नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"गोकुळ" बंगल्यात श्री व्यतिरिक्त अन्य पुरुष दाखविलेलाच नाही.... सुरुवातीला [पहिलाच भाग १५ जुलैचा] श्री जॉगिंग करून घरी येतो त्यावेळी बंगल्याच्या आवारात असलेल्या फुलझाडांना पाणी घालणारा एक "पांडुदादा" दाखविला होता....त्याला श्री हाक मारतो, गुड मॉर्निंग म्हणतो....तिथून आत येताना श्री च्या पायाला ठेच लागते व रक्त निघते....श्री कळवळतो, त्या क्षणी सहाही आया पी.टी.ऊषाच्या वेगाने विविध ठिकाणाहून तिथे येऊन श्री ला किती लागले याविषयीची वांझोटी चर्चा, शरयू विसराळू आहे हे माहीत असूनही तिलाच मलम आणायला पाठवितात आणि ती नेहमीच्या रिवाजानुसार आत जाते व रिकाम्या हातानेच परत येत.....दुसरीकडे तिथेच बेबीआत्या त्या पांडुदादाला बेजबाबदारपणे दारात साहित्य टाकले असल्याबद्दल बोल लावते, श्री तिचे मत खोडून काढतो....आणि त्या पांडुदादाला तिथून जाण्यास सांगतो..... एकदोनदा वॉचमनचा उल्लेख आलेला आहे, प्रत्यक्षात एकदाही वॉचमन दिसलेला नाही.

बस्स.....त्यानंतर तिथे आलेला दुसरा पुरुष म्हणजे अनिल आपटे हाच.

हे अगदी "बिनधास्त" सिनेमा मध्ये जसा एकच पुरुष दाखवलाय तसच संपूर्ण बंगल्यात या सगळ्या श्रीमती/सौ/कु. मध्ये एकच "श्री".

चाणाक्ष आजीला एकदाही वाटले नाही कि या अनिल आपटेची माहिती काढावी.....

अजूनही तसेच चालू आहे..नाव न घेता बोलत रहायचे. आपटे इतक्यावेळा घरी येऊन गेला तरी एकाही बाईने श्रीला त्याच्याबद्दल सांगितले नाही. श्रीला सुद्धा लिंक लागत नाही कि आजी म्हणत होती कि तिचे accountant बरोबर लफडे आहे..तेव्हा तो accountant आहे हा गैरसमज जानू, तिच्या घरचे अन आपटे यांचा होता. त्यामुळे आजी ही माहिती आपटेनी दिली असणार....

'असणार' वरुन आठवले ..श्री असणार च्या ऐवजी 'अशणार' म्हणतो.

श्री असणार च्या ऐवजी 'अशणार' म्हणतो <<< नवीन मराठी आहे हे..
जसं 'प्रश्न' चा उच्चार सर्रास 'प्रश्ण' असं करतात.. बर्‍याच वेळा लिहीतातही तसाच..

सहस्त्रबुद्धे
मी तुझी काय मदत करू शकते?
तुझी मदत आधी तुलाच करायला हवी.
नंदन चहात आलं टाकतो. श्री आणि गोखले निवासातील भगिनी मंडळ चहात आलं घालतं.

भरत....

विजया सहकारी बॅन्केतील शिपायालादेखील जान्हवी ऑर्डर देते...."या कस्टमर्सना चहा घेऊन ये.... आलं टाकून." .... सारी यंत्रणाच चहा पिते तो आलं टाकलेलाच.

anil far mast kam karatoy...ha nat evadhe divas hota kuthe?

पाटीलसाहेब, शारदा नाटकाच्या बाबत कबुल; अहो तो काळ वेगळा होता. पण २१व्या शतकात सुद्धा असे भुजंगनाथ आपटे आहेत हे बघुन जरा विचित्र वाटलं...

बाकि आल्याच्या चहा मागचं कारण बहुदा मुंबई-ठाण्यात अजुन चालु असलेल्या पावसाची रिपरिप, हे असावं... Happy

राज.... "शारदा" काळ आणि विवाह परिस्थिती वेगळीच होती असेच आजच्या पिढीतील युवावर्गाला वाटत राहील. म्हणजे असे की पन्नाशीतील गृहस्थ दुसरेपणावर लग्नाला उभा राहिला तरी त्या पठ्ठ्याला बायको मात्र दहाबारा वर्ष वयोगटातीलच लागे. आज हे वाचताना विचित्र वाटेल पण त्याकाळी ते सर्रास चालत असे, शिवाय मुलीकडील लोकांचीही त्याबाबत काही तक्रार नसे. त्याला प्रमुख कारण म्हणजे त्या काळात मुलीबाबत संसाराची व्याख्या ही 'चूल आणि मूल' इतपतच सीमित होती.

मुलगी आणि शिक्षण हे समीकरण ज्यावेळेपासून अस्तित्वात आले त्यावेळेपासून खर्‍या अर्थाने मुलीला स्वतंत्रपणे आपले व्यक्तिमत्व दाखविण्याची आस निर्माण झाली असे म्हणण्यास हरकत नाही. पतीपत्नीतील वयाचे अंतर किती असावे यावर दस्तुरखुद्द पत्नीही आपले मत मांडू लागल्याचे चित्र निर्माण होत गेले.

मग २०१३ मध्ये जान्हवी मग ५८ वर्षे वयाच्या गृहस्थाबरोबर लग्नास का तयार होते ? तर त्याचे कारण काय आहे त्याचा उहापोह कथानकात झाला आहेच......[जरी बॅन्केत नोकरी करणारी मुंबईतील एक सुशिक्षित मुलगी बापाच्या ऑपरेशनसाठी पैसा स्वतंत्रपणे उभा करू शकत नाही...ही बाब पचनी पडण्यासारखी नसली तरी].

अशोक पाटील

कालच्य भागातल्या अनिल आणि शशिकला यांच्या संभाषणावरून कळले की शशिकलाने अठरा वेळा जान्हवीचे लग्न जुळू दिलेले नाही. मुलाकडच्यांना ती पसंत असायची. पण तिची आई मुलाकडच्यांना आणि आपल्या कुटुंबालाही खोटेनाटे सांगून लग्न जुळू द्यायची नाही. हे सगळे अनिलला माहीत आहे, म्हणजे तो आधीपासूनच यात सहभागी असावा.

कालच्या भागात श्रीने बहुतेक आपल्या ओळखीच्या कोणा पोलिस अधिकार्‍याला अनिल आपटेबद्दल सांगितले आहे.

गोखल्यांच्या घरी आपल्याला वाईट वागणूक मिळाली, आजी आपल्य विरुद्ध आहेत, हे जान्हवीने आपल्या घरी कळू दिले नव्हते.

तिची आई मुलाकडच्यांना आणि आपल्या कुटुंबालाही खोटेनाटे सांगून लग्न जुळू द्यायची नाही. हे सगळे अनिलला माहीत आहे, म्हणजे तो आधीपासूनच यात सहभागी असावा.

>> मलाही हिच शंका आली.. आणि आता तो तिला पुन्हा तेच करायला सांगतो आहे. Sad
पुन्हा अजुन एक एपिसोड..

गुरुवार ३ आक्टोबर २०१३ ~ अपडेट

~ काल चंडिकेच्या रुपात जान्हवी दिसली आणि तिच्या त्या अवताराला साथ दिली ती तिच्या भावाने...पिंट्याने. गल्लीत शिरलेल्या अनिल आपटेने पुन्हा एकदा जान्हवीला अडवून तिची छेड काढली आणि "माझ्यापेक्षा त्या गोखलेंकडे पैसा जास्त आहे म्हणून तू मला सोडून तिकडे चालली आहेस" अशी बकबक सुरू केल्यावर सुरुवातीला त्याला शांतपणे समजाविणार्‍या जान्हवीने मग थेट पोलिसाची भाषा सुरू केल्याचे दाखविल्यावर अनिल आपटे तिचा हात पकडून "ओरड आता किती ओरडायचे तितके....पाहतोच कोणता कृष्ण या द्रौपदीला सोडवायला येतो...' अशी दर्पोक्ती मारतो. नेमक्या त्याच वेळेस पिंट्या तिथे येतो आणि अनिलला दमदार ठोसे लगावून रस्त्यावर फेकून देतो. अनिल आपटे त्यालाही शिव्या द्यायला लागल्यावर जान्हवी प्रथमच मोठ्याने बोलून त्याच्यातील हवा घालविते आणि पिंट्यालाही आवरते. घरी आल्यावर वडिलांना हा प्रसंग अगदी हसतहसत बहिणभाऊ सांगतात. बाबा आनंदित होतात तरीही पिंट्याला कायदा आपण हातात घेऊ नये अशी सूचनाही करतात. आई तिथे येते आणि त्या तिघांचा कशाबद्दल असा आनंदाचा दंगा चालू झाला आहे हे तिला समजत नाही. तितक्यात तिला आपटेचा फोन येतो आणि ती सबब सांगून बाहेर पडते.

इकडे 'गोकुळ" बंगल्यात देवासमोर बसलेल्या श्री कडे आजी येतात आणि त्याला "आता थांबव ती प्रार्थना आणि ऐक....मी विचार केला आहे सार्‍या गोष्टींचा आणि तिच्या बाबाबाबत तुझे म्हणणे मला पटते, म्हणजेच त्यानी ज्या चुका केल्या असतील/नसतील त्याबद्दल मुलीला दोष देण्यात काही अर्थ नाही. तू आमचा होकार कळव त्याना आणि पुढील आठवड्यात तिच्या आईबाबांना घेऊन ये...".... यावर हर्षभरीत झालेला श्री तात्काळ जान्हवीला फोन करून ही गोड बातमी सांगतो....जान्हवीदेखील तिने आणि पिंट्याने केलेल्या अनिलविरुद्ध सामन्याची माहिती देते.....श्री ला ते ऐकून आनंद होतो, पण नंतर काळजीने डीएसपी ना फोन करून अनिल आपटेविरूद्ध तक्रारही नोंदवितो.

आपटे दुसरीकडे जान्हवीच्या आईला बाहेर बोलावून घेऊन ७० हजार रुपये दिल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मोबाईलवर दाखवितो आणि धमकी देतो....'मला पैसे परत नकोत...माझे लग्न जान्हवीशी तुम्ही करून दिलेच पाहिजे......त्यामुळे आता गोखलेंच्या घरी तुम्ही जाऊन अन्य १८ स्थळांकडील स्त्रियांना जान्हवीविरूद्ध तुम्ही जे काही सांगून त्यांचे मतात बदल केले होते, अगदी तसेच श्री च्या आईआजीना जाऊन सांगा..."

यावर धक्क्याने जान्हवीची आई पुतळ्यासारखी स्तब्धच.

गल्लीत शिरलेल्या अनिल आपटेने पुन्हा एकदा जान्हवीला अडवून तिची छेड काढली >>> त्यांच्या गल्लीत किंवा चाळीत (मालीकेत हाच शब्द वापरतात) त्या वेळेस कुणीच कसे नव्हते? आवाज ऐकून खरे तर पाचपन्नास माणासे जमा व्हायला हवी होती.

कालच्या भागात श्रीने बहुतेक आपल्या ओळखीच्या कोणा पोलिस अधिकार्‍याला अनिल आपटेबद्दल सांगितले आहे.>>
माझी पोस्ट वाचली त्यांनी Proud

"....चाळीत (मालीकेत हाच शब्द वापरतात)....."

~ राईट यू आर, नताशा. मुंबईकर "चाळ" असेच म्हणतात....मात्र आमच्या कोल्हापूरात गल्ली हे नाम प्रचलित असल्याने माझ्या लिखाणात तसेच अवतरले.

बाकी तुझे "...त्या वेळेस कुणीच कसे नव्हते?..." हे निरीक्षण योग्यच म्हणावे लागेल. एरव्ही तिथे गजबजाट असतो... जान्हवी मनिषसोबत बोलताना अन्य चाळकरी इकडेतिकडे जाताना दाखविले आहेच....पण काल आपटे इतका मोठ्याने दंगा घालतो....पिंट्या त्याला बदडतो...पण त्यावेळी एखादा इसमही तिथे उपस्थित असत नाही हे पटतच नाही....पण शेवटी टीव्ही मालिकाच !!

मलाही ती गल्लीच वाटली होती. मला वाटत होते की चाळ म्हणजे १ RK वाली सामायीक बाल्कनीवाली मोठी बिल्डींग.

मी नताशा बरोबर, सामायिक बाल्कनी असलेल्या किंवा कौलारू, पत्र्याच्या अनेकजण राहणाऱ्या ठिकाणांना चाळी असे म्हणतात, आणि आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रस्त्यांना मुबई आणि आसपास गल्ली असेच संबोधतात.

जान्हवी राहते ती चाळ/गल्ली मात्र गोरेगाव येथील खरीखुरी आहे....त्यामुळे ते घर व परिसर नकली वाटत नाही. ही बाब तेजश्री प्रधान हिनेच एका मुलाखतीत सांगितली होती....सोबत आशा शेलार {आई}, रोहन गुजर {पिंट्या} आणि संजय देशपांडे {मनिष} ही चाळकरी मंडळीही त्या मुलाखतीत होती.

हो अशोककाका, बरोबर मी पेपरात वाचले कि चाळ गोरेगावची आहे आणि बाकी शुटींग ठाण्यात होते, देऊळ, ठाण्यातील 'उपवन' भागातील दाखवतात.

चाळीतले सगळे 'फू बाई फू' बघण्यात गुंग झाले असतील Wink

जाग असलेल्या ठिकाणी अनिल आपटेने जान्हवीचा हात पकडून पिरगळण्याचं धाडस केलं असतं का? Happy

मामा मी कालचा एपिसोड पाहिलाच नाही ऑफिसचं काम करत बसले. कारण तुम्ही तंतोतंत अपडेट्स टाकता एपिसोड अगदी डोळ्यासमोर उभा राहतो.

असो, अनिल आपटे सारखा स्पाईनलेस माणूस या जगात अस्तित्वात असू शकतो यावर विश्वासच बसत नाही.

"....अनिल आपटे सारखा स्पाईनलेस माणूस या जगात अस्तित्वात असू शकतो यावर विश्वासच बसत नाही..."

~ दक्षिणा...अशा प्रवृत्तीची माणसं असतात. विशेषतः सेक्शुअली पर्व्हर्टेड ज्याना म्हटले जाते, तसली माणसे तर लागलीच ओळखता येतात.....याला कारणेही अनेकविध प्रकारची असू शकतात. अर्थात अनिल आपटेसारखी अग्रेसिव्ह नेचरची माणसे पाहायला मिळणार नाहीत, पण तितपत स्वातंत्र्य दिग्दर्शकाने घेतल्याचे मान्य व्हावे.

अनिल आपटेचे पात्र मला तरी अजिबात अवास्तव वाटले नाही. असतात की अशी माणसे आजूबाजूला. हां, पण जान्हवीसारख्या मुलीने त्याच्याशी लग्नाला तयार होणे, कितीही अगतिक होऊन का होईना हे मात्र मालिकेतला स्थळ-काळ, पात्रं बघून अतिरंजित वाटले.

अगो, मलाही आधी तसंच वाटलं होतं. पण तिच्या वडिलांचं 'अफरातफरीच्या आरोपांवरून नोकरीवरून काढून टाकणे' समजल्यावर तिचं आपटेला 'हो' म्हणणं मी पटवून घेतलं.

आता रूमाल न टाकता पोस्ट लिहिता येतेय मराठीतून Wink
'प्रतिसाद तपासा' वापरून.

मंजूडी, हो गं. म्हणून तर मी म्हटलं ना की गुंड प्रवृत्तीचाच पण अगदी वडलांच्या वयाचा न दाखवता दहा-पंधरा वर्षांनी मोठा दाखवलेलंही चाललं असतं. पण पटवून घेतल्याशिवाय ती सिरियल कसली Wink

रुमाल टाकणे = प्रतिसादात नुसतेच एखादे विरामचिन्ह किंवा 'रुमाल टाकलाय' असे लिहून नंतर सवडीने सविस्तर प्रतिसाद लिहिणे.

Pages