नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय त्या आयांना काही कॉमन सेन्स नाही का. श्री फोनवर कामाचे बोलतानाही त्याला जेवण्यासाठी विचारत होत्या.
रच्याकने श्री नेहमी एकच वाक्य बोलतो...मी मेल पाठवलीये किंवा मेल पाठवा>>> मी पण अगदी हेच लिहायला आले होते...

http://zeemarathi.com/ZMA2013/zee-marathi-nominations.aspx

हि घ्या लींक..

फक्त तुमचे नाव, मोबाईल नं, इमेल आयडी, शहराचे नाव लिहुन खाली तुम्हाला हवे ते पर्याय निवडून वोट करा आणि सबमिट वर क्लीक करा. तुम्हाला झी कडून मेल आली कि वोटिंग झाले असे समजा बस.. Happy

घेतली लिंक पियु.....आणि व्होटिंग केलेही.... पण एक नको तो प्रॉब्लेम झालाच. म्हणजे ज्या मालिका मी कधीच बघितल्या नाहीत, त्यानाही व्होटिंग देणे प्रोग्रामने अनिवार्य केल्याचे दिसले. माझ्या दृष्टीने फक्त 'होणार सून मी ह्या घरची...' हीच महत्वाची....पण असेही काही गट होते की जिथे या मालिकेला प्रवेश नव्हता.... म्हणून ते विभाग मी सोडले....शेवटी 'सबमिट' ला क्लिक केल्यानंतर मेसेज आला की अमुकतमुक गटातील तुम्ही कुणीच निवडले नाही....सबब पुन्हा तिकडे जावा.....सबब पुन्हा तिकडे गेलो आणि न पाहिलेल्या मालिकांना व्होटिंग करावे लागले.... हा सारा बनवेगिरीचाच प्रकार म्हणायचा.

असो...श्री व जान्हवीसाठी काहीही.

मी देऊन आले मत
होणार सुन,शेजारी शेजारी आणि एखाद्या ठिकाणी (जिथे पर्याय नाही तिथे) तुमाज ला देऊन आले मत Proud

शेजारी शेजारीच्या भुजंगला आणि लाजोला मत दिलं
श्री जान्हवीला तर दिलंच दिलं
रिमाला दिलं
लिमयेंना दिलं
अनिल आपटेला दिलं

इतकच आठवतय सध्या

बेस्ट कॅरेक्टर साठी भागिरथी बाईंना आणि भोसलेंना मत द्यायची इच्छा नसताना द्यावं लागतय Sad (बाकिच्या मालिक अगदीच व्याक असल्याने)
सेम विथ -
बेस्ट मदर- नर्मदा
बेस्ट फादर लिमये
बेस्ट जज -स्वप्निल जोशी
बेस्ट मदर इन लॉज सहा सासवा (पण हे तितकंही वाईट नाही)
बेस्ट फादर इन लॉज - लिमये

लिंक बद्दल धन्यवाद Happy

>>हा सारा बनवेगिरीचाच प्रकार म्हणायचा
अहो बनवेगिरी कसली त्यात? मतदान करणारे प्रेक्षक सारे कार्यक्रम बघतात असे गृहीत धरलय इतकच!

बाकी यंदा होणार सुन बरीचशी बक्षिसे मारणार असे दिसतेय Happy

निगेटीव्ह व्होटींगची सोय पाहिजे होती.... पिळगावकर, सौरभ, पुष्कर क्षोत्री वगैरे मंडळी वाचली Wink

स्वरुप +११११११११११११११११११११११ Proud

रिया मी पण.... एखाद्या ठिकाणी (जिथे पर्याय नाही तिथे) तुमाज ला आणि तुतिमी ला (एकाच ठिकाणी) मत दिल.

स्वरुप..... पण माझ्यासारखा एखादा मतदार मालिकांच्या पावसात भिजतच नसेल तर त्याला मत न देण्याचा अधिकार आहेच ना ? प्रत्येक गटात मी मत दिलेच पाहिजे हा अट्टाहास काय कामाचा ?

अहो मग तुम्ही इतरही मालिका बघाव्यात असे वाटत असेल झी वाल्यांना!
बघत नसाल तर तुमच्या लाडक्या भाच्यांकडून कानोसा घ्या आणि करुन टाका वोटींग.... हाय काय नाय काय!

वेल वेल....स्वरुप...झी चा तसाही डाव असू शकेल म्हणा.... तसे व्होटिंग केले आहेच मी....भाच्यांना विचारूनच अर्थात.... बाकी ज्या ज्या ठिकाणी श्री आणि जान्हवी आहेत तिथे त्यानाच....हे आम्ही जाहीरपणे सांगू शकतो.

निगेटीव्ह व्होटींगची सोय पाहिजे होती.... पिळगावकर, सौरभ, पुष्कर क्षोत्री वगैरे मंडळी वाचली
>>>>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी

बेस्ट कॅरेक्टर साठी भागिरथी बाईंना आणि भोसलेंना मत द्यायची इच्छा नसताना द्यावं लागतय..

निगेटीव्ह व्होटींगची सोय पाहिजे होती.... पिळगावकर, सौरभ, पुष्कर क्षोत्री वगैरे मंडळी वाचली

>> सेम पिंच..

बादवे हा १००८ वा प्रतिसाद.. धाग्याने मोठा टप्पा पार केला.. Happy
थँक्स टू अशोककाका आणि श्री-जान्हवी Happy

अरेच्या....पियु.... १००० चा टप्पा पार केला सुनबाईने ? व्वॉव....तिचे अभिनंदन केलेच पाहिजे. लग्नात करूच.

Mugdha: Point noted.

Tey portrait Jyotiba Phulencha aahey ka sanga na kunitari.. bet lagaliye bayakoshi.

Janashri var gharatil samasta mahila varg tudumb prasanna aslyamule voting kadhich zalay.

आजच्या भागाचा निषेध... काहीही टाकतात उगाच.. तो मामा डोक्यात जातोय.. ब्रश ढापला आणि आता कपडेही.. काहीही दाखवलय.... Uhoh

आजच्या भागाचा निषेध... काहीही टाकतात उगाच.. तो मामा डोक्यात जातोय.... अनुमोदन जान्हवी...
खरच काहि हि दाखवतायेत ..कपडे.. ब्रश... हा मामा ... आता उगिचच काहि एपिसोड खानार असे दिसते ...आज अनिल आनि.. त्याचे जे काहि दाखवले ते म्हनजे कहर होता...

शनिवार दि,१२ आक्टोबर २०१३ ~ अपडेट

~ या भागाची लक्तरे वरील प्रतिसादात प्रेक्षकांनी काढलेली आहेतच. तरीही सवयीमुळे अपडेट देत आहे. जान्हवी व श्री यांचा विवाह २० आक्टोबररोजी असल्याचे मिडियाच्या विविध चॅनेल्स मधून सतत रसिकांवर आदळत आहे शिवाय मुंबईतील वर्तमानपत्रातून साग्रसंगीत फोटोसहीत वृत्तांत प्रकाशित झाल्या असल्याने त्या तारखेपर्यंतच्या भागांना शून्य महत्व आले आहे. दिग्दर्शक आणि लेखिका तोपर्यंत काहीही रंगसफेती करीत आहेत असे म्हणावे लागेल. आजच्या भागात बीडचा नीळकंठ मामा आपल्या पराक्रमाने बहिणीच्या मागे लागलेली अनिल आपटे नामक साडेसाती दूर करणार आहे. मग त्याने सकाळी उठून भाच्याच्या ब्रशने दात घासायचे,त्याची अंडरवेअर, टॉवेल घेऊन आंघोळीला जायचे, त्याच्या पैशाने बिस्किटे आणून चहा प्यायचा आदी किळसवाणी म्हणणारी दृष्ये दाखवून देवस्थळीनी त्याची काय प्रतिमा उभी केली ? मग हा मामा त्या अनिल आपटेला हॉटेलमध्ये बोलावून घेऊन त्याला भविष्य सांगतो....जे वाईट आहे म्हणून आपटे टरकतो, ग्रहांची शांती करायला पैसे देतो....मग माझ्या गुरुला बोलावून घेतो असे सांगून मामा आपटेचाच मोबाईल घेतो आणि रेंजच्या बहाण्याने हॉटेलबाहेर पडतो.

इकडे आयांच्या सततच्या रडण्याने प्रेक्षकही वैतागून गेले आहेत...तरीही श्री बिचारा तग धरून आहे. जान्हवी आणि त्याची समोरासमोर भेट नाहीच. जी काही तीन चार मिनिटे बोलतात ते फोनवरच. बोरकर मॅनेजरांचा जान्हवीसमोर नित्याचा तो हलकाफुलका संवाद.

काहीही घडलेले नाही...वा काही घडावे असे वाटले नाही. तरीही त्यातल्या त्यात सोमवारच्या भागाची जी झलक दाखविली त्यामध्ये दोन आया श्री ला 'त्या दिवशी जान्हवीची आई आपल्याकडे आली होती. ती आणि आईआजी वरील रूममध्ये गेल्या आणि दार बंद करून घेतले...' तेवढ्या बातमीवर श्री विस्मयात पडलेला दाखविला गेलाय....कदाचित त्या बिंदूपासून जान्हवीचा प्रश्न मार्गी लागू शकेल.

आज मी बघितला नाही, एकंदरीत बरेच झाले बघितला नाही ते, त्या मामाला कशाला आणले त्यापेक्षा दुसऱ्या तऱ्हेने प्रॉब्लेम सोडवता आला असता, आता एकदम २० तारखेला लग्नच बघावे डायरेक्ट असे वाटायला लागले, रात्री अशोककाकांचे अपडेट वाचायला जास्त छान वाटतेय तो एपिसोड बघण्यापेक्षा.
धन्यवाद अशोककाका.

मीपण वोटिंग केले, मी सध्या हीच मालिका बघते म्हणून अपवाद वगळता मी ह्याच मालिकेला जास्त मते दिली. अपवाद मागे मी मसाह बघायची म्हणून सविता प्रभुणे आणि आबा यांना मत दिले आणि राधा बघणे कधीच सोडले तरी तो यशवंत ढगे (अनिल गवस) चांगले काम करायचा म्हणून त्याला दिले आणि रंजूला कारण ती माझी भाची आहे म्हणून, बस एवढाच फरक आणि स्वप्नील जोशी आणि बांदेकर यांना दिले.

आज सकाळी झी मराठी बघताना खाली स्क्रोल मध्ये वाचल की जान्हवी उंबरठा ओलांडुन आत येताच उंबरठा ओलांडुन घराबाहेर जाण्याचा सहा सासवांचा निर्धार/निर्णय (हे नक्की आठवत नाहिये) आता काय होईल?

अपवाद मागे मी मसाह बघायची म्हणून सविता प्रभुणे आणि आबा यांना मत दिले...>>>>> मी पण...सविता प्रभुणे आणि आबा यांना मत दिले. दादा होळकर ला सुद्धा मत दिले....

Pages