आठवणी विंबलडनच्या

Submitted by Sanjeev.B on 26 June, 2013 - 06:51

जुन महिना उजाडलं कि, सर्व टेनीस प्रेमींना वेध लागतात ते विंबलडन चे. जसे क्रिकेट मध्ये आय सी सी च्या विश्वचषक स्पर्धेला महत्व व लोकप्रियता, तसेच किंबहुना त्यापेक्षा ही जास्त टेनीस मध्ये विंबलडन चे लोकप्रियता. क्रिकेट आवडण्यापुर्वी टेनीस आवडायचे, आम्ही सारे मित्र टेनीस ह्या खेळाला विंबलडन म्हणायचो, बॅडमिंटन चे बॅट आणि टेबल टेनीस चे बॉल घेऊन आम्ही विंबलडन खेळत होतो.

मला बिजॉर्न बॉर्ग फार आवडायचा, त्याच्या सारखेच डोक्याला हेड बॅन्ड घालुन मी हा खेळ खेळत होतो. बॉर्ग नंतर जॉन मॅकेनरो ही सुरुवातीला हेड बॅन्ड घालायचा, पण मला नेहमीच बॉर्ग आवडायचा.

Bjorn Borg.jpg

बॉर्ग बेसलाईन च्या खेळीसाठी प्रसिध्द होता, पण मला जे एक दोन मॅचेस आठवतात, त्यात त्याने नेट च्या जवळुन केलेले रॅली पाहण्यास फार मजा आली होती.

बॉर्ग X मॅक चे मॅचेस म्हणजे पर्वणीच होती, आम्हाला ते खेळ एव्हढे समजत नव्हते, पण विंबलडन मधले बॉर्ग X मॅक चे मॅचेस आम्ही चुकवत नव्हतो. फ्रेंच ओपन,यु एस ओपन आम्ही एव्हढे फॉलो करत नव्हतो, पण विंबलडन चे फायनल मॅच आम्ही न चुकता बघत होतो. त्या काळी फक्त दुरदर्शन होते, आजच्या सारखे चॅनेल्स चे महापुर नव्हते, सगळ्या मॅचेस पाहायला मिळत नव्हते, उपांत्य आणि अंतिम फेरी चे सामन्यांचे प्रसारण केले जायचे.

१९८० साल चे विंबलडन च्या सेंटर कोर्ट वर बॉर्ग आणि मॅक चे फायनल मॅच मला आज ही आठवतं, चौथ्या सेट च्या टाय ब्रेकर, मॅक ने १८-१६ अशी जिंकली होती, दोघे फार चिकाटीने खेळत होते, बॉर्ग ने ती मॅच पाचव्या सेट मध्ये ८-६ असे जिंकले. २-३ आठवड्यापुर्वीच हा मॅच स्टार स्पोर्ट्स वर परत पाहण्यास मिळाले, बॉर्ग ला खेळताना पाहुन मी तर पार मंत्रमुग्ध झालो, एकदम बालपणी चे दिवस आठवलेत. बॉर्ग जेव्हढं शांतपणे खेळायचा, मॅक तेव्हढाच चिडचिडत खेळायचा, त्याचे ते विंबलडन अधिकार्‍यां बरोबर भांडणे, त्याचे ते रॅकेट फेकणे, हे त्यालाच शोभत होते, दोघांना फायर अ‍ॅन्ड आईस असे संबोधण्यात येत होते.

बॉर्ग नंतर मला आवडायला लागला तो, जिमी कॉनर्स. मला, जिमी त्याच्या खेळा पेक्षा मला जास्त आवडत होता तो त्याच्या लुक्स आणि कोर्ट वर सदैव हसत राहणे ह्यासाठी, किती ही अटीतटी चा सामना असो, ह्याच्या चेहर्‍यावर दबावाचे काहीच खाणाखुणा नसायचे.

जिमी आणि मॅक ची रायव्हलरी ही त्याकाळी खुप गाजली, किंबहुना, बॉर्ग X मॅक रायव्हलरी पेक्षा ही जास्त, जिमी मॅक एकुण ३४ वेळा आमने सामने भिडले, त्यात मॅक ने २० वेळा विजय संपादन केले, तर जिमी ने १४ वेळा. १९८२ चे सेंटर कोर्ट वरचे ते द्वंद्व, ही तर टेनीस चाहत्यां साठी मेजवानीच होती, जिमी ने तो सामना ३-६ ६-३ ६-७ ७-६ ६-४ असे जिंकले, त्या काळी तो सामन विंबलडन च्या इतिहासातल्या सर्वात जास्त वेळ खेळले गेलेले सामना मध्ये गणले गेले होते.

Jimmy Connors.jpg

जिमी नंतर स्टिफान एडबर्ग आणि बॉरिस बेक्कर आवडायला लागले. बॉरिस हा विंबलडन जेतेपद जिंकणारा पहिलाच अनसिडेड खिळाडु होता व १९८५ साला पर्यंत कोणतेही ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारा सर्वात लहान खिळाडु होता. हे विक्रम नंतर मायकल चँग ने १९८९ साली फ्रेंच ओपन जिंकुन मोडीत काढले. बॉर्ग X मॅक रायव्हलरी सारखे, बेक्कर X एडबर्ग रायव्हलरी ही फार गाजले. १९८८, १९८९ आणि १९९० सलग तीन वर्षे विंबलडन च्या फायनल्स मध्ये दोघे आमने सामने आलेत, ज्यात स्टिफान ने १९८८ आणि १९९० जेतेपद जिंकले आणि बॉरिस ने १९८९ साली जेतेपद जिंकले. त्या दरम्यान ही दुसरे खिळाडु जे आवडत होते ते म्हणजे मॅट्स विलँडर आणि इवॉन लेंड्ल, पण त्यांना कधी फॉलो केले नाही, नंतर फॉलो केले ते फक्त आंद्रे अ‍ॅगसी ला. अ‍ॅगसी चा खेळ कधी आवडला नाही, पण जेव्हा तो सुरुवाती ला आला तेव्हा त्याचे झिपरेपण फारच आवडले, तसे गोरान इवॅनसेविक ही त्याच्या खेळापेक्षा त्याच्या सर्व्स आणि एसेस साठी आवडायचा. सर्वाधिक एस (१०८१३) चे विक्रम गोरान च्या नावावर आहे, कोणत्याही स्पर्धेत सर्वात जास्त एस नोंदवण्याचे विक्रम ही गोरान च्य नावावर आही (२१२ एस, २००१ सालच्या विंबलडन मध्ये, त्याच स्पर्धेचे जेतेपद त्यांनी पटकावले होते). पीट सॅम्प्रस चे सर्व ही वेगवान असायचे पण तो कधी आवडला नाही, त्या दरम्यान क्रिकेट जास्त आवडायला लागले व विंबलडन फॉलो करण्याचे थांबविले होते.

आवडणारे भारतीय टेनीस खिळाडु म्हणजे फक्त विजय अमृतराज, रमेश कृष्णन ने जरी ज्युनियर विंबलडन आणि फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले होते आणि १९८६ साली विंबलडन च्या उप उपांत्या फेरी पर्यंत मजल मारली होती, तरी विजय अमृतराज सारखे त्याचे खेळ नव्हते.

विजय अमृतराज आणि जिमी कॉनर्स एकुण ११ वेळा भिडले, त्यात विजय अमृतराज ने ५ वेळा विजय संपादन केले. विजय अमृतराज ने एकदा मॅक ला आणि एकदा बॉर्ग ला सुध्दा हरविले होते.

पीट सॅम्प्रस पर्यंत टेनीस फॉलो केले मग नंतर सोडुन दिले, कदाचित इकडे भारतीय क्रिकेट संघ फार छान कामगिरी करत होती म्हणुन असेल बहुधा.

महिला टेनीस मध्ये मार्टिना नवराटिलोवा, स्टेफी ग्राफ, मोनिका सेलेस इथपर्यंतच फॉलो केले, पण लक्षात राहण्यासारखे एक ही सामना आठवत नाही, लक्षात राहिले ते फक्त मोनिका सेलेस वर सामना सुरु असताना टेनीस कोर्ट वर झालेले खुनी हल्ला, ज्या मधुन ती बचावली.

आता कधीतरी विल्यम्स भगिनी चे मॅच असणार तर पाहतो, पण नजाकत ऐवजी पॉवर प्ले जास्त वाटतं.

सेंटर कोर्ट वरचं ते हिरवळ, अंपायर्स ने silence please म्हणताच शांत झालेले प्रेक्षक, सामना जिंकल्यावर चेंडु प्रेक्षकां मध्ये भिरकावणे हे मला फार आवडत होतं.

क्रिकेट मधले मॅच फिक्सिंग / स्पॉट फिक्सिंग ने एव्हढा उबग आले कि ह्या वर्षी चँपियन्स ट्रॉफी पाहिलेच नाही. विंबलडन चे फायनल मॅच चे प्रसारण तरी बघायचेच. बघु जमतं का.

धन्यवाद. Happy

संजीव बुलबुले (२६.जुन.२०१३)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users