भेटवस्तू होलसेल मध्ये पुण्यात कुठे विकत मिळतील?

Submitted by रंगासेठ on 26 June, 2013 - 02:03

नमस्कार

आमच्या घरी होणार्‍या एका कार्यक्रमासाठी येणार्‍या पाहुण्यांना भेटवस्तू द्यायची आहे. सदिच्छा/ धन्यवाद अशा संदर्भाने. एखादं शो-पीस अथवा गणपती बाप्पाच्या मूर्ती द्यावं असा विचार आहे. जवळपास २५-३० लोक असतील.

तर पुण्यात अश्या भेटवस्तू होलसेल मध्ये कुठे विकत मिळतील? तुळशीबाग / सोमवार पेठ (की रविवार पेठ??) येथे जावे लागेल का? एखादे दुकान माहिती असेल तर कृपया माहिती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रविवार पेठ उत्तम राहिल.
पण मला असे वाटत की घरात उपयोगात येईल अशी वस्तु द्या. मागे एका कार्यक्रमात आम्हाला सिगल बेडशिट मिळाले होते.

रविवार पेठ... जवळपास सगळ्याच गोष्टींची होलसेल ची दुकाने आहेत. बरेच पर्यार उपलब्ध होतील.

रविवार पेठेतल्या पुरोहित स्वीट्सच्या गल्लीत उजवीकडे बरीच दुकाने आहेत. ( रामसुख मार्केट ) तिथे बाहेर पण दिकाने आहेत तसेच आतही दुकाने आहेत.

गिफ्ट आर्टीकल्स साठी पुरोहित कडून बाहेर पडल्यावर जो सरळ जाणारा रस्ता आहे तिथे डावीकडे एक दुकान आहे.. नाव विसरलो.. पण समोर भांड्यांची दुकाने आहेत... तिथे चांगली गिफ्ट आर्टीकल्स मिळतीत.

क्रोकरी टाइप मटेरियल साठी दिपक ग्लास हाऊस.. मंडई कडुन रविवार पेठेत जाताना डाव्याहाताला..

हो, मी पण रविवार पेठेबद्दल ऐकलय. धन्यवाद, जाऊन येतो तिथे.
>>पण मला असे वाटत की घरात उपयोगात येईल अशी वस्तु द्य>><< +१ तोच विचार आहे आत्ता. Happy