ‍ॅलोपॅथीच्या तुलनेने पारंपरिक उपचार शास्त्र मागे पडले किंवा प्रभावहीन झाले, त्याचे प्रयोगशीलता नसणे, हेच प्रमुख कारण आहे. साप चावला तर पारंपरिक उपचार पद्धतीचा उपयोग करणे धोकादायक आहेच, मात्र याचा अर्थ असाही नाही की सर्पदंशावर वैद्यकियशास्त्र फारच प्रभावी आहे. साप चावलेला रोगी ताबडतोब दाखल होऊन वेळेच्या आत उपचार सुरू झाले नाहीत तर रोग्याला हमखास वाचवू शकेल असे औषध आधुनिक वैद्यकशास्त्राकडे नाही. येथे औषधीपेक्षा आणि उपचारपद्धतीपेक्षा रोगी वेळेच्या आत उपचारस्थळी दाखल होणे, हेच सर्वाधिक महत्त्वाचे असते हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. सर्पदंश झाला तर उपलब्ध सर्व पर्यायांमध्ये वैद्यकीय उपचार हाच एकमेव पर्याय परिणामकारक आहे, यात दुमत नाही. आधुनिक वैद्यकियशास्त्र आता सर्वमान्य झालेले आहे पण सर्पदंश झाला तर इस्पितळात पोहचण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर तेथे जो कोणता पर्याय उपलब्ध असेल तो स्वीकारणे रोग्याची अपरिहार्यता असते, हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे वैद्यकियशास्त्र वगळता अन्य पारंपरिक उपचार करून घेण्याचे व्यक्तीचे पर्यायस्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. या कलमामुळे विनामूल्य पारंपरिक उपचार करणार्‍यांमध्ये भितीचे वातावरण तयार होईल आणि काळाच्या ओघात ही पारंपरिक उपचार पद्धती नामशेष होईल. सरकार जर जनतेला आहे त्यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर उपलब्ध असलेला पर्याय हिसकावून घेण्याचा हक्क सरकारला असूच नये आणि तो जनतेने मान्य करू नये. 

हास्यास्पद कलम : जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." येथे "यासारखे उपचार करणे" हा शब्द फारच संभ्रम निर्माण करणारा आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार वगळता अन्य सर्व उपचार कायद्याने बेकायदेशीर ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. कुणी कितीही म्हणोत की हा कायदा केवळ बळजबरीने अघोरी उपचार करणार्‍या मांत्रिकासाठी आहे, तर त्यात अजिबात तथ्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. या कलमाच्या संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की, "घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून" हे शब्द निव्वळ कुचकामी आहेत, कारण कोणताही मांत्रिक हातात तलवार, कट्यार, बिचवा, चाकूसारखे धारदार शस्त्र किंवा AK-47 अथवा स्टेनगनचा धाक दाखवून ज्याला दंश झाला आहे त्याव्यक्तीस बळजबरीने अडवून (बलात्कार करावा तसा) मंत्रतंत्र, गंडेदोरेचा उपचार करणार नाही तोपर्यंत "रोखणे/प्रतिबंध करणे" या सारखे कलमच लागू पडणार नाही, त्याअर्थी या कायद्यातले हे कलम हास्यास्पदच म्हणावे लागेल. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदा अपराध्यास शिक्षा करत नाही, न्यायाधीश करत असते. शिक्षा न्यायाधीशाच्या स्वमर्जीने ठरत नसते, तर ते वकिलांच्या ऑर्ग्यूमेंटवर ठरत असते. कायदा किंवा कायद्याचे कलम अस्पष्ट किंवा संदिग्ध असेल तर न्यायप्रक्रियेत जो वकील अधिक चांगल्यातर्‍हेने युक्तिवाद करेल त्याच्या पक्षाने न्याय झुकण्याची शक्यता असते. कायदा किंवा कायद्याच्या कलमाच्या अस्पष्ट किंवा संदिग्धपणामुळेच निष्णात वकील न्याय आपल्या बाजूने झुकवून घेण्यास यशस्वी ठरत असतो. 

उपद्रवी कलम : या कलमान्वये कायदेशीर कारवाई करूनही पुरावे गोळा करणे अशक्य आहे असे पोलिस खात्याला वाटले आणि कायदेशीर कारवाई करूनही पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयात खटला दाखल करणे उपयोगशून्य आहे अशी खात्री झाली तर लाचलुचपत घेऊन तिकडेच निपटारा केला जाईल. त्यामुळे पोलिस खात्याचा अशा केसेसमध्ये उपद्रव वाढीस लागेल.

सूडबुद्धीने वागणारे कलम :  कलम ११ (क) बघा "स्वतःत विशेष शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वतःत पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे"

या तर्‍हेची वर्तणूक करणार्‍याला शिक्षेची कायद्यात तरतूद असणे समर्थनीयच आहे पण;

- तुला माझ्या संस्थेत नोकरी देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी संस्थाचालक लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून शिक्षणमहर्षी घोषित करायचे? 

- एखादा राजकीय नेता तुला निवडणुकीचे तिकीट देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी तो राजकीय पुढारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून मंत्रिपद देऊन त्याचे हात अधिक मजबूत करायचे? 

- एखादा प्रशासकीय कर्मचारी तुझे काम करून देतो असे सांगून, जर एखाद्या गरजू स्त्री सोबत तो कर्मचारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून राष्ट्रपतिपदक देऊन त्याचे सत्कार करायचे? 

              गुन्हा जर समान असेल तर असा गुन्हा करणार्‍यापैकी निवडून एखाद्याला शिक्षा देणारा कायदा बनविणे, हे "समान न्याय तत्त्वाला" छेद देणारे ठरते. अशा स्वरूपाच्या कायदा निर्मितीमुळे कायदा आपल्याशी समान न्यायाने नव्हे तर सूडबुद्धीने वागतो, अशी भावना काही निवडक जनवर्गाच्या मनात उत्पन्न होऊन त्यांचा कायद्यावरचा विश्वास उडून कायद्याबद्दल चीड आणि द्वेष उत्पन्न होऊ शकते. हा फार गंभीर धोका आहे.

अव्यवहार्य कलम 

माझा या कायद्याच्या कलम नऊला विरोध आहे कारण;

१) त्यामुळे उपचार निवडीचे स्वातंत्र्य धोक्यात येते.

२) रोग्याने उपचार पद्धती कोणती निवडावी, हा प्रबोधनाचा विषय आहे, सक्तीचा नाही.

३) या कलमामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन पारंपरिक उपचारपद्धतीचे अस्तित्व धोक्यात येईल.

४) हे कलम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश जनहिताचा नसून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा आहे.

              हा कायदा केवळ शहरी किंवा जेथे वैद्यकीयसेवा सहज उपलब्ध आहे अशा शहराच्या आसपासच्याच जनतेसाठीच लागू नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर जनसंख्या ग्रामीण भागात राहते. तेथे अजून पिण्याचे पिण्यायोग्य पाणीसुद्धा पोचलेले नाही. काही गावात रस्तेच नाहीत. अनेक दुर्गम भाग असे आहेत की, जेथे बारमाही संचार सुविधा उपलब्ध नाही. पावसाळा सुरू झाला की काही गावात पायदळ चालत जाणे ही एकमेव संचार सुविधा उपलब्ध असते. पुर आला की काही गावांचा अन्य गावांशी आणि शहरांशी संपर्क तुटून जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर असे दिसेल की शेतात जायला पक्के रस्ते नाहीत. केवळ पांधनरस्ते, शीवरस्ते किंवा पायवाटाच आहेत. पावसाळाभर चप्पल नावाची वहाण जेथे चालत नाही तेथे अन्य वाहने चालण्याचा प्रश्नच येत नाही. गावाकडून शहराकडे जायला शेतक्र्‍यांजवळ स्वतःचे वाहन नाही. बर्‍याच गावांना अजून एसटीचे दर्शन झालेले नाही. ज्या गावात एस टी जाते तेथे एक किंवा दोनच टायमिंग आहेत. आपण २०१३ मध्ये जगत असलो तरी खेड्यातील रोग्यास घ्यायला अ‍ॅम्बुलन्स येणे, ही सुविधासंस्कृतीच अजून जन्माला यायची आहे.

              सर्पदंश झालेल्या व्यक्तीस अत्यंत तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. अनेक गावांची स्थिती अशी की, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात पोचवायला किमान ४-५ तास लागू शकतात. समजा जेथे सर्पदंशावर वैद्यकसेवा उपलब्ध आहे अशा आरोग्य केंद्रापासून ७०-८० किलोमीटर दूर असलेल्या खेडेगावात श्याम नावाच्या व्यक्तीला गावापासून ३-४ किलोमीटर अंतरावरील शेतात सर्पदंश झाला तर दवाखान्यात न्यायचे वाहन उपलब्ध होईपर्यंत श्यामने किंवा त्याच्या नातेवाइकाने काय करायचे? जर वैद्यकीय उपचार उपलब्धच नसेल तर अन्य पर्यायी उपचार नाही करायचे? देवाचा धावा केल्याने मरणारा माणूस वाचत नाही, हे माहीत आहे म्हणून "देवा वाचव" असा धावा करण्यास मनाई करायची? पारंपरिक उपचार करायचेच नाहीत? 

              चावा घेण्यासाठी साप माणसावर चाल करून बाहेर मोकळ्या जागेत येत नसतो. झुडुपात, जमिनीच्या भेगांत, कचरा टोपलीत, कचर्‍याच्या ढिगात किंवा एखाद्या वस्तूच्या खाली बुडाशी बसलेला असतो. माणसाच्या ज्या भागाचा स्पर्श त्याला होईल त्या भागाला तो चावा घेत असतो. कधी कधी तो दिसतच नाही. अंधार असेल तर अजिबातच दिसत नाही. अशावेळी साप विषारी की अविषारी हा मुद्दाच गौण असतो. साप विषारी असेल तरीही त्याने किती मात्रेत विष शरीरात टाकले, हे कसे ठरवणार? सापाचे वजन, दंश झालेल्या व्यक्तीचे वजन यावर सुद्धा बरेच अवलंबून असते. अशावेळी दंश झालेल्या व्यक्तीस मानसिक आधार दिला तर तो कदाचित वाचेल सुद्धा. आमच्या भागात डोम्या नाग व गव्हाळ्या नाग प्रसिद्ध आहेत. हे साप चावले तर माणसाला "पाणी सुद्धा मागू देत नाही" अशी म्हण आहे. या प्रजातीचा मोठ्या आकाराचा साप चावला तर दोन तासात सर्वकाही संपून जाऊ शकते. वैद्यकीय सेवा उपलब्ध होईपर्यंत जर त्याच्यावर पारंपरिक उपचार केले तर कदाचित हा काळ आणखी वाढण्यास मदत होऊ शकते. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन झाले पाहिजे म्हणून काय अशा प्रसंगी हातावर हात ठेवून बसायचे? वेळेच्या आत वैद्यकीय सेवा जर उपलब्ध झालीच नाही तर डोक्यावर हात ठेवून त्याला मरताना उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे? 

              अनेकजण यावर युक्तिवाद करतात की, पारंपरिक उपचारांना बंदी घातलेली नाही. पण माझ्या मते ही बंदीच आहे. समजा श्यामवर पारंपरिक उपचार सुरू केले आणि श्याम दगावला. त्याला दोन मुले आहेत एक पुण्याला आणि एक मुंबईला. ते दोघेही येणार पण तो पर्यंत बाप मेला असणार. या मुलांनी जर का बापाच्या मृत्यूपश्चात ठाण्यात तक्रार नोंदवली की, माझ्या बापावर मांत्रिकाने जबरदस्ती करून उपचार केले तर पुढे काय होईल कल्पना करा. शिवाय प्रत्येक गावात गटबाजी असते. ते अशावेळी एकमेकावर सूड उगवू शकतात. सत्ताधारी पक्ष गैरफायदा घेऊ शकतो.

              वास्तवाची एवढीशी जाणीव नसणे हा दुर्गम भागातील ग्रामीण लोकजीवनाशी राज्यकर्त्यांची नाळ तुटली असल्याचा पुरावा आहे. राजकारणाबाहेरील व्यक्तींना समाजसुधारणा करायची असेल तर त्यांनी प्रबोधन करावे, सक्ती करणे म्हणजे विचारसामर्थ्याचा पराभव मान्य करण्यासारखे आहे. सामाजिक सुधारणांच्या अनुषंगाने विचार केला तर ज्यांना स्वतःच्याच विचारावर भरवसा नाही तेच सक्तीची भाषा वापरत असतात, असेही म्हणता येईल. 

सरकारला जर खरेच अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असेल आणि सर्पदंशामुळे होणारे मृत्यू थांबवायचे असतील तर;

१) प्रत्येक गावात पक्का रस्ता तयार करावा.

२) प्रत्येक गावात अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी.

३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास हजर राहण्याची सक्ती करावी.

४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.)

कायदाच करायचा असेल तर असा करावा;

"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."

              या तर्‍हेचा कायदा जर अस्तित्वात आला आणि लागू झाला तर पुरोगामी महाराष्ट्रातील बर्‍याचशा अंधश्रद्धा संपुष्टात येतील. डॉक्टर नेमणुकीच्या प्रक्रियेत अंधश्रद्धा निर्मूलनाला स्वेच्छेने उत्सुक आणि कटिबद्ध असलेल्या डॉक्टर मंडळींना प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम आणखी गतिमान करता येईल.

                                                                                                                           - गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ वत्सला, @ डेलिया

मी विरोध अंधश्रद्धा निर्मुलनाला नव्हे तर कायद्याच्या कलमाला करत आहे. तुम्ही ज्या आशेने या कायद्याचे समर्थन करता आहात प्रत्यक्ष तसेही या कायद्यात काहीच नाही आहे.

उगीच भ्रमात राहू नका. हा कायदा लवकरच सर्वांचा भ्रमनिरास करेल.

@ डेलिया, तुम्ही दिलेल्या लिंकवरील दोषीला शिक्षा देण्यास पूर्वीचाच कायदा सक्षम आहे. हा कायदा या घटनेच्या बाबतीतही निरुपयोगी सिद्ध होईल.

कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यावर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार केले, असे एखादे उदाहरण कुणाच्या पाहण्यात आहे काय?

असल्यास कृपया प्रतिसादात तपशीलवार लिहावे, ही विनंती.

१) त्यामुळे उपचार निवडीचे स्वातंत्र्य धोक्यात येते.
२) रोग्याने उपचार पद्धती कोणती निवडावी, हा प्रबोधनाचा विषय आहे, सक्तीचा नाही.
३) या कलमामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन पारंपरिक उपचारपद्धतीचे अस्तित्व धोक्यात येईल.

हे तीनही मुद्दे अप्रत्यक्षपणे असे सुचवतात की मंत्रतंत्र, गंडेदोरे ही वैद्यकीय उपचारांसाठी एक पर्यायी (किंवा पारंपारिक) उपचारपद्धती आहे. हे निखालस असत्य असल्याने मी याचा निषेध करतो. ज्या कथित उपचारांवर लेखकाचासुद्धा विश्वास नाही, त्यांना पर्यायाचा दर्जा देणे विसंगत आहे.

४) हे कलम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश जनहिताचा नसून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा आहे

Biggrin

बाकीच्या विनोदी विधानांची दखल घेण्याचा मूड नाही. पण एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो.

इथे प्रकाश घाटपांडेंसारख्या अनेक ज्येष्ठ, विद्वान सदस्यांना असे वाटते की मुटे या कायद्यातील याच कलमाला, कदाचित गैरसमजातून विरोध करत आहेत. मात्र त्यांचे कार्य वा हेतू याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.
इथे नरेन्द्र दाभोळकरांच्या हत्येच्या धाग्यावर मुटेंनी "हत्या झाली ते वाईट, पण माझा त्या कायद्याला विरोध होता आणि राहील" अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांना या कायद्यातील कलमेही ज्ञात नव्हती. मग त्यांनी (आणि इतरांनी) 'कलमे कुठे आहेत' चा धोशा लावला. त्यांना कुणीतरी कलमे आणून दिली. मग ती वाचून , त्यापैकी कुठल्या कलमाला विरोध करावा हे मुटेंना ठरवता आले, आणि ही लेखमाला तयार झाली. म्हणजे विरोध करायचा हे ठरले होते, मुद्दे नंतर मिळाले. थोडा शोध घेतला आणि मुटेंच्या माबोवरच्या गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादांची टाईमलाईन तपासली, तर हे कुणालाही सहज लक्षात येईल.
तात्पर्य हेच, की हे कलम क्रमांक नऊ कायद्यात नसते, तरीही मुटेंनी दुसर्‍या कुठल्यातरी मुद्द्याचे शेपूट पकडून, शेतकरीहिताचा बादरायण संबंध लावत या कायद्याला विरोध केलाच असता. त्यांच्या कन्विक्शनबद्दल अनेकांना असलेला विश्वास हा असा अनाठायी आहे.

मुटेसाहेब, हा लेख अचूक मुद्यांना स्पर्ष करणारा आहे.
शिवाय या विश्लेषणाचे नीट आकलन केले तर कळू शकेल की मूळात जे लोक हिंदूंचे देवच मानित नाहीत, किंवा देव मानणे वगैरे हिंदूंचा श्रद्धाभाव हीच अंधश्रद्धा असे मानतात, त्यांचा मूळ हेतू काही वेगळाच आहे.

तुम्ही मांडलेल्या वरील प्रत्येक मुद्यास समर्थन, अन इतक्या चिकाटीने, विचित्र टिकाटिप्पणीनंतरही व द्वेष-निंदा-नालस्तीयुक्त वातावरणातही, मुद्देसूदपणे तुमचे मौलिक व अनुभवसिद्ध विचार मांडलेत त्याबद्दल धन्यवादही.

ज्यांचा या कायद्याला विरोध आहे त्यांनी आजारी पडल्यावर मरीआईला कोंबडं कापावं आणि लोकांच्या परोपकाराकरताच जन्म घेतलेल्या अशा कोणाही मांत्रिकानं दिलेला अंगारा दिवसातून तीनदा तीन तीन चिमटी असा पाण्यातून घ्यावा. पाणी निर्जंतूक नसेल तरी चालेल.

बाकीच्यांनी लबाड, स्वार्थी, लोकांकडून पैसे उकळणार्‍या, अज्ञानी डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.

---- हुकुमावरून.

जादूटोणा विरोधी कायद्याचा कोंबडी, बोकड, साप, विंचू, म्हशी, टिटव्या, घुबडे, गिधाडे, कावळे, चेटकीणी, जखीणी, काकिणी, डाकिणी, भानामत्या, चकवे, भुते, समंध, मुंजे, भगत, बाबा, महाराज, लिंबे, मिरच्या, काळ्या बाहुल्या, चपला, मोहरी व मीठ यांच्यातर्फे निषेध करण्यात येत आहे.

या सर्वांच्या जीवावर अथवा पोटावर हा नवा कायदा उठलेला आहे.

@ ज्ञानेश | 28 August, 2013 - 09:10

तुम्ही व्यक्तिगत पातळीवर उतरत आहात. हे मुद्दे आणि विचार संपल्याचे प्रारंभिक लक्षण आहे. तुम्हाला उत्तर देताना मलाही व्यक्तिगत पातळीवर उतरावे लागेल, म्हणून उत्तर देण्याचे टाळत आहे.

---------------------------
@ मामी | 28 August, 2013 - 09:51

तुमचा प्रतिसाद माझ्या लेखाशी मेळ अथवा भेळ खात नाही आहे.

तरी पण एक सांगतो. एका डॉक्टरच्या शिक्षणासाठी सरकार काही लाख रुपये खर्च करत असते. वैद्यकीय संशोधनासाठी काही कोटी रुपये खर्च करत असते. तो पैसा आमच्या श्रमातून आणि करातून गोळा होतो. त्यामुळे वैद्यकशास्त्र ही या विधेयकाला समर्थन करणार्‍यांचीच खाजगी मालमत्ता आहे, अशी आधुनिक वेलक्वालिफाईड अंधश्रद्धा समाजात पसरवणे गैर आहे. Happy

एका डॉक्टरच्या शिक्षणासाठी सरकार काही लाख रुपये खर्च करत असते. तो पैसा आमच्या श्रमातून आणि करातून गोळा होतो. त्यामुळे वैद्यकशास्त्र ही या विधेयला समर्थन करणार्‍यांचीच खाजगी मालमत्ता आहे, अशी आधुनिक वेलक्वालिफाईड अंधश्रद्धा समाजात पसरवू नका<<<< आं???? डॉक्टर मेडीकल शिक्षणासाठी फी भरत नाहीत???? फुकट शिकतात????? आधी माहिती असतं तर आम्ही पण डॉक्टर झालो असतो की....

मुटेसाहेब, जरा ज्ञान वाढवा.

कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यावर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार केले, असे एखादे उदाहरण कुणाच्या पाहण्यात आहे काय?

असल्यास कृपया प्रतिसादात तपशीलवार लिहावे, ही विनंती.

दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंडीखुर्द या गावातील ही घटना आहे. महादेव पिलणकर याला अंथरूणात साप चावला. रत्नागिरीमधे सर्पदंश बर्‍ञापैकी कॉमन असल्याने सिव्हील हॉस्पिटलमधे नेल्यास त्याचे प्राण वाचू शकले असते. मात्र, घरच्यांनी त्याला काजरघाटीमधील एका भगताकडे न्यायचे ठरवले. त्याचे कारण सिव्हीलपेक्षा काजरघाटीला लवकर पोचता येइल असे अजब तर्कशास्त्र होते. शिवाय डॉक्टरपेक्षा भगत भारी पावरफुल असल्याचा दावा तिथे कुणीतरी केलाच होता... तिथे गेल्यावर त्याचा जीव दोन तासांनी गेलाच. चावलेला साप विषारी नसून (धामण) हार्ट अ‍ॅटॅकने त्याला मृत्यू आल्याने पोस्ट मार्टममधे स्पष्ट झाले. या घटनेनंतर ग्रामपंचायतीने गावामधे प्रशिक्षण शिबीर भरवून गावातील लोकांना साप चावल्यास काय करावे याचे मार्गदर्शन दिले. तसेच, गावामधील काही मुलांनी स्वतःहून याबद्दल शिक्षण घेऊन "सर्पमित्र" म्हणून काम करत आहेत (अर्थात फुकट). गावात कुठेही साप आल्यास या सर्पमित्रांना फोन केल्यास त्यापैकी जो जवळ असेल तो येऊन साप पकडून घेऊन जातो. साप विषारी नसल्यास त्याला जंगलामधे पुन्हा सोडले जाते.

काजरघाटीतील भगत अद्याप साप उतरवण्याचे दावे करतोच आहे हे इथे नमूद करते. वरील घटनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास महिन्याभराने गावावरून येताना वर्तमानप्प्त्रातील कात्रणे व इतर संबंधित व्यक्तींचे फोन नंबर देऊ शकेन. याहून जास्त तपशीलात जायचे असल्यास काजरघाटीचा व्यवस्थित पत्ता देऊ शकेन. तिथे जाऊन आपण खातरजमा करू शकता. या व्यक्तीच्या प्रेतयात्रेला मी हजर होते. आणि स्थानिक वर्तमानपत्रासाठी ही बातमी कव्हर केली होती. धन्यवाद.

(वरील पोस्टमधे कुठेही "मला असे वाटते", "असे म्हणतात", "असे असावे", "कदाचित", "बहुतेक" हे व अशा अर्थाचा एकही शब्द नाही. याची कृपया नोंद घ्यावी.)

एका डॉक्टरच्या शिक्षणासाठी सरकार काही लाख रुपये खर्च करत असते. तो पैसा आमच्या श्रमातून आणि करातून गोळा होतो.
<<
गलत जवाब मुटेजी.
हे कोणे एके काळी सत्य होते, आजकाल नाही.
आणि तुमच्या श्रमातून मला नाही वाटत सरकारला फद्याचा कर मिळत असेल. शेतकरी ना तुम्ही Wink

यामुळे वैद्यकशास्त्र ही या विधेयला समर्थन करणार्‍यांचीच खाजगी मालमत्ता आहे, अशी आधुनिक वेलक्वालिफाईड अंधश्रद्धा समाजात पसरवू नका
<<
वैद्यकशास्त्र ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. नो चान्स. शास्त्र आहे ते. लपवून ठेवत नसतात शास्त्र कधीच.
आधुनिक वैद्यक हे नवा शोध तात्काळ जगप्रसिद्ध करण्याचा पाठी असते. इतर 'शास्त्रां'सारखे वा तुमच्या भगतांसारखे 'रामबाण' उपाय लपवून ठेवत नाही.

पण,
तुमचा रोख पहाता वैद्यकशास्त्र नव्हे तर ह्या डॉक्टरांवर सरकारने खर्च केला म्हणून हे तुमचे वैयक्तिक गुलाम असायला हवेत अशी आयडीया दिसते. ते सदोष मनुष्यवध वगैरे वक्तव्य, हेच दाखवते. ह्याच न्यायाने सरकारी संस्थांतून (आयआयटी, आयआयएम सह) पास झालेले सगळेच तुमचे नोकर असायला हवेत.

हो ना?
एल. ओ. एल.

बरे, आता चेष्टा पुरे. किती त्या मुटेंना समजवायचे आपण प्रयत्न करायचे. काही लिमिट आहे की नाही??

पण या विधेयकाबद्दल माझ्याही मनात काही शंका आहेत. हे विधेयक लागू झाल्यावर माचुपिचूवरील आरती, किरमीजी रंगाच्या पेयाचा नैवेद्य, नीलगायी आणि हरीण यांची होणारी पूजा या सर्वांवर बंदी येइल का? अशी बंदी आली आणि या सर्वांअभावी २०१२ ला होणारी जगबुडी परत युटर्न मारून आली तर त्याला जबाबदार कोण असेल? त्या जगबुडीमधे जे एक टक्का लोक तरणार आहेत, ते तरल्यानंतर हे विधेयक परत चालू ठेवतील की नाही? २०२५ मधे येणार्‍या रामराज्यामधे या विधेयकाचा कितपत उपयोग होइल??? भूमिकाताई तेव्हा परत मायबोलीवर लिहू लागतील का??

@ इब्लिस | 28 August, 2013 - 11:27

कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यावर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार केले, असे एखादे उदाहरण कुणाच्या पाहण्यात आहे काय?

तुम्ही नक्की कायदा आणि जुने बील त्यात नविन केलेले बदल हे सर्व वाचले आहे का?
या कायद्याबद्दल ( जुने मुद्दे आणि मार्च मधे केलेले नविन मुद्दे ) अशी तुलना इथे वाचा.
http://www.legalserviceindia.com/articles/statl.htm
लाल रंगात "The schedule to the March Bill included:" असे लिहुन त्याखाली सगळे मुद्दे आहेत.

नंदिनी, हे विधेयक फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहे.
आपण खुशाल माचूपिचूवर आरती करू शकतो.
तसेच लिंबाजी म्हणतात त्याप्रमाणे माचूपिचूवरिल देव हा समस्त हिंदूंचा देव नसल्याने तुम्ही सहज हरणाचा नेवैद्य दाखवू शकता.
हरणे हवी असल्यास चिनूक्सला सांग.
माझ्याकडून घेऊन मायबोलीवर 'खरेदी' मध्ये ठेवणार आहे तो. Wink

@ राहुल१२३ | 28 August, 2013 - 11:38

अगदी बरोबर!! मला नाही वाटत की नोकरदार, मोजके व्यावसायिक व व्यापारी सोडून कोणी कर भरत असेल.

या देशातला प्रत्येक नागरीक कर भरत असतो. त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात.

नंदिनी यांच्या पोस्टमध्ये काही असंबद्ध असे मला तरी आढळले नाही.

डॉक्टरपेक्षा भगत भारी पावरफुल असल्याचा दावा तिथे कुणीतरी केलाच होता... तिथे गेल्यावर त्याचा जीव दोन तासांनी गेलाच.

हा कायदा उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून असे म्हणतो.
उगाच वेलक्वालिफाईड अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका.

गंगाधर मुटे | 28 August, 2013 - 11:32 नवीन

@ इब्लिस | 28 August, 2013 - 11:27
कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यावर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार केले, असे एखादे उदाहरण कुणाच्या पाहण्यात आहे काय?
<<<

मुटेबाबा,
केवळ सोयिस्कररित्या जिथे बगल देता येते तिथेच माझ्या प्रतिसादांना उत्तर येते आहे.
हे असे का बरे?

नंदिनी यांनी सांगितलेल्या उदाहरणातील महादेव पिलणकर याला दवाखान्यातच जायचे होते. ते लोकांनी मांत्रिकाकडे नेले, अन त्यांचा जीव गेला. हवे तर 'वर' फोन लावून बोलून घ्या.

-***-

साती, धन्यवाद. अन्यथा मी या अन्यायाविरूद्ध चार पाच किरमीजी रंगाचे पेय भरलेले ग्लास पिऊन पाच लेखांकाची मालिका लिहिणार होते. "टोण्याचे कायदे आणि आमच्या श्रद्धेवर पाय" (अद्याप श्रद्धेचा पाय प्लास्टरमधे आहेच). या मालिकेमधे मी हरणांच्या नैवेद्याचे १०१ फायदे आणि माचुपिचूवरील आरतीच्या रेझोनान्सने वाढलेली ७८६ टक्के पातळी यांचा तौअलनिक अभ्यास लिहिणार होते. माझे तेवढे कष्ट वाचवल्याबद्दल आभार.

हरणांच्या नैवेद्याचे १०१ फायदे
>>
ते १०१ चे १०८ करा हो. जरातरी सेक्युलर बना. काय उठसूट आपले लांगुलचालन Happy

माझ्याकडे 'रोखून किंवा प्रतिबंध करुन' अशी असंख्य उदाहरणे डीटेलवार आहेत मुटेजी.
पण ती कर्नाटकातली असल्याने इथे महाराष्ट्रात त्याचा फायद नाही.
इथे तुमची ही लेखमाला सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच मी वाहत्या पानांवर एक दोन उदाहरणे लिहिली होती. (ज्यापैकी एकाचा उल्लेख तुमच्या पहिल्या लेखांवरिल प्रतिसादात अल्पनाने केलाआहे.

@ इब्लिस | 28 August, 2013 - 11:49

मुटेबाबा पेक्षा भोंदूमुटेबाबा कसे वाटेल?

तुमची ही एकंदरीत वैचारीक खोली! आणि माझ्याकडून उत्तराची अपेक्षा करता?

कुणा बुवा बाबाचे वस्त्रहरण केल्यास ते हरण नैवेद्य म्हणून चालेल का?<<<

मग ती खरी अंधश्रद्धा ठरेल. लोक डोळे झाकून घेतील आणि श्रद्धा ठेवतील. बघणार कोण ते?

हवे तर 'वर' फोन लावून बोलून घ्या.
<<< कशाला? त्याचा सख्खा भाऊ आमच्याघरी माळीकाम करतो. त्याची बायको दोन तीन महिन्यापूर्वी आमच्याकडे काम करायची. (तिचे पिशवी काढायचे ऑपरेशन झाल्याने ती आता घरकाम करत नाही.) महादेवची बायको पिठाची गिरण चालवते. एवढीच आवश्यकता असेल तर या सर्वांची आधी परवानगी घेऊन त्यांचे मोबाईल नंबर तुम्हाला संपर्कातून पाठवून देईन. काय शब्दाचा किस पाडायचा तो त्यांच्यासमोर पाडा. तुमच्या लेखाबद्दल पण त्यांना सांगून ठेवतेच.....

पण एकदा का तिकडून त्या भगतासाठी आणी सर्पदंशावर "पारंपारिक उपचार केले तर काय बिघडले?" वगैरेबद्दल भंडारीस्पेशल "भ" बाराखडी चालू झाली तर मला सांगू नका हां....

मुटे बाबा,

तुम्हाला "बाबा" म्हणून चिमटी काढल्यावर तुम्हाला माझे प्रतिसाद दिसले तरी!

आता लगे हाथो शाम मानव यांना कसे निरुत्तर केले पासून सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन टाका पाहू.

बाकी तुमची वैचारिक उंची लेखातून दिसतेच आहे.

जिथे जिथे हे लेख डकवलेत, त्या प्रत्येकच साईटवर तुमच्या या उंची विचारांची संभावना झालेलीच आहे.

इथे तुमचे दोन समर्थक वेगळ्याच कारणाने तुम्हाला समर्थन देत त्यांचा अजेंडा पुढे ढकलत आहेत.

असो.

मलातरी या धाग्याचा उद्देश असा वाटतो:
- लोकांनी इथले भाग, त्यावरचे प्रतिसाद वाचावेत. वाचताना पॉपकॉर्न खावेत.
- पॉपकॉर्नची मागणी वाढेल, पर्यायाने मक्याची मागणी वाढेल.
- मक्याला चांगला दर येईल. (बहुतेक मुटेंचा मका आता शिवारात रेडी असेल :डोमा:)

Proud

@ नंदिनी | 28 August, 2013 - 11:55

तुमची ही पोस्ट वैयक्तिक रोख असलेली आहे, असे तुम्हाला नाही वाटत?

अद्याप श्रद्धेचा पाय प्लास्टरमधे आहेच >>>> माझा पाय???? नाय नाय ओ! असे काहीबाही बोलू नका. Proud

माचुपिचूवरील आरतीच्या रेझोनान्सने वाढलेली ७८६ टक्के पातळी>>>> 'किलिमांजारो.. लडकी परबत की यारों' ही पण माचूपिचूवर गायलेली आरती आहे. रजनीकांतावर माचूपिचूवरचा देव त्यामुळेच प्रसन्न आहे.

Pages