भयग्रस्त समाज ?

Submitted by Mandar Katre on 1 July, 2013 - 01:16

मला एक प्रश्न पडला आहे

हिंदू धर्म / समाज नेहमीच आक्रमित / भयग्रस्त का?

1000 वर्षांपूर्वी मुघल / 600 वर्षापूर्वी यूरोपियन आक्रमक धर्मविस्तारवादी माथेफिरु आणि सध्या ढोंगी लाळघोटे सेक्युलर

हिंदू धर्माने नेहमीच इतर अविकसित /रानटी संस्कृतींकडून हल्ल्यांना बळी पडत राहावे का?

ताठ मानेने /स्वाभिमानाने आपला स्वत:चा धर्म-संस्कृती/मूल्ये यांवर आधारित जीवन जगणारा निर्भय समाज दीर्घकाळ कधी तरी अस्तीत्वात होता का?

7500 वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास करता ,वैदिक काल / राम-कृष्ण-पांडव काल / विक्रमादित्य /राजा शिवाजी /राणा प्रताप यांचे कार्यकाल असे अपवादात्मक कालखंड वगळता हिंदू समाज भीती ,गुलामगिरी आणि दास्य यात जखडलेला आढळतो.

कदाचित याला हिंदूंची कथित पापभीरू वृत्ती ,ब्राहम-क्षात्र तेजच्या समन्वयाचा अभाव आणि तथाकथित शास्त्र-पुराणातून सांगितलेल्या भाकडकथा आणि पाप-पुण्याच्या भ्रामक कल्पना हे सारे कारणीभूत असेल का ?

आध्यात्मिक जीवन / मृत्यूनंतरचे मोक्ष इत्यादि गोष्टींना अवास्तव महत्त्व दिल्याने ऐहिक /भौतिक जगाकडे, वर्तमानकाळातील वास्तवाशी आणि आव्हानांशी काडीमोड घेतल्याचेच हे परिणाम आहेत ,असे मला वाटते .

जय हिंद !

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुघलांचं युद्धतंत्र वरचढ नव्हतं? मध्ययुगातले युरोपियन रानटी आणि अविकसित?
कारणीभूत ठरणार्‍या घटकांच्या यादीत एकजिनसीपणाचा अभाव नको? त्या अभावाची कारणे शोधणार? (ज्यांचे डोळे उघडलेले आहेत, त्यांना ती दिसतात). सुवर्णमयी इतिहासाच्या वाळूत तोंड खुपसून बसलेल्यांना नाही दिसणार.
परकीय आक्रमण होण्याच्या आधीच्या काळात लोक भयमुक्त होते का?

हिंदू धर्म / समाज नेहमीच आक्रमित / भयग्रस्त का?
<<
भयगंडाने पछाडलेले व शस्त्राने धर्मप्रसार करणार्‍या + कर्मठ व मध्ययुगीन रूढीप्रिय अशा इतर फतवेबहाद्दर धर्मांचा कित्ता गिरवू पहाणारे 'काही' लोक, जोपर्यंत स्वतःला हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणवत रहातील, तोपर्यंत या धर्माचे / समाजाचे लोक भेदरलेले आहेत असे त्यांनाच वाटत रहाणार.

हिंदू धर्माने नेहमीच इतर अविकसित /रानटी संस्कृतींकडून हल्ल्यांना बळी पडत राहावे का?
<<
धर्म म्हणजे काय हेच ज्यांना समजत नाही, सुसंस्कृत व पापभीरू वर्तन, अहिंसा, सत्य, ऋजुता, सर्वधर्मसमभाव या व अशा गोष्टी पाळून वागणे ज्यांना बुळेपणा वा लांगुलचालन वाटते, अशा लोकांकडूनच या धर्माला जास्त धोका आहे.
रस्त्यात त्रिशूळ अन तरवारी घेऊन नाचणे, व या ना त्या कारणावरून इतर मानवांना धर्म-जाती-लिंगाच्या आधारे नीच लेखणे, यातच शौर्य आहे असे ज्यांना वाटते, असे लोक ज्या धर्माचे स्वयंघोषित धर्मरक्षक व मुखंड आहेत, अशा 'धर्मा'ला बाहेरून कुणा रानटी वा अविकसित लोकांनी काही करायची गरजच नाही. हे आतलेच कर्मठ रानटी पुरेसे आहेत या धर्माची विल्हेवाट लावण्यासाठी!

भौतिक जगाकडे, वर्तमानकाळातील वास्तवाशी आणि आव्हानांशी काडीमोड घेतल्याचेच हे परिणाम आहेत ,असे मला वाटते .
<<
अगदी अगदी! मी पण तेच म्हणतो आहे.
वर्तमानकाळातील वास्तवाशी काडीमोड घेतल्यामुळेच, इतिहासाकडे काविळ झालेल्या नजरेतून पाहून, धर्माच्या नावावर भांडणे, जातीच्या नावावर माज, अन तदानुषंगिक पुढील अव्यक्त साखळीला अटळपणे पुढे नेणारे असले "विचारप्रवर्तक" लेख जन्म घेतात.

*

मुळात हिंदू धर्म / समाज भयग्रस्त आहे हा जावाईशोध लागलाच कुठून तुम्हाला? Happy काय कुणी भेदरलेले - घाबरलेले नाही इथे. तुम्ही अज्जीबात टेन्शन घेऊ नका कात्रेसाहेब. आल इज वेल इन इन्डिया! फिकर नॉट.

*

स्वर्णमयी इतिहासाची वाळू Wink मस्त वाक्य आहे मयेकरजी!

नमस्कार !

हिंदू धर्म / समाज नेहमीच आक्रमित / भयग्रस्त का? > > > >
स्व-स्वार्थामुळे एकता नाहीशी झाली, आणी एकटे राहिल्याने भिती ही आलीच.

अहो एकता असली कि, चिमुरड्या मुंग्यासुद्धा एका हत्तीला खेचुन घेऊन जाऊ शकतात हवे तिथे.
------------------------
ताठ मानेने /स्वाभिमानाने आपला स्वत:चा धर्म-संस्कृती/मूल्ये यांवर आधारित जीवन जगणारा निर्भय समाज दीर्घकाळ कधी तरी अस्तीत्वात होता का? > > > >

हो. होता आणी अजुनही आहे, आपण फक्त इतरांच्या तर्क-कुतर्कांमुळे गोंधळुन जाऊन जे उमजायचे आहे ते न उमजता भलत्याच दिशेला भरकटु नये . . . . मग तो कणखर समाज आपल्यातच ताठ मानेने जगत असलेला दिसुन येईल.
---------------------------------
7500 वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास करता ,वैदिक काल / राम-कृष्ण-पांडव काल / विक्रमादित्य /राजा शिवाजी /राणा प्रताप यांचे कार्यकाल असे अपवादात्मक कालखंड वगळता हिंदू समाज भीती ,गुलामगिरी आणि दास्य यात जखडलेला आढळतो. > > > >

नंतर आपण होऊन त्यातुन बाहेर ही आला आहे . . . .
------------------------------------------
पुराणातून सांगितलेल्या भाकडकथा आणि पाप-पुण्याच्या भ्रामक कल्पना > > > >

कोणते पुराण वाचुन ते भाकड अथवा त्यातील पाप -पुण्ण्याच्या कल्पना भ्रामक वाटल्या ?

मग मला वाटते आपल्या वाचनात ( आपल्याच काय ? ईथे सर्वच कुतर्क वादींच्या ही ) खरी पुराण शास्त्रे आली नसुन, त्यांच्या काही व्यक्तगत मतांनी पुनःश्च घडविलेल्या प्रति आपण वाचल्या असाव्यात.

कारण आपल्या धर्मात अठरा पुराण शास्त्रे आहेत आणी त्यांतील एक ही गोष्ट, कथा भाकड अथवा असत्य वा भ्रामक नाही.
-----------------------------------------------
आध्यात्मिक जीवन / मृत्यूनंतरचे मोक्ष इत्यादि गोष्टींना अवास्तव महत्त्व दिल्याने ऐहिक /भौतिक जगाकडे, वर्तमानकाळातील वास्तवाशी आणि आव्हानांशी काडीमोड घेतल्याचेच हे परिणाम आहेत ,असे मला वाटते . > > > >

हे ऐहिक / भौतिक जग, ही वर्तमानकाळची ( वाटणारी ) वास्तवता, हे सर्वच त्या अध्यात्मिक जीवनाचा एक अत्यंत अल्पसा अंश आहे.

अध्यात्म ह्यापासुन वेगळे नाहीच ( जसे वाटते ) पण खरी वास्तविकता ही आहे कि, हे सर्वच अध्यात्माचाच एक भाग आहे.

आपली दृष्टी केंद्रित न करता आपण जर खर्‍या मोकळ्या मनाने पाहिले तर उमजेल कि, आपण पृथ्वीवरुन दिसणारे आकाश नाही आहोत, पण ते सर्व आकाशच आपण आहोत ज्यात एका अल्पश्या अंशात ही पृथ्वी स्थीर आहे आपल्याच चक्रात. कृपा करुन नीट विचार करुन पहा मी काय म्हणतो आहे ते !
हे नसेल कळले तर सांगावे, मी आणखीन व्यवस्थितपणे सांगायचा प्रयत्न करेन, पण हेच आहे ते ज्ञान, जे उमजणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ही गोष्ट हसण्यावारी नेण्याजोगी नाहीये, ही बाजु एकदा कळाली कि, आपली संपूर्ण जीवनाची सांगड चटकन उमजते

मंदार कात्रे साहेब . . . .
कृपया राग मानु नये, पण ईथे अभ्यासापेक्षा प्रयत्नांची आवश्यकता आहे.

अभ्यास - अभ्यास . . . . असे केल्याने प्रयत्न कधीच होत नाही, पण प्रयत्न केल्याने अभ्यास आपल्या आपणच होतो.

माझे काहीतरी पुन्हा ईथे चुकले असेलच ! त्याबद्दल क्षमस्व.

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

>>>>> मला एक प्रश्न पडला आहे
विसाव्या अन एकविसाव्या शतकातला मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालित वाढलेला क्लर्की स्वार्थी पाश्चिमात्य अन परकियान्मुळे न्युनगन्डित झालेला/केला जात असलेला हिन्दु बघुन असा प्रश्न पडणे सहाजिक आहे.

>>>>> हिंदू धर्म / समाज नेहमीच आक्रमित / भयग्रस्त का?
इथे दुमत होते, एक तर हिन्दू समाज "नेहेमीच" वा खरेतर "कधीच" भयग्रस्त नव्हता, नाही त्यान्च्या देवाधर्माची शिकवण त्यान्ना भयग्रस्त बनवित. असे नसते तर पुढील तुमच्याच वाक्यातील काही शे वर्षांची परकीय आक्रमणे या हिन्दू समाजाने परतवून लावलीच नसती, अन इतक्या आक्रमणानन्तरही "हिन्दू" म्हणवुन घ्यायला तो शिल्लकच उरला नसता. त्यामुळे वर्तमानकालिक काही शहरी/पोटार्थी/स्वार्थी भयगन्डीत लोकान्च्या उदारहरणावरुन मी सम्पुर्ण हिन्दु समाजाला सर्वकाल भयग्रस्त मानायला तयार नाही.

>>>>>> 1000 वर्षांपूर्वी मुघल / 600 वर्षापूर्वी यूरोपियन आक्रमक धर्मविस्तारवादी माथेफिरु आणि सध्या ढोंगी लाळघोटे सेक्युलर <<<<<<
पृथ्विचा नकाशा उघडा, लक्षात घ्या, की मुघलान्चे आक्रमण केवळ भारतावर नव्हते, मुसलमानी सत्तान्नी केवळ भारतामधे घुसखोरी केली नव्हती, तसेच ख्रिश्चनान्चे अन गेल्या शतकात उदयास आलेल्या कम्युनिस्टान्चेही. पण बाकी सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावरून, या दोन्ही धर्मान्नी जिथे अन कम्युनिस्टान्नी जिथे जिथे आक्रमणे केली तेथिल स्थानिक संस्कृती/धर्म/पन्थ मुळासकट उखडून निघाले, केवळ अन केवळ हिन्दुस्थानातच त्यान्ना कडाक्याचा विरोध झाला/होतोय्/होत राहील, अन असा विरोध करुन स्व अस्तित्व टिकवण्याचे सामर्थ्य अन्गी असलेल्या हिन्दु धरर्मियांस "भयग्रस्त" समजणे मला शक्य नाही, हिन्दून्च्या शत्रून्नी समजले तर जरुर समजूदेत, ते जितके जास्त अज्ञानी रहातील तितके युद्धशास्त्रीय दृष्ट्या चान्गलेच नाहि का? Wink

>>>>> हिंदू धर्माने नेहमीच इतर अविकसित /रानटी संस्कृतींकडून हल्ल्यांना बळी पडत राहावे का? <<<<< यासही वरीलच उत्तर.

>>>>>> ताठ मानेने /स्वाभिमानाने आपला स्वत:चा धर्म-संस्कृती/मूल्ये यांवर आधारित जीवन जगणारा निर्भय समाज दीर्घकाळ कधी तरी अस्तीत्वात होता का? <<<<<< होय, पूर्वी होता, आत्ता आहे अन उद्याही असणार आहे. दरम्यानच्या काळातील अहिंसा/एकेश्वरवाद/चार्वाकवाद वगैरेसारखे काही (अन हल्लीचे बुप्रावादी/ब्रिगेडी/समाजवादी/कम्युनिस्ट/सर्वधर्मसमभावी कॉन्गी असे काही Proud यांचेवर मात होते आहे, पूर्ण व्हायचीये! ) बुद्धिभेदात्मक अडथळे सोडले, किम्बहुना या अडथळ्यान्वर मात झाली याचाच अर्थ हिन्दू धर्म अस्तित्वात होता, तुम्हाला का शन्का येत्ये काय की!

>>>>> 7500 वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास करता ,वैदिक काल / राम-कृष्ण-पांडव काल / विक्रमादित्य /राजा शिवाजी /राणा प्रताप यांचे कार्यकाल असे अपवादात्मक कालखंड वगळता हिंदू समाज भीती ,गुलामगिरी आणि दास्य यात जखडलेला आढळतो. <<<<<< यावर प्रचण्ड काही लिहीता येईल, पण इथे इतकेच लिहीतो की हे विधानच मला अमान्य आहे. असे काही एक दास्य खरोखर असते, अन येथिल हिन्दू समाज जर गुलाम/मृतवत झालेला अस्ता, तर आज जो हिन्दू धर्म तुम्ही बघता त्यातला कणही शिल्लक दिसला नसता, हवे तर इतर पूर्वेकडच्या व पश्चिमेकडच्या सर्वच देशान्चा इतिहास बघुन घ्या. एक मात्र खरे, की सातत्यपूर्ण आक्रमणान्मुळे येथिल समाजरचनेबरोबरच येथिल ज्ञान/विज्ञान/संस्कृतीतील बराचसा भाग नष्ट झाला/नव्याने रचावा लागला, पण जो काही शिल्लक आहे, त्यातुन फिनिक्स पक्षाप्रमाणे हिन्दू धर्म पुन्हा पुन्हा आक्रमकान्च्या तोन्डाला पाने पुसत नव्या दमाने उभा राहिला आहे हा इतिहास आहे.

>>>>>> कदाचित याला हिंदूंची कथित पापभीरू वृत्ती ,ब्राहम-क्षात्र तेजच्या समन्वयाचा अभाव आणि तथाकथित शास्त्र-पुराणातून सांगितलेल्या भाकडकथा आणि पाप-पुण्याच्या भ्रामक कल्पना हे सारे कारणीभूत असेल का ? <<<<< हे विधानही सम्पुर्णतया अमान्य. कारणे वर दिलीच आहेत.

>>>>> आध्यात्मिक जीवन / मृत्यूनंतरचे मोक्ष इत्यादि गोष्टींना अवास्तव महत्त्व दिल्याने ऐहिक /भौतिक जगाकडे, वर्तमानकाळातील वास्तवाशी आणि आव्हानांशी काडीमोड घेतल्याचेच हे परिणाम आहेत ,असे मला वाटते . <<<< हे विधानही अमान्य. किम्बहुना मृयुनन्तरच्या जीवनाबद्दल अतिशय उत्तमरित्या जे भाष्य हिन्दू धर्माने केले आहे तसा अभ्यास राहूदेच, विचारही करणे बाकी कुणाला सुचले नाहीये. अन मृत्यु पश्चात जीवनाची खात्री असतानाच देहाचे नश्वरत्व व इश्वराचे अस्तित्वच, इतक्या प्रचण्ड सन्ख्येने सातत्याने होत असलेल्या आक्रमकान्ना जीवाची पर्वा न करता लढा देऊन परतवुन लावण्याचे बळ जीवन/मृत्युनन्तरच्या जीवनाबद्दलची सुस्पष्ट दिशाच देऊ शकते असे माझे मत.

>>>> जय हिंद !
जय हिंद ! जय महाराष्ट्र

विचारपूर्वक दिलेल्या आणि विचारप्रवर्तक अशा प्रतिसादांसाठी आभार .

थोडेसे अवांतर-

<<हल्लीचे बुप्रावादी/ब्रिगेडी/समाजवादी/कम्युनिस्ट/सर्वधर्मसमभावी कॉन्गी असे काही >> अशा मंडळींचे आज मीडिया मध्ये प्राबल्य दिसते . बिकावू मीडिया मुळे जनमत काही प्रमाणात तरी प्रभावित होते.

उदा. आज इशरत जहा सारख्या केस मध्ये भ्रष्ट तपासयंत्रणा आणि मीडिया ने जे चित्र उभे केले आहे,ते पाहून मीडिया च्या बुद्धीची कीव येते. खरेखुरे जिहादी आतंकवादी शस्त्रसज्ज होवून हल्ला करायला आले तरी त्यांना कंठस्नान घालण्या ऐवजी अटक का केली नाहीत ? असे बुद्धीहीन प्रश्न मीडिया पोलिसांना/गुजरात सरकारला विचारून Fake Encounter असल्याचे भासविले जाते. आणि मोदींची छबि मुसलमानांचा कर्दनकाळ अशी उभी करून केंद्र सरकार राजकीय लाभ उठवू पाहत आहे.

हिंदू धर्मात जातीयवाद हा अति प्रमाणात आहे एका जातीला दुसर्या बद्दल विश्वास नाही. त्या मुळे भयग्रस्त असावा.क्षत्रीयावर सारी जनता युद्धासाठी अवलंबून राही. राम-कृष्ण-पांडव काल ह्यांच्यावेळी हि जातीयवाद होताच. शाम्बुकाची हत्या रामायण काळात झाली. एकलव्य हा आदिवासी युवक धनुरविद्या शिकला म्हणून द्रोनाचार्याजीनी गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला. ह्या मागे हा क्षत्रिय नसून विद्या शिकला ह्याचा राग होता. म्हणजेच ह्या जातीव्यवस्थेमुळेच एकही जातीला परस्पराबद्दल विश्वास नसल्यानेच हिंदू समाज हा सदैव भयग्रस्त राहिला असावा.

Mandar Katre, इथे वेगळी घटना सांगितली आहे. समाजात प्रतिकारशक्तीची आग असतेच. तिच्यावर फुंकर घालून निखारा फुलवावा लागतो. या चौघांनी हेच केलं.
आ.न.,
-गा.पै.

हिंदू समाजाचा इतिहास गेल्या हजारो वर्षांचा आहे असे म्हणतात. त्याकाळी काय झाले, त्यावरून आजच्या समाजाचे मूल्यमापन करणे कठीण. आता हे खरे आहे, की आक्रमणे झाली, गेल्या हजार वर्षात अनेक पराभव सहन केले.
माझ्या मते त्याचे कारण ते लोक हिंदू म्हणवून घेत असतील स्वतःला, पण त्यांना धर्म पूर्णपणे समजला नाही. इतर अनेक भानगडी जसे अध्यात्म, मुंज, पूजा, ब्राह्मणांना दक्षिणा, याचबरोबर गीतेचा अभ्यासहि महत्वाचा आहे हे ते विसरले.
अधर्म, अन्याय यांच्या विरुद्ध लढणे हे कर्तव्य आहे. कर्तव्य केलेच पाहिजे हे ते विसरले. धर्माचे रक्षण करायचे तर दुर्बळ असून चालत नाही, हे फक्त काही लोकांना कळले. त्यांची संख्या कमी. तेंव्हा सरसकट हिंदू समाज घाबरट नव्हता, पण मोठ्ठा भाग अज्ञ होता. त्यांना धर्महि समजला नाही नि जे प्राण्यांना सुद्धा कळते की एकी ठेवावी, ते पण त्यांना कळले नाही. सतत आपआपसात दुही. आपली मालमत्ता, प्राण, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी काय केले पाहिजे ते त्यांना कळलेच नाही.

आता आजचा 'हिंदू' समाज! हे कसले हिंदू? काय कळते त्यांना हिंदू धर्मातले? ना धड जुनी कर्मकांडे नाहीत ना काही नवीन अक्कल नाही. निव्वळ स्वार्थी. भयग्रस्त वगैरे काही नाहीत. निव्वळ गोंधळलेले. अजूनहि स्वतःच्या देशाचे, धर्माचे, समा़जाचे रक्षण कसे करावे याची अजिबात अक्कल नाही.
हिंदू समाज म्हणू नका, भारतीय म्हणा. ते तर मुळीच भयग्रस्त नाहीत. निव्वळ स्वार्थी. आपले कर्तव्य काय, ध्येय काय याबद्दल त्यांच्या कल्पना म्हणजे जमेल तेव्हढा पैसा करायचा, मग धर्म, समाज, देश गेला खड्ड्यात.

नुसतीच कृष्णाची प्रार्थना करून नैवेद्य हादडू नका. एकत्र या, साध्य काय, ते कसे साह्य करायचे, त्यासाठी कुणाचे कर्तव्य काय याची योजना करा, नि मग त्या मार्गाने इकडे तिकडे न पहाता, आपले कर्तव्य करीत रहा. भक्ति मनातल्या मनात करता येते.त्यासाठी काम थांबवून स्वस्थ बसण्याची गरज नाही!