ग्लास पेंटींग्ज चे प्रदर्शन.

Submitted by डॅफोडिल्स on 7 November, 2008 - 04:59

DSC01789.jpg

तुम्हा सगळ्या मायबोलीकर मित्र मैत्रिणींना सांगताना मला आनंद होतोय की,

मी बनवलेल्या ग्लास पेंटींग्ज व इतर हस्तकलाकॄतींचे पहिले वहिले प्रदर्शन रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २००८ रोजी आयोजित करत आहे.
निमित्य आहे कर्नाटक राज्योत्सवाचं.

वेळ :

रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २००८ स. १० ते ८ पर्यंत.

ठिकाण :

नंदी गार्डन्स फेज -२, जे. पी. नगर ९ फेज, बंगळूर.
प्रवेश विनामुल्य.

वेळात वेळ काढून तुम्ही नक्की यालच.. हो ना?

स्वागतोत्सुक,
संपदा

गुलमोहर: 

प्रथम शुभेच्छा! आणि अभिनंदन! Happy
अहाहा! डॅफ़ो, काय सुंदर काढलय ग! दागिने तर अगदी खरेच वाटतायत.धनुर्धारी गणपती आणि बाकीची पण छान आहेत. आणखी फोटो दाखव की आम्हाला. आणि जमल तर पुण्यात पण प्रदर्शन ठेव, म्हणजे आम्हालाही बघता येईल. Happy
काय कला आहे ग तुझ्या हातात. मला साधी रेघ काढता येत नाही. ग्रेट>>>> माझीही तीच अवस्था आहे. Happy

अप्रतिम!!! काय सुंदर कला आहे ! किती वेळा पाहिले तरी समाधान होत नाही. अप्रतिम झाली आहेत सर्व पेन्टींग्ज.

धन्यवाद लोकहो !
ह्या प्रदर्शनातली ९० % पेन्टींग्स सेल झाली. Happy

शोभा, विद्या, बंडूपंत ....
तुम्हाला
मायबोली दिवाळी अंकात माझे ग्लास पेंटींग्ज् बघता येतील. Happy

डॅफोडिल्स, आताच तुझी दिवाळी अंकातली पेंटींग्ज पाहीली. मस्तच आहेत सर्व. मला सर्वच गणपती खुप खुप आवडले. मोर, पोपट, आफ्रिकन बायका ही छान झालेत..... तुला ही सर्व विविध गणपतींची चित्रे कशी मिळाली?.... हे ग्लास कलर खुप वर्ष झाल्यावर सुकतात का? आणि सुकल्यावर त्यात एनॅमल टाकले तर ते पुन्हा वापरण्या सारखे होतात का?....
आणि हो एक सांगायचे राहिलेच....तुझा आवाज ,सांगण्याची पध्द्त खुप आवडली.

Pages