नवी सुरुवात

Submitted by Aditiii on 14 November, 2008 - 05:36

४ ऑगअस्ट २००६

आज कॉलेजचा पहिला दिवस. तस नवीन कहिच नाहि आता काय पोस्ट ग्रॅजुएशन च्या वेळेला काय नाविन्य असणार कोलेजच?जस ११ वीला होत. फार फार आकर्षण वाटल होत त्या लाइफच. नवीन गोष्टी, नवीन लोक, नवीन नाती सगळ्या सगळ्याच. अनुभवाचे बरचसे चटके तेव्हाच बसले होते, प्रेम, मैत्री या शब्दान्चे अर्थ नव्यानेच समजले होते तेव्हा. फार शोधले होते आधार तेव्हा पण खर्या आयुष्यात कुठे असत ते पिक्चर मधल प्रेम? सगळ्या शरीराच्या गोष्टी. सही फिगर, आणी टाइट्ट कपडे लाइन लगते मग मागे...... किळस वाटायला लागली होती ह्या सगळ्याची, प्रेम ह्या शब्दाची, भीती बसली होती विश्वासघाताची!
फसवणूक शारिरिक नाही पण मानसिक पडझड खूप झाली होती. आत्ता २ वर्षच झाली होती या गोष्टीला. आत्ताच कुठे तर सावरत होते मी.

अशा अनुभवानि पोळलेल्या मनात मग कुठे कोणाबद्दल प्रेम फुटू शकत? त्यामुळे नवीन कोलेज आणी प्रेमाच्या गोष्टिन्नी एकमेकान्पासून केव्हाच फारकत घेतली होती. फक्त अभ्यासावर लक्ष केन्द्रीत करायच थरवल होत. मित्र मैत्रिणी ही मोजक्याच आणी जेवढ्यास तेवढच ठेवायच ह्याची मनात एकदा उजळणी करून मी
कोलेज ला निघाले. बस पकडून पोहोचले.

अनेक मुल मुली आनि त्यान्च्या एकमे़कन्ना निरखणार्या डेस्परेट नजरा पाहुन सकाळ्च्या विचारान्च जरा हसुच आल. किती तफवत असते सगळ्यान्च्या अनुभवात? मी चुप चाप एका कोपर्यात जाउन बसते... मग यथावकाश लेक्चर चालू होतात, ओळख परेड. मी माझी ओळख उरकून बकिच्यान्ना बघत असते आनि तेव्हाच तो स्टेज वर येतो! आणी मी माझीच ओळख विसरते.

५ ऑगस्ट २००६

मला कळत नहिये हे अस का होतय? आज पर्यन्त किती मुलान्ना भेटलेय मी. माझे अनेक मित्र. काहिन्नि प्रपोज केलय काहि मनातल्या मनात झुरतायत अजुनही पन निष्ठेनी आणी आशेनी मैत्री टिकवून असलेले ते आणी प्रेमाच्या उल्लेखानीही चिडणारी मी. पण तो चेहेरा नाही माझा ताबा असा सुटता कामा नये मी जाणूनबूजुन त्याच्याशी बोलत नाही. बाकी लोकान्शी छान ओळखी झ्याल्या आहेत आणी माझ्या तोडीची अजुन कोणीच नाही म्हणून मनातल्या मनातच खुश होते आहे! त्याच्याकडे पुर्ण दुर्लक्ष. ( मुलान्ना भाव दिला नाहि की ती आपल्याला भाव देतात म्हणे!) एका मित्राने फूकट दिलेल ज्ञान अत्ताच का डोक्यात याव?

६ ऑगस्ट २००६

मी समोर असलेल्या पुस्तकावरून नजर फिरवत राहते. अभ्यास इज मस्ट! इतक्यात तो समोरून येतो. आणी मला माझा नन्बर मागतो आणि मी देते ( काय चाललय हे? सगळी मुल सारखीच असतात मी का विसरतेय हे?) पण आज त्याने आपणहून माझा नम्बर मागितला. ऱोब्याचा फोर्म्युला सॉलिड आहे. शी काय चाललय हे आपल्याला फक्त शिकायचय. मी परत एकदा पुस्तकात लक्ष घालायचे असफल प्रयत्न करत राहाते.

२० सप्टेम्बर २००६
बरेच दिवस स्वत:शीच भान्डल्यावर मी अक्सेप्ट केल आहे की मला 'तो' खरच आवडायला लागला आहे. हा आता हे प्रेम वगैरे आहे का ह्याचा अजून विचार नाही केला. पण आता आम्ही छान मित्र आहोत. पण मला तो दिवसेन्दिवस खूपच आवडायला लागला आहे.

२६ सप्टेम्बर २००६

आज त्याने बॉन्ब टाकला आहे. सहज बोलता बोलता सन्गितल की त्याला कोणीतरि दुसरि मुलगी खूप आवडते. इन्जिनीअरिन्ग मधली. मी तिथेच खलास. एकही शब्द नाहि फुटला नन्तर तोन्डातून पण त्याला जाणवूही दिल नाही. फुकट भाव खाइल साला! शी मला आधीच माहित होत हे. माझ्या नशिबातच नहिये हे प्रेम वगैरे. मिळणार्यान्ना आपसूक मिलत सगळ. आमची आधी पासूनची सोबत म्हणजे तन्हाई वाली गाणी! हे बहार वगैरे आमच्या तोन्डात शोभणारच नाही. पण ती पोरगी नाही म्हणामी आहे ह्याला, आणी हा म्हणे नोकरी मिळवून घरीच जाणार तिच्या! पी़जी ला हे असले विचार? आमचच नशीब फुटक.

३० सप्टेम्बर २००६

वेल, मी सावरलीये आता ह्या धक्यातून आता मला कळतय हे प्रेम काय चीज आहे? डोक्यातून जातच नाही तो आणी त्याचे विचार. पण मी आता स्वीकारलय हे सगळ. मला खरच तो आवडतो आणी मी त्याला नाही सान्गणार हे सगळ. कधी कधीच नाही. कारण तो माझ्या बरोबर असणच खूप आहे माझ्यासाठी मग ते फक्त मित्र म्हणून का असेना? आय डोन्ट वॉन्ट टू लूझ हीम! आय लव्ह हीम! आय रीयली डू!

क्रमशः

गुलमोहर: 

उत्सुकता वाढली आहे..
पुढच्या भागाची वाट पहातेय.
-----------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......