नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि भाजी होय्,नाय बा.. न्हाई म्हाइत...!! Thank you मामा फोटुबद्द्ल Happy तुम्ही अगदी तातडीने माझ्या इवल्या मेंदुत भर घालण्यासाठी धावपाळ केली.
ही भाजी मंडिईत मिळत असेल.माझं पालेभाजीविषयी अगदिच सामान्य ज्ञान आहे,मेथी,कांदापात्,पालक ,शेपु,लाल/हीरवा माठ यानंतर माझी वीकेट पड्ते! Lol

तमाम कोल्हापुरवासीय (आणी खाद्यप्रेमीनां) अभीमान वाटावा अशी Good News!

http://maharashtratimes.indiatimes.com/global-maharashtra/Indian-boy-dom...

पोकळा म्हणजे हिरवा माठ>>> हिरवा माठाचे देठ हिरवे असतात...पुण्यात ही भाजी मी कधी पाहिली नाही.

वाईत सुद्धा पोकळा म्हणुनच फेमस आहे ना?
वाईवरुन येताना खामकरांचे पेढे आणि पोकळा आणण्याचं कंपल्शन आहे आमच्यात
माझीही फेव्हरेट

दक्षे..... मी एक नंबरची पोकळ्याची भाजी करतोय.... तुला ज्यावेळी पाहिजे त्यावेळी सांग, मी करून देतो तुला....भाजी आणि कढई दोन्ही चाटुनपुसून खाशील....आय गॅरंटी...!

वेकेट >> Lol Rofl

अरारा सून त्या घरची झाल्यावर लग्गेच किचनला जुंपली क्कॉय??? आता झालं ताई, माई, आक्का पुढच्या भागात पोकळा निवडताना भाजीची रेशिपी पण शेअर करतील... "काय गं शरे तुला दाण्याचा कूट करून ठेवायला सांगितलेला ना? विसरलीस..." इ. इ.

अगागा.....!!! दक्षे, सार्‍या पोरी येड्या झाल्या की काय....ह्या भाजीपोटी ? तुच सांभाळ आता याना.

पोकळा म्हणजे काय? मी विचारणारच होते, आम्ही हिरवा माठ म्हणतो. आमच्याकडे लाल माठ पण मुबलक मिळतो.

मामा, माठाची भाजी आणि भाकरी यांचा मस्त शाकाहारी बेत आणि मला विसरलात बोलवायला. (मजा केली, आज संकष्टी आहे.)

श्री दाढीतच छान दिसतो, विदाऊट दाढी आवडणार नाही कदाचित.

दक्षे..... यू मीन....मी पोकळा कोल्हापुरातून घेऊन येऊ ? कमाल झाली तुझी ! मला तुमच्या पुण्यातील म.फुले मंडई माहीत आहे....तिथे जाऊन भाजी घेऊ या....आणि मग तुझ्या घरात देतो तुला शिजवून....बस खात दिवसभर.

मायबोलीच्या इतिहासातील सर्वाधिक भरकटलेल्या धाग्यांच्या स्पर्धेत या धाग्याला सर्वोच्च स्थान मिळायला हवे. Light 1

गोकुळमध्ये श्री बाबांचा नाष्टा सुरू आहे....>>>>>> गोकुळमध्ये श्री बाळाचा नाष्टा सुरू आहे....

हे जास्त सूट होतंय ना? :फिदीफिदी:

भरत....झाले असे की मालिकेचे कित्येक भाग "स्वयंपाकघर" या मर्यादेच्या बाहेर यायला तयारच नाही...मी खुद्द त्रासलो होतो....किती दिवस अजूनी घेणार देवस्थळी...त्या सहा बायकांच्या पंजातून जान्हवीला बाहेर काढण्यासाठी ? असेही दिसू लागले की मोठाले अपडेट्स इथे देवूनही प्रतिसादकांना मालिकेची गती कमी वाटत आहे....मग आत्या त्या स्वयंपाकघराच्या अनुषंगाने भाजी हा विषय इथे आला....मग चालू झाली चर्चा.... काहीसा बदल म्हणून.

पण आता होणार नाही....कारण, आजच्या भागात सोनार दागिन्यांचे बिल घेऊन आला आहे...आणि बेबीआत्या, इंदूबाई आणि आजी....आकडा पाहून घर डोक्यावर घेणारच आहे...नवीन काहीतरी घडेल.

याची....>>>> मी श्रीला एका शिरेलीत सफाचाट असलेला पण पाहीला आहे >>>> मला वाटलं हीच श्रीची पहिली मालिका आहे. कुठे काम केलंय याअधी त्याने?

गुरुवार दि. २१ नोव्हेंबर २०१३ : अपडेट

~ आजपासून मालिका अ‍ॅक्शनपॅक्ड होईल असा अंदाज वर्तवायला काही हरकत नाही. शेवटी कथानकाची गाडी किचनमधून बाहेर पडली आणि आमनेसामने पत्ते आता पटलावर यायला सुरुवात होईल. जान्हवी अजूनही पिंट्याच्या चिंतेत आपल्या खोलीत बसून आहे आणि तिची चौकशी करायला अगत्याने शरयू आणि मावशी तिथे येतात.....विचारतातही मुकाट बसण्याचे कारण....पण जान्हवीची तीच रेकॉर्ड...."काही नाही, असेच काहीतरी.... पिंट्याचा विषय डोक्यात आहे...." यावर मावशी 'म्हणजे त्याच्या लग्नाचा विषय डोक्यात आला आहे का तुझ्या? तू इकडे आल्यामुळे घर रिकामे झाले असेल ना...म्हणून". पण शरयूला ते कारण पटत नाही, म्हणून आपुलकीने जान्हवीला अगदी खोलवर विचारते....दोन्ही सासवांची माया पाहून जान्हवीला हुंदका फुटतो आणि ती शेजारी असलेल्या सरस्वतीमावशीच्या कुशीत शिरते....रडू लागते.

इकडे बेबीआत्या आणि इंदूबाई यांची वेगळीच बैठक चालू आहे....आणि त्यांचा ठरलेला पेटंट विषय : जान्हवी. ही इंदूबाई तर अशुभ बोलायचे टेन्डर घेऊन आली आहे असेच दिसते. जान्हवीला बोल लावणे ठीक आहे; पण मध्येच ही बाई म्हणाली, "मग, अशा या जान्हवीसोबत आपला श्री राहाणार ?"....याला उत्तर म्हणून बेबीआत्या "ते श्री ठरवू देत...आपण मात्र एकत्र राह्यचे हिच्याबाबतीत...' बोलणे चालूच आहे तोपर्यंत मावशी आत येते, म्हणते "बाहे ज्युवेलर्सचा माणूस आला आहे. बिल आणले आहे असे म्हणतोय...." त्यावर या दोघी..."कसले बिल ? लग्नातील ?" आता या विषयावर वाद चालू राहील उद्यापासून.

गोखले गृहउद्योग कार्यालय...बर्‍याच दिवसांनी शिवदे मॅडम दिसल्या.....आणि स्टाफ कामात आहे. श्री मीटिंगमध्ये व्यस्त आहे....अशावेळी ऑफिसमध्ये शशीकलाबाई येतात. सार्‍या ऑफिसवर आपलेच राज्य आहे अशा आविर्भावात शिवदेमॅडमना इकडचेतिकडचे विचारून "मी या कामासाठी तुमच्याकडे आले होते की आमची कमावती मुलगी जान्हवी तुमच्या श्री ने पत्नी म्हणून इकडे आणली आणि आमचे हाल चालले आहेत. तेव्हा ही काही बिले आहेत ती तुम्ही तुमच्या उद्योगसमूहाचा माणूस पाठवून भरून टाका....". शिवदेमॅडम थक्कच होऊन जातात ह्या बाईचे आगाऊपणाचे वर्तन पाहून. त्या सांगतात "मला असला कसलाही अधिकार नाही. तुम्ही ही बिले आणि अन्य खर्च याबद्दल श्री सरांना सांगा..." मग यावर 'लावा त्याना फोन मी बोलते"; "अहो ते मीटिंगमध्ये आहेत, फोन लावता येत नाही..." तरीही ही बाई फोनबाबत आग्रह करतेच....नाईलाजाने शिवदेमॅडम फोन लावतात. पण श्री फोन घेत नाही...उलट मीटिंग संपल्यानंतर बाहेर येऊन शिवदे मॅडम यांच्याकडेच त्याबाबत खुलासा मागतो. शिवदेमॅडम त्याच्या सासूबाईकडे बोट दाखवितात....श्री एकदम नरम पडतो....आपल्या ऑफिसमध्ये त्याना घेऊन जातो...त्यांची चौकशी करतो....शशीकलाबाई नाटक करण्यात वाकबगार असल्याने अगदी डोळ्यात व्यवस्थित पाणी वगैरे आणून "आमचे घर कसे चालणार ? एकुलती एक कमावती मुलगी तुम्ही करून आणलीत...मुलगा काम करीत नाही...यांच्याकडून काही काम होत नाही... त्यातच चाळ पाडली जाणार.....लाईट नाही, बिल भरलेले नाही म्हणून तोडली आहे...." इ.इ. ~ श्री या भडीमारापुढे सर्दच होतो....सासूबाईला शांत व्हायला सांगतो.....बिले मागवून तर घेतोच...ती आम्ही भरतो असे सांगतो....वरतून तुम्हाला रोजच्या खर्चासाठी काही रक्कम लागणार असेल तर तेही सांगा अशी सूचना करतो....[जगावेगळा जावई....खरेच].... शशीकलाबाईच्या तोंडाला पाणी सुटते....त्या विचार करू लागतात. किती सांगावे ? पाच हजार की दहा हजार...नको नको दहा हजार जास्त वाटतील...पाचच सांगू या... इतका विचार करून हळून पंजाची पाच बोटे त्या श्री ला दाखवितात....श्री ते पन्नास हजार समजतो....

शिवदेबाई बंगल्यावर आईआजीना फोन करतात, "श्री सरांनी मला बॅन्केतून पन्नास हजार रुपये काढायला सांगितले...." आजी गोंधळून विचारतात, "कशासाठी ?" तर "ते पैसे त्यानी जान्हवीच्या आईना पाकिटात घालून दिले...".

उद्या याचा भडका उडेल.

मला वाटलं हीच श्रीची पहिली मालिका आहे. कुठे काम केलंय याअधी त्याने?>>>> स्टार प्रवाह वर "सुवासिनी" नावाच्या मालिकेत त्याने तुषार दळवी च्या मुलाचे काम केले होते....

[जगावेगळा जावई....खरेच]..>>> खरेच.....शशिकलाबाई खूप गोंधळ घालणार असे दिसत आहे....

Pages