भाडेकरू ला भाडे पावती देण्या बद्दल (११ महिन्याचा करार)

Submitted by सुरजभोसले on 5 June, 2013 - 08:14

भाडेकरू ला Income Tax ला देण्या साठी भाडे पावती हवी आहे. ती द्यावी का?
Wording (Format) काय असावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाडेकरू ला Income Tax ला देण्या साठी भाडे पावती हवी आहे. ती द्यावी का?
>> हो, दिलेल्या भाड्याची पावती मिळणे हा त्याचा अधिकार आहे.

स्टेशनरीच्या दुकानात छापील पावत्याचे रेंट बुक मिळते. त्याचा Format बरोबर असतो.

हा आहे Format:

RECEIPT OF HOUSE RENT

(Under Section 10(13A) of Income Tax Act)

Received from ____________________ an amount of Rs __________

(In words____________________________________________________)
towards the rent of residential accommodation at

Following address:
_____________________________
_____________________________
_____________________________
_____________________________

For the month of / months of __________________

(Affix Revenue Stamp of Rs.1/-)

Date: Signature of The House Owner

Landlord details:
PAN No : _______________________
Name : _____________________
Address: ________________________
________________________________
________________________________

Note: Land Lord PAN is Mandatory, if the rent paid is more than Rs.1.8 lakhs per
annum/15000 per month to land lord.

पावती द्या. त्याने तुम्ही मालक आहात हे सिद्ध होते. घर बळकावणे कठीण.

भाडे पावती देताना, त्यात उदा. भाडे १००० रुपये असेल, तर घरभाड्यापोटी रुपये ५००, मेन्टेनन्सपोटी २०० व म्युन्सिपाल्टीपोटी ३०० रुपये, एकूण १००० घेतले असे नमूद केले तर फायद्याचे होते. त्याला १००० रुपयावर टॅक्स सवलत मिळते, तुम्हाला घरपट्टी ५०० रुपयांवर लागते.

अधिक खुलासा इन्कमट्याक्स कन्सल्टन्ट करतीलच.

लोकांचे फुकटचे सल्ले एकु नका. त्यापेक्षा वकिलाला गाठा. आणी उत्तरे देणार्या महाभागांना विनंती आहे कि पुर्ण माहित नसेल तर तारे तोडु नयेत तुम्हि प्रश्न विचारणार्याचे नुकसान करत आहात.

भाडेकरु असणे आणी live and license agreement असणे यामध्ये कायदेशीर प्रचंड फरक आहे. तुमच्या प्रश्नावरुन असे वाटते आहे की तुमचा ११ महिन्याचा live and license करार आहे. पावती द्याल तर फसु शकाल.

http://articles.economictimes.indiatimes.com/2008-08-03/news/28390597_1_...

लीव्ह लायसेन्स केले तरी कंपनीत इनकम टॅक्स साठी पावती लागतेच की... कंपनीत कुठल्यातरी फेक पावत्या कित्येक जण सादर करतात.. त्यापेक्षा प्रत्यक्ष ओनरलाच जर कोणी मागत असेल तर त्यात काही प्रॉब्लेम नसावा.. त्यातही वकिलाशी एकदा बोलून घ्या..

Proud "माणुस" नामक आयडी वकील असून फी घेतल्याशिवाय नीट सल्ला देणार नाहीत असे दिसते. यांना सखोल माहिती (बिना पावतीचे व्यवहार करणेविषयी) असल्याने, यांना आपण प्रत्यक्ष संपर्क करून विचारावेच, अशी धागाकर्त्यांना विनंती

हो आम्ही ११ महिन्याचा live and license करारा ने भाडेकरू ठेवला आहे.
त्यासाठी भाडे पावती वेगळी असते का ?

त्यासाठी भाडे पावती वेगळी असते का ?<< हो. दर महिन्याला भाडेकरूने भाडे भरले आहे आणि ते तुम्हाला मिळाले आहे यासाठी ही पावती द्यावी लागते. आमचे घरभाडे कंपनी भरत असल्याने आम्हाला या पावत्या दर महिन्याला कंपनीत द्याव्या लागतात. आमच्या घरमालकाला पण हे पावती प्रकरण नवीन होते, आमच्या एजंटानेच त्यांना पावतीपुस्तक आणून दिले आणि त्यामधली एक पावती दर महिन्याला ते आम्हाला लिहून देतात. शिवाय, ऑन द सेफर साईड म्हणून भाडे नेट बँकिंगने सरळ घरमालकाच्या खात्यातच भरतो. (कॅश कधीच नाही).

माझ्यामते आपलं घर कुणालाही भाड्याने देताना सर्व कायदेशिर बाबी पाळाव्यात. त्याने फायदा होतो. रितसर अ‍ॅग्रिमेंट्/भाड्याच्या पावत्या/मेंटेनन्स्/जर पुन्हा त्याच भाडेकरूला घर द्यायचं असेल तर अ‍ॅग्रिमेंट रिन्यू.. इ. शिवाय भाडेकरूची बॅक्ग्राऊंड तपासून जवळच्या पोलिस ठाण्यात तशी नोंद. हे सर्व वेळ खाऊ प्रसंगी खर्चिक असू शकते पण पुढे येणार्‍या कोणत्याही आपत्तीपासून आपल्याला वाचवू शकतो. कोणतीही अनपेक्षित घटना घडली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात हे सादर करायला तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्हाला शांत झोप लागेल.

भाडेकरूला भाडे पावती मिळणे हा त्याचा अधिकार आहे, आणि तुमचं आद्य कर्तव्य.
हे माझं मत.

भाडेकरूला भाडे पावती मिळणे हा त्याचा अधिकार आहे, आणि तुमचं आद्य कर्तव्य.>>>>
लीव्ह लायसेन्स केले तरी कंपनीत इनकम टॅक्स साठी पावती लागतेच की>>>>>>
हो आम्ही ११ महिन्याचा live and license करारा ने भाडेकरू ठेवला आहे.
त्यासाठी भाडे पावती वेगळी असते का ?>>>>>>>>>>

live and license agreement केले असेल तर भाडे पावती मागण्याचा कोणताहि अधिकार नसतो. कारण मुळात ज्याच्या सोबत हा करार केला आहे तो कायदेशीर भाषेत भाडेकरु नसतो. त्याला फक्त जागा वापरायची परवानगी दिली असते.

A lease or rent, defined under Section 105 of The Transfer of Property Act, 1882, is a transfer of the right to enjoy the concerned property for a pre-defined time period or in perpetuity. The lessor (owner of the property) gives the lessee (the one leasing the property)

याचाच अर्थ असा की तुमच्या property मध्ये दुरुस्ती, रंगरंगोटी, बदल करण्याचे त्याला अधिकार मिळतात.
The rent agreement transfers the right of ownership to the tenant for an indefinite period of time, which can be problematic because it encourages the tenant to claim the right to permanent occupation. In numerous cases, tenants have refused to relocate. When brought to court, these cases can take 10 to 20 years to resolve.

License is defined in Section 52 of the Indian Easements Act,1882. License does not allow any interest in the premises on the licensee's part. It merely gives the licensee the right to use and occupy the premises for a limited duration.

Most landlords prefer a Lease and License Agreement. This agreement only grants the tenant a license to occupy the property for a period of 11 months, with an option for periodic renewal. Because the rent control laws (which are largely in favor of tenants) only apply for lease agreements of at least 12 months, establishing an 11-month agreement serves as a pre-emptive measure.

परत वरील सर्वच महाभागांना विनंती आहे की माहित नाहिये तर तारे तोडु नका. हा काहि फालतु बाफ नाहिये कपुगिरी करायला. एका माणसाचे नुकसान करत आहात तुम्हि.

बाकि भोसलेसाहेब, तुम्हि मोकळे आहातच हवे ते करायला!

माणुस, जरा विस्कटून सांगाल का? माझा थोडा गोंधळ उडतो आहे. म्हंजे, घर भाड्याने देताना नक्की कुठ्ली प्रोसिजर वापरावी?