नवी सुरुवात (भाग २)

Submitted by Aditiii on 17 November, 2008 - 05:56

५ ऑक्टोबर २००६

किती घडून गेल एव्हढ्या दिवसात? माझा विश्वासच उडून गेला होता चान्गुलपणावरून! पण आता कळतय की किती चुकिच्या कल्पना होत्या माझ्या. मी आज पर्यन्त कधीच का नाही भेटले इतक्या चान्गल्या लोकान्ना? काल पर्यन्त प्रेमाच्या नावानी चिडणारी मी आज अगदी त्याच प्रेमाला कुठेही जाहीर होऊ देत नाहिये. किती अवघड आहे हे सगळ? पण मी आणी तो आता चान्गले मित्र आहोत अगदी बेस्ट फ्रेन्ड्स! मला तरी अजून काही नको आहे. हे नात असच टिकल तरी मला खूप मिळाल.

१० ऑक्टोबर २००६

सगळ काही सुरळीत चालेल तर ते माझ आयुष्य कस असेल?
ग्रुप मधे सगळेच आम्हाला चिडवायचे. मला तर ते आवडायचच पण तो ही कधी काही नाही म्हणाला उलट तो पण भाग घ्यायचा चिडवाचिडवी मधे. पण परवा म्हणे त्याने आमच्यातल्या एकाला सान्गितल की त्याला अस वाटत की मी त्याच्या बाबतीत सीरीयस होत आहे. अस डोक फिरल माझ, मी त्याच्याशी बोलणच सोडलय गेले दोन दिवस. मग आज त्याच्या घरी जायचा प्रोग्रॅम बनत असताना मी सान्गितल त्याला की मी नाही येणार! त्याच्या मनाला खूप लागल वाटत, तो माझ्यासठी थाम्बला मुद्दाम सगळ्यान्ना पुढे जायला लावून मग आम्ही भान्डलो, पण त्यानी खूप पेशन्स नी मला समजावल.

इथेच सुरुवात झाली होती माझ्या गोष्टीतल्या तिसर्या कोनाने डोक वर काढायला सुरुवात केली होती पण मला ते खूप उशीरा कळल!

३० ऑक्टोबर २००६

आता परिक्षान्चे वेध लागायला लागले आहेत. आता एक महीना फक्त आणी फक्त अभ्यास! एकत्र अभ्यास तर माझा होतच नाही म्हणून मी घरीच बसून अभ्यास करण पसन्त केलय! रोज फोन चालूच असतात आमचे. वेळात वेळ काढून आम्ही बोलत असतो सध्या. पण आता फक्त अभ्यास.

२३ नोव्हेम्बर २००६

परिक्षा! आज पहिला पेपर, खूप वाट बघितली त्याची पण भेटलाच नाही आज. फोन पण नाही केला ऑल द बेस्ट म्हणून. एनी वे पेपर छान गेला!

२४ नोव्हेम्बर २००६

पेपर छान गेला! भेटला नाहीच आज पण

२५ नोव्हेम्बर २००६

पेपर छान गेला! भेटला नाहीच आज पण

२६ नोव्हेम्बर २००६

पेपर छान गेला! भेटला नाहीच आज पण

२७ नोव्हेम्बर २००६

पेपर भयानक होता! म्हणून मी पेपर देवून सरळ मूव्ही बघायला गेले तर ह्याचा सन्ध्याकाळी नेहेमिच्या वेळेला फोन, झाप झाप झापल मला त्यानी परिक्षेच्या मधेच मूव्ही बघितला म्हणून! खर सान्गू मला खरच खूप छान वाटल!!!!

२७ नोव्हेम्बर २००६
आज परिक्षा सम्पली आणी खूप मोकळ मोकळ वाटतय आता मी त्याचा विचार करू शकते. मला माहीत आहे तो माझा कधीच होणार नाही. पण त्याचा विचार आणी जर त्याला मी आवडले तर किती छान होइल असे एक न अनेक विचार माझ्या मनात सतत येतच राहतात!

६ डिसेम्बर २००६

गेला एक आठवडा आम्ही त्याच्या घरी रोज जातोय आणी रोज किमान दोन तरी मूव्हीज बघतो. वेळ खूप छान जातोय सध्या. दिवसभर तो समोर असतो अजुन काय पहिजे मग?

९ डिसेम्बर २००६

उद्या माझा वाढ्दिवस आहे. मी आजच चालले आहे महाबळेश्वरला. माझ्या दुसर्या ग्रुप बरोबर! दोन दिवस ध्म्माल मज्जा. पण त्याला नक्किच मिस करेन.

१० डिसेम्बर २००६

आज दुपारचे ४ वाजलेत, मी परत पुण्याला परत आले खूप मजा केली. पण मला अजुनही कोणीच कस विश केल नाही माझ्या पीजी च्या ग्रुप मधून. त्याने ही नाही.

सन्ध्याकाळी ८ वाजता
त्याच्या घरी:

सरप्राइज पार्टी फक्त माझ्यासाठी छानशा मेण्बत्त्यान्च्या प्रकाशात साजरा झालेला माझा वाढदिवस! कधीही नाही विसरु शकणार मी हे सगळ!

किती छान दिवस होता आजचा. त्याने केवळ माझ्यासाठी केल हे सगळ? का केल असेल? माझ्याच विचारात मग्न होउन मी स्वप्नान्च्या राज्यात शिरले!

क्रमश:

गुलमोहर: 

good going

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

चालू द्या. वाचतोय आम्ही.

छान छान, मस्त एकदम.. भराभर येऊ द्या म्हणजे लिंक पण राहिल आणि तुमचे मराठी टंकलेखन पण सुधारेल... तसे बरेच सुधारलेय आता... Happy