नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या भागाचा निषेध... काहीही टाकतात उगाच.. तो मामा डोक्यात जातोय.. ब्रश ढापला आणि आता कपडेही.. काहीही दाखवलय.... अ ओ, आता काय करायचं>>>>>+१००००००००

मी जज म्हणूनन उर्मिलाला कधी बघितलं नाहीये Happy

शुभातै, निगेटीव्ह वोटींग ठेवलंच नाही त्यांनी तर काय करणार/ नाही तर १००% मत महागुरुंनाच पडलं असतं Proud

सहाय्यक अभिनेता म्हणुन नंदन ला वोट करा.. खुप मेहनती आहे विनोद गायकर... आम्हाला शिकवता देखील खुप मेहनत घ्यायचा कृपया त्याला वोट करा.. Happy

२० रविवार सकाळी १० ते ७ आतापर्यत्चे मालिकेचे अपडेटस आणी ७ ते ९ शुभविवाह Happy
मी पण वोटिंग केले.

मी पण केले वोटिंग श्री आणि जान्हवीला.
माझी लेक विचारत होती की जान्हवी अजुन सून झालीच नाहिये मग तिचे नाव कसे आहे 'फेवरेट सून' मध्ये? Happy

aajachya episode madhe kaay jhala? please update taka. Thanks!

आज अशोक काकांचे अपडेट्स कसे नाही? Happy
त्यांच्याएवढे छान नाही लिहिता येणार ब्वॉ.
तरी पण
चीकू आजच्या भागात असं दाखवलंय की
तो मामा, शशिकलाबाई आणि आपटे हॉटेलमधे भेटतात. मामाला भविष्य सांगता येते अशी बतावणी करत अनिल आपटेचे काही बाही भाकीत वर्तवतो. यासाठी त्याच्या गुरुंशी बोलायला लागेल असेही सांगतो आणि अनिलचा फोन गुरूजींना फोन करण्याच्या बहाण्याने बाहेर नेतो आणि त्यातला व्हिडीओ डिलिट करतो ज्यात अनिल आणि जान्हवीची आई यांच्यातल्या पैशाच्या व्यवहाराबाबत बोलणे असते.

इकडे श्रीची आई आणि काकू फायनली त्याला अनिल घरी येऊन गेल्याचे सांगतात आणि जान्हवीची आई आली होती तेही. श्री आजीला त्याबद्दल विचारतो पण आजी काही कळू देत नाही. कारण ती वचनबद्ध असते. पण श्री तिला असेही ठणकावून सांगतो की त्याचा हट्टीपणा आजीकडूनच आलाय त्यामुळे तो जान्हवीबद्दलचा गैरसमज तिच्या मनातून काढल्याशिवाय राहणार नाही.

नंतर श्री आणि जान्हवी ऑफिसमधे भेटतात तेव्हा जान्हवी म्हणत असते तुला मी सांगितलं खरं की आजी आणि माझ्यात निवड करायची वेळ आली तर आजीला निवड पण हे खूप कठीण आहे माझ्यासाठी. त्यावर श्री तिला थोडक्यात असे समजावतो की अनुकुल परिस्थितीत सगळे प्रेम करु शकतात पण प्रतिकुल परिस्थितीतच प्रेमाचा कस लागत असतो. आजी जितकी त्याच्यासाठी महत्वाची आहे, जवळची आहे तितकीच जान्हवी पण हे तिला सांगतो.

आता उद्याच्या भागात शशिकलाबाई श्रीच्या ऑफिसमधे आलेल्या दाखवल्या आहेत आणि माफी मागत विचारत आहेत की तुमच्या आजीने तुम्हाला सांगितले का मी येऊन काय बोलले ते? Happy

आजचा भाग समाप्त

चांगले लिहिले अंजली. मीपण बघायला आले अशोककाकांचे अपडेट्स. आज अशोककाका का आले नाहीत.

अंजली तू लिहिलेस ते बरे झाले, बरेच जण आजचा भाग वाचायला येतील तर त्यांची निराशा होणार नाही.

Dhanyavaad Anjali!

मला पण प्रश्न पडलाय कि काकांना बरे नाही का नेट प्रॉब्लेम? काकांची तब्येत बरी असुदे.

आजकी ताजा खबर --- मामान्चे नेट
कनेक्शन गेल्यामुळे मामा ऑनलाइन येऊ शकत
नाही

कालच मामांचा फोन आला होता.
बीएसएनएल च्या नेटवर्कचा प्रॉब्लम आहे

टिव्ही ९ वर आत्ता श्री जान्हवीची लग्नाच्या सेटवरच मस्त मुलाखत चालु आहे.
लग्नाच्याच गेटअप मध्ये !!! Happy
शुभमंगल सावधान नावाचा खास कार्यक्रम होता म्हणे हा १ तासांचा..

अनुकुल परिस्थितीत सगळे प्रेम करु शकतात पण प्रतिकुल परिस्थितीतच प्रेमाचा कस लागत असतो.
>>
वाह! Happy

बाकी अंजलीचे आजचे अपडेट्सही छानच Happy

अहो मंडळी....भाचेभाच्यांनो.... मी आलो.... दोनअडीच दिवस बीएसएनएल ने दिला तडाखा मला... बंदच. फोन केला त्याना...तर ते म्हणाले मेकॅनिक उद्या पाठवितो.... उद्याचा वाघ्या आज आला....आणि आला तो आला तो आला सायंकाळी ४ वाजता... मग मशिनमध्ये डोके घालून बसला....माझ्याच फोनवरून आठदहा फोनही केले.. शेवटी सहाच्या सुमारास रीकनेक्शन झाले एकदाचे.... खूप वैताग आला....नेटवर नसल्याचा....वाईटही वाटलेच.....[आणि प्रकृती ठीक आहे.....आपुलकीने विचारणा केल्याबद्दल सार्‍यांना धन्यवाद]

चला असो.... गैरहजर राहिलो की किती चुकल्यासारखे होते ते समजले.....!!

बाकी 'होणार सून...' च्या कालच्या भागावर इथे अंजली_१२ ने छानच लिहिले आहे...माझ्याही पेक्षा. ते मी वाचले. आजच्या भागाविषयी लिहितो आहेच....रात्री ११ च्या प्रसारणानंतर.

सहाही सासू लग्नानंतर घर सोडणार आहेत ह्या बातमीने धक्काच बसला आहे.... [म्हणजे इथे मी वाचले, मागील पानावर..... खरे होऊ नये तसे]

अहो काका धन्यवाद Happy पण तुमचे अपडेट्स शेवटी तुमचेच Happy त्याची वाट आम्ही पाहणारच.
परत तुमचे नेट कनेक्शन न जावो Proud

Pages