नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

thanks Mugdha....

ज्यांना ज्यांना अपडेट्स आवडले त्यांना मनापासुन धन्स. तुमची हरकत नसेल तर मामांच्या गैरहजेरीत मी देउ का अपडेट्स?

<काही गोष्टी राहुन गेल्या असतील तर कृपया सांगाव्यात.>

आपल्याकडे रात्री पिंट्या आलाय हे बेबीआत्या चॅनेलवरून सगळ्या आयांना कळलेलं असतं. पाहुणा आहे तर त्याच्यासाठी सकाळच्या नाश्त्याला काहीतरी गोड करा असं चक्क मोठी आई सुचवतात. आता पटकन काय गोड होणार तर ................................................................................. शिरा असं सर्वानुमते ठरते.
मग पिंट्या रात्री कोणालाही न भेटता गेला हे कळल्याने त्यांचा विरस होतो. (शिरा करायचा चान्स गेला ना? Wink

मालिकावाले मायबोली वाचतात. अब कोई शक? Wink

पिंट्याभोवती संशयाचे जाळे विणायला सुरुवात झालेली आहे. चंद्रहाराकडे तो ज्या पद्धतीने पाहतो, आई येताच लपवतो. आईला आता मी बिझिनेस करणार आहे, नवी खोली घेण्यासाठी लागणार्‍या डिपॉझिटचे पैसे माझ्याकडे आहेत हे सांगतो.

शशिकलाबाई नवर्‍याला सोडून जावयाने दिलेल्या फ्लॅटमध्ये राहायला तयार आहेत. पिंट्याला तू तरी माझ्याबरोबर राहायला ये असे सांगतात. (बाबा येतीलच मागून)
पिंट्या आईवडिलांना मी तुम्हाला उपाशी मारणार नाही आहे, स्वतः कमवून तुम्हाला पोसेन असे ठणकावून सांगतो.

कालच्या भागात संवादांना म्हणी आणि वाक्रप्रचारांची चुरचुरीत फोडणी होती. दातावर मारायला तरी पैसा आहे का? गाढवापुढे........... ; कुत्र्याचे शेपूट......इ.

पिंट्या आता तो चंद्रहार विकुन काहितरी उद्योग सुरु करणार पण बरोबर तो चंद्रहार आईआज्जींपर्यंत ट्रेस होणार.
मग अजुन रडारड.

कालच्या भागात जेव्हा आई बाबांना पिंट्या ठणकावुन सांगतो की मी तुम्हाला उपाशी ठेवणार नाही त्यानंतरचे बाबांचे भाव मस्त होते.

अपडेट्स २९/११/२०१३

कालच्या भागाची सुरुवात मोठी आई आणि जान्हवीच्या उरलेल्या संभाषणापासुन झाली. मोठ्या आईकडुन सोन्याच्या जरीची साडी आणि चंद्रहाराबद्दल कळल्याने जान्हवी विचारात पडते. पण मोठी आई सासुबाईंच वाक्य रिपिट करुन झाल गेल गंगेला मिळवुन टाकते आणि जान्हवीला येण्याच कारण विचारते. पिंट्या घरी येउन लगेच निघुन गेला आणि उशीर झाल्याने तुमची चौकशी न करता गेल्याबद्दल माफी मागायला आल्याच जान्हवी सांगते. तेव्हा मोठी आई पिंट्या इतक्या उशीरा बाहेर का होता? बाबा ओरडत नाहित का त्याला? अशी तिचीच उलटतपासणी घेते. जान्हवी आपल्या परीने प्रसंग निभावुन नेते. काल मोठी आईच्या मनात जान्हवीबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाल्याच जाणवल, कारण या प्रसंगानंतर ती स्वतःहुन तिला "आपण दोघी चादरीची घडी घालु" अस सांगते.
इकडे भाउजींच्या आज्ञेला मान देउन पिंट्या श्रीला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये येतो. त्यावेळी श्री फोनवर एका इस्टेट एजंटशी सहस्त्रबुद्धेंच्या घराबद्दल बोलत असतो. पिंट्याशी बोलताना एका जबाबदार व्यक्तीप्रमाणे श्री त्याला चार समजुतीचे शब्द सांगतो. बिझनेस सुरु करताना कसे कष्ट करावे लागतात ते सांगतो, त्यांच बोलण चालु असतानाच पिंट्याला फोन येतो आणि पिंट्या तिथुन निघुन जातो.
गोखल्यांच्या किचनमध्ये जान्हवी, छोटी आई आणि सरु मावशी एकत्र काम करत असतात. काम करता करता जान्हवी बँकेत बोरकर सरांशी ऑफिस जॉईन करण्याबद्दल बोलत असते. बोरकर सर घरी सगळ्यांची प्रवानगी असल्याची खात्री करुन घेउन जान्हवीला उद्यापासुन ऑफिस जॉइन करण्यास सांगतात. मग तिच्या सासवा तिच्या टिफिनविषयी गप्पा मारतात. इतक्यात श्री घरी येतो. चहाची विचारणा होताच मी फ्रेश होउन चहा घेतो अस सांगुन जान्हवीशी त्याला महत्त्वाच बोलायच आहे अस सांगुन तिला खोलीत बोलावतो. दोन्ही सासवा यावरुन तिची यथेच्छ चेष्टा करतात. खोलित श्री पिंट्या भेटायला आल्याच सांगतो.....

इथुन पुढे नाही बघता आल, :-(: कारण यानंतर आम्ही बाहेर गेलो..... कुणी बघितल असल्यास प्लीज टाका इथे.

श्री, जान्हवीला त्याच्या आणि पिंट्याच्या भेटीचा वृत्तान्त देतो. मुलीची/बाईची भानगड नसल्याची खात्री देतो. जान्हवीच्या आईवडिलांसाठी घर शोधण्याचा श्रीचा कार्यक्रमही भरधाव वेगात आहे. त्यांच्यासाठी तळमजला किंवा पहिल्या मजल्यावरचे घर तेही आमच्याजवळचेच हवे आहे. तसे घर मिळाले आहे. जान्हवीचा या सगळ्याला विरोध करायचा प्रयत्न आणि श्रीचे तो विरोध गोड बोलून किंवा पुढे ढकलून डावलणे चालू आहे.
बेबीआत्या आणि आईआजी ऑफिसच्या अकाउंट्सचे ऑडिट करताहेत. गेल्या वर्षभरात नंदनने किती रकम कर्जाऊ घेतली, काहीही परतफेड केली नाही,शेवटच्या पन्नास हजारांची नोंद नाही. इ. यावरून श्रीच्या एचार पॉलिसीजची, एप्लॉयी वेल्फेअरच्या कल्पनांची चर्चा.
श्री आणि आईआजीने एकत्र बिझिनेस सांभाळलेला आहे, तिथे पूर्वी दोघांचे वाद झालेले आहेत, पण त्याने ज्याप्रकारे उद्योग वाढवला ते पाहून आईआजींनी त्यातून अंग काढून घेतले इ. इतिहास कळतो.
आईआजी नंदनला घरी बोलवून पन्नास हजाराच्या लेटेस्ट कर्जाऊ रकमेबद्दल चौकशी करणार आहेत.
पुढच्या भागाच्या क्षणचित्रांत आईआजींना भेटायला जाणार्‍या नंदनला श्रीने त्याबद्दल काहीही कल्पना दिलेली नसावी असे दिसते.

हा वृत्तान्त . आता कमेन्ट : आधीच्या भागात पन्नास हजार, कलावतीबाईंची बिले भरणे याबद्दल श्रीने दिलेले स्पष्टीकरण आईआजींनी पटले असे दाखवले असले तरी ते फक्त दाखवलेच असावे असे दिसते.

त्यापुढे.....

मोठी आई अन बेबी आत्या पिंट्या बद्दल बोलत असतात. मोठी आई सांगते कि तिला जान्हवीचे म्हणने पटले कि तो थोड्या वेळासाठी आला होता आणि रात्र होती म्हणून न भेटता गेला. त्यावर बेबीआत्या म्हणते कि पण इतक्या रात्री तो बाहेर करत काय होता? तेव्हा मोठी आई सांगते कि, 'मी तिला समजावले त्याला सांग इतक्या रात्री बाहेर भटकू नये...तुझे बाबा त्याला काहिच बोलत नाही का? त्यावर ती बोलली कि तो बाबांचे ऐकत नाही'....बेबी आत्या बोलते, 'त्यांच्या घरात एक माणूस धड नाही. संस्कारच नाही अजिबात.' मग मोठीआई जरीची साडी अन चंद्रहाराचा विषय जानू कडे काढल्याचे सांगते. सगळे माहित असूनही उगाच वादाचा विषय नको म्हणून आई गप्प आहे ते श्रीसठी. त्यामुळे ते आई ला अजिबात आवडणार नाही आणि आपणही गप्प बसायला हवे असे बेबीआत्या सांगते...त्यावर जानूशी जास्त न बोलण्याचा सल्लाही देऊन जाते.

इकडे ऑफिसमध्ये नंदन भा. मॅडमनी घरी बोलावले आहे असे श्रीला सांगतो...अन श्री त्याला घरी पाठवतो.

आज जानूचा ऑफिसचा पहिला दिवस. सरु आणि शरु आरतीचे ताट करून तयार असतात. ती खाली आल्यावर तिला ओवाळतात. तेव्हा आई आजी खाली येते अन चहा मागते. शरु चहा जानूच्या हातात देऊन तिला आईला चहा देण्यास सांगते. जानू आई आजीला चहा देऊन नमस्कार करते...आजीचा "मोठी हो" असा आशिर्वाद ऐकून सगळ्याजणी खुश होतात.

जानू जाताना नंदन तिथे येतो. आजी त्याला त्यांच्या खोलीत बोलावते. शरु नंदनला त्याला का बोलावले? त्याने काय केले? त्याचे आता काही खरे नाही असे बोलून त्याला घाबरवून सोडते.

जानूच्या ऑफिसमधे सगळे खूश. मैत्रिणींची गळाभेट होते. जानू नसताना कामाचा खोळंबा, बोरकर सरांचे सगळ्यांना ओरडणे अशा गप्पा होतात.

आजी नंदनला आज पर्यंत त्याच्या आई, बहिणीच्या वैद्यकीय खर्चाला, त्याच्या भाच्याच्या शिक्षणाला (त्याच्या ४ वर्षाच्या नोकरीत) श्रीने पैशाची मदत केल्याचे सांगते.. नंदन बोलतो कि त्याने सांगूनही त्याच्या पगारातून श्री एक पैसाही कापत नाही. आजी मग त्याला ५० हजार का घेतले ते विचारते. पण नंदनला त्याबद्दल काहिच माहित नसते व तो मी नाही घेतले असे सांगतो. पण आजीने परत विचारल्यावर श्री खोटा पडू नये म्हणून नंदन ते पैसे घरासाठी घेतल्याचे कबूल करून लवकर परतफेड करण्याचे आश्वासन देऊन जातो.

जानू इकडे ऑफिसमध्ये तिच्या कौतुकाला 'काहिही- काहिही' करत असते. मग सरांना ती आता कामाला येणार ते सांगते.

श्री नंदन्ला विचारतो कि आजीने कशाला बोलावले होते? तर नंदन त्याला काहिच सांगत नाही.

हा श्री एव्हढा हुश्शार आहे तर खोटे बोलल्यावर योग्य ते सेटिंग का करत नाही.....स्वतः तर खोटे बोलतोच आहे पण आता बाकिच्यांना सुद्धा बोलायला भाग पाडतो.

नंदनला आईआजींनी बोलावले हे श्रीला कळले तेव्हा त्याच्यासमोर कोणी क्लाएंट बसला होता. त्याच्यासमोर नंदनला खोटारडेपणा कर हे सागणे त्याला शक्य झाले नसावे. आईआजी डायरेक्ट नंदनला बोलावतील असे वाटून आधीच सेटिंग करायला तो सराईत खोटारडा नाही ना.

काल शरू आणि सरू शाळकरी मुलींसारख्या खिदळत होत्या. आईआजींनी जान्हवीच्या हातचा चहा, तिचा नमस्कार स्वीकारून तिला आशीर्वाद दिला तेव्हा शरूने ऑल्मोस्ट उड्या मारत टाळ्या वाजवल्या Lol

काल मि. बोरकर श्रीबद्दल 'मोठ्ठा माणूस' म्हणायची वाट बघत होतो.

मस्त अपडेट्स सोनालि. पण हा एपि म्हणजे अगदीच फुसका बार निघाल्यासारखा वाटला.... जाहिरातीवरुन तरी अस दिसत होत की नंदनकडुन भागिरथीबाई खर काय ते काढुन घेतील, पण तो सुद्धा शिवदेबाईंसारखा श्रीचा चमचा निघाला आणि श्री साहेबांना वाचवण्यासाठी खोट बोलला. भागिरथीबाईंनीही त्याच्यावर विश्वास ठेवला. अचाट आहे.

जाहिराती मध्ये जान्हवी तिच्या आईला ठणकावून सांगते, 'मला माझ्या सासरी ताठ मानेन जगायचं. या पुढे तू माझ्या खेरीस माझ्या घरच्यांपैकी कोणाकडनहि पैसे मागितलेले मला चालणार नाहीत.' भारी....मस्त!!

जाहिराती मध्ये जान्हवी तिच्या आईला ठणकावून सांगते, 'मला माझ्या सासरी ताठ मानेन जगायचं. या पुढे तू माझ्या खेरीस माझ्या घरच्यांपैकी कोणाकडनहि पैसे मागितलेले मला चालणार नाहीत.' भारी....मस्त!!>>>>> हो हो, ते पाहुन टिव्हीत जाउन तिची पाठ थोपटाविशी वाटली...... अग पण त्याआधीच्या जाहिरातीत श्री जान्हवीला म्हणताना दाखवला आहे की "मी तयार केलेल्या ट्रॅपमध्ये मीच अडकत चाललो आहे." काय होईल आता?

बादवे, मधुरा आहेस कुठे अग तु? कित्ती दिवसांनी दिसलीस?

नमस्कार....."होसूमीयाघ' प्रेमी रसिक.

~ पाच दिवसांची काहीशी दीर्घ स्वरूपाची सहल आटोपून मी आज दुपारी १२.३० वाजता घरी आलो आहे. आल्याआल्या मुग्धा, भरत, सोनाली यानी लिहिलेले अपडेट्स वाचले....खूप समाधान झाले हे सांगणे अगत्याचे आहे. हे सारे भाग चुकले माझे....पण नाईलाज....प्रवासात कार्यक्रमाच्या वेळेत असे बाहेरच होतो....[ तरीही जान्हवीचा बॅन्केतील पहिला दिवस....गीताशी भेट....बोरकारांचा हसरा आवाज....ह्या गोष्टी हुकल्या, त्याची हुरहूर वाटते आहे....पण आज रीपिट कार्यक्रमात पाहता येईल...]

वेल....आज रात्रीपासून मी लिहायला सुरुवात करतो....जर तुमच्यापैकी अन्य कुणाला लिहायची इच्छा असेल तर जरूर मला सांगा....मी थांबेन, कारण दोघांदोघांकडून अपडेट येण्यात काही अर्थ नाही.

थँक गॉड मामा तुम्ही आलात.... आता जरा हा धागा जिवंत होईल नाहितर अवकळा आली होती धाग्याला. तुमच्यासारखे खुसखुशीत अपडेट्स नाही हो देता येत....

मुग्धा.... बिलिव्ह मी.... तू जसे लिहिले आहेस तसेच मी लिहित आलो आहे अपडेट्स.....तुझेही लिखाण खुसखुशीतच आहेत.... त्यामुळे माझ्या त्या लिखाणाला कसली वेगळी चमकणारी किनार आहे असे बिलकुल मानू नकोस. मला दीर्घ लिहायचा कंटाळा अजिबात येत नाही, त्यामुळे तिथे लिहिते राहणे मला खूप आवडते....इतकेच.

अन्जू....थॅन्क्स, मी ठीक आहे... उलटपक्षी चारपाच दिवसांच्या फिरतीमुळे बरेच वाटले....सोबतीला मित्रही होते. त्यामुळे मजेत झाले सारे प्रवास.

तू जसे लिहिले आहेस तसेच मी लिहित आलो आहे अपडेट्स>>>> नाही नाही, तुम्ही जसे लिहिता तसे लिहायचा माझा प्रयत्न होता तो Happy बर ते जाउदे प्रवास कसा झाला तुमचा? आणि तब्येत कशी आहे?

प्रवास धमालीचाच होता मुग्धा..... शेतकरी आंदोलनामुळे कोल्हापूर ते औरंगाबाद इथे झालेल्या हिंसक दगडफेकीमुळे आम्हाला औरंगाबादकडे न जाण्याचा सल्ला मिळाला, त्यामुळे आम्ही ते लग्न टाळले आणि मुलीला एसएमएसद्वारे शुभेच्छा दिल्या..... कराडपर्यंत आलोच होतो, पुढे जायचे नाही म्हणून मग महाबळेश्वरला गेलो....तिथे यथेच्छ भटकंती केली आणि वाईला मुक्काम केला.....वाईवरून मग पुण्यनगरी.... तिथे आम्हा कोल्हापुरी ग्रुपचे गटग झाले....मल्टीस्पाईस हॉटेलमध्ये....खूपच मजा आली....भाचेभाच्या खुश होते अगदी. मुंबई, शहापूर, ठाणे इथूनही सदस्य आले होते. रात्री आपापल्या घरी परतल्यानंतर आम्ही दोघे कराडला परत आलो....मी तिथेच मुक्काम केला आणि सकाळ झाल्यावर तिथून कोल्हापूरला.

तब्येतही छान राहिली....हे विशेष....गोळ्या खायचा कंटाळा आला होता....पण खाल्ल्या.

मी सध्या गझल करण्याच्या / शिकण्याच्या मागे लागलीये. म्हणून मालिकेपेक्षा जास्त लक्ष मात्रा, काफिया याकडे आहे. बाय द वे, अशोक मामा, मुग्धा दि, कसे आहात दोघे?

तिथे आम्हा कोल्हापुरी ग्रुपचे गटग झाले....मल्टीस्पाईस हॉटेलमध्ये....खूपच मजा आली>>> मी येणार होते या गटगला पण ऐनवेळी कॅन्सल झाले. सो मजा मिस केली.....

मधुरा, मी मजेत आहे. तु कशी आहेस? आणि हो मला नुसत मुग्धाच म्हण दि वगैरे नक्को

बर....मी मस्त...सध्या सुट्टी सुरु आहे...म्हणून जरा गझलेच्या मागावर आहे. नंतर परत कॉलेज आहेच....सुट्टीत सिनेमा, टीव्ही, मोबाईल वागैर्व चालू आहे.

Pages