नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना....

श्री च्या होणार्‍या पत्नीला [जान्हवीला] आजी वगळता एकजात गोखले स्त्रिया आता आपली सूनच मानतात....फक्त तिच्या माहेरच्या लोकांच्या कर्तृत्वामुळे लग्नाचे आकाश काळवंडले आहे....पण श्री करेल नीरभ्र....अर्थात सावकाश.

श्री ची आई [श्री पोटात असतानाच तिचा नवरा तिला सोडून गेला असल्याने] कायम दबावातच सासूच्या हाताखाली संसारगाडा हाकत असते आणि त्यातच मुलाच्या लग्नात उभे राहात असलेल्या मोडक्या पायर्‍या पाहून तिचे घाबरून रडणे स्वाभाविक मानले पाहिजे.

एकटी शरयू हीच जान्हवीला प्रथमपासून आपली मानत असल्याचे दाखविले आहे ती समाधानकारक बाब आहे.

राज....

अनिल आपटे निदान ५८ चा तर आहे....पण आपल्या महाराष्ट्र देशी जरठ-बाला विवाह तर शेकडो वर्षे जुना आहे. गोविंद बल्लाळ देवल यांचे "संगीत शारदा" ही गाजलेले नाटक तुम्हास माहीत असणारच. यातील एक म्हातारा...भुजंगनाथ.... चक्क ७५ वर्षाचा असून याची प्रथम पत्नी वारल्याने तो दुसरी बायको करीत आहे. याला ती कशी हवी आहे ? अशी ~~

".....सुंदर खाशी सुबक ठेंगणी स्थूल न कृशहि न, वय चवदाची
नयन मनोहर वनहरिणीचे, नाक सरळ जशि कळि चांफ्याची
भृकुटि वांकडया, केश सडक मृदु, दंतपंक्ति ती कुंदकळ्यांची
ओंठ पोंवळी, हनु चिंचोळी, लालि गुलाबी गालांवरची...."

~ मध्यस्थी करणार्‍याला हा भुजंग अगदी गाऊन "अशी हवी बायको" म्हणून साग्रसंगीत वर्णन करीत आहे.... मुलगी चौदा वर्षाची हवी होती त्याला.

श्री चे कॅरॅक्टर किती लॉजिकली विचार करताना दाखवले आहे. सायलीबाबत बोलताना "प्रत्येकाला खूश ठेवण्याची जबाबदारी माझी नाही." हे असो किंवा कालच्या भागात आजीला जान्हवीच्या वडिलांची बाजू पटवून देणे असो, मालिकेतील पात्रे अभावानेच इतकी लॉजिकल वागतात-बोलतात.

शिवाय स्त्रीसक्षमीकरण हा ह्या सिरियलचा बर्‍यापैकी स्पष्ट अजेंडा दिसतो आहे. अनिल आपटेसारख्या गुंड प्रवृत्तींचा सामना कसा करायचा हे जान्हवीला सांगणे हा ह्या अजेंडाचाच भाग होता. इतर मालिकेत स्त्रियांनी जे स्वतःचे पोतेरे करुन घेतलेले दिसते ते बघून अशी भूमिका घेणारी मालिका बघायला बरे वाटते आहे.

ago+1

barobar. pan kal janhavi cha hat anil dharato ahe ani mag pintya sodvayala yeto he nako hote ghyayalaa...tya aivaji tinech tyachya dolyat tikhat vagaire takale ase dakhavale aste tar bare zale aste.

काही वेळा असं वाटंत नाही का............की इतक्या हुशार बाई(रो. हट्टंगडी/आईआज्जी) च्या संसारात असं कसं झालं? तेव्हा काय चुकलं त्यांचं?
त्यांची स्वता:ची मुलं अशी कशी निघाली?

ho malahi asach vatla.. pan ekhad weles pintya chi baju aatasavarayachi asel.. kinwa pintya jababdar hotoy yachi nandi asel ti...

asu shakataat dakshina, kahi lok aksharsh: ghaaaN astaat!! yuck!! to apte pan kilas-wana prani aahe.

तेजश्री (जान्हवी) काम करत असलेला 'लग्न पहावं करून' हा सिनेमा उद्या रिलिज होतोय. कोणाला ती खूपच आवडत असेल तर नक्की बघा तो सिनेमा. त्यात तिची भूमिका एकदम डॅशिंग आणि मॉडर्न आहे Happy मुख्य जोडी मुक्ता बर्वे- उमेश कामत आहे. तिच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकर.

अगो + १.. आणि अजुन एक मुख्य म्हणजे आईआजी एकदम दैवत असुनही एकदाही तिच्या बोलण्यावरुन श्री ने जान्हवी वर अविश्वास दाखवला नाहिये.. तो प्रत्येक वेळी ती च्या मागे खंबीर उभाय..नाहितर बाकिच्या सिरियल बघा घरातले एक वाइट म्हणले की सगळे लगेच री ओढायला पुढे.. स्वत:ची काही मते ,अंदाज, अनुभव नाहितच..

पण आईआज्जी सुद्धा अजिबातच हलक्या कानाची किंवा पार्शियल नाहिये स्वभावाने.
जे समोर येतंय त्याची शहाणपणाने शहानिशा करतेय.

जे समोर येतंय त्याची शहाणपणाने शहानिशा करतेय>>> तिडिक आणणार्‍या अनिल आपटेला सोडून Wink

तिडिक आणणार्‍या अनिल आपटेला सोडून>>> हो, त्याला बसवून चहा पाजतात आणि जान्हवीला बसायलाही सांगत नाहीत. Happy

अछी कछी शंपेल?
लग्न झालं तरी त्या सहाजणींना आपलंसं करावं लागेल. शिवाय बाबांचं ऑपरेशन, पिंट्याला मार्गी लावायचंय, आईला वटणीवर आणायचंय. शेजारी तो मित्र राहतो, त्याच्यावर एखाद दोन आठवडे खर्च करता येतील. झालंच तर मैत्रिण गीता, बोरकर साहेब, बँकेतला पिऊन. अधूनमधून श्रीबरोबर रोमॅन्स करावा लागेल. शिरीयलीत अजून दोन तीन गाणी नवीन क्रियापदांसह आणावी लागतील. शिवदे मॅडमशी दोन हात झालेले दाखवता येतील. श्रीच्या पिऊनवर एखादा आठवडा घालवता येईल.
तरीही प्रेक्षकांचा पेशन्स शिल्लक असेल तर आयांचे नवरे.....

श्रीच बहुतेक ओळखीचा पोलिस-बिलीस, नाहीतर कोणीतरी दादा-बिदा पकडून किंवा स्वतःच कराटे-बिराटेचं प्रात्यक्षिक दाखवून त्या अनिल आपटेचा नायनाट करेल असा माझा अंदाज.

मंजूडी, ओ वेगळ्या धाग्यावर आणि के वेगळ्या. मला तिथे कलाकंद वाढण्यासाठी ताटली ठेवलीय का असे वाटले होते Lol

हो ना, तो अनिल आपटे कोण ह्याविषयीचा खुलासा एकदाही आलेला नाही अजून. Thats weird !

अय्या आणि पुढे गर्भारपण आणि डोहाळे बाळंतपण आहेच कि. जानूश्री जन्माला येइल मग शाळेत जाईल. इत्यादी.

जानूश्री Biggrin

तरीही प्रेक्षकांचा पेशन्स शिल्लक असेल तर आयांचे नवरे..... >>> मंजूडी, अगं हा तर मुख्य कथानकाचा भाग आहे. जान्हवीचा मोठा सहभाग असणार बघ त्या सर्वांना परत एकत्र आणण्यात !
तो बॉस पण बायकोशी फोनवर जरा अतिच बोलताना दाखवतात. त्या विनोदी बोलण्यामागे नक्कीच काहीतरी कारुण्य दडले असणार Wink

बाकीची उपकथानकं परवडली पण नीलकंठ ( ? ) मामाची एंट्री हा नक्कीच पाण्याचा लोट असणार असे वाटते. अवंतिका मालिकेत पण असाच एक खलनायकी मामा होता. तो आला की जाम बोअर व्हायचे !

तो बॉस एरवी अतीच बोलतो पण परवा त्या अनिल आपटेसमोर स्टाफला (खोटं) झापताना मस्त बोलला - तुमच्या वडीलांच्या वयाच्या वगेरे Proud

मामी ने तर बारसे पण करुन टाकले Happy

त्याला बसवून चहा पाजतात आणि जान्हवीला बसायलाही सांगत नाहीत>>>>प्राची, आपटे त्यांच्या परवानगीशिवाय घरात घुसून चहा पितो अन मागच्या वेळी त्याने टोमॅटो पण खाल्ला होता.

अगो, जानूच्या आईने अनिल आपटे बाबांच्या ऑपरेशन साठी पैसे देणार असतो, पिंट्याला नोकरी लावणार असतो आणि महिन्याला खर्चासाठी पैसे ही देणार असतो म्हणून त्याच्याशी जानूचे लग्न ठरविलेले असते.

sonalisl, गोखल्यांच्या घरातील बायकांना अनिल आपटे कोण, तो आपल्या घरी का येतो, जान्हवी त्याच्याशी लग्नाला का तयार झाली असेल ह्याविषयी बोलताना दाखवले नाहीये. अनिल आपटे कोण ह्याचा खुलासा त्यांनी करुन घेतलेला दाखवायला हवा ह्याबद्दल होते ते Happy
अनिलने त्यांना सुरुवातीला जान्हवी माझी बायको आहे आणि नंतर तिच्याशी ठरलेले लग्न मोडले असे सांगितले तेवढेच !

जान्हवीच्या बॉसला बायकोच नसेल, अपघातात मूलासकट वारली वगैरे असेल आणि मग त्यात एक दोन आठवडे जातीलच.

भरतजी +१
मी काल एकच एपिसोड पाहिला.. श्री नि जान्हवी दोघेही मस्त आहेत .. रिअलिस्टिक Happy
पण बाकीच्या बायका जरा अतिच गोडू गोडू करतात जसं काय श्री कुक्कुल बाळ आहे..
त्या एपिसोडमधे श्री नुकताच ऑफीस मधुन येतो.. त्रासलेला दिसतोय.. त्याला जरा बसं , पाणी घे .. काय झालं हे विचारायचं सोडुन मावशी (बहुतेक) - मी ९ दिवस उपवास करणार तुझ्यासाठी....ह्याने लग्गेच शपथ घातली नि मावशीनी ऐकलं पण
मग दुसरी - तुझ्या निर्णयाला माझा पुर्ण पाठिंबा आहे ... ब्लाह ब्लाह .... श्वास तरी घेवु द्या की बिचार्याला!

हो अगदी अतीच चिकटलेल्या असतात बाबा... :रागः
घरात एक तरी पुरुष दाखवायचा निदान अजून...तेवढीच श्रीला कंपनी..:)
आयांना स्वत:ची काही मतं आहेत की नाही? एकदा म्हणतात दुसरी मुलगी बघू...एकदा जान्हवीच्या बाजूने बोलतात.

कालचा बसस्टॉपवरचा प्रसंग मस्त होता... श्री म्हणतो आता तुला मिठी मारावी लागेल हां इथे.. मग लगेच ती सांगायला तयार होते Happy क्यूट

अआ ने हात धरण्याच्या प्रसंगात मलाही वाटले ही स्वतः काहीतरी करेल श्रीने एवढा डोस दिलाय तर....

बादवे आईचे काय झालेय तिच्या? पोलिस आले असतात ना घरी?

Pages