नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परन....

शशीकलाबाईचा स्वभावच गोंधळ घालण्यासारखा आहे आणि ते पात्र त्याच ब्रशने रंगविण्यात येत आहे, हे ठीक. पण ज्या उद्योगधंद्याची कोटीची उलाढाल आहे, जो धंदा आजीने कर्तबगारीने शून्यातून मोठा केला आहे, तिथे आता मुख्य व्यक्ती म्हणून काम करणारी व्यक्ती....जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून एम.बी.ए. झाली आहे.... पैशाबाबतीत इतकी दुधखुळी बघणे क्लेशदायक वाटते. त्याने निदान 'तुम्ही द्या ती बिले, मी भरतो.... पण रोजच्या खर्चासाठी जर मी तुम्हाला काही रक्कम द्यायची असेल तर त्याबाबतीत मला आजीशी बोलावे लागेल, जान्हवीला सांगावे लागेल...." अशा सबबी पुढे करणे त्याच्या दर्जाला शोभले असते.....पण नाही, पन्नास हजार आणतो काय, पाकिटात घालून सासूला देतो काय....सारेच अनाकलनीय.

इकडे प्रत्यक्ष जीवनात आम्ही बाईकच्या चाकात हवा भरायची झाल्यास ज्या ठिकाणी २ रुपये बोर्ड लावला आहे तिथे न जाता १ रुपया कुठे आहे का ते प्रथम पाहतो....आणि इथे तर आलीया सासू म्हणून पन्नास पन्नास हजार ?

खरे आहे जगावेगळा जावई.....
श्री खरंच इतका बावळट कसा आहे.....

इकडे प्रत्यक्ष जीवनात आम्ही बाईकच्या चाकात हवा भरायची झाल्यास ज्या ठिकाणी २ रुपये बोर्ड लावला आहे तिथे न जाता १ रुपया कुठे आहे का ते प्रथम पाहतो....आणि इथे तर आलीया सासू म्हणून पन्नास पन्नास हजार ?>>>> अगदी बरोबर...पैसे देणार ते देणार वर जान्हवीला सांगणार नाही....म्हणजे पुढे जाऊन याचा जान्हवीलाच त्रास होणार...

[जगावेगळा जावई....खरेच] <<< त्याच काय जातय Wink

जान्हवीचा आजचा ड्रेस्स चांगला होता. (आधीच्या मानाने)

किचन बाहेर आली आहे सिरीयल. त्यामुळे आजचा भाग बरा वाटला.

देअर यू आर अदिति....

किचन बाहेर आली आहे सीरिअल...... येस्स, त्यामुळे मलाही इतका हर्ष झाला की पूछो मत !

एरव्ही ऑफिसमधील त्या शिवदेमॅडमना पाहिले की ही बाई जान्हवीच्या विरोधात आणि सायलीच्या बाजूने आहे म्हणून राग यायचा.....पण काल त्याना पाहताक्षणीच त्यांच्याविषयी आपुलकीच वाटली एकदम. कंटाळा आला होता त्या पाचजणींचा स्वयंपाकघरातील कलकलाट पाहून पाहून.

मी श्रीला एका शिरेलीत सफाचाट असलेला पण पाहीला आहे >>>> मला वाटलं हीच श्रीची पहिली मालिका आहे. कुठे काम केलंय याअधी त्याने?>>>> त्याची पहिली मालिका म्हणजे ई मराठी वरची "कालाय तस्मै नमः" त्यात त्याने विक्रम गोखलेच्या नातवाच काम केल आहे आणि या मालिकेतले सासरे तिथे त्याचे वडील झाले आहेत.
परन सुवासिनी मध्ये पण त्याची आधी मिश्या आणि मग दाढी दाखवली होतीच पण कालाय तस्मै नमः मध्ये एकदम सफाचाट

अगदी खरय मामा. एक बिझनेसमन म्हणुन त्याला माणस ओळखता आली पाहिजेत, नाहीतर बुडीत खात्यात जायचा धंदा.

वॉव्व !!!! मुग्धा रानडे म्हणजे सीरिअल्सचा एनसायक्लोपिडीयाच आहे ! ग्रेट.

मी श्री आणि जान्हवी याना इथेच प्रथम पाहिले.

काल शशीकलाबाई चे बोलणे पाहुन माझा नवरा तर इतका चिडला होता .... ते बघुन मला हसायला येत होते.:) Happy Happy

पैशाबाबतीत इतकी दुधखुळी बघणे क्लेशदायक वाटते.>> मला तरी श्री शशीकलाबाईंना आजमावत असेल असं वाटतंय. 'माझ्या मोबाईलमधला बॅलन्स संपलाय' असे त्या म्हणताक्षणी श्रीच्या चेहर्‍यावरचे भाव 'बऽऽऽरं!' अश्या प्रकारचे होते.
त्याने जे काही केलं ते विचारपूर्वक केलं असेल असं आत्ता तरी वाटतंय. पुढे कळेलच की त्याची ही कृती विचारपूर्वक केलेली होती की जान्हवीच्या प्रेमापायी आंधळेपणाने केलेली होती.

paN shivade baI pan bhagirathI madam cha sollid mottha chamachaa aahe... evdha tevdha khutt zala ki lagech madam na phone.. sayali aali.. phone.. sadee nesun aali phone.. shree hasla.. phone.. nandan la premabaddal vicharla.. phone.. mazya dokyat jato to chamachaa...

serial kitchen chya baher aali te besht zaale...

ro.Ha. sutty sampavoon parat aalyaa bahutek Happy

पैशाबाबतीत इतकी दुधखुळी बघणे क्लेशदायक वाटते. >>> मामा...श्री ला खुप वाईट वाटले असणार . त्यानची एकटी कमवति मुलगि मि लग्न करुन घेउन आलो .....आनि आता त्यांचे खुप हाल होत आहेत.

सृष्टी....

तुझा मुद्दा मान्य.... पण म्हणून इतक्या शिकलेल्या....बिझिनेसमध्ये पदवी मिळविलेल्या युवकाने सासू घरखर्चासाठी पैसे मागते म्हणून चक्क पन्नास हजार देणे....ही बाब न पटणारीच आहे. त्याने लग्नापूर्वी जान्हवीला नकळत बोरकर यांच्यामार्फत ऑपरेशन खर्चापोटी दोन लाख दिले होते....ते पटले, कारण एकतर तिच्यावरील प्रेम आणि ऑपरेशनशिवाय ती लग्नाचा विचार करूच शकत नसते.

मुळात म्हणजे असे हपिसच्या अकाउंट मधून घरच्या/ स्वतःच्या खर्चासाठी पैसे उचलता येत नाहीत.
ऑडिटर फाडून खातात. हा गृहौद्योग म्हणजे नक्की काय आहे? कि असेच प्रोप्रायटरी कन्सर्न? सबकुच्च हमाराइच टाइप? तो क्लायट मीटिन्ग म्हणजे कुठे गेला असेल? एखाद्या सुपरमार्केट च्या हपिसात? माल सप्लाय करायची बोलणी करायला? आव तर अगदी आय टीतल्या माणसाचा असतो.
ऑफिस चांगले आहे बाकी. आणि सर्व बाया श्री जानवीला बाळ बाळ काय म्हणतात? पंचविशीचे तरी असतील ना दोघे?

शिवदे बाईंचे काम आणि एकूण प्रतिक्रिया बरोबरच वाटल्या. त्या पोस्ट्वर अशीच व्यक्ती पाहिजे.
आई वैताग आहे मुलगी रडकी आहे बाया पीळ आहेत.

तुम्ही नोटीस केले आहे का? श्रीच्या चेहृयाचा मेकप दाढीच्या आत एक शेड जास्त गोरा दिसतो.
मानेकडे, दाढीच्या खाली वगै रे नॉ र्मल स्किन कलर! असेका बरे?

वॉव्व !!!! मुग्धा रानडे म्हणजे सीरिअल्सचा एनसायक्लोपिडीयाच आहे ! ग्रेट.>>>> अहो मामा या दोन्ही मालिका मी आवडीने पहात होते म्हणुन लक्षात आहेत हो.... कालाय तस्मै नमः ही हिंदी चित्रपट "भुलभुलैया"च्या कथानकावर आधारलेली होती आणि पत्रिका, पुनर्जन्म वगैरे गोष्टींमध्ये सासर्‍यांना रस असल्याने पिनड्रॉप सायलेंस वातावरणात ही बघितली जात होती. सुवासिनीच्या कथेचा प्लॉट जुन्या काळचा होता नउवारी साड्यांमधल्या सुनांचा वगैरे असल्याने साबांच्या आवडीची होती, म्हणुन ती बघितली जात होती.

मुळात म्हणजे असे हपिसच्या अकाउंट मधून घरच्या/ स्वतःच्या खर्चासाठी पैसे उचलता येत नाहीत.
ऑडिटर फाडून खातात.>>> 'ड्रॉईंग्ज' हा कन्सेप्ट माहित करून घ्यावा. धन्यवाद!

पण श्री आपल्या पर्सनल अकाउंट्मधून काढतो ना पैसे? Uhoh
असेच काहीसे शिवदे मॅडम सांगतात आईआजीला, असे आठवते आहे.

अगदी अपेक्षित अश्याच वळणाला लागली आहे आता मालिका ( आणि धागाही. :))

पण श्री आपल्या पर्सनल अकाउंट्मधून काढतो ना पैसे? >> होय पर्सनल अकाऊंटमधून काढतो.

न न न..नॅचरल्स आइसक्रिम घरच्या घरी खाईन...
साजुक तुपातला शिरा करुन खुप दिवस झाले..केला पाहिजे...

कंटाळा आलाय मालिकेचा
तेच तेच आहे सगळं
मला वाटलं यात तरी काही तरी चांगलं येईल Sad
यापेक्षा एलतिगोच बरी

अश्विनीमामी....

श्री....२८ वर्षाचा तर जान्हवी २५ वर्षाची आहे....असे उल्लेख अगोदरच्या भागात दोनतिनदा येऊन गेले आहेतच. त्यामुळेच म्हणावेसे वाटते की इतका मॅच्युअर युवक इतक्या बालिशपणे व्यवहार कसे करेल ? शिवाय अशा बाईशी की जिने लग्नापूर्वी त्याला घरात येऊ नका तुम्ही आमच्या....तसेच जान्हवीला भेटल्याचे मला आवडणार नाही अशी धमकीही दिली होती......लग्नात चंद्रहार चोरीला गेला होता....तो कुणी उचलला असेल याचाही अंदाज याला यायला नको का ? ते नाही....उलटपक्षी हाच त्या नंदनला सांगून त्याच सोनाराकडून तात्काळ तसला आणून देतोही जान्हवीला...!

[आता आला आहे सोनार बिल घेऊन.....मग नेहमीचेच जान्हवीच्या नावाने कोकलणे सुरू होणार गोखल्यांच्या घरी....तिला बिचारीला यातील काहीच माहीत नाही....आहे एक नंबरी रडारड परत]

सिरियलमधे काही नियम असतात बहुतेक
की आलेल्या कोणत्याही संकटाला आपण एकट्यानेच सोल्यूशन काढत बसायचं. इथे हा श्री
तिकडे तो आयमाय ढगे. माकड दवाख्यानात तर त्याचे सर्व खर्च याने घर आणि दुकान विकून केले. घरच्यांना चकार शब्दाने कल्पना न देता.
श्रीला आजीचा स्वभाव माहित असून तो अशी रिस्क घेऊन जान्हवीसाठी जगणं मुश्किल करतोय. वर म्हणतोय मी आजिला जिंकणार? Uhoh कसं?

श्री ह्या मालिकेआधी 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकेत होता (व्हीलानिश रोल).

श्री ह्या मालिकेआधी 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकेत होता (व्हीलानिश रोल).>>> हायला. खरच? अन्जु जरा सांगशिल त्याच्या रोलबद्दल?

Pages