नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच, श्री चे व्यक्तिमत्व अतिशय विचारी आणि संयमी रेखाटले आहे. लेखक आणि दिग्दर्शकांना अनुमोदन. तेव्हढंच शशांक यांनी उत्तम वठविलंही आहे. त्यांचेही कौतुक आहे. श्री ने आपली बाजू कुणाचा अपमान न करता स्पष्टपणे, ठामपणे मांडणे छान दाखवले. इतर मालिकांवाल्यांनी जरा स्फूर्ति घ्यावी Wink

अशोक मामा, अपडेट्स भारी!
मला अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे श्री नेहमी जान्हवीचा फोन न घेता तिला उलट फोन करतो. तिचे पैसे जाऊ नयेत म्हणून! किती गोड!
आजी फार डोक्यात जात आहेत!

<."आजी, जान्हवीच्या चारित्र्याविषयी कुणीतरी तुला येऊन सांगतो आणि तू ते सारे खरे मानतेस ? आणि मी जो जन्मापासून तुझ्याबरोबर आहे, तो इतक्य विश्वासाने त्या मुलीविषयी सांगत असताना माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस हे सारे अनाकलनीय आहे..." याला आजीकडे काहीच उत्तर नसले तरी त्या आपल्या हट्टाला चिकटून आहेत.>

जान्हवीला अनेक वर्षांपासून ओळखणार्‍या तिच्या घरच्या कोणी हे सांगितले असा उल्लेख केला ना आजींनी? आजींशी बोलतानाचे शशिकलाबाईंचे संवादही +अभिनय सॉलिड होते. आमची मुलगी अशी आहे. पण तुम्ही पदरात घ्या; हे तुम्हाला बाहेरून कळू नये म्हणून मीच सांगतेय, असे अगदी रडून भेकून पाय धरून सांगितले. नुसतेच मुलगी चंचल आहे, तिची अफेअर्स होती असे सांगितले असते तर आजीला शशिकलाबाईंचाच संशय आला असता.

आजी जान्हवीला नाकारण्याची एकेक कारणे सांगत होत्या आणि श्री ती खोडून काढत होता.
अनिल आपटेशी लग्न करताना तिने काय विचार केला? - त्यात तिचा नाईलाज होता.
तुझ्या पैशासाठी लग्न करत नाही का ती ? - आमचे जुळले तेव्हा मी श्रीमंत आहे हे तिला माहीतच नव्हते असे (याच शब्दांत नाही)
तिचे लग्न अठरा वेळा जुळून मोडले - जुळता जुळता राहिले

कालचे संवाद मस्त खटकेबाज तरीही ग्यान देणारे होते.
आजी : पुढच्यास ठेच मागचा शाहणा (बेबीआत्यावरून)
श्री : मला माझ्या चुका स्वतः करून शिकू दे.

पाच आया आजीविरुद्ध बंड करतील का?

मस्त...श्री एकदम भारी काल! आई-आजी करत भावनिक झाला नाही, ते फार आवडले.

हो छान होता कालचा भाग. रो हं चा त्रागा अगदी डोक्यात जात होता पण श्री अगदीच आवडला.

राधाच्या सौरभ ने श्री कडुन काही शिकायला पाहीजे Wink

काल जेव्हा आजी श्रीला म्हणते की भागीरथी गोखलेची पारख, अटकळ कधीच चुकत नाही...तेव्हा श्रीने विचारायला हव होत की सायलीला तुच पारखुन घेतल होतस ना, मग ती अशी का निघाली?? याचाच अर्थ काय की तुमच्यासमोर गोष्टी जश्या मांडल्या जातात त्या तशाच आहेत हे तुम्ही मानुन चालता.

राधाच्या सौरभ ने श्री कडुन काही शिकायला पाहीजे>>>>>>> अदिती १००००००००००००% अनुमोदन.

श्रीने झालेल्या आणि होउ घातलेल्या सगळ्या नवर्‍यांसाचे ब्रेन वॉशिंग क्लासेस घेतले पाहिजेत. ते तुमाज मध्ये नाही का दिप्ती आणि सुहास जोशीने कंन्सल्टंसी सुरु केलेली असते, "शादी में मचमच........." पूर्ण नाव आठवत नाहीये.

काय पळतोय हा धागा.
कालचा भाग खरेच केवळ श्री चा होता. मस्त काम करतो तो. आजीच आदर ठेवूनही आपले मुद्दे व्यवस्थीतपणे मांडत होता.

आजच्या प्रतिसादांमधील मला भावलेली प्रमुख घटना म्हणजे जवळपास सार्‍याच प्रतिसादकांनी 'श्री' च्या भूमिकेचे मनःपूर्वक कौतुक केले आहे....त्याच्यामुळेच म्हणा, पण जान्हवीचा अनुपस्थिती तितकी जाणवली नाही....आज येईल ती.

भरत ~ शशीकलाबाईनी आजीपुढे जान्हवीविषयी जो इतिहास वाचला तो आजीला पटेल अशा अभिनयाने, हे खरे.... पण शहरातील एका मोठ्या उद्योगधंद्याशी सर्वार्थाने निगडित असलेली ज्येष्ठ कर्तबगार महिला त्याच्यावर चटदिशी विश्वास ठेवून आपल्या नातवाने चूक केली असा सिद्धांत मांडते ती बाब पचविणे फार जड जाते.

अर्थात आता २० तारखेच्या महाभागात जोडीचे लग्न आहेच....पण आशा आहे की त्या कालावधीपर्यंत गोखले स्त्रियाही मनापासून तयार झाल्या असतील.....[कारण वरच्या लोकसत्ता लिंकमधील फोटोत श्री समवेत केवळ सहस्त्रबुद्धे मंडळीच दिसतात....]

पण मामा, काल नोट केले का... लीना भागवत ने आवहन केले तेव्हा मागे सेट लग्नाचा वाटत होता ...

मस्त...श्री एकदम भारी काल! आई-आजी करत भावनिक झाला नाही, ते फार आवडले.>>++++++++++१११११

बहुतेक आजीचा गैरसमज दूर न होताच ५ आयांसठी ती तयार होणार असेल... म्हणजे लग्न झाल्यावरचे काही एपिसोड्स तो दूर करण्यात घालवता येतील....

प्राची.... म्हणजे लीना त्या 'विनोदी कलाकार' भूमिकेसाठी मतदानाचे आवाहन करतात, त्यावेळेचा सेट ? अरेच्या, मी काही तिकडे खास असे लक्ष दिले नाही, त्यामुळे हुकले. तसे जर असेल तर मग श्री ची आई नर्मदाबाई यानीही तसलेच आवाहन करताना अगदी मंडपात नटल्यासारखाच पेहराव केल्याचे दाखविले आहे.

तसे असेल तर ठीक आहे म्हणा....अन्यथा आयत्या लग्नाच्यावेळी यांची चुपकी दाखविली तर मजाच जाणार.

श्रीने झालेल्या आणि होउ घातलेल्या सगळ्या नवर्‍यांसाचे ब्रेन वॉशिंग क्लासेस घेतले पाहिजेत......>>>> १००% अनुमोद्न.

खूप आवडला कालचा भाग. मस्त जुगलबंदी होती. श्री (शशांक) ने अभिनयात बाजी मारली.

कालचा भाग लई म्हणजे लईच आवडला.. माणसं अगदी माणसासारखीच बोलली Proud
ब्लॅक आणि व्हाईटच्या मधली ग्रे शेड पण असते हे ह्या मालिकेत दाखवतायत हे अत्यंत चांगली गोष्ट.
इतर मालिकांवाल्यांनी जरा स्फूर्ति घ्यावी >>> +१००
श्रीच्या मुली फॅन्स मध्ये प्रचंड वाढ होणार हे नक्की.. Happy काल मुलाखती दरम्यान एक प्रेक्षकाने माझी होणारी बायको अगदी जान्हवी सारखी आहे पण मी तुमच्यासारखा नाहीय हे कबूल केले. ईतके जरी लग्नाळू मुला-मुलींना उमजले आणि त्याप्रमाणे समंजस वागायचा प्रयत्न केला तरी अजून काय हवे.. Happy

aajachaa

कालचा भाग मस्त झाला. श्री व आजीची जुगलबंदी आवडली. मी जान्हवीच्या दृष्टीने अकाउटंट आहे सांगायला हवे होते व ज्यामुळे आजीचा गैरसमज होतो.... कर्तुत्वाने व 'मी' सगळं केलं ह्यामुळे आलेला 'अहं' आजी अन उद्योजिका भागिरथी गोखले ह्या दोन व्यक्तिमत्वातून छान दाखवले.

मुग्धा, काल मलापण वाटले श्री आजीला विचारेल सायलीला तूच पारखले होतेस ना?
मुळात मला त्यांची पारख चुकीचीच ठरतेय असे वाटते, देवळात त्यांनी जान्हवीच्या आईला खरे म्हणजे बरोबर पारखले होते, पण नंतर त्यांचा स्वतःच्या पारख करण्यावर विश्वास नाही असे वाटते कारण सायलीच्या बाबतीत ती चांगलीच आहे असे ठामपणे समजणारी आईआजी, जान्हवीच्या आईने जान्हवीबद्दल सांगितल्यावर आपली देवळात केलेली पारख विसरून जान्हवीच्या आईवर विश्वास ठेवते अगम्य वाटते हे सगळे.

कालचा भाग जबरदस्त होता.
पण ५ आया अगदीच शामळू शटल्स आहेत. एकदा इकडे एकदा तिकडे.. पण श्रीच्या विरूद्ध नाही. आणि हतबल झाल्या की अश्रुगाळ मोडात जातात.

त्यातल्या त्यात ती बेबीआत्याच अधूनमधून आईलाही विरोध करताना दिसतात....तेही मिळमिळत नाही, तर तडफदारपणे....जरी त्याचा आजीवर काही परिणाम झाला नसला तरी.

बाकी या पाचही आयांच एक बरे आहे, ते म्हणजे त्या श्री वर अगदी जीवापाड माया करतात.

@ मुग्धा
>>सायलीला तुच पारखुन घेतल होतस ना, मग ती अशी का निघाली?? याचाच अर्थ काय की तुमच्यासमोर गोष्टी जश्या मांडल्या जातात त्या तशाच आहेत हे तुम्ही मानुन चालता

+११११११

लीना भागवत मला पण आवडली. बहुतेक रोहिणी हट्टंगडी डॅशिंग दिसावी म्हणून या पाच जणींना जरा जास्तच मवाळ दाखवलंय.

रोहिणी हट्टंगडींचे व्यक्तीमत्वच अ‍ॅग्रेसिव्ह आहे. त्यांना कर्तबगार भूमिकाच शोभून दिसतात. त्यांच्या अभिनयात मला भागिरथी गोखलेच जास्त दिसतात, श्रीची आजी क्वचीतच दिसते. (हे कालच नाही तर मालिकेच्या सुरुवातीपासूनच वाटत आलंय मला)

"तर तू तुझ्या आयांना निवडलं पाहिजे" असे जान्हवी श्री ला आज सांगणार....एव्हढं काय महान व्हायचं! ह्म्म्म!!!

श्री जान्हवीला सर्वात पहिल्यांदा कुठे पाहतो? काय प्रसंग दाखवलेला? मला सहज आधीचे एपिसोड बघावेसे वाटले पण आता ती लिंक काढून टाकलीये असं आलं म्हणून विचारले Happy

गुरुवार दि.१० आक्टोबर २०१३ : अपडेट....

आजही सर्वांच्या डोळ्यातून गंगायमुना वाहण्याचाच कार्यक्रम होता.....अगदी श्रीरंग गोखलेही रडू लागले, अगदीच हमसाहमशी नाही तरी जान्हवीला वाटले की त्याला जवळ घेऊन त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसावेत. ती तर रडतच होती; कारण श्री ने तिला लग्नात येत असलेल्या अडचणींबाबत विवेचन केले. मग अगदी टिपिकल मीनाकुमारी राजेन्द्रकुमार पद्धतीप्रमाणे त्याने तिचे व तिने त्याच्या डोळ्यांवर हात फिरवून पाणी पुसले....बरे वाटले बघताना.

श्री तिला सांगून टाकतो आजीचे मत....शिवाय हेही की "मी तिला लागेल असे बोललो असलो तरे आता या क्षणी मला त्याबद्दल खूप वाईट वाटत आहे....असे वर्तन माझ्याकडून व्हायला नको होते. अर्थात मला जशा त्या सहाही आया हव्या आहेत तशी तूही हवी आहेस जान्हवी..." यावर जान्हवी खूष होऊन न जाता श्री ला त्याच्या घरातील परिस्थिती समजावून घे असा योग्य सल्ला देते. ती म्हणतेच की, 'उद्या जर सहा आया आणि दुसरीकडे मी यातील कुणाची निवड करायची असला प्रसंग तुझ्यावर आलाच तर तू सहा आयांचीच निवड केली पाहिजेच..." यावर सुन्न झालेला श्री तिला सावरून घेण्याचा प्रयत्न करतो..... "तू काय करशील त्यानंतर?" या प्रश्नाला जान्हवी शांतपणे उत्तर देते..."मग मी इथे नाही राहाणार."

भावनिक होते सारे संवाद आजचे...'[म्हणजे या दोघांचेच].... सुरुवातीला शशीकलाबाई फोन सेंटरवरून आपल्या भावाला फोन लावून त्याला इकडे येण्याची आग्रहाची विनंती करतात. कारण त्याना अनिल आपटे आपल्याला काहीतरी इजा करणार अशी भीती वाटत आहे. बहुधा तो भाऊ आज ना उद्या आलेला दाखवितील आणि तोच त्या अनिल आपटेला दूर करेल....[असा अंदाज आहे]. फोनचे बिल ५७ रुपये होते, पण ह्या बाई दुकानदाराला केवळ १० रुपये देतात....आणि तोही प्रथम आरडाओरड करून १० घेतो.... कठीण आहे या देशाचे.

बाकी 'गोकुळ' बंगल्यावर तर नुसता रडका कारभारच.....कुणालाही कसलेही काम नाही....आपल्या रूममध्ये आजी आतून दार लावून बसल्यात...कालच्या संवादांची उजळणी...व त्यावर डोळ्यातून पाणी वाहात आहेच. दुसर्‍या रुममध्ये नर्मदा धाय मोकलून रडताहेत तर त्याना सावरत आहेत शरयू आणि मावशी....तिसर्‍या खोलीत बेबीआत्या आणि इंदूवहिनी....परत तेच....रडणे.

बॅन्क मॅनेजर बोरकर मात्र जान्हवीचे लग्न आता हाकेच्या अंतरावर आल्याच्या भावनेने एकदम खूष झाले आहेत...त्याना आपल्या मुलीचेच लग्न आहे असे वाटत आहे.....आजच्या एपिसोडेमध्ये हाच छोटासा भाग सुसह्य होता.

अजंली_१२
...श्री जान्हवीला सर्वात पहिल्यांदा कुठे पाहतो? काय प्रसंग दाखवलेला? ..."

~ पहिल्या भागात 'विजया सहकारी बॅन्के' च्या फाटकातून श्री आत येत आहे....तर जान्हवी तिचा हाफ डे असल्याने तसेच घरी तिला पाहायला एकजण येणार असल्याने बॅन्केतून बाहेर पडली आहे. दोघे समोरासमोर येणार तोच रस्त्यावरून स्त्री ड्रायव्हर असलेली एक कार दुसर्‍या मोटारसायकलवाल्याला ठोकरता ठोकरता थांबते. थोडासा दंगा होतो; पण पादचारी मार्गावरून जाणारा एक गृहस्थ त्या बाईना पाहून काहीतरी "या स्त्रियांना कशासाठी लायसन्स देतात"" असा शेरा मारतो....तो ऐकून जान्हवी त्याला फटकारते....आणि "स्त्री असली म्हणून काय झाले ? मनात आणले तर स्त्री गाडीच काय सारे जग चालवून दाखविल..." असे म्हणत तडफेने तिथून जाते.....बाजूला उभा असलेला श्री अत्यंत कौतुकाने त्या मुलीचे ते उदगार ऐकतो...अर्थात त्याला त्यावेळी माहीत नसते की मुलगी त्याच बॅन्केत नोकरीला आहे जिथे तो चालला आहे कामासाठी.

आज मी आवर्जुन बघणार होते सिरीयल.. पण बंधुराजांनी रिमोट सोडलाच नाही Sad
अपडेट्चा १ला पॅरा सही वाटला वाचताना.. मी इमॅजिन केलं.. वीकांताला बघेन सल्ग

Pages