नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्जू....सानी...मधुरा...

~ एप्रिलमध्ये मी हीरो स्प्लेन्डरवरून वाळूत घसरून पडलो होतो, त्यावेळी कपाळ आणि डावा डोळा इथे चांगलाच मुका मार लागला होता....त्यावेळी किरकोळ औषधपाण्याने त्या वेदना शमल्या; पण मे महिन्यात दोन्ही ठिकाणी प्रचंड दुखणे सुरू झाले होते....म्हणून मग फॅमिली डॉक्टरना दाखविले, त्यानी न्यूरॉलॉजिस्टकडे पाठविले....तेथील एम.आर.आय. टेस्टिंगवरून ठरले की माझे मेंदूचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे....दुसरा विकल्पच नसल्याने त्याला होकार द्यावा लागला....झाले ऑपरेशन आणि दीडएक महिना दवाखान्यातच काढले, नंतर घरी आलो....आता या गोष्टीला चार महिने होत आलेत, तरीही गोळ्या आणि पथ्यपाणी चालूच राहिले. म्हणून परवा पुन्हा त्याच डॉक्टरांना दाखविले....त्यानी तपासून नॉर्मलवर मी [आणि माझा मेंदूही] आल्याचे सांगितले आहे....पण गोळ्या तसेच पथ्यपाणी अजूनी चालूच ठेवण्याची सक्ती केली आहे. अशा या घरी बसण्याच्या स्थितीत मला 'होणार सून.....' चा लळा लागला असे म्हटले तरी चालेल.

तशी तब्येत आता ठीक आहे.

[या धाग्यावर माझ्या प्रकृतीविषयीचा हा प्रतिसाद अवांतर होत आहे, याची मला जाणीव आहे....]

आजचा भाग - सोमवार ३० सप्टेंबर

~ कुमारी जान्हवी आणि कुमार श्रीरंग आज भलत्याच रोमँटिक मूडमध्ये होते.....जणू काही राजेश खन्ना आणि मुमताझ यांचेच संवाद म्हणत हॉटेलमध्ये कोल्ड कॉफीचे घुटके घेत आरामात बसले होते....भविष्याविषयी चर्चा करायला....तर दुसरीकडे अनिल आपटे परत 'गोकुळ' बंगल्यात जाऊन त्या सहाही आयांच्यासमोर सहस्त्रबुद्धे कुटुंबाची यथेच्छ निंदानालस्ती करत असतो तर या बायका एरव्ही तडफदार दाखविल्या जातात मात्र ह्या आपटेच्या पुढे हतबल. आजीला जान्हवीच्या आईने आपल्याशी खोटे बोलून ७० हजार घेतले आहेत हे तर आपटे सांगतोच शिवाय जान्हवीच्या बापाने ऑफिसमध्ये दहा लाखाचा फ्रॉड केला असून त्याबद्दल त्याना नोकरीवरून काढून टाकले आहे, तसेच जान्हवीचा भाऊ पिंट्या काहीही कामे न करता गल्लीत निव्वळ बाता मारत फिरत असतो....त्यामुळेच तुमच्या नातवाला या सर्वांनी जान्हवीचे प्रलोभन दाखवून आपल्या गळाला बांधले आहे, अशी स्फोटक बातमी देतो.....त्याच्या या माहितीच्या भडिमारासमोर जिथे आजीच काही बोलत नाहीत, तिथे बाकीच्या पाचजणी काय बोलणार ? इतकी गरळ ओकून अनिल आपटे उलट त्यांचाच चहा मुर्दाडपणे पिऊन तिथून निघून जातो.

इकडे हॉटेलमध्ये श्री आणि जान्हवी त्या सायलीचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा यावर विचारविनिमय करतात. बोलण्याच्या ओघात श्री सायलीविषयी काहीतरी मर्यादा सोडून बोलतो ते जान्हवीला आवडत नाही.... ती सायलीच्या बाजूने बोलते....मग श्रीरंगराव जान्हवीला खट्याळपणे "माझे लग्न ठरले आहे....व जिच्याशी ठरले आहे ती मुलगी वेडी आहे...' असे सांगितल्यावर जान्हवी लाजून खाली मान घालते आणि लागलीच त्यालाही चिडवायला चालू करते....जायच्या वेळी श्री जान्हवीला म्हणतो, "जान्हवी, आता राहू दे सारे, चला आत्ताच आपण देवळात जाऊन लग्न करू या.... मी नंतर आजीला समजावून सांगेन." यावर हसत जान्हवी तिथून पळ काढते.

छान रंगविला आहे हा हॉटेलमधील प्रसंग....हसतखेळत.

मधुरा + १
विषयांतर झाले, तरी काहीच हरकत नाही. तब्येतीविषयी कळवल्याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या, मामा. पथ्यपाणी वेळच्यावेळी, न कंटाळता चालू राहू द्या. शुभेच्छा. तुम्हाला काहीतरी छान विरंगुळा मिळाला, हे छान झाले बाकी.. Happy

तुमचे वरचे अपडेट्स वाचायचे स्किप केले आहे. अजून आजचा भाग पहायचाय मला..

अशोक काका लवकर बरे व्हा पण मालिका संपे पर्यत आराम करा. Happy

गोखलेंच्या घराच्या दाराला कडी नाहिये का? आणि ह्या बायका त्याला बाहेर काढणया एवजी बोलत का बसल्यात?

सार्‍या भाच्यांना त्यांच्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद ! मी तर कित्येकवेळी म्हणतच असतो की प्रत्यक्ष औषधापेक्षाही असा दुवाच प्रकृती सुधारण्यासाठी कारणीभूत ठरतो.

वेल...अदिति.... गोखलेंचा बंगला तर आवजाव तुम्हारा घर अशाच अवस्थेचा आहे असे अगदी सुरुवातीपासून वाटत होते. एक त्रासदायक इसम थेट आत घुसतो आणि निर्लज्जपणाचा कळस करीत असताना बंगल्यातील तब्बल सहा बायका आपल्या वॉचमनला बोलावून घेत नाहीत....किंवा त्यांच्याकडे श्री शिवाय अन्य एकही पुरुष माणूस नाही, ही गोष्ट पचायला जडच जाते.

....पण प्रेक्षक म्हणून आपल्याला तरी असे कितीसे स्वातंत्र्य असते ? दाखवितात ते पाहात बसायचे आणि त्यातल्यात्यात जान्हवी-श्री यांचे संभाषण मृदू स्वरुपाचे असल्याने त्याचा आनंद घेणे, इतपतच.

अशोक मामा, तुमचा शनिवारचा अपडेट मिस केला! पण कारण कळल्यावर काळजी वाटली. तुम्ही प्रथम प्रकृतीची काळजी घ्या! ते जास्त महत्वाचे आहे. मालिका तर आहेतच!

धन्यवाद जिज्ञासा.... खुद्द मीही तो भाग अद्यापि पाहिला नाहीच....आता येत्या शनिवारी वा रविवारी रीपिट टेलिकास्ट असते त्यावेळी पाहायला मिळेलच.... पण वर श्री.भरत मयेकर यानी त्याच भागाचे अपडेट दिल्याने काहीतरी नजरेसमोर आले हेही चांगलेच.

बाकी प्रकृतीचे म्हटल्यास....वो तो चलताही रहेगा....असंच झाल्ये. मालिका तर एकप्रकारे रीलिफ देण्याचे काम करीत आहे.... जरी त्यातील कित्येक गोष्टी पटत नसल्या तरीही.....नाईलाजाने स्वीकारायचे..... दुसरं काय !

जरूर मुग्धा.... वरवर पाहता मी इतरांना बराच वाटतो, दिसतो.... कारण मेंदूचे ऑपरेशन झाल्याचे कुणाला कळणार ?!..... प्रकृतीवर तसा जाणवण्याइतपत परिणाम झालेला नाही.....[आय होप सो !]

हे खूपच छान आहे की तुम्ही इतक्या मोठ्या संकटातुन वाचुन सुखरुप आहात आणि तब्येतीवरही फारसा परीणाम झाला नाही हे तर अतिशय चांगल आहे.

http://www.youtube.com/user/zeemarathi पहायचे मिस झाले असतील, तर इथे सर्व मालिकांचे एपिसोड्स मिळतील. मध्यंतरी इकडे अपलोड करणे बंद केले होते, कधी सुरु केले पुन्हा, नाही माहिती.. मी आजच खुप दिवसांनी ह्या वेबसाईटवर गेले आणि ही गोष्ट लक्षात आली.

मंगळवार १ आक्टोबर २०१३..... अपडेट

~ आजच्या भागात परत एकदा आजीबाईंचा जान्हवीविरुद्धचा पारा वर गेला. त्याला कारण म्हणजे अनिल आपटे याने तिच्या बापाने केलेल्या फ्रॉडबद्दल जे काही उलटसुलटे सांगून आजीचे मन कलुषित केले होते, त्याचा निचरा करण्यासाठी आजीनी आपले रीसोर्सेस वापरले आणि त्यात सत्य असे बाहेर आले की आपटे याच्या फ्रॉडसंदर्भातील बोलण्यात तथ्य आहे. मग आता ज्या घरी असला आरोप सिद्ध झालेला इसम आहे त्याची पोरगी सून म्हणून गोखले घराण्यात आणण्यास आजीचा ठाम नकार.....आणि रात्री श्री घरी आल्यानंतर त्याला त्या वार्तेबद्दल अपडेट दिले जाते आणि श्री ही बातमी खरी की खोटी याची विचारणा दुसर्‍या दिवशी जान्हवीशी बोलताना करेल असे ठरते.

सकाळी जान्हवी त्याला बस स्टॉपवर भेटते....श्री ला पाहताच जान्हवी ओळखते की त्याचे काहीतरी बिनसले आहे....तो वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतो पण तो विफल होतो कारण जान्हवीसमोर तो खोटे बोलू शकत नाही. जान्हवी त्याला मन मोकळे कर म्हणून आग्रहाने सूचना करते....मग श्री तिच्या बापाबद्दल विचारतो आणि त्यांच्या नावावर फसवणुकीचा आरोप झाल्यानेच त्याना नोकरीवरून कमी करण्यात आले होते का ? हा प्रश्न विचारतो.... सुन्न झालेली जान्हवी आरोप खोडून काढत नाही, उलटपक्षी ते सारे खरे आहे असे सांगते शिवाय मी स्वत: आजीजवळ येऊन त्या प्रकरणाची सारी माहिती देईन असे सांगते....त्या प्रस्तावाला श्री नकार देतो आणि आता मीच यातून काहीतरी मार्ग काढेन असे तिला आश्वासन देतो.

जान्हवी बॅन्केत येते....काम चालू असतानाच अनिल आपटे परत एकदा विग घालून बॅन्केत येतो..... आता लग्नाची बात मागे पडल्याने तेथील गीता आणि शिपाई त्याला किंमत देत नाहीत...जान्हवीही सडेतोड बोलते; पण 'मी बॅन्केचा कस्टमर असून माझ्या डिपॉझिटबद्दल चौकशी करायला आलो असताना बॅन्केतील कर्मचारी माझ्याशी उद्धट वागतात' म्हणून मॅनेजर बोरकरांच्याकडे जाऊन याना कामावरून काढून टाका अशी मागणी करतो....ही मागणी अर्थातच पोरकट असल्याने मॅनेजर त्याला सबुरीने घ्या असे सांगून तिघाही सेवकांना आपापल्या टेबलवर पाठवितात....आणि आपटेला बॅन्केबाहेर काढतात.

उद्याच्या भागात श्री आणि आजी यांच्यात जान्हवीवरून चांगलाच वाद रंगेल अशी चिन्हे दिसत आहेत.

श्री आणि जान्हवीचे लग्न तुळशीच्या लग्नानंतर होणार अशी एकंदरीत चिन्हे दिसतायत, किती घोळ घालतायत अजून लग्न लांबवण्यासाठी?

आजीने जान्हवी च्या आईला माफ केला का? की ती एक एक करुन ईश्युज सोडवते आहे. तितकेच एपिसोड्स पण वढवता येतील सीरीयल वाल्यांना..

अदिति.... आजीने अजून जान्हवीलाच माफ केलेले नाही, तर ती तिच्या आईला कसे माफ करेल ? शिवाय आता बाप आणि भाऊ पिंट्याही आजीच्या यादीत आहेत....त्यामुळे एपिसोड्सना मरण नाही अजिबात.

आज एक नविनच प्रस्ताव येईल....तो असा की, श्री वाद घालतोय म्हणून आजी जान्हवीला त्याची बायको म्हणून स्वीकारायला तयार आहेत....पण गोखल्यांची सून म्हणून नाही. परत यावर दोनचार एपिसोड्स ठरलेले आहेतच.

बिचारी जान्हवी....तिच्यामागे लागलेले हे शुक्लकाष्ठ जेव्हा संपुष्टात येईल तो सुदिन...!

बिचारी जान्हवी....तिच्यामागे लागलेले हे शुक्लकाष्ठ जेव्हा संपुष्टात येईल तो सुदिन...!

>> आणि आपलं दुर्दैव.. कारण मालिका मग नेहमीचे सासु-सुनेचे दळण दळेल. आणि अजुन काय काय होईल हे आधीच सगळ्यांना नीट ठाऊक आहे. आधीच्या पानांवर सगळ्यांनी जवळपास सेम भाकीत वर्तवले आहे.

मला हे न सुटणारी संकटांची मालिका नै बाई आवडत. निदान टीव्ही वर तरी सगळं कसं शांत शांत अस्लं की बरं ना. ताण असावे, पण किती गुंतागुंत.

या आजीबाई जे सोर्सेस वापरतात ते सोर्सेस आपटेंची माहीती नाहीत का काढू शकत?

अग रमा काढु शकतात ग पण अजुन आजीने सांगितल नाहिये ना त्यांना तस करायला. उगाच जास्तीची काम कोण करत बसलय?

खरंय

बुधवार दि. २ आक्टोबर २०१३ अपडेट

~ आजचा भाग श्री ने जान्हवीला "स्त्री चे स्वसंरक्षणाचे हक्क म्हणज काय ?" यावरील व्याख्यानावर आधारित होता. अनिल आपटे बॅन्केत येऊन जान्हवी, गीताची छेड तर काढीत होताच शिवाय त्यांच्या कामाविषयी काहीही भंकसगिरी करत होता. जान्हवीपुढे बॅन्क कस्टमर असतानाही तिच्याकडे 'ही म्हणजे आपलीच इस्टेट' अशा नजरेने पाहातच तिथे घुमत होता अन् त्याचे ते वर्तन जान्हवी व गीता दोघींनाही त्रासदायक ठरत होते. बॅन्क अवर्स संपल्यानंतर गीता जान्हवीला सांभाळून घरी जाण्यास सांगते. जान्हवीने आपटेचा त्रास नको म्हणून बस स्टॉप बदलला आहे आणि ती नव्या स्टॉपवर येऊन गेल्या काही दिवसातील घटनांची उजळणी करीत असताना खांद्यावर एक हात पडतो....स्पर्शाने ती दचकते, घाबरते....पण तो हात श्री चा आहे हे पाहून तिला हायसेही वाटते. श्री ला कळत नाही की ही अशी का घाबरली....तो तिला कारण विचारतो...सुरुवातीला उत्तर द्यायचे टाळणारी जान्हवी शेवटी 'अनिल आपटेमुळे मी घाबरली आहे. तो आजकाल रोज कसा त्रास देत आहे...' हे सांगते. यावर श्री तिला धीर तर देतोच, शिवाय अशावेळी एक खंबीर स्त्री म्हणून तू काय त्यावर अ‍ॅक्शन घेतली पाहिजेस....पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविणे किती योग्य आहे... आजुबाजूच्या लोकांना मदतीसाठी हाक मारताना काय केले पाहिजे....आदी अनेक मार्ग सांगून तिला आपला आणि पोलिस स्टेशनचे नंबर्सही देतो. जान्हवीचा तणाव दूर होतो आणि बसने ती घरी येते....रात्र झाली आहे आणि गल्लीत जिन्याजवळ आल्याबरोबर समोरील बाजूने अनिल आपटे येऊन तिचा रस्ता अडवितो. जान्हवी अगोदर शांतपणे त्याला तिथून जाण्यास सांगते आणि न गेल्यास पोलिस कंप्लेन्ट करीन अशी तीव्र सूचनाही देते....पण आपटे हा इसम अशा धमकीना दाद देणारा दिसत नाही, उलट तोच बेधडक जान्हवीचा हात पिरगाळून तिला ''ओरड आता'' अशी चिथावणी देतो....'या द्रौपदीला वाचवायला कोण कृष्ण येणार आहे ?" अशी पृच्छाही करतो....आणि नेमक्या त्याच क्षणी जान्हवीचा भाऊ पिंट्या त्या कृष्णाच्या भूमिकेत तिथे आलेला दाखविला आहे .... तो अनिल आपटेला बाजूला खेचून त्याला सनी देओल धर्तीने बेदम मारहाण करतो....हाच भाग उद्या पुढे चालू राहील.

त्या अगोदर 'गोकुळ' वर आजी + ५ महिला एका बाजूला आणि श्री दुसर्‍या बाजूला असा सामना जान्हवी प्रश्नावरून रंगला आहे. आजीचा विरोध जान्हवीच्या बापामुळे....तर श्री चे म्हणणे बापाने केलेल्या वा न केलेल्या गुन्ह्याबद्दल मुलीला शिक्षा कशासाठी तुम्ही लोक करीत आहात ? पण आजीचे म्हणणे तू बायको आणायला लागला आहेस हे ठीक, पण आम्हाला सून हवी....त्यामुळे तू हवीतर जान्हवीला आपली बायको करून घेऊन ये; पण मी तिला सून म्हणून स्वीकारु शकत नाही.

आता हा एक नवीनच वादाचा मुद्दा.

अशोक काका, व्वा!
आम्हाला सून हवी ... तू बायको म्हणून आण पण आम्ही सून म्हणून स्वीकारू शकत नाही?
विहिनोहोदह!
श्रीची बायको म्हणून ह्यांची सून ना? का उलट?

"मला खोटे वागता येत नाही" हा आज्जीचा डायलॉग डोक्यात जातो...ह्या आईआज्जीला जरा खोटेपणाने वागायला शिकवले पहिजे म्हणजे मग ती जरा नॉर्मलला येईल. सहा आयांची सर्कस पुढे फुबाईफुकडे वाटचाल करणार आहे बहुतेक Happy

कालच्या एपिसोडातला सगळ्यात भारी संवाद अतुल परचुरेचा होता....."स्मितु....माझे तुझ्यावर प्रेम नाही असे कसे म्हणतेस? मग आपली ती दोन छोटी छोटी मुले ऑन्लाईन मागवली का आपण?" Happy

एकंदरीतच गोखल्यांच्या बाकीच्या मंद आणी मठ्ठ सुना पाहता "ह्या घरची होणारी सून" ही काही विशेष कॅटेगरी वाटत नाही.

मला पण श्रीच्या आई बद्दल फार वाट्ते. एक तर सून कशी हवी वगिअरे पसंती तिची पाहिजे. काही ऑब्जेक्षन काढायचे तर तिने इथे तर आईआजीचाच संसार संपत नाहिये. ही अशी सँडविच परिस्थिती अगदी येते काहीवेळा. बेबी आत्या आणि लीना भागवत यांच्या साड्या मस्त होत्या.

Pages