नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ...माय गॉड !!! काय मस्त झणझणीत चर्चा चालू आहे !!! जान्हवी जिंदाबाद !

काय काय आज नावे वाचायला मिळाली मला या समस्त पुणेकरांकडून.....खायच्या अगोदरच पोट भरले माझे.

सुधारस....हा गोड पदार्थ खायाला मात्र नंदिनी मी तुझ्याकडे येणार चेन्नईला.....आता कॉफी राहू दे...ओन्ली सुधारसच.

अय्या! मध्यमवर्गीय घरात चटकन होणारे गोड पदार्थ सगळेच शकारी आहेत. >>> हे मी 'शाकाहारी' असं वाचलं. तडक्याचा ठसका लागतो तो असा Proud

नंदिनी, प्रेशरकुकरमधलं पुरण कसं करायचं ते जरा सविस्तर सांग ना. खरंच Happy

अशोक काका, चांगलं पुरण वगैरे करून वाढेन. ते सुधारस काय खायचा पदार्थ आहे काय!!!

अगो, लवकरच हयग्रीव उर्फ पुरणाच्या खीरीची पद्धत लिहेन. Happy

Lol

प्रेशरकुकरमधलं पुरण कसं करायचं >> तेच की. फारतर पुरणाची डाळ शिजेल प्रेशर कूकरमधे... गूळ-डाळ कुकरात टाकून शिट्या दिल्या की गुळाचा पाक होईल मग निघालीच इज्जत Proud

आता बेकाकबरोबर माकाचुचा पण पत्ता द्यायला पायजेल.

आता गोडाच्या चर्चे मध्ये माझी पण थोडीशी भर . गोखले/सहस्रबुद्धे अशांच्या घरी कायम उपलब्ध असणार्या गोष्टीन मधून पटकन करता येण्यासारखा गोड पदार्थ म्हणजे गोडाचा शिराच. बासुंदी/गुलाबजाम/दुधी हलवा/गाजर हलवा हे पटकन करण्यासारखे गोड पदार्थ नव्हेत. आणि कायम घरात उपलब्ध असतील असंही नव्हे . खीर होते पटकन पण जास्तीच दुध घरात असेलच अस नव्हे Happy

Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol

Happy Lol

..59129_479797632110156_713879928_n_0.jpg

हिंदी सिनेमातला पेटंट गाजर का हलवा चालतो तर मराठी शिरिलीतला साजुक तुपातला शिरा का नाही चालत?

तसंही मालिकेशी संबंधित लोक मायबोलीवर डोळा ठेवून असतात म्हणे. आता पुढच्या वेळी वेगळा गोड पदार्थ, कदाचित पुरणपोळी, तीही या धाग्यावरच्या टिप्स वापरून करतीलच. Wink

जाऊ दे आत्ता गोड गोड बोलणी . आता आज काय दाखवतील संध्याकाळी . सगळ्यांचा कल्पना विलास येऊ दे जरा Happy

तसंही मालिकेशी संबंधित लोक मायबोलीवर डोळा ठेवून असतात म्हणे. आता पुढच्या वेळी वेगळा गोड पदार्थ, >>
तसे पण इथे तुप कसे बनवन्याचि चर्चा चालु होति ना.. म्हणुन तुपातला शिरा झाला.

मामा, आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला तिखट मिसळ करा, चालेल जेवण म्हणून, कारण आम्ही नॉनव्हेज काय, अंडीपण खात नाही.

अन्जू....

मग तू येच एकदा कोल्हापूरला....मग असा काही फक्कड बेत करतो.....लाल तिखट, झणझणीत रस्सा, एक नंबरी...तांबडा पांढरा रस्सा, सारे काही शाकाहारी जग विसरशील.... नंतर म्हणशील...."मामा, मी राहते कोल्हापुराताच आता पर्मनन्ट !"

मामा नको हो नॉनव्हेज. कोल्हापूरचे वेज तिखट चालेल, तशी मी तिखटखाऊच आहे.

काय पोरगी आहे ही अन्जू..... अगं कोल्हापूरी हॉटेल्स तर पुणे आणि मुंबई इथे नाक्यानाक्याला दिसताहेत. एन.एच. ४ वर तर उजव्या डाव्या बाजूला "कोल्हापुरी स्पेशल" असे झळझळीत बोर्ड टांगले गेले आहेत, आणि मी हिला अगदी फ्री सारे करून देत आहे तर ही "...मामा नको हो नॉनव्हेज...." अशी प्रार्थना करीत आहे !! काय करावे?

जान्हवीला बोलाविले तर...धावत येईल ती कोल्हापूरला.

वा मामा मस्तच, मी गप्पा मारायला येईन तुमच्याशी. तुमच्याशी गप्पा मारणे हीपण एक मेजवानीच असेल.

ग्रेट.... तू गप्पा मारायला येतेवेळी वरण आणि साजुक तूप आणशील....ते पाहून मला दिवसाढवळ्या तारे दिसतील...बालिके !

Pages