'पुण्यातल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेज विषयी माहिती हवी आहे'

Submitted by शिवम् on 11 June, 2013 - 06:16

नुकताच MT CET चा निकाल लागला आणि त्याबरोबरच इंजिनिअरिंगच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे.

विशेषतः पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्येच प्रवेश घेण्याचा ओढा सर्वत्र दिसून येत आहे.

त्यासाठीच हा नवीन धागा.....

तरी JEE MAINS - 125
आणि CET - 120 या गुणांआधारे मिळणारे इंजिनिअरिंग कॉलेज सुचवावे (विशेषतः पुण्यातलेच)
तसेच
त्या ठिकाणी असणार्या हॉस्टेल, Faculty आणि fees विषयी माहिती हवी आहे...

मला माहीत असणार्या इंजिनिअरिंग कॉलेजेसची काही
नावे देत आहे. त्यातील कॉलेज विषयीही सुचवावे...

१.VIIT
२.MAEER'S MIT
३.PICT
४.Sinhgad college
५.D. Y. Patil
६.Pimpri–Chinchwad Engg. College

तरी प्लेसमेंटच्या संधी संबंधी ही माहिती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे शहर आणि परिसरातील काही चांगले कॉलेज
सी ओ ई पी (आपण टॉपर असाल तरच)
एम आय टी कोथरुड
वाडीया पुणे स्टेशनजवळ
व्ही आय टी सहकारनगर
ए आय एस एस पी एम एस ( आर टी ओ जवळ )
मॉडर्न,पी आय सीटी, असे बरीच कॉलेज आहेत पुणे विद्यापीठाशी सलग्नीत असेल तर बहूतेक कॉलेजेस चांगली आहेत.

अ‍ॅडमिशन फी डिपेन्डस ऑन कॉलेज /सोसायटी साधारण ४०००० ते १०००००० ( बहुतेक ़ओलेजमध्ये पुढच्या वर्षी फ्रीशीप घेवून रिफंड मिळविता येतो

प्लेसमेंट कॉलेजवर नाही आपल्या गुणवत्तेवर होते

४०००० ते १००००००
दहा लाख? बाप रे! इतकी फी इंजिनियरिंग कॉलेजांची आहे पुण्यात? काशीबाइ नवले मेडिकल कॉलेज प्रायव्हेट आहे. त्याची ६.५ लाख ऐकली होती.

MIT कोथरूड म्हणालात त्यात MAEER'S आहे की
MAHARASHTRA INSTITUTE OF TECHNOLOGY ?
किंवा त्या दोन पैकी कुठलं जास्त चांगलं आहे?
मलाही डाऊट आहे..

धन्यवाद mansmi18,किरण कुमारजी, हिम्सकूल !!
सुशांतचा डाऊट मलाही आहे..
मला १२६ मार्क्स आहेत सीईटीत
त्यादॄष्टीने सुचवावे....:स्मित:

maeer's alandi..

MIT, MITCOE, kothrud..

MIT संस्थेचीच कॉलेजेस आहेत पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत..

गेल्या वर्षीचे कट ऑफ काय आहेत त्यावरुन काही तरी सांगता येईल...

तसेच ब्रँच स्पेसिफिक आहे की कॉलेज तेही महत्त्वाचे आहे. ब्रँच स्पेसिफिक असेल तर कोणत्याही कॉलेज मध्ये ती ब्रँच घेता येईल.. आणि कॉलेज स्पेसिफिक असेल तर त्यात कोणत्याही ब्रँचला अ‍ॅडमिशन घेता येईल..

कॉलेजेसचा साधारण क्रम.
सीओइपी
पीआयसीटी
व्हिआयटी
कमिन्स (फक्त मुलींसाठी)
पीव्हीजी
एमआयटी (किमान ४ वेगवेगळी कॉलेजेस, त्यातील एक फक्त मुलींसाठी)
सिंहगड (किमान ४ वेगवेगळी कॉलेजेस, त्यातील एक फक्त मुलींसाठी)
एआयएसएसएमएस (ह्यांचे पण मुलींचे वेगळे कॉलेज आहे बहुतेक)
मॉडर्न
वाडिया (इथे डिप्लोमा खूप वर्षांपासून आहे त्यामुळे इंजिनीयरिंग पण उत्तम आहे)

वरच्या यादीत सीओईपी आणि व्हिआयटी (अप्पर इंदिरानगर) हे ऑटोनोमस (पण तरीही एफिलिएटेड टू पूणे युनिवर्सिटी) अशी आहेत. म्हणजे यांच्या परीक्षा वगैरे सगळं स्वतंत्रपणे चालतं. विद्यापीठ वेळापत्रकाशी/ परीक्षापद्धतीशी यांचा त्या बाबतीत संबंध नाही. व्हिआयटीचंच VIIT आहे ते मात्र विद्यापीठाशी जोडलेलं आहे.

बाकी, कोणत्याही कॉलेजमधे गेलात तरी स्व-अभ्यासाला पर्याय नाही. जी चांगली मानलेली कॉलेजेस आहेत तिथे तुम्हाला रोजच्या हजेरीचा हिशोब सांभाळावा लागतो. आजकाल खूप ठिकाणी हजेरीबद्दलच्या नियमांची कडक अंमलबजावणी असते.

मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे हा सल्ला दिलाय, गैरसमज नसावा. कारण मी स्वतः अगदी गावाबाहेरच्या, त्याकाळी नव्याने सुरू झालेल्या कॉलेजचा ढिसाळ कारभार ते पुण्यासारख्या शहरातल्या, प्रस्थापित आणि नावाजलेल्या कॉलेजचा शिस्तबद्ध कारभार याचा अनुभव जवळून घेतलाय. हा फरक मला तरी महत्त्वाचा वाटतो कारण अशा गोष्टींमुळेच कॉलेजचं रेटिंग आणि स्टँडर्ड वाढतं आणि टिकतं.

तुम्हाला शुभेच्छा. Happy

शिवम,

मी दिलेल्या साईटवर कट ऑफ्स इ. सर्व माहिती आहे. तिथे एक फोरम आहे तिथे तुम्ही माहितीसाठी पोस्टही करु शकता. त्यात प्रत्येक कॉलेजवर रीव्युही आहे.. उदा.
http://stupidsid.com/index.php/engineering-college-reviews?id=892

मला सीईटीत 129 मार्क्स आहेत ..
MAEER'S MIT KOTHRUD मध्ये कोणती ब्रॅंच मिळू शकेल?

शिवम AICTE च्या साईट वर सुध्दा clgs ची माहिती आहे.

तुम्हाला कोण्ती ब्रॅंच वा कॉलेज मिळू शकेल यासाठी लास्ट इयर कट ऑफ बघा
शक्यतो १ ल्या रांउडला जे ( आपलाच प्राधान्यक्रम ठरवून)मिळतय ते पदरात पाडून घ्या

धन्यवाद किरण कुमारजी...
आपल्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल..!!

शिवम्... पीव्हीजी बद्दल अजून माहिती म्हणजे नक्की काय हवे आहे... उत्तम कॉलेज, सध्या प्लेसमेंट्स पण चांगल्या आहेत.. शहराच्या मध्यभागात.... आजूबाजूला सोयी आहेत.

धन्यवाद हिम्सकुलजी...

Faculty बद्दलच जरा माहिती हवी होती..

॓2-3 दिवसच शिल्लक आहेत व cutoff च्या द्रुष्टीने pvg मिळायची शक्यता आहे म्हणुनच pvg बद्दल specific माहिती विचारली....

धन्यवाद...

option form भरताना खालील पद्धतीने कॉलेजेसचा क्रम भरण्याचा मानस आहे....

1.Govt. College of Engg, Aurangabad
2.PICT
3.MIT
4.PVG
5.VIIT

तरी काही त्रुटी असल्यास बदल सुचवावा...
(वरील कॉलेज cutoffच्या द्रुष्टीने तसेच admission
मिळण्याच्या शक्यतेनुसारच भरत आहे)

ऑप्शन भरताना कॉलेजबरोबर ब्रॅच चा ही कोड टाकावा लागतो,
प्राधान्यक्रमात तुम्ही वेगवेगळे क्रम ठेवू शकता

जस कि
१.Govt. College of Engg, Aurangabad- कंपुटर
२.Govt. College of Engg, Aurangabad- इ एन टी सी
३.MIT - इ एन टी सी
४ .Govt. College of Engg, Aurangabad- कंपुटर
५VIIT- इ एन टी सी
६Govt. College of Engg, Aurangabad- मेकॅनिकल /सिव्हील

आपल्याला कोणती ब्रँच निवडायची आहे तर मनाशी पक्क ठरवून घ्या - केवळ हे कॉलेज मला जवळ आहे,किवा फेमस आहे म्हणून कुठलीही ब्रँच स्वीकारु नका -

कॉलेज फक्त ४ वर्षे आहे तुमची आवड /ब्रँच तुम्हालाआयुष्यभर निगडीत असेल.

ब्रँच निवडताना तज्ञांचा सल्ला घेतल्यास उत्तम

सध्या राऊंडची कन्सेप्ट काय आहे ते माहिती नाही.. पण ती जर आधी होती तशीच असेल तर मग तुम्हाला एखाद्या कॉलेज मधली ठराविक ब्रँच हवी असेल आणि गेल्या वर्षीच्या कट ऑफ नुसार मिळणार असेल तर त्याला पहिला प्रेफरन्स द्या.. जेणेकरुन फर्स्ट राऊंडलाच तुम्हाला हवे असलेले कॉलेज आणि ब्रॅंच मिळेल आणि काम होइल..

किरण कुमारांनी जे लिहिलेले आहे ते अगदीच खरे आहे.. पण जर तुम्हांला आयटी मध्ये यायचे असेल तर ब्रँच फारशी महत्त्वाची ठरणार नाही.. तर कॉलेजमध्ये कोणत्या कंपनीज येतात ते जास्त महत्त्वाचे ठरेल.. (शक्यतो आयटी, कॉम्प, इलेक्स, इ&टीसी, ह्या ब्रॅंच घेतल्यास उत्तम. पण मेक, प्रॉड, सिव्हील ह्यातील विद्यार्थी सुद्धा आयटीमध्ये जातात)

पण जर कोअर इंजिनीयरींग मध्येच नोकरी करायची असेल तर मात्र ब्रँच फारच महत्त्वाची ठरेल.

कॉलेज फक्त ४ वर्षे आहे तुमची आवड /ब्रँच
तुम्हालाआयुष्यभर निगडीत असेल.>>>1+

नक्कीच...
मला mech घ्यायची इच्छा आहे.
पण मागील वर्षाच्या cut off च्या द्रुष्टीनं pvg,mit,MAEER'S MIT असे प्रतिष्ठीत College मिळण्याची शक्यता नाही...

मग काय करावे अशी आपली सूचना राहील...??

Mech साठी pes Modern, Modern (Wadia ),
Sinhgad Vadgaon(bk),VIIT,DY Patil (Aakurdi),
DY Patil (pimpri)...यापैकी किंवा व्यतिरीक्त कोणते college चांगले राहील..???
(कारण वरिल clg मधे mech मिळण्याची शक्यता आहे)

व्ही आय टी, सिंहगड,वाडीया, असा क्रम ठिक वाटतो,

मेकॅनिकल ब्रँच - उत्तम आहे,
पोस्ट ग्रॅजूएशन करणार असाल तर व्ही आय टी मधील प्रॉडक्शन पण घेवू शकता.

प्रथम तुम्हि option form भरताना home university and other than home university चे cut off check करा . this year cut off will come down by 4-5 marks . i am working in admission process if u need any help tell me.

तुम्ही सीईटी च्या अडमिशन प्रोसेस मध्ये आहात काय ??
असल्यास १२९/११४ मार्कांवर तसेच जेईई १२५ मार्कांवर कोणते college मिळू शकेल / योग्य राहिल ??

option form bharlyaanantar aamhaalaa at a time kiti college allot hotil???
i.e. 1 or more??

dte will allot only one college. for which brach you are looking for? r u from pune university?

i am not from Pune University..but
I am from BAMU ,Aurangabad
pls suggest me colleges &branches .

माझ्या भाच्याच्या वेळेला केलेली स्ट्रॅटेजी..(त्याचा प्रवेश मुंबईत झाला).

सूचना:पुढील गोष्टी त्या वेळी केलेल्या या प्रवेश प्रक्रियेच्या अनुभवावरुन लिहिल्या आहेत. त्या सगळीकडे लागु पडतील असा दावा मुळीच नाही. कृपया या विषयातील आणि प्रक्रियेतील तज्ञ लोकांचा सल्ला घेउन निर्णय घ्यावेत.

सर्वप्रथम आपला मेरिट नंबर पाहुन आपल्या "वर" किती नंबर आहेत ते पहायचे. त्यात आपल्या वाटेतले "काटे" किती आहेत पहायचे. उदा. जर तुम्ही पुण्यात पाहत असाल तर मुंबई किंवा नागपुर इ. भागातले तुमच्या "वर" असतील तरी त्यांची तुम्हाला भिती नाही कारण त्या भागातले "१२०" च्या वरचे लोक साधारण पुण्यात तुमच्या मधे जनरली येत नाहीत. एकदा पुण्यातले आपल्या "वर" किती आहेत कळले की मग प्रत्येक कॉलेजमधे किती जागा आहेत ते पहायचे. (ही सगळी माहिती प्रवेश प्रक्रियेच्या साईटवर असते). मग मेरीटमधले "वरचे" उत्तम कॉलेजेस घेतील हे धरुन तेवढ्या सीट्स वगळायच्या आणि आपल्या आवाक्यात कुठले कॉलेज येत आहे ते पाहुन मग ऑप्शन भ्ररायचे.

पहिल्या राउंडला आपल्याला मिळणार नाहीत अशी कॉलेजेस भरायची. (म्हणजे मार्कांप्रमाणे आपल्या आवाक्याच्या बाहेर पण मिळाले तर काही प्रॉब्लेम नाही अशी) म्हणजे जर अलॉकेशन झाले तर फायदाच नाहीतर तोटा नाही.

पहिल्या राउंडनंतर परत लिस्ट जाहीर होते त्यात आधीच्या राउंडमधे कन्फर्म अ‍ॅडमिशन केलेले बाहेर जातात. साधारण टॉपर्स मग परत आपल्या आवाक्यात काय येते ते पहायचे. आणि त्याप्रमाणे ऑप्शन्स भरायचे. या राउंडला प्रवेश मिळण्याचे चान्सेस जास्तीत जास्त!

आणखी काही मुद्दे:
१.कॉलेजेसच्या स्वतःच्या सीट्स असतात त्यांची प्रवेश प्रक्रिया वेगळी असते. त्यातही ते मेरिट प्रमाणे प्रवेश देतात. त्याची त्या त्या कॉलेजमधे चौकशी करणे. त्यात प्रवेश मिळुन जातो काही वेळेला.

२.काही वेळा हाय मेरिट वाले "जुगार" खेळुन अ‍ॅडमिशन सोडुन देतात कारण त्याना आणखी वरची ब्रांच हवी असते. उदा. सी ओ ई पी त एखाद्याला काँप्युटर हवे असते पण ते त्याला मिळणार नस्ल्याचे चान्सेस असतात मग तो असे ऑप्शन्स भरतो कि त्याला काहीच मिळणार नाही. त्यानंतर तो शेवटच्या फेरीची वाट पाहतो त्यात त्याला औरंगाबादला प्रवेशासाठी जावे लागते.
तिथे अशा भितीने, नैराश्याने दुसर्‍यानी "सोडुन" दिलेल्यापैकी सी ओ ई पी ची सीट त्याला मिळते.

३.बर्‍याच वेळा लोक असे करतात की ज्या कॉलेजेस च्या स्वतःच्या सीट्स असतात त्यातील आपल्याला "चालेल" असे एखादे कॉलेज निवडुन तिथे अ‍ॅडमिशन घेउन ठेवतात कि ज्यामुळे ते हा "जुगार" खेळु शकतात. पण अशा जुगारासाठी तुमच्यात मानसिक बळ असणे आवश्यक आहे.(आणि पैसाही..कारण कॉलेजमधील अ‍ॅडमिशन कॅन्सल केली तर फीची रक्कम लगेच परत मिळत नाही).

४. या सगळ्या माईंड गेम मधे पडायचे नसेल तर दुसर्‍या राउंडला जे मिळेल ते बर्‍यापैकी कॉलेज "पदरी पडले पवित्र झाले" असे मानायचे, पैसे भरायचे आणि अभ्यासाला लागायचे.

शुभेच्छा..

for other than home university cut offs are more. Please tell which branch u prefer. In general now a days students are preferring E and TC and Mechanical. Mechanical at no. 1 so cut offs of mech are highest one. For your marks u can get admission in VIIT, Sinhgad etc. First confirm branch then its easy to choose college.
If possible see cut offs of last year from dte website.

हिम्सकूलजी ,आपण वर pvg तील electronics & mechanical बद्दल बोललात..
पण मला तिथे electrical भेटते आहे..
त्यदृष्टीने pvg चा preference दिल्यास योग्य ठरेल का?
Electrical ब्रॅंच साठी कसे आहे ते कॉलेज ,faculty आदी...

Mech घ्यायची इच्छा जरूर आहे.
पण त्यासाठी clg compromise करावे लागेल.

मग आपले opinion काय राहिल..??

Cutoff wise मला,
1.MAEERs MIT ..(I.T.) & (CIVIL)
2.PVG..(COMP),(Mech),(Ele),(EnTC)
3.VIIT ...all branches
4.Sinhgad Vadgaon Bk...all branches

मिळू शकतील...
.
माझा branches साठीचा क्रम ..
1.mech
2.etc
3.comp
4.civil

असा आहे....

आपल्या मते वरीलपैकी कोणते best राहील...:)

जर आयटी मध्ये जॉब पाहिजे असेल तर नॉर्मली सर्किट ब्रांच बघावी. बर्‍याच कंपन्या कॅम्पसला सर्किट ब्रांचचा क्रायटेरिया ठेवतात.

O.k. Happy

शिवम मित्रा,

कॉलेज कोणत ह्याचा उपयोग कॉलेज नंतर तु पुण्यात वा म्हाराष्ट्रात नोकरी संदर्भात होऊ शकतो. पण अन्यता त्याला काहीच अर्थ नाही. जर पुढे शिकण्याचा, पोस्ट ग्रॅज्युएशन्चा, मानस असेल तर योग्य युनिव्हरसिटि असणे महत्वाचे. कारण परिक्षा कॉलेज घेत नाही ती युनिव्हर्सीटि घेते. तुझे शेवटचे सर्टिफिकेट हे त्या युनिव्हर्सीटिचे असते कॉलेजचे नाही.

कॉलेजचा माहोल जास्त महत्वाचा मिळणारे मित्र व त्यांच्यातली कुछ बनने कि जिगर व कोंपेटेटिव्ह स्पिरीत असेल तर अजुन उत्तम कारण इट हेल्प्स टू स्टे फोकस.

मनापासुन काय कराय्चे आहे ते आधी तपासुन बघ ते ठरले कि कॉलेज निवड. मला तरी पुण्यातल्या कॉलेजचे रँकिंग युसलेस वाटते.

पीव्हीजी इलेक्ट्रिकल पण चांगले आहे..>>>
एक मित्र होता पीव्हीजी ला. एलेक्ट्रिकलच.
त्यांना कॅम्प्स रिक्रुटमेन्ट मिळाली.
रादर त्याला कोअर कंपनीतच जायच होतं.
तो सिमेन्स मध्ये सिलेक्ट झाला.

मला हा धागा आवडलाय शिवम,
काय मिळालं/घेतलंस ते सांग रे
मित्रा शेवटी.>>> अवश्य इब्लिसजी... Happy

.

कॉलेजचा माहोल जास्त महत्वाचा मिळणारे मित्र व
त्यांच्यातली कुछ बनने कि जिगर व कोंपेटेटिव्ह
स्पिरीत असेल तर अजुन उत्तम कारण इट हेल्प्स टू
स्टे फोकस.>>>आपणांस अनुमोदन पेशवाजी.... Happy

.

मनापासुन काय कराय्चे आहे ते आधी तपासुन बघ ते
ठरले कि कॉलेज निवड. ..नक्कीच Happy

PCCOE Mechanical branch bhetate aahe ..krupayaa margadarshan karaave

Pages