पंचकर्म

Submitted by _आनंदी_ on 7 August, 2013 - 01:21

माझी मुलगी वर्षाची आहे ...... पाठदुखी साठी पंचकर्मा सुरु करण्याचा विचार आहे.....
करु का?
त्यात पुर्ण अंगाची आयुर्वेदिक तेलाने मालिश... स्टीम ... कसलितरी बस्ती ई. ८ दिवसांसाठी आहे....
सगळ्यांचे काय मत ???
कृपया पंचकर्मा बद्दल माहिती असेल तर द्या..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंदघन_,
कृपया निष्णात डॉक्टरांचा सल्ला घ्या. Happy
'सगळ्यांचं मत' वैद्यकीय ज्ञानावर आधारलेलं असेलच असं नाही. तुमची मुलगी फार लहान आहे.

हम्मम्म.. खरतर एक डॉक्टर आहेत त्याच हे सगळ कंडक्ट करतात .. त्या आयुर्वेदिक डॉ. आहेत...
अजुन बरेच सर्टिफिकेटस् लावलेले आहेत त्यांच्या क्लिनिक मध्ये .. कोणी हे केल्यचा अनुभव असेल तर काही अंदाज येईल..

ओह.. मलाच ... सिझेरियन डिलिव्हरी आणि दिवसभर ऑफिस मध्ये लॅपटॉप समोर बसुन पाठदुखी.. या सगळ्यासाठी ८ दिवसांची ट्रिट्मेंट आहे..

आनंदघन. पाठदुखीसाठी तुम्ही चांगल्या ओर्थोपेडिक डॉक्टरला दाखवले आहे का? त्याचे काय मत आहे? पाठदुखीचे नक्की कारण काय आहे त्याचा आधी शोध घ्या, सीझेरीयनमुळे की चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे अथवा इतर काही कारणाने पाठदुखी आहे ते तपासून घ्या.

ह्म्म्म्म .. x-ray कढला आहे.. whole spine चा ... तो नो प्रॉब्लेम दाखवतो आहे..
पण मुलीला प्यायला घेणे ... रात्री पण.. ,
ऑफिस .. रोजच ट्रेन ट्रॅव्हलिंग.... खुप शारिरीक कष्ट झाले जवळ जवळ गेली दीड-दोन वर्ष .. म्हणुन करायचा विचार होता..

पंचकर्माचं दुकान थाटल्यासारखं असेल आणि तिथेच तुम्हाला ते करुन घ्या म्हणून सल्ला मिळाला असेल तर अजून एखाद्या अनुभवी आयुर्वेदाच्या / अस्थीतज्ञ डॉक्टरांना विचारुन घ्या. हल्ली कुठल्याही व्याधीला पंचकर्माने बरं व्हायची लालूच दाखवली जाते, ते बरोबर नाही. योग्य त्या तपासण्या करुन घ्या आणि आधी तुमचे पोस्चर योग्य आहे का ते बघून घ्या. बसायची पद्धत चुकीची असेल तरी त्रास होईल. कंबर पाठीच्या स्नायूंना आराम मिळेल अशी उशी खुर्चीत ठेवून बघा. पुर्वी बायका बाळंतपणानंतर कंबरेला पाठीला परत बळकटी येईल असा आहारात बदल करायच्या. तो सुद्धा थोडाफार करुन बघा. जड वस्तू उचलताना चुकीच्या पद्धतीने उचलून स्नायूंना अपाय तर होत नाही ना बघा. तपासण्यांमध्ये दुसरा काही प्रॉब्लेम निघाला तर उपचारही वेगळाच करावा लागेल. सरसकट मालिश, स्टीम, बस्ती चालणार नाही.

मी आयुर्वेदाचीच काय, तर कसलीही डॉक्टर नाही.

प्रेमाचा सल्ला : कष्टाचं प्रवास करुन ऑफिसमधून घरी आल्यावर हातपाय धुवून फ्रेश झाल्यावर घरात इतर कुठेही लक्ष न देता बेडवर पाठ नीट टेकेल अश्या ५ मिनिटं तरी डोळे मिटून खोलीत अंधार करुन पडा (दिवेलागणी झाली असली तरी). थोडं बरं वाटलं की उठून नेहमीच्या रगाड्यांना जुंपा.

आनंदघन वर आश्विनीने उत्तम सल्ला दिलाय. चांगल्या/ तज्ञ अस्थीतज्ञांचा सल्ला घेऊन योग्य तो व्यायाम करा. योग्य व्यायामाने पाठ कंबर पण दुखणे थांबेल. पण अजूनही जड वस्तु उचलणे टाळा. एकदम खाली न वाकता खाली बसुन वस्तु उचलत जा.

एनिमा बद्दल घरातले ज्येष्ठ सदस्य सुद्धा सांगतील्.:स्मित:

आणी ते पंचकर्म आहे, विश्वकर्मा सारखे पंचकर्मा नाही.

लगेच बदललं... Happy
एनिमा का देतात ई. माहिती आहे पण इथे पंचकर्मा मधे कसा देतात? काही त्रास होतो का हे विचारायचे होते..

Tumachyaa jawalchya madhavbaug panchkarma center madhe jaun ekda tapasani karun ghya tumhala yogya toch salla ani upchar sanganyat yetil....( mi tithe job kela ahe panchkarma therapist mn)

Bastiche don prakar asatat yogya prakare dili gelyas kahihi traas hot nahi

तुमची मुलगी वर्षाची आहे.आणि अंगावर पिते.तेव्हा तुम्हाला जादा कॅल्शियमची गरज आहे.कॅल्शियमयुक्क्त आहार घ्या.कॅल्शियम सप्लिमेंटस डॉ.च्या सल्ल्यानुसार घ्या.मला स्लीपडिस्कचा त्रास होता त्यावेळी डॉ.चा वरील सल्ला + व्यायाम इ.पाळले होते. डॉ.नी सांगितल्याप्रमाणे पाठीवर झोपून व पाय सरळ न सोडता गुडघ्यात दुमडून झोपा.अश्या झोपण्याने/विश्रांती घेतली की खूप बरे वाटते.मी पंचकर्म केले नव्हते.पण एकदाच तैलबस्ती घेतली होती.काही त्रास झाला नव्हता.
बाकी आश्विनी व रश्मी यांनी योग्य सल्ले दिले आहेत.

पंचकर्म फायनली सुरु केले..
घरी आल्यावर थोडा आराम करवा.. वर्क लोड कमी करवा .. ई.ई. अनेक गोष्टी खर्या असल्यातरी स्वतःला वेगळा वेळ काढणे जमत नव्हते..
आता तिथे कंपलसरि १ तास बसायचेच आहे म्हणुन थोडा आराम मिळत आहे..
ट्रिट्मेंट देणार डॉ आणि थेरपिस्ट योग्य क्वालिफाईड असल्याने .. उत्तम वाटत आहे .. भोंदुगिर्री नाही..

खरतर घाबरतच गेले होते .. दारातुनच परत जायचा विचार होता..
पहिल्यादिवशी आता पुढे काय असेल या विचाराने लक्ष लागले नाही ..
पण आता नीट वाटत आहे .. १४ दिवस आहे ..