नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढची अडचण तयारच आहे. अनिल श्री ला जीवे मारण्याची धमकी देणार आणि जान्हवी सत्य जाणून न घेताच परत त्याला टाळायला लागणार.

हे भगवान..,...!!!

~ आज तिने हास्याचा स्फोट केला. कारण तिला समजले एकदाचे की त्या वाघ्याचे लग्न झालेले नाही आणि तो गोखले गृह उद्योगचा अकाऊंटंटही नाही. गंमत वाटली खरे; पण पुढे हीच हुशार जान्हवी म्हणते की, "मग, तू तिथे कोण आहेस...? प्यून आहेस का ?"

आता काय करावे ह्या पोरीला ?

एखादा मोठा( श्रीमंत) माणुस आपल्या प्रेमात पडेल हे तिच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडे असावे बहुदा. पण आता तेच तेच घोळ घालत बसण्या पेक्श्या सीरीयल जरा पुढे सरकली तर बर होइल.

ह्यातली गाणी अगदीच र ला ट आहेत! ही दोघं इतका छान नॅचरल अभिनय करत असताना मागे गाणी वाजवू नयेत! रसभंग होतो!

अरे त्याचे कपडे, घड्याळ, मोबाइल बघता तो वाटतो का प्यून?
जरा काहीतरी वेगळे तरी म्हणायचे... असो.... पण अभिनय मस्तच दोघांचाही!

'मालक' या शब्दाची अ‍ॅलर्जी आहे सिरीयलला ....
एक मनुष्य एकदम Expensive Hospital मधे नेऊन तिला Observation साठी बिनधास्त ठेवतो आणि तोच तिला 'प्यून' असावा असे वाटते. लेखक झोपला असावा.. बाकी छान चालले आहे..

हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्यावर हे आमच्या मालकांचे हॉस्पिटल आहे असे सांगितले होते.

"....आमच्या मालकांचे हॉस्पिटल आहे...."

~ येस, भरत. तसे सांगितलेले असते. तरीही "डीमोशन" श्री साठी काहीसे खटकले असणारच. असो....कारण जान्हवीची त्याबद्दलही तक्रार नसल्याचे तिच्या बोलण्यावरून समजते. ती म्हणतेच, "तू कुणीही असलास तर आपल्या मैत्रीत फरक पडण्याचे काहीच कारण नाही....".

म्हणून सत्याची एक मोठी बाजू म्हणजे चटकन सांगून टाकणे जे काही खरे आहे ते. पुढचे काही निस्तरावे लागत नाही.

मी पाहिला नाही कालचा भाग... पण तिने त्याला' तू प्यून आहेस का?' असे मस्करीत विचारलेले असू शकत नाही का?

मस्करीत नाही विचारले. अगदी भाबडेपणाने विचारले. श्री तिची वाट बघत रात्रभर बसस्टॉपवर राहिला. सकाळी ती बसमधून उतरल्यावर तिला दिसला. तिने निघताना त्याला विचारले की तुझ्या आजारी मुलाची तब्बेत कशी आहे?
श्रीची बोलती बंद. मग ऑफिसात जाऊन त्याने जान्हवीला फोन केला आणि सांगितले की तिचा असा समज का झाला? त्यावर गोखले गृहउद्योगात फोन करून अकाउंटंटचा मुलगा आजारी असल्याची खात्री केल्याचे जान्हवीने सांगितले. यावर त्याने मी अकाउंटंट नाही आणि लग्नही झालेले नाही हे सांगितले. त्याने आधीच मी काहीतरी खोटे सांगितलेले आहे, हे सांगितले होते त्यामुळे जान्हवीने बहुतेक लाजेखातर याने आपला खरा हुद्दा सांगितला नाही असा निष्कर्ष काढला.

अगदी भाबडेपणाने विचारले.>>> ओके Happy

श्री तिची वाट बघत रात्रभर बसस्टॉपवर राहिला.>> Lol

धन्यवाद.
प्लिज उद्याही लिहा आज काय घडतंय ते.

` गोखले उद्योग ' च्या उत्पादनांमधे बाकरवडी, पेढे वगैरे असावेत चितळ्यांसारखे. फोटोमधे पाहिल्यासारखे वाटले.

अजुनच गोंधळ वाढवताहेत.आतातरी खर काय ते सांगुन रिकाम व्हायच तर आता प्युन. आता हा गोंधळ निस्तरायला पुढचे चार एपिसोड.

खरं काय ते सांङून ते रिकामे झाले तर आपणही रिकामे नाही का होणार? धड कथानक, व्यक्तिरेखा, संवाद, अभिनय असलेली ही एकमेव मालिका आहे. ती लवकर गुंडाळून तिच्या जागी मसाह, तूतिमी इ. हवेय का?

अकाउटंट नंतर डायरेक्ट प्युन हेच पद असत का? अधेमधे काही नाही??? Uhoh
टिपिकल चाळ्करी मेंटॅलिटी अजुन काय???? Proud

"भाबडेपणा" आणि "मस्करी"...... यापैकी 'भाबडेपणा' हाच अलंकार योग्य आहे जान्हवीच्या तशा विचारला. तिचे सेलवरील बोलणेही अगदी त्याच आवाजात चितारले गेले आहे. बाकी बोलणे संपल्यावर मैत्रिणीच्या गळ्यात पडून दोघी खो-खो हसताना छानच रंगविले आहे.... लग्नाचे टेन्शन गायब झाल्यामुळे.

भरत तस नाही हो, पण किती ते समज गैरसमज Lol बिचारा श्री प्रत्येक गैरसमजाला बसस्टॉपवर रात्र काढणार मग हिला कळणार.
आजारी नाही का पड्णार अश्याने तो?? आणि मग त्याच्या त्या आई काकु आत्या सगळ्या त्याची काळजी घेणार ते एपिसोड्स नको बाबा.

लॉजिक : तरुणाने तरुणीला आपला नोकरीतला हुद्दा खोटा सांगितला असे कळले तर तो वाढवून सांगितला असेल की कमी करून याबाबत ती काय तर्क करेल? गोखले गृह उद्योग MNC असती तर तर कारकून केले असते.

हो अशोक, आनि या प्रसंगातच जान्हवीला कळते आहे की आपल्याला श्री तश्याप्रकारे आवडतो. तिची मैत्रीण तिला पुन्हा पुन्हा विचारते की तुला राग कसला आलाय? त्याने खोटे बोलण्याचा की त्याचे लग्न झाले आहे याचा?
सटलिटी सटलिटी म्हणतात ती हीच असावी Wink

पण किमान जान्हवीने "मग तू गोखलेमध्ये सेल्स रीप्रेझेन्टेटिव्ह वगैरे आहेस का ?" असे विचारले असते तरी प्रेक्षकांना पटू शकले असते.... कारण श्री चा नेहमीचा रुबाब, गाडी चालविणे, त्याचा ड्रेस कोड, त्याने जान्हवीच्या बॅन्केत येऊन मॅनेजरसमोर बसणे, चहा घेणे.....आदी गोष्टी जमून गेल्या असत्या.

पण असो.... होईल रस्ता अधिक स्वच्छ हळूहळू. अजून त्या सहा महामाया आहेतच जान्हवीला बारीक करण्यासाठी टपलेल्या.....त्यांच्यातील एकच जान्हवीच्या बाजूची दिसत्ये.

<त्याच्या त्या आई काकु आत्या सगळ्या त्याची काळजी घेणार ते एपिसोड्स नको बाबा.> त्या आल्या की टीव्ही म्यूट करा. Lol

माझ्या ओळखिचा एक प्युन मस्त दिसायचा प्युन वाटायचाच नाही.. आणि हे वरिल सगळ वाचुन आत्ता कंपनी ऑफिस मधल्या प्युन कडे पाहिल .. सकाळी अल्या वर प्युन चा ड्रेस (कंपनित प्युन साठी ड्रेस कोड आहे) घालेपर्यंत बराच बरा वाट्त होता.. Proud

त्याला तिने प्युन म्हंटल्यावर तुम्ही का हळहळताय??? जान्हवीला तर काहीच प्रॉब्लेम नाहिये. त्याच लग्न झालेलं नाहिये आणि तो अकाउंटंट नाहिये यातच ती खुष आहे. बाकी तो कुणीका असेना Lol

पण आता तो अकाउंटंटीण शब्दप्रयोग मिसणार Sad

मैत्रीण भारी आहे एकदम जान्हवीची आणि तिचा आवाजही मला खूप आवडतो...........

त्याला तिने प्युन म्हंटल्यावर तुम्ही का हळहळताय??? जान्हवीला तर काहीच प्रॉब्लेम नाहिये. त्याच लग्न झालेलं नाहिये आणि तो अकाउंटंट नाहिये यातच ती खुष आहे. बाकी तो कुणीका असेना हाहा>>>> काहिहि काय शुभांगी इतका गो$$$$$$$$ड श्री तिला प्युन कसा काय वाटु शकतो? शी बाबा Sad बोर आहे राव

मुग्धा अग तीच म्हणाली की काम कुठलच वाईट नसत. प्युन असलास म्हणुन काय झालं वगैरे वगैरे.
पण पुन्हा एक्दा गृहितकच Sad
पण मस्त चाललिये मालिका. थोडा वेग घेतला तर अजुन मजा येइल.

इतका गो$$$$$$$$ड श्री तिला प्युन कसा काय वाटु शकतो????????????? कुणी गो$$$$$$$$ड मुलगा प्युन नसु शकतो की काय?? Happy

पण काहीही असो तो जेंव्हा तिला फोन करुन सांगतो की तो अकाउंटंट नाहिये आणि त्याच लग्नही झालेलं नाहिये तेंव्हा ती कसली खुष होते. पुनः पुनः खात्री करुन घेते. तो आनंदच इतका असतो की त्यापुढे तो काय सांगतोय बाकीच त्याकडे तिच< लक्षही नसत. तो खुप प्रयत्न करतो सांगायचा तिच्या साहेबाने बोलावले असल्याने जाते ती निघुन.

तिला जे मनापासुन ऐकायच असत ते श्रीच्या तोंडुन ऐकल्यावर बाकीच्या गोष्टी तिच्यासाठी गौण ठरतात कारण ती त्याच्या प्रेमात आहे

स्मिते, गोखले गृह उद्योगात असु शकेल की मिठाईच तयार करतात की ते Wink

पण श्री गो$$$$$$$$ड् आहे याला अनुमोदन Happy

Pages