बी १२ ची कमतरता

Submitted by सुज्ञसमन्जस on 30 July, 2013 - 05:41

साधारण २ वर्षांपूर्वी बी १२ ची कमतरता कळली त्यानंतर इंजेक्शन्स घेतली पण आता परत तेच निदान झाले आहे. शाकाहारी व्यक्तींना बी १२ कशा कशातून मिळू शकेल किंवा त्याची कमतरता भासू नये म्हणून अन्य कोणते उपाय करता येतील?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस म्हणल जात की खूप वर्ष पुरेल इतक B12 लिव्हर मध्ये साठवल जात आणि त्यामुळे सहसा कमतरता नसते. याचा अर्थ असा होऊ शकतो की कमतरता असेल तर Liver Functions एकदा तपासून घ्या, acidity खूप होते का पहा..
शाकाहारी व्यक्तींसाठी दूध, चीज इं. मधून थोड्याफार प्रमाणात मिळू शकते B12
नाहितर multivitamin tablets / B-Complex घ्याव्यात.

दुग्धजन्य पदार्थ व अंडी खावीत. अंड्याला शाकाहारी समजून ते अहारात योग्य प्रमाणात ठेवल्यास शरीराचे कल्याण होईल! बी १२ हे फक्त प्राणीजन्य पदार्थांमध्ये असते. तसेच ते आपल्या आतड्यातील जीवाणूही तयार करीत असतात. जीवाणूंची वाढ झालेल्या अन्नातून बी १२ मिळू शकते. तेव्हा घरचे थोडे शिळे अन्न खायला हरकत नाही!

@ सृ ष्टी : उन्हात बसण्याचा सबंध' डी ' जीवन्सत्व शरीरात तयार होण्याशी आहे. माझ्या माहितीनुसार तरी बी १२ शी अजिबात नाही. तुम्ही वाचले असल्यास संदर्भ द्यावा.

Liver Functions एकदा तपासून घ्या >> +१!

दूध, व्हे पावडर, फोर्टिफाईड ब्रेकफास्ट सीरियल्स, चीज यांमधून बी १२ मिळू शकते.

मी स्वतः ह्यावर बराच शोध घेतला आहे आणि माझ्या आहारात बदल करुन माझे बी १२ वाढले आहे.

आपला पारंपरिक आहार आत्मसात केला तर बी १२ जीवनसत्वाची उणिव भासणार नाही. आहारात काकडी, ताक, भरपुर हिरव्या कच्च्या पालेभाज्या ह्यांचा समावेश. भाज्या खूप शिजवायच्या नाहीत. भाज्यांची तिखट मिठ घालून केलेली कोशिम्बीर आहारात ठेवावी.

मी हे करुन पाहिले. वर्षभरात माझी बी जीवनसत्त्व वाढले परिपुर्ण आहार ठेवा. अजून जास्त जोमाने वाढेल.

माहीतीपूर्ण धागा. वाचतो आहे.
*
एक शंका @ सूज्ञसमंजस :
त्या बी१२ डेफिशिअन्सीचे निदान करणार्‍या डॉक्टरांनी फी चे पैसे घेतलेच असतील. त्यांना त्या पैशाच्या बदल्यात तुम्ही विचारलेत का, की 'डॉक्टर, काय खाल्ल्यावर मला हे व्हिटॅमिन मिळेल?'
त्यांनी काय सांगितले ते लिवणार का जरा?
की त्यांच्या कडून फक्त 'निदान' करून घेऊन मायबोलीवर 'पब्लिक ओपिनिअन पोल' घेऊन, आपले आपणच धष्टपुष्ट व निरोगी होण्याची तुमची हुश्शार आयडीया आहे?
*
इथून मला नवी माहिती कळाली तर नक्कीच एम यू एच एस ला मेल करून कळवीन, की,

मा. कुलगुरु,
आरोग्य विज्ञान विद्यापीठ,

महोदय,
मायबोलीवर कोवळ्या उन्हात खाल्लेल्या काकडीतून लै व्हिटॅमिन बी १२ मिळते असे लिहिले आहे, तर तुमच्या त्या मेडीकलच्या पुस्तकांत असे लिवा बरे?
न लिहिल्यास मला उद्देशून येतील त्या सगळ्या पोस्टी तुम्हाला फॉर्वड करीन.
-
आ.न.
इब्लिस.

(हवे तर आपण सगळे मिळून एक सह्यांचे पत्रक काढू यात. लोकशाही आहे. १० - १२ हजार सह्यांचे पत्र गेले की झक्कत ऐकतील.)

त्या बी१२ डेफिशिअन्सीचे निदान करणार्‍या डॉक्टरांनी फी चे पैसे घेतलेच असतील. त्यांना त्या पैशाच्या बदल्यात तुम्ही विचारलेत का, की 'डॉक्टर, काय खाल्ल्यावर मला हे व्हिटॅमिन मिळेल?'
की त्यांच्या कडून फक्त 'निदान' करून घेऊन मायबोलीवर 'पब्लिक ओपिनिअन पोल' घेऊ<<< Lol

इब्लिस,

पूर्ण प्रतिसाद आवडला, पण हे वरचे फारच!

सारीका ताई,
लोचा तुमच्या लक्षात आलेला नाही.
"शाकाहारी व्यक्तिंना" हा बेसिक प्रॉब्लेम आहे Happy

जाऊ द्या हो इब्लिस ,मनावर घेउ नका.
उद्या तुम्ही म्हणाल कुळाचाराचे प्रश्न रीतीरिवाजच्या धाग्यावर विचारण्याऐवजी घरच्या गुरूजींना विचारा.
Wink

.

@ सृ ष्टी : उन्हात बसण्याचा सबंध' डी ' जीवन्सत्व शरीरात तयार होण्याशी आहे. माझ्या माहितीनुसार तरी बी १२ शी अजिबात नाही. >>> सॉरी माझि चुक झालि आहे.( मला डी ' जीवन्सत्व पन कमि होते त्यामुळे गडबड झालि . परत सॉरी)

ऑक्टोपस खा ... मी नाही http://www.healthaliciousness.com/articles/foods-high-in-vitamin-B12.php म्हणते...

बाकी अजुन ९ पर्याय आहेत, तेही बघा.... गुगल फुकट आहे अजुनतरी Happy

http://www.webmd.com/food-recipes/guide/vitamin-b12-deficiency-symptoms-...

इथे बघा... सगळं डीटेल लिहिलय. मांसाहारी नसाल तर लिटर-दोन लिटर दुध घ्याच... थोडं थोडं पित रहा पाण्यासारखं.

पूर्वी फॅमिली डॉक्टर ( सकाळचे नव्हे) म्हणून संकल्पना होती, आता ती थोडी बाद झाल्यासारखीच दिसते.

वर इब्लिस यांनी लिहीलेलेच आहे तसे तुम्ही का करत नाही? माबोवर विचारण्यापेक्षा ज्या डॉक नी तुम्हाला इंजेक्शन्स वगैरे दिली त्यांच्याशी याविषयी चर्चा करा ना. ते यातले तज्ञ आहेत, तेच अधिकारवाणीने सांगु शकतील ना याबद्दल.

तरीही तुम्हाला माहिती हवी असेल तर डॉ. मालती कारवारकर ( प्रख्यात न्युट्रिशिअन) यांची पुस्तके वाचा. त्यात अगदी अथपासुन इतीपर्यंत माहिती आहे सर्व जीवनसत्वांविषयी. वंशवेल हे गर्भवती स्त्रियांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी उपयुक्त आहे.

पण एक सांगावेसे वाटते की तुमचा आहार खरच चौरस ठेवा. निसर्ग वेडा नाहीये सगळ्या रंगांची उधळण करायला. भरपूर दिलेय त्याने. सर्व प्रकारची, सर्व रंगातली फळे, भाज्या, फळभाज्या वापरुन आहार सुधारा. नशीबावान आहात भारतात जन्माला आलाय म्हणून. कारण समशितोष्ण कटीबंधामुळे सर्व प्रकारचे मौसम अनुभवायला मिळतात.

आणी कळकळीचे सांगणे की बर्गर, पिझ्झा सारखे जंक फुड आणी बेकरी प्रॉड्क्टस कमी करा.

गर्भवती महिलांना "बी-6' च्या गोळ्या कशासाठी देतात?
गरोदरपणातील सुरवातीच्या काळात अनेक गर्भवती महिलांना मळमळ जाणवते. याचे कारण जीवनसत्त्व बी- 6 चा अभाव असू शकतो. अशक्तपणा, निरुत्साहीपणा व तोंड येणे ही लक्षणेदेखील या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जाणवतात. चिकित्सकाला यातील एखादे लक्षण जाणवल्यास ते गर्भवतींना ब जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेण्यास सूचित करतात. हे पाण्यामध्ये विद्रावित होणारे जीवनसत्त्व असल्याने याच्या पूरक मात्रांनी शरीराला कोणतीही हानी पोचत नाही; परंतु आपल्या चिकित्सकाला न कळवता परस्पर कुठल्याही गोळ्या गर्भवती स्त्रीने घेऊ नये.

जीवनसत्त्व बी-6 हे मोडाची कडधान्ये, शेंगभाज्या, तृणधान्ये व मांसाहारातून शरीरास मिळते.

हे माझ्याकडे असलेल्या एका लेखातले आहे

उन्हात बसणे व डी जीव नसत्व निर्मिती याबद्दल थोडे : यासाठी दुपारी ११ ते १ चे उन शरीराच्या उघड्या भागांवर पड णे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकामावर काम करणारा मजूर या बाबतीत सुदैवी ठरतो. परंतु कार्यालायात बसणारे त्याला वंचित होतात. 'डी' निर्मीतीची क्षमता वाढ्त्या वयानुसार तसेच हवा प्रदूषणामुळे कमी होते. यासठीच थोडे 'डी' आहारात हवेच. त्याबबतीत पक्के शाकाहारी पुन्हा मार खातात. तेव्हा अंडे खाणे त्यासठी आवश्यक. ९४% भारतीयांमध्ये 'डी' ची कमतरता आहे. तेव्हा सर्वांनी अंडे आहारात ठेवा!

यासाठी दुपारी ११ ते १ चे उन शरीराच्या उघड्या भागांवर पड णे आवश्यक आहे.
>>
सकाळचे कोवळे ऊन घेतल्याने डी जीवनसत्व मिळते ना?

यासाठी दुपारी ११ ते १ चे उन शरीराच्या उघड्या भागांवर पड णे आवश्यक आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>सकाळचे कोवळे ऊन घेतल्याने डी जीवनसत्व मिळते.

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आमच्या डॉक्टरचा याबाबत सल्ला घेतलाच आहे आणि त्यांच्या सल्ल्यानेच सर्व सुरु आहे. मी इथे हा विषय मांडण्याचे मुख्य कारण म्हणजे इथे उपयुक्त आणि न मिळालेली माहिती मिळू शकते हा माझा असलेला अनुभव तसेच इंजेक्शन्स अथवा कोणत्याही प्रकारची औषधे न घेता फक्त आहारातून हे जीवनसत्व मिळत असेल तर त्याची माहिती मिळावी हा होता. सर्वात महत्वाचे म्हणजे आजकाल ही कमतरता खूप जनाकडून ऐकिवात आली आहे.

सकाळचे कोवळे ऊन घेतल्याने डी जीवनसत्व मिळते ना?>>> नाही. ही चुकीची माहिती चुकीच्या पद्धतीने पसरवली गेली आहे असे माझ्या डॉक्टरांनी सांगितले. कुमार१ यांनी लिहिलेली माहितीच माझ्या डॉक्टरांनी मला दिली.

डी जीवनसत्व कोवळ्या उन्हातुनच मिळते, तसे बाकी पर्याय आहेतच या जीवनसत्वांसाठी. दिल्ली वगैरे साईडला पंजाबी लोक मुलांना मोहरीच्या तेलाने मालीश करुन सकाळच्या कोवळ्या उन्हात घेऊन बसतात थोडा वेळ. पाहिलेत ना कसले हट्टे कट्टे लोक असतात हे.:फिदी:

सुज्ञसमन्जस,तुम्हाला कितपत डेफिशियंसी आहे मला माहित नाही.पण मला डॉ.ने रेक्मेंड केलेली इंजेक्शने आणि गोळ्या घेतल्यानंतर २-३ महिने थांबून परत एकदा बी १२ चेक करायला सांगितले आहे.त्यानंतर जर लेव्हल ठीक असेल तर सगळी सप्लिमेंट्स बंद करुन दरवर्षी एकदा बी १२ चेक करण्याचा सल्ला दिला आहे.सध्या तुम्हाला जर इंजेक्शन आणि गोळ्या सांगितल्या असतील तर ते टाळून फक्त आहारावर अवलंबून राहू नका.सप्लिमेंट्सने बी १२ जेवढ्या लवकर वाढेल तेवढे आहारातून मिळणार नाही.

ब 1 २ हे दोन प्रकारचे आहे, काही दिवसापूर्वीच मी या विषयावर बरीच शोधाशोध केली होती, त्यातील मुख्य भाग. माफ करा हे इंग्लिश मध्ये आहे.
Cyanocobalamin is indirect type of B12, when it's comes in the body your body creates the B12, found most of Multi-vitamins. As it is cheaper to make. From WikiPedia "The amount of cyanide liberated in this process is so small that its toxicity is negligible."
Methylcobalamin is a direct form of B12, it's mostly in chewable tablets, it's is little expensive than Cyanocobalamin.

B12 helps for producing energy, so Drinks like '5 Hour engry' has 500 mcg. US Daily Value of B12 is suggested 6 mcg everyday, so you will know how much B12 is in this engery drinks.( BTW, Owner of this energy drinks is Manoj Bhargava)

More information is at Wiki :
http://en.wikipedia.org/wiki/Cyanocobalamin
http://en.wikipedia.org/wiki/Methylcobalamin

अशक्तपणा, निरुत्साही वाटणे, वारंवार पोट बिघडणे, घसा खराब होणे, हात पाय दुखणे इत्यादी इत्यादी महत्वाची लक्षणे असू शकतात. मागच्या वेळेस जेव्हा हे चेक केले होते तेव्हा यातील निरुत्साही वाटणे व घसा खराब वारंवार होणे हे लक्षण होते त्यावेळेस एका प्रसिद्ध हार्मोन स्पेशालीस्ट कडून निदान झाले यावेळेस अशक्तपणा हे मुख्य लक्षण तसेच वस्तू उचलताना जडपणा वाटत होता आणि हाताच्या मुव्हमेंट करताना थोडा त्रास जाणवत होता त्यामुळे ऑर्थपीदीक कडे गेलो असता हे निदान झाले.

बी १२ ची अपेक्षित पातळी काय आहे?
ती पातळी कितीवर असेल तर उपचार चालू करायला हवेत? कुठले? म्हणजे गोळ्या/ इंजेक्शन इत्यादी?

तेच प्रश्न डी ३ बद्दलही..

मंजूडी, बी १२ - <२०० pg/ml असेल तर कमतरता असते. विटॅमीन डी - <१२ ng/ml.

मी ५ महिन्यांपूर्वी केले होते चेक तेव्हा बी १२ - २५० pg/ml होते पण विटॅमीन डी फक्त १० ng/ml. आले. भारतीयांमधे म्हणे ते फार कमी असते.

माझे डी ३ १३.८० आहे आणि बी १२ -१६४
मागे एकदा फक्त गोळ्यांचा कोर्स केला होता. यावेळी पण तोच कोर्स दिला. पण सांधे खुप दुखु लागले म्हणुन एक्स रे काढुन ऑर्थो. कडे गेले. त्यांच्या मते सांधे बरे आहेत पण गोळ्यातिल डोस शरीरात पुरेशा प्रमाणात शोषुन घेतला जात नाही. सो एक दिवसाआड इनजेक्शन सांगितले आहे.
डी ३ साठी गोळ्या अणि एग व्हाईट.

ताई, डी३ साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात चाला>> हा एक मोठा गैर्समज आहे. एक Dr म्हणून काही सांगतो:
१. त्वचेमध्ये डी' तयार होण्यासाठी UV-B हे किरण उघड्या त्वचेवर पडणे आवश्यक असते. (काचेतून पडलेले किरण नाय चालत ). त्यांचे प्रमाण हे सकाळी १० ते दु. ३ मध्य लक्षणीय असते. तसेच त्या वेळी त्वचेचा भरपूर भाग उघडा हवा. अन्गभर कपडे घालून हापिसात वा घरात बसून नाय चालत. ( तेव्हा या बाबतीत बांधकाम मजूर व सैनीक सुदै वी ठरतात!)

२. वरील प्रक्रियेला पुढील अडथळे ठरतात : वाढते वय, काळा रंग, प्रदूषण, हिवाळा इ.

३. एक खरे की त्वचेत तयार झालेले डी' गोळ्यांपेक्षा दुप्पट काळ टिकते.

४. तेव्हा वरील लक्षात घेता पन्नाशी नंतर बाहेरील गोळ्या वा पावडर मधून मधून घ्यावी लागते.

५. मि त्रांनो, अंडे जरूर खात रहा. त्यासरखा स्वस्त, मस्त व उपयुक्त पदार्थ दुसरा नाही !

ह्या उन्हात चालण्याने खुपच गोंधळ उडवलाय माझा. मला डॉकने सकाळी १० ते २ या वेळच्या उन्हात चालायला सांगितले. नेटवरही ब-याच ठिकाणी मध्यानीची वेळ योग्य म्हटलेले आहे. गेल्याच आठवड्यात एका डॉक्टराने सकाळी आणि संध्याकाळी चाला हा सल्ला दिला. आता अश्विनी कोवळे उन रेकमेंड करतेय. नक्की करावे?

मला तरी १० ते २ च्या दरम्यान जेवल्यानंतर १५ मिनिटे वेळ मिळातोय उन्हात फिरायला. मी सध्या तेच करतेय.

कुमार धन्यवाद. मी हेच फॉलो करतेय. आठवड्याचे ५ दिवस ऑफिसात असतात, तेव्हा ऑफिस डेकोरमला साजेसे कपडे घालुनच फिरावे लागतेय उन्हात. Happy हात आणि मान उघडे राहिल एवढे पाहते.

खरे तर माझे हात आणि मान खुप काळी पडलीय. अजुन्काळी पडू नये म्हणुन मी त्यांना उन्हापासुन लपवत होते. तर आता हे क्मतरता प्रकरण पुढे आले..

साधना, मझ्या वरील प्र. ने तुमचा गैर्समज दूर व्हावा. मी ही महिती Medscape (International updates for Doctors) च्या अलिकडील सदरात वाचली आहे. तसेच वैद्यकीय परिषदेतील संवादात ही आमची यावर चर्चा झाली आहे.
अर्धवट माहीती अस लेले लोक वर्तमानपत्रातून लेख लिहून चुकीची माहीती पसरवतात.

बी-१२ बद् ल नंतर लिहीतो.

Pages