युएस ओपन - २०१३

Submitted by Adm on 22 August, 2013 - 07:30

वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा युएस ओपन सोमवार दिनांक २६ ऑगस्ट पासून सुरु होते आहे.
त्याबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

स्पर्धेची वेबसाईट :
http://www.usopen.org/index.htm

बाकी सगळं नंतर लिहीन...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो .. ४थ राउंड मध्ये ..

ज्योको चा मला भरवसा वाटत नाही .. म्हणजे मरेला हरवेल की नाही ह्याबद्दल ..

पेस आणि स्टेपनेक जिंकले ! भारी.. आता चॉम्प व्हा म्हणं..
मरे.. अरेरे.. संपलं का काय अवसान इतक्यात ?
विल्यम्स भगिनींनी इर्रानी/विंची ह्या अव्वल जोडीला हरवलं.. त्या जिंकतील आता बहूतेक..
आज सेरेनाच्या लागोपाठ एकेरी आणि दुहेरीच्या मॅचेस.. आणि मधे सुटेबल रेस्ट म्हणे.. मग सेरेनाची पहिली सेमी ठेऊन अझारेंकाची दुसरी ठेवायला काय झालेलं. ! वेळापत्रक कसं काय ठरवतात काय माहित..

तगडे आणि अ‍ॅक्युरेट शॉट आहेत वावरिंकाचे. मी पहिल्यांदाच पाहतोय त्याची म्याच.
काही खरं नाही जोकोचे आज.

वावरींका जबरी खेळला... एकदम त्याच्या Tatooसारखा..“Ever tried. Ever failed. No matter. Try again. Fail again. Fail Better.”
त्याच्या पायाला काही झालं नसतं तर नक्कीच हरवलं असतं त्याने जोकोला....
कालचा जोको आणि परवाची अझारेंका बघुन बहुतेक या वर्षी सेरेना आणि नदाल जिंकतील...

वावरींका मस्त खेळला ...
सर्विस वर मेहनत घ्यायला पाहिजे त्याला..
२१ मिन चाललेला गेम तर जबर्‍याच होता..

aha.gifaha.gif

राफाचा (आणि रेसेनाचा पण) बेस्ट हार्डकोर्ट सिझन !!
दोघांनीही वर्षात दोन ग्रँडस्लॅम मिळवली..

गेल्या अनेक स्लॅम्स पैकी ही पहिलीच असेल ज्यातली एकही मॅच ई पूर्ण पाहिली नाही Sad

लेडिज फायनल काल रात्री रेकॉर्डेड पाहिली. रिझल्ट आधी कळलेला नसल्यामुळे 'लाईव्ह'प्रमाणेच अनुभवता आली.
एच.डी.वर मॅचेस अफाट वाटतात पहायला. क्लॅरिटीच्या दृष्टीने.

आज रात्री पुरुषांची फायनल तशीच पहायचा प्लॅन केला होता. पण त्याआधीच इथे आले आणि राफा जिंकल्याचं कळलं Proud

एक जरा अवांतर विचारायचं होतं -

मॅचेस चालू असताना चेअर-अम्पायरच्या टॉवर-खुर्चीच्या शेजारी एका साध्या खुर्चीवर अजून एक बाई बसलेली असायची. तिच्या हातात काळं, लंबुळकं काहीतरी यंत्र असायचं. बहुतेक स्पीड-गन. बॉल जिकडे जाईल तिकडे ती हातानं ते यंत्र वळवायची. बॉल डेड होईपर्यंत बॉलला फॉलो करायची. मला प्रश्न पडला, की ते बॉलचा वेग मापायचं यंत्र किंवा तत्सम काही असलं, तरीही अजूनही ते मॅन्युअली करण्याची गरज का भासावी?
शिवाय हे करणारी अशी व्यक्ती कोर्टच्या शेजारी बसलेली याआधीतरी मला कधी दिसली नव्हती.

बाकी, यावेळी महिला खेळाडूंच्या वेशभूषेत ग्रे-पिंक कॉम्बिनेशनचा भलताच प्रादुर्भाव झालेला होता. Lol
आणि एकंदरच, खेळाडूंच्या बुटांच्या रंगात लाल रंगानं दमदार एण्ट्री मारलेली दिसली.

Pages